( २१७ )
रेघा ओढीत बैसला घरीं ॥ दैव मोडोनी आलें वरी । होतें संचित
ह्मणउनी ॥ ७ ॥
| ॥ ९५८ ॥ भावें ओजावली भूमिका । वरी कृपाघन वोळली निका ॥
संती वीज दिधलें फुका । तें चि पेरिले ते चि क्षणीं ॥ १ ॥ वाफलें है
बरावरी । कणसे दाट आल्या घुमरी ॥ पिकलें न समाये अंबरीं। चहुं कौन
सारिखें चि ॥ २ ॥ निळा केला भाग्यवंत । सर्वगीतां नावरे पीक अद्भुत ॥
राशिवा केला न लगे अंत । माप करितां नावरेसा ।। ३ ।। उमर जातां
अधिक चि वाढे। दिसों चि लागे पुढे पुढे ॥ सांजे भरले सीग न मोडे।
मोडती गाडे ओढतां ।। ४ ।। नवल पिकाची हे धणी । होती संतकृपेची
पेरणी । पुरे उरे नन्हे चि उणी । पदरी भरुनी वैसलों ॥५॥ निळा झाला
सदैव आतां । अपार लेखा चि नव्हे चित्ता ॥ सांठवू जाणतां नेणतां ।
राहो भरिता उरलें तें ॥ ६ ॥
|॥ ९५९ ।। सोडोनियां चाती पोतीं । कृपा करुनी दिधली हातीं ॥ १ ॥
संत उदार उदार । कुटविलें निज भांडार ।। २ ।। होते सायासे जोडिलें।
निक्षेपीचें तें दाविलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे उदारपणा । मेरु संतांच्या
डेंगणा ॥ ४ ॥
॥ ९६० ॥ न करिती चि कांहीं वाणी। देता पुरवित आयणी ॥ १ ॥
म्हणती व्यारे च्या निज मुखें । अचयां एक चि धन सारिखें ॥ २ ॥ नाहीं
वांटितां भागले । सदासर्वदा हरिखले ।। ३ ।। निळा म्हणे पूर्णपणें ।
नेदित पड़ों कोठें उणें ।। ४ ।।
| ॥ ९६१ ॥ खाती अापण जें जेविती । तें चि आणिकां ही वादिती ॥१॥
अजि बहुता भाग्ये भेटी । झाली चरण पडली मिठी ॥ २ ॥ नाहीं चि
आम्हांसी वंचिलें । निज गुज अवघं चि अपुलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपा-
वैत । केलें अनाथा सनाथ ॥ ४ ॥
1} ९६२ ॥ अर्थ अवधे चि याचे हातीं । जया देऊ जे बोलती ॥ १ ॥
त ते तात्काळ चि पावले । जगामाजी धन्य झाले ।। २ ।। नाहीं चि वेळ
काळ गुंतीं । देतां रेक थोर नेणती ॥ ३ } निळा म्हणे अवलोकनँ ।
तोडिती भवाची बंधनें ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/258
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
