पान:ज्योतिर्विलास.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धूमकेतु. १७७ तारखेस आपल्यास गांठणार असें स्वित्सलँदांतल्या एका अतिनिपुण जोशाने भाकात केले आहे व ते चुकावयाचे नाही, अशी बातमी युरोपांत जिकडे तिकडे पसरला. तो ज्योतिषी धमकेतंविषयीं व्याख्यान देत असतां इतकेंच बोलला की आगष्टच्या १२ व्या तारखेस जो उल्कापात होतो त्याचा संबंध एका धूमकेतूशी आहे. त्यावरून पिसाचा कावळा झाला. इ० स० १८४३ चा धूमकेतु सूर्याच्या फारच जवळ गेला होता. तितका जवळ दुसरा कोणताच धूमकेतु आजपर्यंत गेला नाही. त्याची कक्षा अमळ बद लली असती तर तो सूर्यावर आपटता. बंडाच्या साली म्हणजे १८५७।५८ साला एक मोठा धमकेत दिसत होता असे सांगतात. तो पन्हां २००० वर्षाना दिसल. -उपोद्घातांत (पृष्ठ ५) लिहिलेला धूमकेत १८९२ मध्ये मार्चपासून दिसत हाता असें गळसंदें तालुका पनवेल येथील एक ज्योतिषी रा० बाळा वामन यांनी मला लिहिले होते. मे महिन्यांत तो पूर्वाभाद्रपदांच्या उत्तरेकडील तारेच्या पूर्वेस हाता. मार्चच्या पूर्वी काही दिवस तो श्रवणाच्या पश्चिमेस दिसत होता असे मद्रासच्या वेधशालेतून प्रसिद्ध झाले होते. अर्थात् त्याची गति ग्रहांप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वस होती. हा केतु फार लहान होता. त्याची तारा ६ व्या प्रतीची होती. लघुकालिक धूमकेतु बहुतेक दुर्बिणकेतु आहेत. काही मात्र कक्षेच्या थोड्याशा भागी नुसत्या डोळ्यांनी दिसतात. परंतु ते लहानच आहेत. माहीत असणारा नियतकालिक मोठा धूमकेतु यापुढें इ० स० १९१० पर्यंत एकादा दिसण्याजोगा बहुधा नाहा. सन १८८२ च्या केतूसारखी एकादी भव्य मति केव्हां दिसेल याचा नियम नाहीं.. इ० स० १८२६ मध्ये बीला नामक ज्योतिष्यास एक केतु दिसला. त्याचा काल ६ वर्षे २२६ दिवस होता. इ० स० १८४६ च्या जानेवारीत एकाएकी त्याचे दोन तुकडे होऊन दोन केत बनले. सन १८५२ मध्ये दोन्ही पुन्हां दिसले. परंतु त्यापुढे ते आजपर्यंत मळींच दिसले नाहीत. त्यांच्या शेष राहिलेल्या द्रव्यांपासून ता० २७ नोव्हेंबरची उल्कावृष्टि इ० स० १८७२ पासून सुरू झाली असे दिसते. उल्कांचा धूमकेतूंशी संबंधः-नियमित काळी उल्कावृष्टि होते, तिचा अशनिसमूह धमकेतूंच्या कक्षेत फिरत असतो असें आतां सिद्ध झाले आहे. ही गोष्ट प्रथम इ० स० १८६६ मध्ये समजली. १८६६ च्या जानेवारीत एक केतु सयोजवळ आला होता त्यास टेंपलचा केत म्हणतात. त्याचा प्रदक्षिणाकाल सुमारे ३३। वर्षे आहे. त्याच्या कक्षेचे नीचस्थल पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ आहे. उच्चस्थल प्रजापतीच्या कक्षेच्या किंचित् बाहेर आहे. ह्याच कातन नवंबरच्या १३ व्या तारखेस होणाज्या उल्कावृष्टीचा अशनिसमूह फिरतो. ही कक्षा पृथ्वीच्या कक्षेस एके ठिकाणी छेदिते. त्या छेदनबिदूजवळ पृथ्वी हल्ली न. वंबरच्या १३ व्या तारखेच्या सुमारास येते. हा अशनिसमूह कक्षच्या सर्व भागी २३