पान:ज्योतिर्विलास.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ ज्योतिर्विलास. पसरलेला नाही; सुमारे १५ व्या भागी मात्र पसरलेला आहे. यामुळे तो समूह छेदनबिंदूजवळ येतो तेव्हां मात्र म्हणजे ३३ वर्षात लगत दोन तीन वर्षे मात्र उल्कावृष्टि होते. इ० स० १८९९ पासून २।३ वर्षे सदर तारखेस उल्कावृष्टि होईल. त्यांत इ० स०१९०० या वर्षी फार होईल असा अजमास आहे. हा वृष्टि पृथ्वीवर सर्वत्र दिसते असा नियम नाही. अशनिसमूहांत पृथ्वी येते तेव्हा जेथे रात्र असते तेथे मात्र दिसते. परंतु दोन तीन वर्षात कोणत्या तरी वर्षी आपल्या देशांत ही वृष्टि दिसेल. सदरहू कक्षाछेदनबिंदु सुमारे ७० वर्षीत एक अंश पुढे जातो. यामुळे तितक्या वर्षांत वृष्टि एक दिवस पुढे जाते. ह्या नियतकालिक वृष्टीविषयी मागील लेख सुमारे १४०० वर्षांचे आढळतात. टेंपलचा धूमकेतु प्रजापतीच्या आकर्षणानें इ० स० १२६ मध्ये सूर्यमालेत आला व पुढे लवकरच ही वृष्टि सुरू झाली असावी, असे अनुमान आहे. आगष्टच्या उल्कावृष्टीचा अ. शनिसमूह सन १८६२ च्या एका केतूच्या कक्षेत फिरतो. त्याचा प्रदक्षिणाकाल सुमारे १२५ वर्षे आहे. हा अशनिसमूह कक्षेच्या बहुतेक भागी पसरलेला आहे. यामुळे ही वृष्टि बहुधा दरसाल होते. हा अशनिसमूह आमच्या सूर्यमालेत निदान ३५ हजार वर्षे आहे. नवंबरच्या २७ व्या तारखेस होणाऱ्या वृष्टीचा अशनिसमूह बीलाच्या धूमकेतूच्या कक्षेत फिरतो. त्याचा प्रदक्षिणाकाल ६ वर्षे २२६ दिवस आहे. ही वृष्टि नवीन सुरू झाली, ही ज्योतिःशास्त्राच्या इतिहासांत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. उल्कावृष्टि व धूमकेतु यांचा निकट संबंध आह ही गोष्ट तिजवरून निर्विवाद ठरली. इ० स० १८९८ मध्ये ही वृष्टि होण्याचा संभव आहे. प्राचीन कालापासून अशा नियतकालिक उल्कावृष्टि करणारे अशनिसमूह अनेक असावे; उल्कावृष्टि होऊन त्यांतले अशनि नाहीसे होत होत आले असावे; काही शेष राहिले ते रोज रात्री आपल्यास उल्कारूपाने दिसतात; त्या शी संबंध असणारे धूमकेतूही बीलाच्या केतूप्रमाणे नाहीसे झाले असावे; असे माझे मत आहे. धूमकेतंची शारीरघटनाः-केतूंच्या घटनेविषयी अनेक कल्पना आहेत. परंतु त्याबद्दल सिद्धांत अजून ठरला नाही. त्यांचे अगदी साधे स्वरूप दुर्बिणकेतूंत दिसते. ते अभ्रांसारख्या अथवा वाफेसारख्या बारीक कणांचे बनलेले दिसतात. पृथ्वीवर आपल्यास असें स्वरूप घन किंवा प्रवाही कणांनी बनलेल्या पदार्थांचे दि. सते. पाण्याच्या बारीक कणांचे मेघ बनलेले असतात, आणि कारबॉनच्या सूक्ष्म कणांमिळून धूर झालेला असतो. या सादृश्यावरून दुर्बिणकेतूंची घटना तशीच असावी असे अनुमान होते. केतूंचा व्यास हजारो मैल असतो, परंतु त्यांतून पलीकडचे पदार्थ दिसतात. तसेच त्यांच्या शेषद्रव्यापासून उल्कावृष्टि होते. यावरून वरील अनुमानास बळकटी येते. सारांश लहान लहान अशनि एकत्र होऊन धूमकेतु बनले असावे. दविणकेतूच्या वर्णलेखाचें, अत्युष्ण वायुरूप कारबॉनच्या वर्णलेखाशी सा.