पान:अमेरिका पथदर्शक.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२६
अमेरिका-पथ-दर्शक

होईल. कदाचित् असा गृहस्थ मिळेल कदाचित मिळणार नाहीं. जो विद्यार्थी चांगला वक्ता असेल ज्यानें आपला देशाच्या सामाजिक, धार्मिक किंवा वाङ्मय विषयक स्थितीचें अवलोकन केलें असेल, त्याला निरनिराळ्या क्लबांतर्फे व्याख्यानें करवितां येईल. ही गोष्ट पूर्वभागांतील शहरांत शक्य आहे, पश्चिम भागांत नाहीं. वक्तृत्वाच्या जोडीला ज्याच्याजवळ निरनिराळ्या प्रांताच्या 'Slides' असतील, व ज्यानें हिंदुस्थानांत सर्वत्र संचार केला असेल तो आपला चरितार्थ मौजेनें चालवूं शकेल. कारण चर्चमध्यें व क्लबांत व्याख्यानें ऐकणारें बरेच लोक असतात; व ते चांगला मोबदलाहि देतात. ह्याकरितां ज्यांना अशा प्रकारचें काम करावयाचें आहे, त्यांनी फोटोग्राफी व Slides तयार करण्याची विद्या अवश्य शिकावी, व अमेरिकेस जातांना आपल्याबरोबर आपल्यादेशाच्या निरनिराळ्या भागांताल सहा सातशें Slides न्याव्या.मॅजिक लंटर्न तेथें विकत किंवा भाड्यानें घेतां येईल.

 प्रश्न १५--कोणकोणत्या वस्तु आम्ही येथून बरोबर घेऊन जाणें जरूरीचें आहे ?
 उत्तर--पुष्कळ सामान बरोबर घेणें चांगलें नाही. येथून एक चांगला मोलवान ओव्हरकोट करवून घ्यावा. इंग्रजी नमुन्याचा एक पूर्ण सूट, वस्तरा, फणी वगैरे हजामतीचें सामान, एक कांबळे, एक डायरी, चारपांच शर्टस, पांच सहा कॉलर्स व नेकटॉय, एक इंग्रजी टोपी इत्यादि सामान बरोबर घ्यावें. मोठी टोपी अमेरिकेस गेल्यावर घेतां येईल. सामान जितकें योडें असेल तितकें सोईस्कर असतें. वरील सर्व वस्तु एका लहानशा बॅगमध्यें ठेवाव्या व बाकीच्या जरूरीच्या वस्तु अमेरिकेस गेल्यावर खरेदी कराव्या.
 प्रश्न १६--स्वतः हातानें स्वयंपाक करणा-या विद्यार्थ्यांस आपली व्यवस्था कशी लावतां येईल?
 उत्तर--माझ्या बरोबर जे डेकवरचे उतारूं होते, ते सर्व आपलें अन्न आपल्या हातानींच शिजवीत असत. हांगकांगपासून व्हॅंकोव्हरपर्यंत जाण्यास साधारणतः एक महिना लागतो. सर्व प्रवासांत आपले अन्न आम्हींच शिजविलें पुष्कळ उतारू हाताने स्वयंपाक करूं इच्छिणारे असल्यास अशी व्यवस्था होऊं शकेल. परंतु केवळ एक दोघांकरितां अशी व्यवस्था होणें कठीण आहे. अमेरिकेस गेल्यावर मात्र आपल्याकरितां स्वतंत्र खोली पाहून, आपल्याला हवें तसें