पान:अमेरिका पथदर्शक.pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५
प्रश्र्नोत्तरें.

 प्रश्न १३-असा कोणता धंदा आहे कीं, जो शिकल्यानें अमेरिकेंत गेल्यावर सहज काम मिळूं शकेल; व त्याला स्वावलंबनपूर्वक विद्यार्जन करतां येईल ?

 उ०-असे बरेच धंदे आहेत.खालीलपैकी एखाद्या धंद्याचें शिक्षण हिंदुस्थानांत मिळवून नंतर अमेरिकेस गेल्यास काम मिळविण्यास फारसें कठीण जात नाही. हिशोब ठेवणें (Book-keeping) टाईपरायटींग, शॉर्टहाँड, मोटार, ड्रायव्हिंग, सायकल-रिपेअरिंग, ड्राईग, सेर्व्हेइंग, लांकडे करवतीनें कापणें, शिंप्याचें काम, विणकराचा धंदा, गाईदोहणें, घोडयाची शागीर्द करणें, घड्याळी दुरुस्त करणें, जोडें शिवणें, हात पाहून भविष्य वर्तविण्याची विद्या, तोंडातून गोळे काढणें, शरीरांतून कांटे आरपार काढून दाखविणें, जादुगाराचे खेळ करून दाखविणें, जन्म पत्रिका तयार करणें, विस्तवावरून चालणें, कुस्ती किंवा इतर हिंदुस्थानी खेळाची माहिती मिळविणें, ह्यांपैकीं, एखादी कला किंवा धंदा आल्यास काम मिळविणें फारसें जड जात नाहीं. थोडेंसे सुतारांचे काम आल्यासहि बरीच प्राप्ती होऊं शकते. पाथरवटाचें काम येत असल्यास फारच चांगलें; कारण हा धंदा करणा-या इसमांस रोजची मजुरी १५-२० रुपयांपेक्षां कमी मिळत नाही. सारांश, हिंदुस्थानांतच कोणताना कोणता धंदा शिकून नंतर अमेरिकेस गेल्यास तेथें द्रव्यार्जन करण्यास सोईचें होतें.
 ज्या विद्यार्थ्यांजवळ मुळीच पैसे नसतात व जे जहाजावर काम करून अमेरिकेस जाऊं इच्छितात त्यांच्या मार्गांत अनेक अडचणी आहेत. वर्ण गोरा असून मांस भक्षण करण्याची तयारी असल्यास, त्यांस जहाजावरील काम करतां येईल. मुंबईसारख्या मोठ्या बंदरावर पुष्कळ जहाजें येत असतात, व त्यावर खलाशांची नेहमीच जरुरी असते. जहाजावर खलाशीं म्हणून भरती होणें मोठेसें कठीण नाही, परंतु खलाशाचें काम करणें हिंदी विद्यार्थ्यास फार जड जाते.
 प्र० १४-संस्कृत जाणणा-या विद्यार्थ्यांस स्वावलंबी बनून, आपला चरितार्थ व अध्ययन चालवितां येणार नाहीं काय ?
 उ०:-हे होऊं शकेल व नाहीहि होऊं शकणार. विद्यार्थी बोस्टन, न्यूयार्क,शिकागोसारख्या शहरीं शिकत असल्यास त्याला संस्कृत-प्रेमी गृहस्थ किंवा स्त्री मिळू शकेल. परंतु अशा भरंवशावर अमेरिकेस जाण्याचे धाडस करणें मूर्खपणाचें