पान:ज्योतिर्विलास.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. अनुमाने केली आहेतः-दुर्बिणीतून दिसणाऱ्या बहुतेक तारा आकाशगंगेच्या दिशेत असणाऱ्या गोलखंडांत आहेत. त्या गोलखंडाचा व्यास जाडीच्या सुमारे आठ पट आहे. या प्रदेशांत तारा सर्वत्र सारख्या दाट नाहीत. त्यांचे बहुधा निरनिराळे अनियमित समुदाय आहेत. त्यांच्या मर्यादा स्पष्ट नाहीत. आणि त्यांच्यामध्ये थोडी बहुत रिकामी जागा आहे. या समुदायांत · तारांची संख्या दोन पासून हजारोपयेत आहे. व कांही लहान लहान समुदाय मिळून मोठे समुदाय झाले आहेत. आपली सूर्यमाला बहुधा ह्या प्रदेशाच्या मध्यभागी आहे म्हणून आपल्यास सर्वे दिशांस बहुधा सारख्याच दाट तारा दिसतात. आपल्यास ६।७ हजार तारा नुस आग्निमेघप्रदेश अग्निमेघप्रदेश चित्रांक १९-विश्वसंस्था. त्या डोळ्यांनी दिसतात त्यांतील कृत्तिका, अरुंधतीकेश वगैरे काही गुच्छ खेरीज करून बाकी तारा आकाशांत सारख्या पसरल्या आहेत. विश्वाचा आकार वर सांगितलेल्या गोलखंडासारखा अगदी बरोबर आहे असें नाहीं; ते त्याचे सारण स्वरूप झाले. त्यांत मध्ये ज्या भागीं फार दाट तारा आहेत तो आकाशगंगाप्रदेश होय. याच्या दोहों बाजूस फारच पातळ तारा आहेत. त्या बाजूस त्या आकाशगंगाप्रदेशाच्या व्यासा इतक्या लांब पसरलेल्या नाहीत. तितक्या लांब कांही असल्यास फारच थोड्या आहेत. गोलखंडाच्या दोहों बाजंस तेजोमेघ (अग्निमेघ) प्रदेश आहे त्यांत तारा फार क्वचित् आहेत. आकाशगंगाप्रदेशाकडे यावे तसे तेजोमेघ पातळ आहेत. ही रचना चित्रांक १९ यांत दाखविली आहे. उत्तराफल्गुनी आणि स्वाती यांच्या मध्ये हा गुच्छ आहे. या अनिमेघ ) प्रदेश आहे त्याज्या आहेत. पसरलेल्या नाही