पान:अस्पृश्य -विचार.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )

उपयोग असला तरी प्रत्येक गांवांत महारवाडा असतोच असतो हा वाच्यार्थ तीवरून स्पष्ट होतो.
 सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कोळा, भिल्ल, गोंड इत्यादिकांप्रमाणे सुसंस्कृत आर्यांपासून फाटून न राहतां या जाती राष्ट्रीय जीविताच्या दृष्टीने आर्यांशी इतरांपेक्षा अधिक जवळ आल्या आणि कोणता का दर्जा होईना, पण तो पतकरून त्यांनी जेत्या लोकांशी एक तऱ्हेचे लागतेपण उत्पन्न केले हे निःसंशय आहे. त्यांच्या वृत्तीची सोयही आर्यांनी खास केली होती. महार लोकांचे एकंदर ५२ हक्क आहेत असे त्यांच्यांतील माहितगार ह्मणतात. या हक्कांपैकी कांहींचा उल्लेख करून त्यांचा नीतिदृष्टया विचार पुढे करीन. सध्या इतकेंच लक्षात ठेवावयाचें की, चरितार्थाचे हटकून साधन असें महारांच्या पदरी काही तरी एक होतेच होते. पण रंगद्वेषाचा प्रभाव सद्यःकाली जसा दृष्टीस पडतो त्यापेक्षा कमी वाईट पूर्वीच्या काळी होता असें ह्मणवत नाही. " आमच्याशी लढावयाचे असेल तर लढा आणि मरून जा. फटकून राहावयाचे असेल तर आमच्यापासून स्पष्टपणे पृथक राहा. आमच्या शेजारास यावे असें ह्मणणे असेल तर या, आम्हासही नोकर चाकर हवेतच आहेत, तुम्हांला पोटभर खावयास देऊ पण एवढे मात्र खडखडीत ध्यानात ठेवा की, आमच्याशी बरोबरीचे नाते आम्ही तुम्हांस केव्हांहि लावू देणार नाही, आणि वैभवाचे वांटेकरीहि होऊ देणार नाही " हा वरचढ संस्कृतीच्या लोकांचा खालच्या लोकांना नेहमींचा रोकडा जबाब आहे. पण वाईटांत चांगले इतकेच की, सबंध जमातीच्या जमाती जिवंत राहू शकल्या. ही काही सामान्य महत्वाची गोष्ट नव्हे. जेथे वंशच्या वंश हळूहळू अल्पसंख्य होत होत कायमचे लुप्त व्हावयाचे तेथे जिवानिशी राहतां आलं हा काही सामान्य फायदा नव्हे. अनेक मानववंशांच्या चाललेल्या झटापटींत आणि त्यांच्या हितसंबंधांच्या