पान:ज्योतिर्विलास.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ ज्योतिर्विलास. आहे. म्हणजे दिवसास पारा सुमारे २८० अंशांवर असेल आणि रात्री दोन-अडीचशे अंश शून्याखाली असेल. उष्णता आणि थंडी इतकी भयंकर, वायु नाही, पाण्याचा अभाव, वनस्पतीच दर्शन नाही, मग चंद्रावर प्राणी आहेत की नाही याचे अनुमान सहज होईल. ज्या प्रकारचे प्राणी आपल्यास माहित आहेत तसे तर चंद्रावर असण्याचा संभवच दिसत नाही. काही निराळ्याच प्रकारचे प्राणी तेथे असण्याची ईश्वरी योजना असेल तर न कळे. - कसेंही असो आपल्यास तर चंद्राचा अनेक प्रकारचा उपयोग आहे. त्याचा विस्तार येथे करणें नलगे. केवळ सौम्यदर्शनादिकांनीच तो रजनीचा वल्लभ झाला आहे, तसा आम्हां सर्वांचाही प्रियकर आहे.