त्यांचें पथक मोडावें व सरदारी काढून घ्यावी असें श्रीमंतांच्या मनांत आलें. त्यामुळें सन १७६६ च्या जूनमध्यें अनूबाई व त्यांचे नातू व्यंकटराव दादा हीं पुण्यास गेलीं होतीं. तात्यांची कशी तरी समजूत घालून त्यांनीं त्यांसही बरोबर नेलें होतें. अद्यापि अनूबाईंची भीड पुणें दरबारीं बरीच चालत असल्यामुळें त्यांनी पेशव्यांकडून व्यंकटरावांच्या नावें सरदारी करून घेतली व पुनः पथकाची उभारणी केली. दुसरेही आपल्या संस्थानासंबंधें त्यांनीं कित्येक बंदोबस्त करून घेतले. कडलास, पापरी व बेडग हे गांव इचलकरंजीकरांकडे पथकाच्या सरंजामांत चालत होते ते या सालच्या दिसेंबरांत पेशव्यांनीं दूर करून तेच गांव त्यांच्या तैनातीस लावून दिले. पेशवे सरकारांतून एकंदर ११४१० रुपयांची तैनात इचलकरंजीकरांस रोख मिळत होती तिच्याऐवजीं त्यांनीं या तीन गांवांचा वसूल तैनातीकडे घेत जावा असें ठरलें. सदर रकमेचा तपशील येणेप्रमाणे:-घर बेगमीस रोख रुपये ५०००, अनूबाईंस पालखीबद्दल ११००, नारायणरावतात्या व त्यांची स्त्री लक्ष्मीबाई यांस प्रत्येकीं १०००, अकरा खंडी गहूं (किंमत रुपये ४४०), पंधरा खंडी तांदूळ (किंमत रुपये ९००), एक खंडी मीठ (किंमत रुपये २५), एक खंडी तुरी (किंमत रुपये ३०), बारा खंडी जोंधळे (किंमत रुपये ३६०), पालखीच्या सामानाबद्दल अनूबाईंस १५० रुपये, तात्या व लक्ष्मीबाई यांस प्रत्येकी ६५. अनूबाईंस कापडाबद्दल ३५० रुपये, तात्यांस कापड ७५० रुपये कारकुनास कापड व नक्त रुपये मिळून १७५ याप्रमाणें हा तैनातीचा तपशील होता. पर्वती व हडपसर येथील मळे व पाडळी येथील चाहूर जमीन पूर्वीपासून चालत आली आहे त्याप्रमाणें इचलकरंजीकरांकडे चालूं द्यावी, म्हणून पेशव्यांनीं याच वेळीं त्या त्या गांवच्या अधिकाऱ्यांस ताकीदपत्रें दिलीं, जिजाबाईसाहेबांनीं इचलकरंजीकरांचें
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११४
Appearance