पान:ज्योतिर्विलास.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ ज्योतिर्विलास. मित ते आवरण नसते. तथापि आपण त्यास कचावरण म्हणूं. ह्यांत दोन थर आहेत. खालचा सूर्यबिंबापासून सुमारे एकदोन विकला आहे. आणि वरचा सुमारे दहापंधरा विकला आहे. म्हणजे आंतल्याची उंची सुमारे पांचसाहाशे मैल आहे, आणि बाहेरच्याची सुमारे दोन हजारपासून सात हजारपर्यंत मैल आहे. या आवरणांतून मधून मधून तांबड्या किंवा गुलाबी रंगाच्या ज्वाला बाहेर येत असतात. ह्या कधी थोड्या असतात, कधी पुष्कळ असतात. सूर्यावर डाग नसतात तेव्हां ह्या बहुधा मुळीच नसतात. ह्यांस आपण तेजःशृंगें अथवा शृंगें म्हणूं. तेजोगोलापासून चित्रांक ८-सूर्याचे प्रभामंडल आणि तेजःशृंगें. हा कधी कधी ५०० मैल उंच असतात. कधी १००००० मैल उंच जातात. क्र. चावरणार्भावती लखलखीत प्रभामंडल असते. ह्यास किरीट अशा अर्थाचें (corona) अस युरोपियन नांव आहे. हे मंडल तेजोगोलाच्या भोवती सर्वत्र असते. ह्यास आपण प्रभाकिरीटमंडल अथवा प्रभामंडल म्हणं. ह्यांत कधी कधी दोन भाग दिसतात. एक आंतला आणि एक बाहेरचा. आंतला विशेष तेजस्वी असतो. प्र. मडल कधी अगदी अरुंद असते. कधी तें कांहीं कला मात्र रुंद असते व की तर बिबाइतके बाहेर पसरलेले असते. सर्यावर डाग थोडे असतात तेव्हां ते अगदी लहान असते. डाग फार असतील तेव्हां फार रुंद असते. इ० सन १८८३ मच्या सूर्यग्रहणांत हे सूर्यबिंबाच्या दुप्पट रुंद होते. बिंबाचा व्यास सु