पान:ज्योतिर्विलास.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याची काणाकाळ काढिला. कल गणित हाले नामक इ० स० १६.८२ मध्य ज्योतिर्विलास. आणि १६६६ या वर्षी मोठा अग्निप्रळय झाला. धूमकेतूंचे हे परिणाम होत, असे त्या वेळी सामान्य लोकांसच वाटले असे नाही, तर जाणत्यांसही वाटले. इ. स. १६८० चा धूमकेतु सूर्याच्या फार जवळ आला होता. इ० स० १६८२ मध्ये एक धूमकेतु दिसला. त्याच्या कक्षेचे गणित हाले नामक ज्योतिष्याने करून त्याचा सूर्यप्रदक्षिणाकाळ काढिला. केतूच्या गतीचे वेध घेऊन त्यांवरून गणिताने त्याची कक्षा ठरवून त्याचा प्रदक्षिणाकाळ काढिला असा प्रथम ह्याच धूमकेतूचा होय. व हे गणित हालेने केलें यावरून त्याचे नांव त्या केतूस दिले. सन १७५१ मध्ये हा पुन्हां दिसेल असा आजमास होता. त्याप्रमाणे त्या वेळच्या ज्योतिष्यांनी गणित करून त्याच्या दिसण्याची वेळ काढिली. या वेळी युरेनस आणि नेप्चुन् हे ग्रह माहीत नव्हते. यामुळे त्यांचे आकर्षण त्या गणितांत आले नाही. व पहिल्या खेपेचे वेध आधारास घेतलेले फार सूक्ष्म नव्हते. यामुळे वर्तविलेली वेळ सुमारे एका महिन्याने चुकली. सन १८३५ मध्ये गणित केले तेव्हां नेप्चुन् माहीत नव्हता. यामुळे वर्तविलेल्या वेळेनंतर ३ दिवशी धूमकेतु सूर्याजवळ आला. ही चुकी अगदीच थोडी किंवा मुळीच नाही म्हटले तरी चालेल. २०० वर्षापूर्वी धूमकेतु म्हटले की 'स्वैरगति' असे वाटत होते. त्यांची दर्शन वेळा ३ दिवसांच्या अंतराने अगोदर वर्तविली ही काही सामान्य गोष्ट नाही. ह्यावरून सर्व धूमकेतूंची अशी वर्तवितां येते असे समजावयाचे नाही. तरी धूमकेतु हे जगाचा प्रलय करणारे आहेत असे नाही, तर तेही इतर ज्योतीप्रमाणे नियमबद्ध आहेत एवढें न्यूटनच्या व हालेच्या वेळेपासून सिद्ध झाले. धूमकेतूंनी कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने जगास भिववावे असा काही गुण त्यांच्या अंगी आहे की काय नकळे. इ. सन १६८० पूर्वी त्यांच्या गतिस्थितीविषयी काही माहिती नव्हती म्हणून मनुष्यांस भय वाटत असे. त्याच्या पुढे उ. लट स्थिति झाली. त्यांचे गणित करितां येऊ लागले म्हणून ते भयप्रद झाले अशी २ उदाहरणे घडली व तीही ह्या सुधारणाकाळांतल्या १८ व्या व १९ व्या शतकांत ज्ञानसंपन्न लोकांत घडली हे मोठे आश्चर्य. तारीख २० मे १७७३ रोजी एका धूमकेतूशी पृथ्वीचे युद्ध होणार असें नामांकित गणिती लालांडी ह्याने वर्तविले आहे, आणि त्या युद्धांत पृथ्वीचा लय खचित होणार, अशी बातमी फ्रान्सदेशांत पसरली. " पृथ्वीजवळ येऊ शकणारे धूमकेतु " या विषयावर एक निबंध लालांडी वाचणार होता, हा कायतो वरील कंडी पिकण्यास आधार होता. सरकारी ग्याझेटांत जाहिरात प्रसिद्ध झाली की भिण्याचे कारण नाही. नामांकित विद्वानांनीही तशा अर्थाचे लेख प्रसिद्ध केले. परंतु व्यर्थ. जिकडे तिकडे देवळांत प्रार्थना सुरू करा अशी पारिसच्या मुख्य धर्माधिकाऱ्यास लोकांनी विनंति केली. " स्वर्गातली स्थाने " या नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले, व ते भारी किंमतीस विकू लागले. अर्थात् जो तो परलोकसाधन पाहूं लागला. सन १८७२ मध्ये असाच चमत्कार झाला. एक विलक्षण धूमकेतु पृथ्वीकडे येत आहे, आणि तो आगष्टच्या १२ व्या पृथ्वीजवळ येऊ शल कंडी पिकण्यास नामांकित विद्वाना सुरू