पान:ज्योतिर्विलास.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० ज्योतिर्विलास. म्हणजे सुमारे १९ चांद्रमास २४ दिवस इतक्या काळांत तो दोन वेळां उदय व दोन वेळां अस्त पावतो. एकदां उदय पावल्यावर सतत दिसत असण्याचें शुक्राचे परममान सुमारे २४८ दिवस आहे. त्याच्या अस्तंगतत्वाची दोन माने आहेत. आहेत. एक सुमारे ५८ पासून ७५ दिवसपर्यंत, व दुसरे ८ पासून १० दिवसपर्यंत. मंगळाचा अस्तोदय सुमारे २ सौर वर्षे ४९ दिवस इतक्या काळांत एकेक होतो. तो एकदां उदय पावल्यावर सुमारे २१ किंवा २२ महिने दिसत असतो. आणि पुढे अस्त पावल्यावर ३ महिन्यांपासून ५ महिनेपर्यंत मुळीच दिसत नाही. सुमारे ३९९ दिवसांत गुरूचा एक उदय व एक अस्त होतो. त्यांत २५ पासून ३० दिवसपर्यंत अस्त व बाकी सुमारे ३७० दिवस उदय असतो. शनीचा उदय व अस्त सुमारे ३७८ दिवसांत एकेक होतो. त्यांत सुमारे ३४ पासून ३७ दिवसपर्यंत अस्त असतो, बाकी सुमारे ३४५ दिवस उदय असतो. ह्या कलमांतील बहुतेक नियम सामान्यतः आपल्याच देशास अनुलक्षून दिले आहेत. अमावास्येच्या सुमारास चंद्र दिसेनासा होतो, तो पूर्वेस दिसेनासा होतो; हे त्याचे अदर्शन पूर्वेस झाले; म्हणजे पूर्वेस अस्त झाला असे म्हणावयाचे. तसेंच, अमावास्येनंतर तो सायंकाळी पश्चिमेस दिसू लागतो. हे त्याचे दर्शन म्हणजे उदय पश्चिमेस झाला असे म्हणावयाचे. यावरून ग्रहांचा अस्त कधी पूर्वेस होतो व कधी उदय पश्चिमेस होतो याचा अर्थ काय हे समजेल. बुध व शुक्र ह्यांची गति कधी सूर्यापेक्षा जास्त असते व कधी कमीही असते. ते वक्री असतात तेव्हां अर्थातच ती कमी असते. ग्रह सूर्याच्या पूर्वेस जवळच असून त्याची गति सूर्याहून कमी असली म्हणजे त्याचा अस्त होतो; व तो आपल्या पश्चिमेस होतो; कारण त्या वेळी त्या ग्रहाचा नित्यास्त सूर्याच्या मागाहून लवकरच होत असतो. तसेंच, ग्रह सूर्याच्या पश्चिमेस जवळच असून त्याची गति सूर्याहून कमी असली म्हणजे त्याचा पूर्वेस उदय होतो.. मंगळ, गुरु, शनि ह्या बहिर्ववर्ती ग्रहांची गति नेहमी सूर्याहून कमी असते. म्हणून त्यांचा नेहमी पूर्वेस उदय व पश्चिमेस अस्त होतो. बुधशुक्रांची गति सूर्यगतीहून कमी असेल तेव्हां मात्र त्यांचा अस्त पश्चिमेस व उदय पूर्वेस होतो. जास्त असेल तेव्हां पश्चिमेस उदय व पूर्वेस अस्त होतो. बुधशुक्रांचा पश्चिमेस अस्त व पूर्वेस उदय होतो तेव्हां ते नेहमी वक्री असतात. व उलट प्रसंगी मार्गी असतात. हे वक्री असतां एकदां पश्चिमेस यांचा अस्त झाला म्हणजे वक्री असतांच ते सूर्याच्या मागे येऊन त्यांचा पूर्वेस उदय होतो, पुढे ते मार्गी होतात. मग सूर्यगतीपेक्षा त्यांची गति जास्त होऊन पूर्वेसच त्यांचा अस्त होतो. व नंतर ते सूर्याच्या पुढे जाऊन पश्चिमेस उदय पावतात. याप्रमाणे बुधशुक्रांचा एकदा एका दिशेस उदय झाल्यापासून पुनः त्याच दिशेस उदय होईपर्यंत उदय व अस्त मिळून ४ होतात. त्याचप्रमाणे एका एकदिगस्तापासून दुसऱ्यापर्यंत ४ होतात. बहिर्वर्ती ग्रहांचे दोनच होतात. बाबांहून कमी असतो. तसेच त्या वेळी