पान:ज्योतिर्विलास.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रजनीवल्लभ. रण असेल. म्हणजे फार तर ५० फूट उंच असेल. १०० फुटांहून तर जास्त नाहींच. सूर्यग्रहणाच्या वेळीही चंद्राच्या कडेवरून सूर्यकिरणांचे वक्रीभवन मुळीच होत नाही. यावरून चंद्रावर वातावरण मुळीच नाही असे दिसून येते. वातावरण नाहीं त्या अर्थी पाणी किंवा दुसरा कोणताही वाफ होणारा प्रवाही पदार्थ चंद्रावर नसला पाहिजे. असता तर सूर्याच्या अत्युष्णतेने त्याची वाफ होऊन त्या वाफेचे वातावरण बनले असते. दुसऱ्या प्रमाणांवरूनही चंद्रावर पाणी नाही असे सिद्ध झाले आहे. पाणी नाही आणि वातावरण नाही तेव्हां अर्थातच पाऊस व त्यापासून होणारे अनेक चमत्कार व फेरफार हे नाहीत. तसेंच वनस्पति नाहीत. वायु आणि पाणी यांच्या योगाने पृथ्वीवर नानाविध स्थित्यंतरे होतात तशी चंद्रावर होण्याचा संभवच नाही. _चंद्र प्राचीनकाळी द्रवावस्थेत होता असे अनुमान आहे. तेव्हांपासून त्यावर जी काय स्थित्यंतरें मागे झाली असतील ती खरी. सांप्रत चंद्राच्या शारीरस्वरूपांत कांहीं स्थित्यंतर होत आहे असे दिसत नाही. कोणाचे मत असें आहे की क्वचित् थोडथोडें स्थित्यंतर होत असावें. परंतु ते आपल्यास दिसत नाही. चंद्रापेक्षां सूर्य फार तेजस्वी दिसतो. परंतु दोघांच्या तेजांत जितका फरक असेल असे वाटते त्याहून तो फारच जास्त आहे. पूर्णिमेच्या चंद्राच्या ६ लक्ष पट तेजस्वी सूर्याचा प्रकाश आहे. ६ लक्ष पूर्णचंद्र प्रकाशले तर मात्र त्यांचा प्रकाश सूर्यासारखा पडेल. इतक्या चंद्रांस आकाशापेक्षा जास्त जागा लागेल. सूर्यापासून मिळालेल्या प्रकाशाचे परावर्तन चंद्र करितो, त्याप्रमाणे उष्णतेचेही करीत असला पाहिजे. चंद्रप्रकाशापासून काही उष्णता आपल्यास प्राप्त होते की काय ह्याविषयी अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. सुमारे २५।३० वर्षांपूर्वी ही उष्णता कोणत्याही यंत्राने अनुभवास आली नव्हती. परंतु त्यानंतर लार्ड रासच्या विशाल दुर्बिणीतून ती अनुभवास आली. परंतु ती इतकी थोडी आहे की, नाही म्हटले तरी चालेल. चंद्राच्या क्षयवृद्धीबरोबर उष्णता कमजास्त होते. सरासरीने सूर्यप्रकाशाच्या उष्णतेच्या २ लक्ष ८० हजाराव्या हिश्शा इतकी उष्णता चांदण्यांत आहे. त्यांतली सुमारे सप्तमांश उष्णता सूर्याच्या उष्णतेच्या परावर्तनामुके असते, आणि बाकीची साक्षात् चंद्रापासून अरीभवनाने बाहेर निघते. सूर्यप्रकाशामुळे चंद्र उष्ण होतो, आणि तो कांही उष्णता अरीभवनाने बाहेर टाकतो. पूर्णिमेच्या चांदण्यांत जितकी उष्णता असते त्याच्या सुमारे एक लक्ष पट उष्णला उन्हांत असते. तेव्हां चांदणे आपल्यास सौम्य वाटते हैं ठीकच आहे. सौम्य ह्या शब्दाचा मूळचा अर्थ चंद्रसंबंधी इतकाच आहे. परंतु चंद्रप्रकाशाच्या शीतलतेमुळे सौम्य शब्दाचा अर्थ शीतल, मृदु अशा प्रकारचा झाला आहे. चंद्रावर उष्णता आणि थंडी यांचे अंतर फारेनहाइटचे सुमारे ६०० अंश