पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/320

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २७९ ) ॥ १ ॥ जेवि चन्हि सूर्यकांती । प्रगटतां कण या नेणती ॥ २ ॥ शक्तिका असवे मुक्ताफळ । जळिचे परी त्या नेणे चि जळ ॥ ३ ॥ निळा म्हणे धूम्रा वन्ही । नाहीं चि तयातें प्रसवोनी ॥ ४ ॥ ॥ १३६० ।। माया ब्रम्हचा आभास । नाहीं ब्रह्म ते निःशेप ॥ १ ॥ यालागी दिसे ते टवाळ । रत्न चि ते रत्नकीळ ॥ २॥ मूर्य चि सूर्यते प्रकाशी । न देखोनियां तम तेजासी ॥ ३ ।। निळा ह्मणे स्वसंवेद्या । नातळे विद्या ना अविद्या ॥ ४ ॥ ॥ १३६१ ॥ आत्मा निघोर निर्मळ | नातळे तो मायामळ ।। १ । जेवीं मृगजळातें भानु । प्रगनियो वेगळा भिन्नु ॥ २॥ आत्मबिंब नव्हे छाया । तैमी स्वरूप मिथ्या माया ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे स्वानुभवें । विचारित होईल ठावें ।। ४ ।। | ॥ १३६२ ।। कृपा केला संतजन । अर्थ दाविले उघडुनी ॥ १ ॥ ते चि प्रगट केले आतां । नाहीं वोलिलों मी म्वनः ।। ३ । नेण काय चैलें संतीं । माझी चैतडनियां मत ।। ३ ।। निळा ह्मणे ओढा वारा । नाहीं तोंडा ना अक्षरा ॥ ४ ॥ | ॥ १३६३ ॥ सव माजी गगन आहे । परी धरितां चि नये काय ॥ १ ॥ तैसें नाकले चि ते शब्दातें । जेवीं वद्योते रवीभेटी ॥ २॥ सागरी पडतांचि लवण क प । निवडतां भिन्नु न निवडे ॥ ३॥ निळा ह्मणे तैशा परी । वोलतां चि वैखरी लीन तेथें ॥ ४ ॥ ॥ १३६४ ।। नाही ह्मणतां अवघे तेंचि । आहे ह्मणतां चिं दावितां नये ॥ १ ॥ ह्मणोनियां न चले शब्द । राहे वेवाद ऐलाडी तो ॥ २ ॥ डोळा देखणा देखे सर्व । न देखे वरव आपली तो ॥ ३॥ निळा ह्मणे तेवी जाण जातां । जाणणे चि तत्वता वस्तु होये ॥ ४ ॥ | ॥ १३६५ ॥ हात पाय इंद्रिये मिळोनी मेळा । चला ह्मणती पाहों डोळां ॥ १ ॥ देखणे चि नव्हती देवती काये । अवधीयाचा देखणा डोळा चि आहे ।। २ ।। आतां डोलिया डोळा पाहों ह्मणे । तंव आपापणीया न चले पाहाणें ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसिया परी । जाणों जातां जाणणे चि हार ॥ ४ ॥