पान:ज्योतिर्विलास.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. ५३९ .....२३५३ शुक्र..... .......२८९२ ............३०६० बुध मंगळ शुक्र मिळून........... पृथ्वी ......... बुध, मंगळ, शुक्र व पृथ्वी मिळून........ युरेनस................... ....५९५२ ...........४४२५० बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, व युरेनस मिळून ........... नेपचुन्... .........५०२०२ ...........५१६०० बुधादि सहांची बेरीज............... शनि................ ...........१०१८०२ ...........२८५५८० बुधादि सातांची बेरीज............ .........३८७३८२ .............९५४३०५ पुरु............................................... बुधादि आठांची बेरीज........... .............१३४१६८७ सूय..............................................................१००००००००० नुसत्या डोळ्यांनी बुध चांगला स्वच्छ चकचकीत व किंचित् पिवळसर दिसतो. स्थिर तारांत लुब्धक मात्र त्याच्यापेक्षां तेजस्वी दिसतो. बाकी सर्वांहून तो तेजस्वी आहे. मोठ्या दुर्बिणीतून तो पाहिला असतां चंद्राप्रमाणे त्याला क्षयवृद्धि आहे असे दिसते. सर्व ग्रह चंद्राप्रमाणे अप्रकाशित आहेत. ते सूर्याच्या तेजाने प्रकाशतात. बुध आणि शक्र ह्यांचे कमजास्त प्रकाशित भाग चंद्राप्रमाणेच आपल्याकडे होतात म्हणून त्यांस वृद्धिक्षय होतात. बुधाच्या कला कमजास्त दिसण्याचे नियम शुक्राप्रमाणेच आहेत. ते शुक्राच्या वर्णनांत चित्र काढून दाखविले आहेत. बुध हा सूर्याच्या फारच जवळ आहे; तो सूर्यास्ता नंतर थोडाच वेळ दिसतो; यामुळे दुर्बिणीतून त्याचे वेध घेण्यास फार अडचण पडते. यामुळे त्याच्या शारीरघटनेविषयी निश्चित असे काही समजले नाही. त्याच्या अक्षप्रदक्षिणेचा काल बरोबर समजला नाही. तो सुमारे २४ तास आहे. बुधावर चंद्राप्रमाणेच वातावरण नाहीं असे अनुमान आहे. त्याजवर वातावरण आहे असे कोणाकोणांचें मत आहे, परंतु ते चुकीचे दिसते. ग्रहांची बिबें वास्तविक जेवढी आहेत त्यांपेक्षा आपणांस मोठी दिसतात. किरणांच्या अरीभवनामुळे म्हणजे त्यांचे तेज चोहोकडे फांकल्यामुळे असें होतें. चांगल्या दुर्बिणीत हे अरीभवन होत नाही.