पान:अस्पृश्य -विचार.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

लग्नसंबंध करू नयेत, इतकेच काय पण त्यांचा शेजारधर्महि योग्य मानूं नये, प्रसंग पडल्यास त्यांना शासन करावे आणि त्यांनी नमतें घ्यावयाचें मनांत आणल्यास फार झाले तर आपल्या सेवाचाकरीची जबाबदारी त्यांजवर सोपवावी, पण इतर सामाजिक आणि राजकीय हक्क व सवलती, संस्कृतीचा समानपणा स्थापीत न करतील इतक्या प्रमाणांत द्याव्यात, असा वर्तनक्रम हल्लींच्या मोठमोठ्या वसाहती अंगिकारीत आहेत. प्राचीन आर्यांनी हीच गोष्ट केली. ज्या जमातींनी सारखें खडाष्टकच ठेविलें त्यांना सरसकट झोडपीत नेऊन कोठे तरी मोठाल्या अरण्यांत अगर पहाडांत नेऊन घातले. जे कोणी अधिक जुळते घेतातसें दिसले त्यांना आपल्या सामाजिक जुळणींत गुंतवून टाकले. त्यांना संपत्ति व वैभव ही प्राप्त करून घेण्याच्या ज्या काही मर्यादा होत्या त्यांच्या आंत घेतले नाही. पण आपली सेवाचाकरीही व्हावी आणि त्यांनाहि चंदीचारा मिळावा अशा तऱ्हेचा कांहींसा सलोखा केला. ही गोष्ट ' ग्राम ' ही संस्था नीट पहावी म्हणजे ध्यानात येईल. हल्लींची वाहतुकीची साधनें उत्पन्न होण्याच्या आधी व भाकरीच्या शोधार्थ दाही दिशा येरझारा करणे भाग पडण्यापूर्वी प्रत्येक गांव म्हणजे स्वतःपुरता पूर्ण असा एक सुटा घटक असे. त्यांतील नारूकारूंची व इतर धंदेविशिष्ट जातींची व्यवस्थाही एका बुद्धिपुरस्सर केलेल्या योजनेची दर्शक असे. जसे इतर धंदेवाले तसे या योजनेंत महार, मांग, ढोर, चांभार हे लोक बहुतकरून सांपडावयाचेच. जे लोक त्यांच्याशी सर्वथैव फटकून राहिले आणि मग ढळढळीत गुन्हेगार जातींत मोडू लागले ते आपल्या ला गांवगन्ना दिसावयाचे नाहीत; पण वर लिहिलेल्या जातींपैकी बहुतेक प्रत्येक जात समाजाच्या घटनेत कायमची गुंतून गेलेली दिसेल. ' गांव तेथें महारवाडा ' या म्हणीचा इतर काहीं