पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


8२ आईबापांचा मित्र. फाजील लाडामुळे इतकें वाईट वळण लागलें होतें की, तो मुलगा कोणासही खपनासा झाला होता. बरोबरीच्या मुलांत जावी, लहानांत जावो, मोठ्यांत जावो, बायकांत जावी किंवा पुरुषांत जावो; जाईल तेथें कजाभांडण केल्याशिवाय तो राहावयाचा नाही, असा त्याचा खभाव बनला होता. त्यास ताळ्यावर आणण्याकरितां मला अनेक प्रयत्न करावे लागले, व शेवटीं त्यास दोन वेळ जबर शिक्षाही करावी लागली. बापाचे वर्तन आरंभापासून शिस्तीचें नसल्यामुळे, त्या मुलास ताळ्यावर आणण्यास फार कष्ट पडले. २८ मुलांच्या मनांत वेगळ्या वेगळ्या वेळीं वेगळेवेगळे मनोभाव उत्पन्न होत असतात. त्यांतून चांगले ते वाढीस लागावे, व वाईट ते नाश पावावे, याकरितां आईबापांनीं प्रयत्न करावे; त्याकरितां त्यांनीं प्रथम सौम्य उपायांचे अवलंबन करावें, कठोरपणा बहुधा करूं नये. प्रथमच जालीम मात्रेचा उपयोग केल्यास पुढें ती मात्राही पचनी पडून, रोगावर उपयोगीं पडेनाशी होते; त्याप्रमाणें प्रथमपासून मारण्याची शिक्षा करणाच्या आईबापांस, ती शिक्षा . वेळेवर हात देईनाशी होते. उपदेशानें व उदाहरणांनीं पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या असतात. संसारांत अनेकविध उत्पन्न होणारे प्रसंग आईबापांनीं फुकट जाऊं देऊं नयेत, व त्यांच्यापासून योग्य वेळीं जो बोध घेण्यासारखा असेल, ती मुलांस दाखवून देण्यास चुकुं नये. अनेक पुस्तकांत अनेक उपयुक्त व बोधपर गोष्टी लिहिलेल्या असतात, त्यांचाही प्रसंगीं होईल तितका उपयोग करीत असावें. ह्मणजे मुलांस चांगल्या रीती लावण्यास त्यांचा मोठा उपयोग होईल. २९ ‘जो गुण बाळा तो जन्मकाळा' ह्मणजे लहानपणीं मुलांस कोणतेंही वळण लौकर लावितां येतें, व तें आमरण टिकर्ते. याकरितां चांगलें वळण लावण्याचे प्रयत्न बाळपणांत करावे, व वाईट संवय लागूं नये ह्मणून प्रथमपासून जपावें. ३० मुलांची जिज्ञासा लहानपणीं फार प्रखर असते. एखादा चांगलासा घोंडा, झाडाचे सुरेखसें पान, किंवा गवताची चमत्का