शेंकडों उपकारांचा वर्षाव त्यांच्यावर करून हा ओढा उत्पन्न करील. इतपत पराक्रम त्यांच्या अंगी खास आहे.
आतां हे सगळे झालेले व होतकरू ख्रिस्ती आपल्याकडे तरी बव्हंशी अस्पृश्य वर्गातलेच आहेत यात शंका नाही. इतर जातीतली सावजे पाद्री लोकांना थोडी गवसतात, कारण त्यांना धर्मज्ञान आहे; पूर्वीचा इतिहास आणि संस्कृति यांचे बंधन आहे; आणि दुष्काळाच्या पहिल्या ढांगेतच ते आक्रमिले जात नाहीत. अस्पृश्यांचे असें नाही. सगळा काच त्याला एकदम उत्पन्न होतो आणि जवळ घेणारा स्वकीय कोणी नाही अशी स्थिति असते. पाद्री उपकार करतो ते ठळक डोळ्यांत भरण्यासारखे आणि अंगी लागण्यासारखेच असतात. तो कुडती देतो; अन्न देतो; औषध देतो; अमेरिकेतून येऊन महिना दहावीस हजारांचा गल्ला गोळा करतां येण्यासारखी, अश्विनीकुमारांना लाजविणारी विद्या अंगी असतां पोटापुरतेच घेऊन सहस्रावधि व्याधिग्रस्तांची पीडा दूर करतो, आणि त्यांना पुनः बायकापोरांत आणून सोडतो. असा माणूस ज्या धर्माचा उपदेश करील त्यापासून सुद्धां परावृत्त राहावे असा पीळ बहिष्कृताला कसा राहील! आमच्या येथे पहा! तापाच्या साथीमध्ये आचार्यांनी पुढे होऊन शहरांतले डाक्टर वैद्य गोळा करून काही सामुदायिक यत्न केला तर काय होणार नाही? पण त्यांच्या म्हणजे डाक्टर वैद्यांच्या धर्मबुद्धीला धर्मगुरु हटकीतच नाहीत. अर्थात् साथी म्हणजे प्रत्यक्ष वैदूंची सुद्धां पोळी पिकण्याची हुल्लड बनून जाते. अशा अनास्थेमुळे आमच्या धर्मात वजाबाकी झपाट्याने चालू आहे. ही जों जो अशीच चालत राहील तों तों हिंदुस्थानांत एक निराळा गट उत्पन्न होत आहेसे समजावें. कितीही माना वांकड्या करून राष्ट्रभाव आळविला तरी राष्ट्राच्या चतुःसीमेच्या टोपणाहून विशाल असे हे धर्माचे टोपण आहेसें कबूल करावे लागेल. मुसल
पान:अस्पृश्य -विचार.pdf/32
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९ )