पान:ज्योतिर्विलास.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. चार बाजूस त्याचे कोपरे वाढलेले असतात. सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या एका ग्रहणांत तेजःशंगें दिसल्याचा उल्लेख आहे. परंतु त्यांकडे ज्योतिष्यांचे विशेष लक्ष लागल्यास सुमारे एक शतकच झाले. आणि क्रकचावरणाचा विशेष शोध तर गेल्या २० वर्षांत झाला आहे. चित्रांक ९ यांत सूर्याचा तेजोगोल, क्रकचावरण आणि तेजःशंगे दाखविली आहेत. ह्याचे मूळ चित्र इतालीतील प्रख्यात ज्योतिषी सेची याने इ. सन १८७१ मध्ये काढिलेले आहे. त्यांत निरनिराळी १७ शृंगे आहेत. सूर्यावर प्रभामंडल आणि तेजःशृंगें कशामुळे उत्पन्न होतात, हे मंडल, ती शृंगें, आणि क्रकचावरण यांची शारीरघटना कशी आहे, व या सर्वांच्या अंतर्भागी असणारा साक्षात् सूर्य हा काय पदार्थ आहे, आणि त्यावर डाग कां दिसतात, हे समजण्याविषयी सांप्रतच्या ज्योतिष्यांचे प्रयत्न चालू आहेत. आमचा नेता, आमचा पोषणकर्ता, किंबहुना आमचे सर्वस्व, असा जो सविता त्याचे ब्रह्मस्वरूप जाणण्याविषयी आमच्या प्राचीन ऋषींनी तपश्चर्या केली. सांप्रतच्या युगांत पाश्चात्य ऋषि परमेश्वराच्या ह्या अतितेजस्वी विभूतीचें प्रकृतिस्वरूप जाणण्याकरितां तपश्चर्या करीत आहेत. वर्णलेखक हे एक विलक्षण साधन त्यांस प्राप्त झाले आहे. सूर्यग्रहण आले की अगोदर कितीएक दिवस त्याचा त्यांस वेध लागतो. सूर्यावलोकन करण्याकरितां योग्य स्थळ शेकडो कोस लांब असले तरी दुर्बिणी, वर्णलेखक, इत्यादि खटाटोपासह तिकडे ते प्रयाण करितात. ग्रहणस्पर्शाची वाट पहात बसून स्पर्श होतांच आसन घालून जे बसतात ते मोक्षापर्यंत आसनावरून ढळत नाहीत. डोळ्याच्या पापण्याही त्यांस नकोशा होतात, मग अभ्रे आली तर ती त्यांस शत्रुवत् वाटत असतील यांत काय नवल ? इतक्या उत्सुकतेने ते सूर्यावलोकन करीत असता पूर्णग्रास पाहण्याची दहा वीस पळे मात्र टिकणारी संधि साधली आणि तीत सूर्याने प्रसन्नमुद्रेने त्यांस दर्शन देऊन वर्णलेखकादिद्वारे आपली प्रतिमा काढून दिली म्हणजे तपश्चर्येचें सार्थक झालेसे त्यांस वाटते. अशा एका ग्रहणानें काम होत नाही. १८६८ च्या आगष्टांत हिंदुस्थानांत खग्रास-सूर्यग्रहण होते. ते पुष्कळांस आठवत असेल. तेव्हां वर्णलेखक यंत्राचा उपयोग प्रभामंडल, तेजःशृंगे इत्यादि पाहण्याकडे प्रथमच केला. यरोपांतन कित्येक ज्योतिषी या देशांत आले होते. प्राचीन काळी जेथे आर्यऋषींनी तप केले तेथेच या तपास आरंभ होणे श्रेयस्कर म्हणूनच वर्णलेखक यंत्राच्या शोधानंतर पहिले मोठे ग्रहण ह्या देशांत दिसण्याचा योग ईश्वराने आणिला असे दिसते.* दुर्बिणीतून सूर्य फार तर दोन लक्ष मैलांवरून डोळ्यांनी पहावा असा दिसतो. * ह्या ग्रहणाच्या वेळी वेध घेण्यास कै० वा० केरोपंतनाना हे विजापुरास गेले होते. त्यांनी त्या ग्रहणाचें मनोरंजक वर्णन नवंबर व डिसेंबर १८६८ च्या शाळापत्रकांत केले आहे. त्यांत प्रभा. मंडलाविषयीं टेनेट याचा अभिप्राय दिला आहे, तो मात्र आतां चुकीचा ठरला आहे. हे ग्रहण विजापूर येथे ५ मिनिटें आणि मेकंद इतका वेळ खग्रास हात.