पान:अस्पृश्य -विचार.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८ )

 असे प्रश्न विचारले की, अहो ! याला कारणे आहेत, असा जबाब लगोलग यावयाचा पण त्यावर प्रत्युत्तर इतकेच की, त्या कारणांनाही उत्तरें करतां येण्यासारखी आहेत, पण प्रस्तुत प्रश्न जो आहे तो हा की, अस्पृश्यता अगर बहिष्कार आहे की नाही ? आणि तो आहे असे वरील प्रश्नांनी सिद्ध होते. दुसरे असे की, ' बहिष्कार नाही ' असें तुम्ही म्हणून काय होणार ? महार काय म्हणतो ? त्याची जबानी तुमच्या विधानाच्या विरुद्ध आहे. तो म्हणतो की, सिनेमाच्या पडद्यावर उठविलेली मनुष्याच्या विविध चारित्र्याची चित्रे जशी अंधारांत बसून माणसे पाहतात तसे आम्ही दूर उभे राहून तुम्ही लोक काय वांकुल्या करीत असाल त्या अज्ञानाने पहातों यापेक्षां तुमचा आमचा विशेष संबंध काय ? या बाबतीत त्यांची जबानी थोडी तरी ध्यानात घेतलीच पाहिजे. एकंदर सामाजिक जिण्यामध्ये आपला हिस्सा किती आहे हे ज्याच्या वाटणीला तो हिस्सा पडलेला असतो त्याच्याइतके चांगले दुसऱ्या कोणाला कळणार ? साहेब म्हणतो, मी तुला स्वराज्याचा मलिदा कितीतरी चारीत आहे. पण भुकेने व्याकुळ झालेला देशभक्त म्हणतो, या तुझ्या ' कितीतरी ' मलिद्याने माझें दाढवणहि माखत नाहीं ! तेव्हां स्वराज्याचे हक्क किती मिळाले हे जसे हिंदी देशभक्ताला विचारून ठरवावें हे युक्त, तसेच हिंदू समाजाच्या संसारांत आपला भाग काय हे महाराला विचारून ठरवावें; म्हणजे चुकीचा संभव कमी. ' मी बहिष्कृत आहे ' असे जर महार म्हणत असेल तर त्याच्या बोलण्यांत सत्यांश आहे हे गृहीत धरावयास हरकत नाही. शिवाय या लोकांना बहिष्कार नाही असे म्हणणारांना एक वेंचक प्रश्न करतां येण्यासारखा आहे. आपल्या लोकप्रिय पुढाऱ्यांवर कशी एक वेडगळ आपत्ति हे लोक आणतात पाहा ! अस्पृश्यता जर नसेल तर ' अस्पृश्यता काढलीच पाहिजे ' असें जें