पान:ज्योतिर्विलास.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पृथ्वीवरील सर्व घड्याळांचे घड्याळ. पृथ्वीवरील सर्व घड्याळांचे घड्याळ. सांप्रत मुंबई, पुणे ह्या शहरांत तर असो, परंतु इतर मोठ्या शहरांतून व गांवांतून, आणि क्वचित् खेड्यापाड्यांतूनही, घड्याळे दृष्टीस पडतात. कोणी आंदोलकाची किंवा दुसऱ्या प्रकारची मोठी घड्याळे बाळगितात. कोणाजवळ खिशांतली लहान घड्याळे असतात. आपली पूर्वीची घटीयंत्रे, व प्रस्तुत चालणारी वेळ मोजण्याची वालुकायतें, छायायंत्रे, ह्यांपेक्षा आंदोलकयंत्रे किंवा दुसऱ्या प्रकारची लहानमोठी घड्याळे ही सोईची होत, आणि ती थोडक्यांत मिळतातही. तेव्हां ती बाळगण्याची इच्छा पुष्कळांस होणे साहजिक आहे. परंतु, ती जो वेळ दाखवितात त्यासंबंधे माहिती, ती बाळगणारांस असेल, तरच त्यांपासून खरा उपयोग होईल; नाही तर ती असून नसून सारखीच! ही माहिती पुष्कळांस नसते. निदान ह्याविषयी विचार तरी थोडक्यांनीच केलेला आढळतो. घड्याळ बंद पडल्यामुळे पुन्हा लावावयाचे असले, किंवा मागेपुढे झालेसे वाटल्यामुळे दुरुस्त करावयाचे असले, तर पहा शेजारचे घड्याळ, दादासाहेबांचे घड्याळ बिघडले की त्यांनी तें रावसाहेबांच्या घड्याळावरून लावावें, रावसाहेबांनी अण्णासाहेबांच्या वरून लावावें, फार झाले तर मास्तरांचे घड्याळ पहावें, किंवा पोष्टाचे पहावे, असें बहुतकरून होते. परंतु ज्यावरून आपण आपले घड्याळ लावितों ते बरोबर आहे किंवा नाही याचा विचार कोण करितो! दहा पांच मिनिटें किंबहुना अर्धा पाऊण तास मागे काय आणि पुढे काय! मोठ्या पोष्टाचा किंवा रेल्वेस्टेशनचा गांव असला म्हणजे घड्याळ पाहण्यास चांगले साधन असते. परंतु पोष्टाचे किंवा रेल्वेचं घड्याळ तरी कसे बरोबर लावितात, व तें जो वेळ दाखवितें तो आपल्या गांवी लागू पडेल की नाही ह्याचा विचार कोणी केला आहे काय? पोष्टांत तारायंत्र असले तर तेथचे घड्याळ व रेल्वेची घड्याळं मद्रासेहून तारायंत्रांतून खरा वेळ विचारून त्याप्रमाणे लावितात. परंत मद्रासेस तरी खरा वेळ कसा समजावा ? मनुष्याने केलेले घड्याळ कितीही उत्तम अ. सले तरी ते नेहमी एकसारखें चालेल, कमजास्त चालणार नाही, म्हणजे दिवसांत त्यांत २४ तासच होतील, त्याहून ते शीघ्र किंवा मंद चालणार नाही, तसेच ते बिघडणार नाही किंवा बंद पडणार नाही, असे होणे अशक्य. क्रोनामिटर म्हणन फार उत्कष्ट घड्याळे असतात. त्यांस किमत फार पडते. तरी ती देखील बिघडतात. मग इतरांची काय कथा ! तर घड्याळे लावण्यास कोणते तरी एक घज्याक असे असले पाहिजे की ते कधी बंद पडणार नाही, बिघडणार नाही, व मागेपुढे होणार नाही. असे घड्याळ ईश्वरनिर्मितच असले पाहिजे हे स्पष्ट दिसते. सूर्य किंवा नक्षत्रे हे अनादिसिद्ध घड्याळ होय. मद्रास येथें ज्योतिषवेधशाळा आहे. तसेच मुंबई येथे मुख्यतः लोहचुंबकधर्म समजण्याकरितां वेधशाळा आहे. ह्या दोन्ही ठिकाणी खस्थ ज्योतीच्या वेधावरून घड्याळ लावितात. आणि त्यावरून मग सर्व हिंदुस्थानांतल्या घड्याळांत खरा वेळ समजतो.