फौजेची छावणी त्या प्रांतींच झाली. खुद्द पेशव्यानीं सप्तंबर महिन्यांत धारवाडास वेढा घातला. सुमारें दोन महिने लढाई होऊन तारीख ५ नोव्हेंबर रोजीं किल्ल्यावर पुनः श्रीमंतांचें निशाण चढले. याप्रमाणें धारवाडचा सुभा मोकळा होतांच त्याची मामलत मिळविण्यासाठीं उमेदवारांची गर्दी झाली. परंतु ही मामलत इचकरंजीकरांकडे आज बहुत वर्षे होती व त्यांचा पैसाही त्या मामलतींत पुष्कळ गुंतला होता; सबब त्यांच्यातर्फेनें विसाजी नारायण याने दरबारखर्चासुद्धां सवा सात लक्ष रुपयांस धारवाडची सुभेदारी कबूल केली. या मुदतींत नारायणरावतात्या इचलकरंजीहून निघून स्वाऱ्या करीत भटकत होते. श्रीमंतानीं मुजरद माणसें पाठवून त्यांस धारवाडास बोलावून नेलें व दसऱ्याचे दिवशी त्यांस मेजवानी केली. नंतरही दोन चार वेळां श्रीमंतांच्या व त्यांच्या धारवाड मुक्कामी भेटी झाल्या. परंतु त्यांपासून कांही निष्पन्न झालें नाही. यंदां अनूबाईंच्या शरीरीं समाधान नसल्यामुळें त्या स्वारीस आल्या नव्हत्या. एकटया तात्यांवर विश्वासानें एखाद्या कामाचा बोजा टाकावा हें श्रीमंतांच्या मनास येईना व तात्यांसही या कचाट्यांत रहाणेंंआवडेना ! त्यामुळें महिना पंधरा दिवस राहून तात्या श्रीमंतांचा निरोप घेऊन परत आले. त्यांचें पथक मात्र विसाजीपंताबरोबर चाकरीस लष्करांत हजर होतें तसें तें ही मोहीम संपेपर्यंत होतेंच. पुढें अनवटी व बिदनूर येथें लढाया होऊन हैदराचा पूर्ण पराजय झाला व त्यानें शरण येऊन पेशव्यांशीं तह करून घेतला. या स्वारींत मुरारराव घोरपडे गुत्तीकर पेशव्यांस येऊन मिळाले होते. कापशीहून राणोजी घोरपडे सेनापति यांचा मुलगा (संताजीराव किंवा सुबराव हें कळत नाही.) रुसून मुराररावांकडे गेला होता त्याबद्दल मुराररावांनी पेशव्यांशींं बहुत सक्तीनें रदबदली केली. इचलकरंजीकरांकडे आजरें तालुका होता तो या मुलास द्यावा हाच विषय
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/११२
Appearance