पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०३
नारायणराव व्यंकटेश.

या रदबदलीचा होता असें दिसते. परंतु या खटपटीचा कांहीं उपयोग झाला नाहीं.
 अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडून होत्या ती संधि साधून नारायणरावतात्यानीं श्रीमंतांच्या लष्करांतून परत आल्यावर बराच दंगा केला. प्रथम ते आजऱ्यांस आले. तेथें स्वार व पायदळ मिळून पांच सातशें लोक त्यांनींं नवे चाकरीस ठेविले आणि विठ्ठल विश्राम म्हणून पेशव्यांचा एक मामलेदार होता त्यापासूनही कांहीं कुमक मिळविली. त्यांनीं रामजी घोरपडे यास पकडून आजऱ्यांस बिडी घालून कैदेत ठेविले व राणोजी घोरपडे सेनापति यांसही कांहीं उपद्रव केला. तात्यांचे आजे नारो महादेव यांनीं दत्तक घेतलेले नरसिंगराव यांचे पुत्र सदाशिव घोरपडे हे रघुनाथराव दादासाहेब यांजवळ होतें. त्यांच्या द्वारें दादासाहेबाशी तात्यांनी संधान बांधिलें होतें. मातोश्रीच्या निसबतीचे जितके लोक आहेत त्यांचे पारिपत्य करावें, मुख्यत्वे विसाजीपंत व हरिराम यांस रसातळास न्यावें, सर्व दौलत आपल्या स्वाधीन करून घ्यावी, गोविंद हरि व त्रिंबक हरि पटवर्धन यांशी कज्या करावा हे त्यांचे बेत होते. तात्यांनी इचलकरंजीच्या ठाण्यांत प्यादे होते त्यांस वश करून घेतलें व तेथील अधिकारी भिकाजी नरहर याजपासून किल्ल्या हिसकावून घेतल्या. सर्व दौलतीत त्यांचा अंमल बसला. तात्यांचा हा उत्कर्ष फार दिवस टिकला नाहीं! अनूबाईंची प्रकृति बरी झाली व पेशवेही कर्नाटकांतून परत आले तेव्हां त्यांचे सर्व बेत विरघळून जाऊन त्यांस पुनः पूर्वीप्रमाणे प्रतिबंधांत रहाणे भाग पडले; व दौलतीचा सर्व कारभार अनूबाईंच्या हाती गेला. नांवाचा धनीपणा मात्र तात्यांकडे राहिला.
 सरकारच्या स्वारीबरोबर पथक घेऊन जावें, कामगिरी करून दाखवून आपली बढती करून घ्यावी, इकडे तात्यांचें लक्ष नसल्यामुळें