पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा- 8 रिक काडी, हींही त्यांच्या करमणुकीचीं साधनें होऊं शकतातयामुळे असले पदार्थ दृष्टीस पडल्यास, मुलें ते सहज उचलतात. ते चोरावे अशी त्यांची इच्छा नसते, पण ते जवळ असावे, असें त्यांस वाटत असतें. याकरितां अशा वलु त्यांच्याजवळ आढव्ळल्यास त्या काय आहेत, कोणाच्या आहेत, त्यांच्याजवळ कशा आल्या, याची चौकशी करावी; व त्या दुसच्या कोणाच्या असल्यास ज्यांच्या लयांस देऊन टाकण्यास त्यांस सांगावें, किंवा आपण देऊन टाकाव्या. प्रथमच मुलांस तें पटणार नाहीं, पण वारंवार सांगत गेल्यास त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाल्याशिवाय राहणार नाहीं. आग्रह न करितां, किंवा मुलांस विशेष न दुखवितां, नुसल्या उपदेशानें-दुसच्याची वस्तु ल्यास विचारल्याशिवाय घेऊं नये-हें तत्व मुलांस शिकवितां येईल. परंतु इकडे आपण दुर्लक्ष केल्यास त्यांस दुसच्याची वर्तु उचलण्याची संवय लागून, हाताळपणाचा दुर्गुण त्यांच्यांत उत्पन्न होईल. जें शिक्षण त्यांस द्यावयाचें, ज्या चालीरीती त्यांस लावावयाच्या, त्या नेहमींच्या वर्तनांतील गुणदोष दाखवून व आपलें वर्तन योग्य ठेवून, त्यांस लावण्याचा प्रयत्न करावा. मुलांशीं आपली वागणूक प्रेमाची असली, ह्मणजे आपण त्यांस एखादे दिवशीं कमी प्रेम दाखवल्यास तेवढे शासन त्यांस पुरेसें होतें. नेहमीं तंबाखू खाणारास तंबाखूचा औषधासारखा उपयोग होत नाही, त्याप्रमाणें नेहमीं रागावणारास त्याच्या रागाचा उपयोग होत नाहीं. नेहमीं मारणाराचा धाक मुलांस वाटत नाहीं, ल्याप्रमाणें नेहमीं रागावणाराच्या रागास कोणी विचारीत नाहीं. कित्येक आईबापांस मुलांशीं नेहमीं धुसफुस करण्याची संवय असते, पण ती अगदीं वाईट. त्या संवईपासून आईबापांस सुख होत नाहीं, व संततीसही सुख होत नाही. मुलें नेहमीं दुर्मुखलेलीं, तिरसट, किरकिरी, अशीं होतात, व आईबापांच्या कपाळाच्या आंठ्या कधीं नाहींशा होत नाहीत. - ३१ तिरसटपणानें जें काम होत नाहीं, तें प्रेमानें होतें. मुलांस