पान:ज्योतिर्विलास.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विश्वः तारासमूहाच्या रचनेविषयी निश्चिपतणे काही सांगता येत नाही. म्हणून चित्रांत ते कसे तरी दाखविले आहेत. आकाशगंगाप्रदेशांतले तारासमूह तिच्या व्यासाच्या दिशेत सर्वत्र सारखे दाट पसरले आहेत किंवा एकाद्या वलयासारखे आहेत; म्हणजे मागे सांगितल्या चाकाच्या धांवेच्या मधली सर्व जागा तारांनी भरलेली आहे, किंवा मध्ये आपला सूर्य व त्याच्या भोवताली कांहीं तारा असून भोवताली कांही रिकामी जागा आहे, व तिच्या भोवताली दाट तारा आहेत; याविषयी अद्यापि शंका आहे. आकाशगंगेच्या बाहेरच्या प्रदेशांत कांही दाट तारागुच्छ दिसतात ते व तेजोमेघ हे दुसऱ्या जगांतले असावे असे काही कालामागे कोणाकोणांचे मत होते. परंतु आपल्यास हल्ली दुर्बिणीतून जेवढे दिसते तेवढे सर्व एकाच जगांतले आहे आणि ते सर्व चित्रांक १९ यांत दाखविलेल्या प्रदेशांत आले आहे असा निर्णय सांप्रत झाला आहे. मग आपल्या दृष्टीच्या बाहेर आणखी जगें असली तर नकळे. विश्वसंस्थेविषयी सांप्रत जो थोडा-बहुत मतभेद आहे तो तारांची वास्तवतेजें किती आहेत, म्हणजे सर्व तारा सारख्या अंतरावर असत्या तर तेजांच्या प्रती कशा झाल्या असत्या याविषयी ज्ञान बरोबर नाही, म्हणून आहे. परंतु काही तारांची अंतरें बरोबर समजली आहेत, त्यांच्या तेजांची तुलना केल्यावरून ह्या गोष्टीचा कां. हीसा निर्णय झाला आहे. व त्यांत आपल्या सूर्याहून इतर तारांचे तेज व महत्त्व कसे आहे हेही समजले आहे. ब्रह्महृदय ही तारा पहिल्या प्रतीच्या तारेचा उत्कृष्ट नमुना आहे. ती त्यांचे मध्यम मान दाखविते. आपला सूर्य हल्लीच्या २३६००० पट अंतरावर नेला तर ब्रह्महृदयेसारखा दिसेल. परंतु पहिल्या प्रतीच्या पुष्कळ तारा ह्याच्या चौपट किंवा पांचपट अंतरावर आहेत. तितक्या अतरावर आपला सूर्य नेला तर तिसऱ्या किंवा चवथ्या प्रतीच्या तारे एवढा दिसेल. तारांच्या वास्तव तेजाच्या सुमारे आठ दहा प्रती असाव्या, व लहान तारांच्या हजारो पट मोठ्यांचा प्रकाश असावा, असे दिसते. आणि अशा भेदामुळे विश्वविस्तार निश्चयाने सांगता येत नाही. _चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसा आपला सूर्य व त्याच्यासारखे तारारूपी अनंत सूर्य दुसऱ्या एका महासूर्याभोवती फिरत असतील असें मनांत येते. सूर्यमालेतले सर्व ग्रह व उपग्रह क्रांतिवृत्ताच्या जवळून फिरतात, तशा सर्व तारा आकाशगंगेच्या पातळीत एका मध्यबिंदूभोवती फिरत असतील असें कांटचे मत होते. परंतु असा महासूर्य असेल तर तो इतका मोठा असला पाहिजे की तो दिसल्यावांचून रहावयाचा नाही. परंतु असा एकादा पदार्थ दिसत नाहीं; आणि तारांच्या गति अगदी अनियमित आहेत. यावरून सर्व तारांचा एक मध्य नाहीं. तारांच्या निरनिराळ्या माला एकेका महासूर्याभोवती फिरत असतील व ते सूर्य फार मोठे परंतु अप्रकाशित आहेत, असे कांटच्या नंतर लांबर्ट म्हणून एक तत्त्ववेत्ता झाला त्याचे मत होते. परंतु तारांचा समुदाय दिसत असून त्यांच्याहून फार मोठा त्यांचा महासूर्य हा तेजस्वी नसल्यामुळे दिसत नाही असे असणे संभवत