पान:ज्योतिर्विलास.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ सविता. मारे ८६०००० मैल आहे. प्रभामंडल पाऊण लक्षापासून १६ लक्ष मैल पर्यंत रुंद असते. म्हणजे तेजोगोलाच्या वर इतकें उंच असते. क्रांतितेज या नांवाचें तेज क्रांतिप्रदेशांत सूर्यापासून सुमारे १० कोटी मैलांपर्यंत पसरलेले आहे. त्याचे वर्णन पुढे येईल. चित्रांक ८ यांत सूर्याचे प्रभामंडल आणि तेजःशृंगें दाखविली आहेत. सन १८६९ च्या आगस्ट महिन्यांत अमेरिकेंत खग्रास-सूर्यग्रहण झाले त्या वेळी ते चित प्रथम काढिलेले आहे. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी प्रभामंडल कधी कधी नसत्या डोळ्यांनी देखील दिसते, असें दुर्बिणीच्या पूर्वीची खग्रासग्रहणांची वर्णने आहेत त्यांवरून दिसून येते. ती ग्रहणे पाहणारांस त्याचे स्वरूप व कारण माहित नव्हते. परंतु दुर्बिणीतून त्याचे स्वरूप स्पष्ट दिसून आल्यावर पूर्वीची वर्णने या मंडळाचीच आहेत, असे सिद्ध झाले. सूर्यग्रहणांत चंद्रबिंबाच्या योगाने सर्याचे आच्छादन होत होत पूर्ण आच्छादन झाल्यावरावर बिंबाभोंवताली विलक्षण तेजस्वी प्र. QQUNA Lee SUSPE खेड, (पुणे.) NAUVA चित्रांक ९–सूर्याचा तेजोगोल, क्रकचावरण आणि तेजःशृंगे. जान काही मिनिटे दिसते. बिंबाच्या जवळचा भाग फार तेजस्वी असतो. तो कांहीसा तांबस असतो. त्याच्या बाहेर पिवळसर अथवा मोत्यासारखा वर्णन सतो. सुमारे मंडळाचा अर्धा भाग चांगला तेजस्वी दिसतो. त्याच्या बाहेर तेज अस्पष्ट होऊ लागते, व शेवटाकडे ते अगदी पांढरे दिसते. हे वर्ण सर्वदां सारखे नसतात. अलीकडील वेधांवरून दिसून आले आहे की प्रभामंडल अगदी वाटोळे असते असा नियम नाही. कधी कधी त्याचा आकार अनियमित असतो. कधी