पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८ } ॥ ९६३ ॥ ते चि भक्त भागवत । संतसेवे जे निरत ॥ १ ॥ शुद्ध यांचा भक्तिभावो । संत वरदें लाभ देवो ॥ २ ॥ संतवचनीं विश्वासती । सय परमार्थ त्यांचे हातीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतसेवा । घडे या उदयो झाला देवा ॥ ४ ॥ | ॥ ९६४ ॥ संत जयां हातीं धरिलें । ब्रह्मसनातन ते पावले ॥ १ ॥ आणिकां दुर्लभ जें साधने । यांच्या प्राप्त अवलोकनें ॥ २ ॥ फळ अना- पेक्ष पावती । प्राणियांचिये संगती ॥ ३ ॥ निळा ह्मणे कल्पतरु । सामान्य दाते हे ईश्वर ॥ ४ ॥ ॥ ९६५ ॥ संत केला अंगीकार । मज हा निर्धार वाणला ॥ १ ॥ सांचिया बोलें अभयदानें । निःशंक वचनें हीं ऐसी ॥२॥ नाहीं को गोवा- गुंती । अक्षरे चालती गुंफिलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे सयासाठीं । जाणती चावटी माझी ते ॥ ४ ॥ ॥ ९६६ ॥ संत ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त में पायी आपुलीये ॥ १ ॥ तेणे समाधान वृत्त । नव्हे चि स्थिती पालट ॥ २ ॥ अखंडता राहिले ध्यान । होउनी उन्मने मनाचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपा केली । जाणों आली या अर्थे ।। ४ ।। ॥ ९६७ ॥ अवलोकिलें कृपादृष्टीं । केली वृष्टि वचनामृतें ॥ १ ॥ अंकु- रले भाववीज । कारण निज अंतरींचें ॥ २ ॥ संतांची हे सहज स्थिती । आठव देतीं स्मरणाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे धांवोनि येती । आणि उपदे- शिती निज गुह्य ॥ ४ ॥ | ॥ ९६८ ॥ आपण चि ते येती घरा। देखोनि बर निज भाव ।। १ ॥ आप्तपणे आलिंगिती । मनींचा पुरविती हेत सकळ ॥ २ ॥ अनाथ अनन्य देखोनी रंक । करिती कौतुक खेळविती ॥ ३ ॥ निळा म्हणे लाविती सेवे । आपुलिया वैभवें गौरविती ॥ ४ ॥ |॥ ९६९ ॥ चीजवीत धरा येती । ज्याचा देखती शुद्ध भावे ।। १ ।। ऐसे करुणाघन हे संत । करिती हेत परिपूर्ण ॥२॥ पाचारुनियां हृदयीं धरिती । निकट बैसाविती" जवळी या ॥ ३ ॥ निळा ह्मणे अनुभव झाला । तो चि दाविला बोलोनीं ॥ ४ ॥