पान:ज्योतिर्विलास.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बुध. पूर्वेस पश्चिमेस १८९३ आगष्ट ता० १६ उदय. १८९३ जून ता० १४ उदय. सप्टंबर ता० ७ अस्त. जुलई ता० २७ अस्त. l डिसेंबर ता०१ उदय. आक्टोबर ता०१६ उदय. -नोव्हेंबर ता० १९ अस्त. १८९४ जानुआरी ता० ७ अस्त. ८९४ फेब्रुआरी ता०१४ उदय. मार्च ता० २२ उदय. " माचे ता० ७ अस्त. मे ता० ३ अस्त. गलमे ता० ३० उदय. जुलई ता० २९ उदय. जुलई ता० १० अस्त. आगष्ट ता० २२ अस्त. सप्टंबर ता०२८ उदय. नोव्हेंबर ता०१६ उदय. नोव्हेंबर ता०२ अस्त. डिसेंबर ता० २० अस्त. १८९५ जानुआरी ता०२७ उदय. फेबुआरी ता० १९ अस्त. सूर्यापासून बुध ३॥ कोटी* मैलांवर आहे. तो सूर्याभोवती ८८ दिवसांत फिरतो. त्यांत तो कधी सूर्य व पृथ्वी यांच्या मध्ये येतो, तेव्हां बुधसूर्याचा अंतपाग झाला असे म्हणतात. व तेव्हां तो आपणांस फार जवळ असतो. कघा तो व आपण यांच्या मध्ये सूर्य येतो तेव्हां बहियोग झाला असे म्हणतात. सव्हा तो आपणास फार लांब असतो. जवळ असतो तेव्हां सुमारे पावणेपांच कोटा मल, आणि लांब असतो तेव्हां साडेतेरा कोटी मैल असतो. त्याचा व्यास पृथ्वीच्या तिसरा हिस्सा आहे. आणि सूर्याचे द्रव्य १०० कोटी मानिले तर बुपाच २०० आहे. म्हणजे सूर्याचे वजन १०० कोटी खंडी मानिले तर बुधाचे फक्त २०० खंडी भरेल. ग्रहांच्या आकारांप्रमाणे त्यांचा क्रम लाविला तर तो बुध, मगळ, शुक्र, पृथ्वी, युरेनस, नेपचुन्, शनि, आणि गुरु असा आहे. ह्यांत बुध सर्वात लहान. ग्रहांच्या द्रव्यांचा असा चमत्कार आहे की प्रत्येक ग्रहाचे द्रव्य त्याच्याहून लहान आकाराच्या सर्व ग्रहांच्या द्रव्याहून जास्त आहे. पृथ्वी आणि शुक्र यांचे आकार बहधा सारखेच आहेत म्हटले तरी चालेल. पृथ्वीपेक्षां शुक्र अमळ लहान आहे. तथापि शुक्र, मंगळ, आणि बुध एकत्र केले तरी त्यांच्या द्रव्यांपेक्षां पृथ्वीचे द्रव्य जास्त आहे. हे खाली स्पष्ट दाखविले आहे. द्रव्ये. .......२०० बुध.... मंगळ... बुध मंगळ मिळून...... .........५३९ * येथे व पुढील सर्व ग्रहांच्या वर्णनांत अंतरादिकांची माने किंचित् स्थूल सांगितली आ. हेत, ती सूक्ष्ममानाने परिशिष्ट २ यांत दिली आहेत.