पान:अस्पृश्य -विचार.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१ )

करावा आणि मग रागवावें. असो. जे आधींच खिस्ती झाले आहेत त्यांना परत आणणे जरूर आहे आणि अशा तऱ्हेचा प्रयत्न जरी धर्मगुरुंनी केला नाही तरी कै. वैद्यांनी केलेला आपणा सर्वांना माहीत आहे, व त्यांच्या बंधूंनीहि तो चालू ठेवला आहे. हा प्रयत्नहि पूर्ण यशस्वी होण्यास अस्पृश्यतानिवारणाची जरूर आहे. कारण खिस्ती झालेल्या महाराला आपण स्पृश्य कोटीत आलो आहो, इतरांशी हस्तांदोलनाला योग्य झालो आहों ही जाणीव उत्पन्न झालेली असते. पण पुनः जर हिंदुत्वांत गेलो तर संस्कृतीच्या कुंचलीने माझें कपाळ पुसून काढतील आणि अस्पृश्य छाप वाचून हा अस्पृश्य रे अस्पृश्य म्हणून पुनः येरे माझ्या मागल्या करावयास लोक चुकावयाचे नाहीत, असा वहिम त्याला येत राहील यांत शंका नाही. तेव्हां त्याला परत बोलवितांना त्याच्या मनांतील या बारीक शंकेला जागा उरूं देतां कामा नये. त्याला आपण हिंदुसमाजांतले अधिकृत घटक आहों अशी भावना उत्पन्न होईसें दिलदारपणा आपण दाखविले पाहिजे. धर्मापासून प्राप्त होणारे नैतिक फायदे आपण त्याला मिळू दिले पाहिजेत. कोणी कोणी असें समाधान सांगतात की, ते घाणेरडे असतात तेव्हां त्यांना धर्ममंदिरांत कसे घ्यावे ? वास्तविक पाहता ही गोष्ट स्वच्छतेच्या मुद्यावरच अडली आहे असे वाटत नाही पण तसे जर खरोखरच असेल तर धर्मगुरूंनी तसे सांगावे की, अमुक एक डिग्रीची स्वच्छता असली तर तुम्हांस आंत घेऊ. गोव्याकडील अगदी घाणेऱ्या व केवळ ' लंगोटी व पंखा ' च नेहमी घालणाऱ्या खिस्ती कामाठ्याला सुद्धा स्वच्छ होऊन डगलापट्टा घालून चर्चमध्ये जातां येते. तसें आचार्यांनी यांना सांगावे की, तुम्हास आंत घेण्यास तुमच्या घाणेरडेपणाखेरीज दुसरा कोणताहि प्रत्यवाय नाही. असें धर्मगुरु म्हणावयास कबूल आहेत का पहा आणि मग स्वच्छतेचा मुद्दा पुढे आणा. मुसलमान किंवा ख्रिस्ती निदान देवळाच्या प्राकारांत