पान:अस्पृश्य -विचार.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३० )

मानाला युरोपांतून झोडपून बाहेर काढंण्याची ख्रिस्त्यांची उत्सुकता आणि राजकारस्थानी मुत्सद्यांची तिला संमति या गोष्टी जर एकादी जाणीव मनांत आणून कोंबीत असल्या तर ती हीच की, अजून तरी राष्ट्रभावनेपेक्षां धर्मभावना अधिक शिरजोर ठरण्याचा काळ गेला नाही. तेव्हा शहाण्याहून शहाणे होण्याची हौस न बाळगलेली बरी. अस्पृश्य लोकांना आपल्या उपेक्षेने आपण जाणूनबुजून पाद्री लोकांच्या तावडीत देत आहोत व घरच्या घरी एक नवीन तिढा उत्पन्न करीत आहोत. आपल्या संस्कृतीची रक्षक होण्यासारखी प्रजा फुकाफुकी गमावणे हे पढत मूर्खाचे लक्षण आहे. पण तो अस्पृश्य तरी आमच्या संस्कृतीचा रक्षक केव्हां बनेल ! जेव्हां त्याला तिच्या कक्षेत घ्याल तेव्हां ! तिचे सर्व तऱ्हेचे फायदे त्याच्या वाट्याला येतील तेव्हां. त्याला जर तुम्ही संस्कृत केले नाही तर तो वाटेल त्या नव्या मताला मिळणार आणि वाटेल त्याच्या गोड हाकेला ' ओ ' म्हणणार.
 असो. ही आपत्ति लक्षात घेऊन या लोकांना खिस्ती न होऊ देणे जसें जरूर आहे तसेंच धर्मातर केलेल्यांना परत आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न होणे जरूर आहे. ' मी ख्रिस्ती होणार ' जसें अवमानाने त्रस्त झालेला अस्पृश्य म्हणाला तर काही लोक उदासीन अवाजाने ' जा हो जा ' असे म्हणतात. पण यांत जितका त्रागा दिसतो तितकी काळजी दिसत नाही. शक्य ते सर्व प्रयत्न त्याला ठेवून घेण्यासाठी केले आणि मग जर तो आडमुठेपणाने 'ख्रिस्ती होणार ' असे म्हणू लागला तर त्या वेळची ही भाषा आहे. आधींची नाही. पण अस्पृश्य इतका आडमुठा नाही. नाही नाही म्हटले तरी अगदी झिरझिरीत का होईना पण त्याच्या समाजावर हिंदुत्वाचेच पांघरुण आहे. तेच जर जास्त उबदार झाले तर त्याला काय नको आहे ? तो आपल्यांतच वागत आलेला नाही ? तर तसा प्रयत्न