पान:ज्योतिर्विलास.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहांचे उदयास्त म्हणजे दर्शनादर्शनें. ११९ असे म्हणावे, व दिसतनासे होतात तेव्हां त्यांचे अदर्शन झाले, असे म्हणावें हे बरे. परंतु आमच्या बहुतेक ज्योतिःशास्त्रकारांनी सूर्यसान्निध्यवशात् होणाऱ्या दशेनादर्शनांस उदयास्त ह्याच संज्ञा योजिल्या आहेत, आणि सांप्रत प्रचारांतही त्याच आहेत. म्हणून मीही येथे त्याच घेतल्या आहेत. भेद समजण्याकरितां नेहमीच्या उदयास्तास 'नित्योदयास्त' ही संज्ञा योजिली आहे. im सूर्यसान्निध्यामुळे सर्व तारा व ग्रह उदयास्त पावतात. परंतु सांप्रत आपत्या पंचांगांत सर्व ग्रहांचे व तारांपैकी अगस्त्याचे मात्र उदयास्त देण्याची रीति आहे. त्यांतही गुरु आणि शुक्र यांच्या अस्तोदयाचा आमच्या धर्मशास्त्राशी संबंध आहे. आमचें ज्योतिःशास्त्र नुसत्या डोळ्यांनी घेतलेल्या वेधांनीच सिद्ध झाले आहे, यामुळे त्यांत या अस्तोदयांचा पुष्कळ विचार झाला असे दिसते. परंतु सांप्रत युरोपियन ज्योतिःशास्त्रांत या अस्तोदयांचा विचार व त्यांचे गणित मुळीच नसते म्हटले तरी चालेल. सांप्रत युरोपांत ग्रहनक्षत्रांचे वेध दुर्बिणीनेच घेतात. सूर्याच्या जवळ ग्रह येतात तेव्हां नुसत्या डोळ्यांनी दिसतनासे झाले तरी पुढे दुर्विणीतून काही दिवस ते दिसत असतात. त्याचप्रमाणे उदयाच्या वेळी अगोदर दिसू लागतात. या व दुसऱ्या एक-दोन कारणांनी सांप्रत युरोपियन ज्योतिःशास्त्रांत अस्तोदयाचा विचार करीत नाहीत असे दिसते. गुरु आणि शुक्र यांच्या उदयास्ताचा आपल्या धर्मकृत्यांशी संबंध आहे. ह्यांपैकी एकादा ग्रह अस्तंगत असतां मौजिबंधन, विवाह, इत्यादि संस्कार, तसेंच व्रते, वास्तुप्रतिष्ठा इत्यादि कृत्ये होत नाहीत. ग्रह व नक्षत्रे यांत गुरु व शुक्र यांचे मात्र अस्त धर्मकृत्यांस प्रतिकूल मानितात. इतर ग्रहांच्या अस्तोदयाचा विचार बहुधा फलग्रंथांत मात्र करतात. गुरु व शुक्र इतरांपेक्षां तेजस्वी आहेत. नक्षत्रांपैकी कोणती तरी नक्षत्रे नेहमी अस्तंगत असतातच. बुधाचे अस्त वर्षातून सुमारे सहा वेळा होतात. मंगळाचा अस्त बऱ्याच काळाने होतो, तरी एकदा झाला म्हणजे कधी पांच महिनेपर्यंत मंगळ दिसत नाही. तेव्हां नक्षत्रे आणि बुधमंगळ यांचे अस्त धर्मकृत्यांस प्रतिबंधक होत नाहीत, ही गोष्ट धर्मशास्त्राचे व्यवहारानुकूलत्वच दाखविते. तरी शनीचा अस्त व्यवहारास नडणारा नसूनही धर्मशास्त्रकारांनी त्याच्या त्याज्यात्याज्यत्वाचा विचार केला नाही, हेही लक्षात ठेविले पाहिजे. शनिमंगळ अशुभ मानिले आहेत, म्हणून त्यांचा अस्त प्रतिकूल मानिला नाही असे दिसते. बुधाचे अस्त व उदय ३४८ दिवसांत सहा सहा होतात. म्हणजे सामान्यतः म्हटले तर वर्षात तो ६ वेळां अस्त व ६ वेळां उदय पावतो. त्याचा एकदां उदय झाल्यावर अस्त होण्यास कधी ४३ दिवस लागतात; कधी २१ दिवसानीच अस्त होतो. म्हणजे २१ पासून ४३ दिवसपर्यंत तो सतत दिसत असतो. तसेच, अस्त झाल्यावर उदय होण्यास कधी ४३ दिवस लागतात; आणि कधी ९ दिवसांनीच उदय होतो. शुक्राचे उदयास्त ५८४ दिवसांत दोन दोन हातात. Sheta C ompeti