पान:ज्योतिर्विलास.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास अजमास केला आहे की पहिल्या प्रतीच्या तारेपासून पृथ्वीवर प्रकाश येण्यास सरासरी १५ वर्षे लागतात. दुसऱ्या प्रतीच्या तारेवरून २८ वर्षे, तिसऱ्या प्रतीच्यावरून ४३ वर्षे व १२ व्या प्रतीच्यांवरून ३५०० वर्षे लागतात. चित्रांक १८ हा विश्वांतील तारांचा पट आहे. पहिल्या ५।६ प्रतींच्या तारांची पृथ्वीपासून अंतरे ही त्यांतील दोन तारांच्या अंतरा इतकी आहेत. म्हणजे ह्या नकाशांतील एका तारेपासून दुसरी पर्यंत जाण्यास प्रकाशास २०० वर्षे लागतात! विल्यम हर्शल व त्याचा मुलगा जॉन हर्शल यांच्यासारखे वेधकार त्यांच्या पूर्वी तर झाले नाहीतच; किंबहुना आजपर्यंतही कोणी झाले नाहीत. ह्या दोघांनी विश्वाची खानेसुमारी केली असे म्हणण्यास चिंता नाही. हर्शलचे मत प्रथम असे होते की आकाशांत तारा सर्वत्र सारख्या पसरलेल्या आहेत. अर्थात् ज्या दिशेत जास्त तारा दिसतील तिकडे त्या जास्त अंतरापर्यंत पसरल्या आहेत. आकाशगंगेशी लंब अशा रेघेत तारा थोड्या दिसतात यावरून तिकडे विश्व फार लांब पसरलेले नाही. या गोष्टीस अनुसरून त्याच्या मते विश्वरचना सामान्यतः ज्याच्या मध्यभागी गोलाचा मध्यबिंदु आहे अशा एका गोलखंडासारखी आहे. म्हणजे गाडीच्या चाकाच्या धांवेच्या आंतला सर्व भाग भरीव असतां जशी आकृति दिसेल तशी आहे. आकाशगंगेचा जो पट आकाशांत. सामान्यतः दक्षिणोत्तर दिसतो त्याच्या दिशेत तो गोलखंड आहे. आकाशगंगेशी लंब अशा पातळीने तो मध्यावर कापिला असतां जो छेद होतो तो चिनांक १८ यांत आहे. त्यावरून हर्शलच्या मते विश्वरचना कशी आहे हे समजेल. चित्राच्या मध्यभागी कोठे तरी आपला सूर्य आहे. व एका बाजूस २ फांटे दिसतात ते श्रवण नक्षत्राच्या उत्तरेस आकागंगेत २ फांटे फुटून दक्षिणेस गेलेले दिसतात ते होत. पृथ्वीपासून पहिल्या प्रतीच्या तारेचे सरासरी जे अंतर, म्हणजे १५चित्रांक १८-विल्यम हर्शलच्या मते वर्षांत प्रकाश जें अंतर ऋमितो, तें माप घेतले अ- . विश्वसंस्था.