पान:अमेरिका पथदर्शक.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१
प्रश्र्नोत्तरें.

उत्तेजन दिलें, त्यांस त्यांनीं मनांतून अनेक शिव्या दिल्या. सर्वच माणसें चांगल्या स्वभावाची नसतात. वीर पुरुष तर अनेक संकटें आली तरी घाबरत नाहीत, उलट संकटांना तोंड देणें, ते आपले कर्तव्यच समजतात. परंतु हिंदी युवकांमध्यें अद्यापि हा गुण दिसून येत नाही. म्हणून, अमेरिकेस जाणा-या प्रत्येक युवकांस जरुरीपेक्षां अधिक द्रव्य जवळ बाळगण्याचा सल्ला मी देईन; असें केलें म्हणजे, त्यांना स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्याकरितां शांत वेळ मिळेल. जे हांगकांगच्या मार्गानें जाणार असतील, त्यांचें जवळ थोडे कमी द्रव्य असलें तरी चालेल. परंतु युरोपच्या मार्गानें जाणा-या इसमांजवळ अधिक द्रव्य अवश्य असवयास पाहिजे; कारण तिकडे खर्च फार पडतो.
 प्रश्न ७-अमेरिकन बंदरावर उतरल्यावर कोणकोणते प्रश्न विचारतात ?
 उ०-ज्यावेळीं जहाज बंदरावर जाऊन उभें राहतें, त्यावेळीं सरकारी अधिकारी येऊन परदेशी प्रवाश्यांची तपासणी करतात. त्यांचे जवळ असलेलें द्रव्य पाहिल्यानंतर, पुढे दिलेले एकामागून एक असे अनेक प्रश्न विचारतात. तुम्ही कोणत्या देशांत असतां? येथे येण्यांत तुमचा हेतु काय? तुम्हांस एकापेक्षां अधिक विवाह करणें संमत आहे काय? तुम्हांस अराजकतेची (Anarchism) तत्वें पसंत आहेत काय? तुम्ही हे पैसे कोणाकडून कर्ज काढून आणले आहेत काय? तुम्हांस येथें येण्याकरितां कोणी लिहिलें होते ? तुमचा धर्म कोणता? असेच हे प्रश्न असतात. एकापेक्षां अधिक स्त्रियांबरोबर विवाह करणें अमेरिकेंत कायद्याच्या दृष्टीनें गुन्हा आहे. म्हणून अधिक विवाह करणें संमत असणा-या इसमास ह्या देशांत प्रवेश मिळत नाही. अराजक तत्त्वांचा प्रसारहि ह्या देशाच्या विरुद्ध आहे.शिवाय, अमेरिकन सरकारची अशी इच्छा आहे की, कोणाच्या फसवेगिरीनें येणा-या इसमासाहि अमेरिकेंत प्रवेश मिळू नये.
 प्रश्न० ८ --अमेरिकेच्या बंदरावर उतरल्यानंतर अनोळखी माणसानें काय करावें ?
 उ०-अनोळखी माणसानें बंदरांत उतरल्यावर प्रथम 'यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन 'च्या (Y. M. C. A.) ठिकाणाचा तपास करावा. तेथें गेल्यावर सभेच्या चिटणीसातर्फे स्वतःच्या राहण्याची व्यवस्था करावी- अमेरिकेंतील मोठमोठ्या शहरीं अनोळखी माणसांना फसविण्याकरतां अनेक लोक