पान:ज्योतिर्विलास.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. वेगाने बाहेर पडणाऱ्या शंगांबरोबर त्यांत कल्लोळ उसळून त्याची सपा मोर परंतु ती कधी मोडत नाही. हे कवच पृथ्वीच्या पृष्ठभागासारखें घन असेल असें नाही. त्याच्या आंत पदार्थ अत्युष्णवायुरूप स्थितीत आहेत, त्यांवर द्रव्याचे घन परमाणु तरंगत असतील, आणि अशा परमाणूंचे हे कवच बनले असेल. म्हणून त्याची सपाटी मोडत नाही, असे साधारण मत आहे. तेजोगोलाचा हा जो वरचा थर ह्याच्या आंत सर्व द्रव्ये वाखवस्थेत आहेत. ह्या आतल्या भागी दाब इतका आहे की त्याची घनता प्रवाही पदार्था इतकी आहे. तरी तेथे उष्णता अतिशय असल्यामुळे त्यांतली सर्व द्रव्ये रसायनसंयोग न पावतां वायुरूप स्थितीत आहेत. तेजोगोलाच्या उष्णतेची गणना करणे कठिण आहे. ती सुमारे दोन कोटी अंश असावी. ह्या उष्णतेची उत्पत्ति, तिचा व्यय, इत्यादिकांविषयी विवेचन पुढे येईल.