पान:अमेरिका पथदर्शक.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०
अमेरिका-पथ-दर्शक

असतो. उन्हाळ्यांत येथील धनिक लोक इकडे तिकडे हवा पालट करण्याकरितां जातात. ह्यामुळे हिंदी व्यापारी ह्या दिवसांत तेथें गेल्यास त्यांचें काम साधत नाहीं.
 प्रश्न ५ वाः-कमी खर्चाचा मार्ग कोणता ?
 उ०:-हांगकांग कडील मार्गानें कमी खर्चानें जातां येतें. परंतु ह्या मार्गानें गेलेल्या कित्येक मजूरांना अमेरिकन लोकांनी परत लावून दिलें आहे ह्याकरितां कोणाहि मजूरास ह्या मार्गानें अमेरिकेस जाण्याचा मी सल्ला देणार नाही. चैनीखातर किंवा व्यापार उदीम करण्याकरितां ज्यांना तेथें जावयाचें असेल, त्यांनी खुशाल हव्या त्या वाटेनें जावें. अमेरिकचीं दोन्ही बंदरें सियेटल व सॅनफ्रॉन्सिस्को त्यांच्याकरितां चांगलीं आहेत. जे हिंदीबांधव विद्यार्जनाकरितां तेथें जाणार असतील व ज्यांचे जवळ खर्चण्याला पुरेसें द्रव्य असेल, त्यांना युरोपच्या मार्गानें जाणें योग्य आहे. निर्धन विद्यार्थी हांगकांगकडून गेल्यास फार कष्ट सहन करावें लागतील, म्हणून त्यांनींहि न्यूयॉर्क मार्गानें किंवा गालवस्टन मार्गानें जाणें श्रेयस्कर आहे.
 प्रश्न ६ वाः- कमीत कमी किती खर्चाची व्यवस्था लावली पाहिजे?
 उत्तर-युरोपद्वारें जाण-यांना मुंबई ते न्यूयार्क भाडें साडेतीनशें रुपये+ पडतें. व न्यूयॉर्क बंदरावर उतरल्यावर दोनशें रुपये दाखविण्यास लागतात. ह्या हिशोबानें साडेपांचशे रुपये एका माणसाजवळ असावयास पाहिजेत. इतक्या रकमेंत मनुष्य न्यूयार्कला पोहोचूं शकतो. परंतु न्यूयार्कहून अमेरिकेच्या पश्चिम भागांत जाण्यास दोनशें रुपये आणखी लागतात. ह्या करिता विचारी मनुष्यानें एक हजार रुपयापेक्षा कमी रकम केव्हांहीं बरोवर घेऊं नये. परदेशांत जातांना केवळ जरुरी पुरतें मोजके पैसे न घेतां थोडे बहुत जास्त रकम जवळ असू देणें एक व्यवहारकुशलतेचें लक्षण आहे. असें केल्यानें बराच त्रास कमी होतो. कित्येकांना अगदी मोजके पैसे घेऊन परदेशांत प्रवास करतांना फार कष्ट सोसावें लागले. अर्थातच ज्यांनी त्यांना मोकळ्या अंतःकरणानें परदेशी जाण्यास


+हल्ली परिस्थिति बदलली आहे. प्रचलित आगबोटींचे दर २ -या परिशिष्टांत दिले आहेत. अमेरिकन बंदरावर दाखविण्याकरितां हल्ली १०० डॉलर (२७५ रु.) जवळ असावे लागतात.