पान:ज्योतिर्विलास.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विश्व. सतां विश्वाच्या गोलखंडाची जाडी १५५ मा आणि व्यास ८५० मा आहे. म्हणजे प्रकाशास विश्वाच्या अगदी शेवटापासून पृथ्वीवर येण्यास सुमारे ६५०० वर्षे लागतात; विश्वाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यासाच्या दिशेने जाण्यास १३ हजार वर्षे लागतात आणि जाडीच्या दिशेने जाण्यास अडीच हजार वर्षे लागतात! वाचकांनी ह्यांचे सेकंद करून दर सेकंदास १८५००० मैलप्रमाणे विश्वविस्तार काढावा. आकाशांत तारा सर्वत्र सारख्या नाहीत; आकाशगंगेच्या दोन्ही बाजूसही कोठे कोठे फार दाट तारकागुच्छ आहेत; व आकाशगंगेतही कोठे खिंडारे आहेत. तेव्हां तारांच्या तेजांवरून विश्वविस्तार काढिला असतां तो अधिक निर्दोष होईल, असें पुढें हर्शल ह्यास दिसून येऊन तो तशा दृष्टीने वेध घेऊ लागला. तेव्हां त्यास दिसून आले की पहिल्या प्रतीच्या तारेच्या ९०० पट अंतरापलीकडे आपल्या दुर्बिणीची शक्ति चालत नाही. म्हणजे त्याच्या पलीकडे तारा आहेतच, परंतु त्या दिसत नाहीत. या शोधावरून विश्वरचनेचे स्वरूप त्याच्या मतें बदलले नाही. उलटा विश्वाचा विस्तार पूर्वी अनुमित केल्याच्या दुपटीहून जास्त आहे, म्हणजे विश्वाच्या एका टोकापासून आपल्याकडे प्रकाश येण्यास १४ हजार वर्षे लागतात, असे दिसून आले. ही संख्या फार दिसते. तथापि हे मत पर्वीच्या मतापेक्षां निर्दोष होय. परंतु सर्व तारांचे तेज सारखे आहे, कमजास्त अंतरामळे ते जास्तकमी दिसते, हा नियम सर्वाशी खरा नव्हे. चवथ्या प्रतीच्या तारेहन पांचव्या प्रतीची एकादी तारा जवळ असेल. तथापि सामान्यतः तो नियम खरा मानण्यास हरकत नाही. आणि सर्व तारांची अंतर प्रत्यक्ष काढतां येईपर्यंत त्याच नियमाचे अवलंबन केले पाहिजे. प्रॉक्टरचे मत असे आहे की विश्वाचा विस्तार व त्याचा आकार हर्शलने दाखविल्याप्रमाणे नाही. काही निरनिराळ्या तारासमहांची वास्तवगति समान आढळते यावरून त्या त्या तारा मिळून एकेक समुदाय अशा अनेक समुदायांनी आकाशगंगा झालेली आहे. तथापि विश्वाच्या एका टोकापासन दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास प्रकाशास हजारो वर्षे लागतात, याविषयी सर्व ज्योतिप्यांचे एकमत आहे. प्रॉक्टरच्या मताप्रमाणे कांहीं कांहीं तारांचे समूह परस्परसंबद्ध असतील असें जोडतारांवरून दिसते. परंतु याबद्दल जास्त शोध झाले पाहिजेत. वरील विचारांत तेजोमेघांचा विचार आला नाही. दोघां हर्शलांनी सुमारे पांच हजार तेजोमेघांचा शोध लाविला आहे. जेथें तारा फार दाट तेथें तेजोमेघ अगदी थोडे, आणि तारा फार पातळ तेथे दाट आहेत. आकाशगंगेच्या मध्यापासन दोहोंकडे पंधरा पंधरा अंश असा तीस अंशांचा पट्टा सगळ्या आकाशांत पसरलेला घेतला तर त्यांत आकाशाच्या एकंदर क्षेत्राचा सुमारे चतुर्थांश येतो. यांत एकंदर तारांपैकी १० आहेत व एकंदर तेजोमेघांपैकी फक्त आहेत. इतर प्रदेशांत तारा व तेजोमेघ आहेत. पूर्वीच्या ज्योतिष्यांची मते व आजपर्यंतचे शोध इत्यादि सर्व गोष्टींचा वि. चार करून न्यूकोंब नामक अमेरिकेतील ज्योतिष्याने विश्वसंस्थेविषयी अशी