हिदुस्थानातील पाऊस व झाडे/हिंदुस्थानचे भूगोलवर्णन व हवामान

विकिस्रोत कडून


हिंदुस्तानांतील
पाऊस व झाडें
---------------
भाग १ ला.
---------------
हिंदुस्तानचे भूगोलवर्णन व हवामान

 झाडांच्या वृद्धीपासून व जंगल संरक्षणापासून काय काय व कसकसे फायदे होतात आणि पाऊस कसा पडतो व पावसाचा आणि झाडांचा काय संबंध आहे, हे सांगण्याचा ह्या पुस्तकाचा हेतु आहे. हा विषय चांगला समजण्यास आपल्या ह्या हिंदुस्तान देशाच्या भूगोलाचे संक्षिप्त वर्णन प्रथमतः केले पाहिजे.

भूगोलवर्णन

 हिंदुस्तानाच्या राजकीय विभागांच्या संबंधाने माहिती देण्याचे कारण नाहीं. ही माहिती व कोणकोणतीं शहरें कोठे कोठे आहेत ह्याची माहिती वाचकांस आहे असे गृहीत धरून फक्त डोंगर, नद्या वगैरे संबंधाने हिंदुस्तान देशाची जी स्वाभाविक रचना आहे तिचे वर्णन करूं.

 स्थाननिर्देश व व्याप्ति:–हिंदुस्तान देश हा विषुववृत्ताचे

उत्तरेस उत्तर अक्षांश ८ पासून ३६ पावेतों आहे; व पूर्व रेखांश 

६६ पासून ९२ पावेतों आहे. याची लांबी दक्षिणोत्तर १८०० मैलांहून जास्त आहे व पूर्वपश्चिम रुंदी सुमारे १५०० मैल आहे.

 सीमाः--हिंदुस्तानच्या उत्तरेस तिबेट देश असून तिबेट आणि हिंदुस्तान ह्यांच्या दरम्यान हिमालय पर्वताची रांग आहे. वायव्येस व ईशान्येस अनुक्रमें सिंधुनद व ब्रह्मपुत्रनद हे असून त्यांचे पलीकडे डोंगरांच्या रांगा आहेत. ह्या देशाचा दक्षिण भाग हा समुद्राने वेष्टित एक विस्तीर्ण द्वीपकल्पच आहे. ह्यासच दक्षिण (डेक्कन ) असे म्हणतात.

 ह्याप्रमाणे हिंदुस्तानच्या आग्नेयीस, दक्षिणेस व नैर्ऋत्येस समुद्र असून वायव्येस, उत्तरेस व ईशान्येस जमीन आहे. दक्षिणेकडील समुद्र जो हिंदीमहासागर हा विस्तीर्ण जलसमूह असून ह्यामध्ये लहान लहान बेटांशिवाय हिंदुस्तानच्या दक्षिणेस दुसरी जमीन नाही. सिंहलद्वीप म्हणजे लंका हा हिंदुस्तानचाच एक भाग आहे, अशी कल्पना करण्यास हरकत नाही. वायव्य, उत्तर व ईशान्य ह्या दिशांस जी जमीन आहे तिचे आसपास दूर अंतरापावेतो विपुल जमीनच आहे.

 ह्या देशाचे मुख्य भाग तीन आहेत तेः १ उत्तर हिंदुस्तान. २ हिमालय पर्वत. व ३ दक्षिण हे होत. ह्या तीन भागांचे आतां अनुक्रमें वर्णन करूं.

 उत्तर हिंदुस्तान:--हें फारच सुपीक व प्रसिद्ध असें विस्तीण मैदान आहे. हे पूर्वपश्चिम ब्रह्मपुत्रनदापासून सिंधुनदापर्यंत

जागा व्यापिते. व दक्षिणोत्तर हिमालयपर्वतापासून दक्षिण पठाराचे 

प्रदेशापर्यंत पसरले आहे. म्हणून ह्या मैदानाची लांबी सुमारे १५०० मैल असून रुंदी सरासरी ३०० मैलांपासून ४०० मैलांपर्यंत आहे. हे मैदान आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे हिमालय पर्वताच्या रांगेशी समांतर असे पसरले आहे. व तो पर्वत ह्या मैदानाची उत्तर सीमा आहे.

 ह्या विस्तीर्ण मैदानापैकी एक वाळूचे मैदान खेरीजकरून बाकीचा सर्व भाग एकसारखा सपाट असून त्यांतून जे असंख्य पाण्याचे प्रवाह वाहतात त्यांपासून ह्यास पाण्याचा पुरवठा होतो. ह्यावर अति रुंद व मंद गतीने वाहणाऱ्या अशा समुद्रासारख्या महानद्या आहेत. ह्या प्रदेशापैकीं पूर्वेकडील भाग बंगाल प्रांत हा वरील वर्णनाचे पूर्णपणे उदाहरण होय. हा प्रांत इतका सपाट आहे कीं, ह्यामध्ये एकसुद्धा लहान टेकडी अगर खडक नाहीं; व ह्यामधून गंगानदी अधिकाधिक विस्तीर्ण होत होत वाहात जाते. चीन देशांतील यांगत्सिक्यांग नदीचे कांठचा प्रदेश खेरीजकरून हा प्रांत सर्व पृथ्वीमध्ये अतिशय सुपीक व सुंदर आहे. ह्या नदीच्या वरच्या बाजूस बहार प्रांत आहे. ह्याच्या पृष्ठभागावर मात्र कोठे कोठे फारच लहान लहान टेकड्या आहेत. गंगानदीचे उत्तरेस अयोध्या व रोहिलखंड हे प्रदेश असून ते उत्तर दिशेकडे हिमालय पर्वताचे बाजूस थोडथोडे चढते होत गेले आहेत. ह्या ठिकाणीं गंगानदीचे *खोरे संपून यमुना नदीचे खोरे लागते. ह्या

-----

 *ज्या ज्या ठिकाणचे पावसाचे पडलेले पाणी वाहात जाऊन कोणत्याही

एकाद्या नदीस मिळते त्या सर्व प्रदेशास त्या नदीचे खोरे असे म्हणतात. 
दोन नद्यांमधील प्रांतास ' दोआब' असे म्हणतात. हा प्रांत

इतका सुपीक नाहीं; तरी ह्यामध्ये जंगल फार दाट आहे. यमुना नदीचे दक्षिण बाजूस तिचीच उपशाखा जी चंबळा नदी तिच्या प्रवाहाशी समांतर माळवा व अजमीर ह्या प्रांतांत ज्या डोंगरांच्या रांगा आहेत त्या लहान लहान टेकड्यांच्या बनलेल्या आहेत. दिल्लीच्या पश्चिमेस वाळूचे विस्तीर्ण मैदान लागते, व त्यानंतर पंजाब देश लागतो. ह्या देशामध्ये सिंधुनदास मिळणाच्या पांच नद्या असून पाण्याची समृद्धि पुष्कळ असल्यामुळे हा प्रदेश गंगा नदीच्या कांठच्या प्रदेशाच्या बरोबरीने सुपीक आहे.

 यमुना नदीच्या जवळच पश्चिमेस वर सांगितलेला सपाट प्रदेश थोडथोडा मध्यस्थानी उंच होऊन नंतर दोन्ही बाजूस उतरता होत गेला आहे. ह्या उच्च प्रदेशावर पडलेले पावसाचे पाणी पूर्वेकडे वाहात जाऊन गंगेस मिळते, व कांहीं पश्चिमेस वाहात जाऊन सिंधूस मिळते. ह्या दोन महानद्या व त्यांस मिळणाऱ्या नद्या ह्यांमध्ये एक विस्तीर्ण वाळूचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये थोडेसे लहान लहान पाण्याचे ओहोळ मात्र आहेत. ह्या ओहोळांचा उगम ह्याच मैदानांत होऊन त्यांचा लयही तेथेच होता. अशा प्रकारचे हे अरण्य हिमालय पर्वतापासून समुद्रापर्यंत पसरले आहे. ह्याची लांबी सुमारे ६०० मैल आहे व रुंदी सुमारे ३०० मैल आहे. अरबस्तानांतील किंवा आफ्रिका खंडांतील अरण्यासारखेच है एक अरण्य होय.

 हिमालय पर्वत:—हिंदुस्तानाच्या उत्तर सीमेवर म्हणजे वर 
सांगितलेल्या उत्तर हिंदुस्तानाच्या मैदानाच्या उत्तरेस ह्या मैदाना-

इतक्याच लांबीचा हिमालय पर्वत आहे. काल्डर साहेबांच्या मताप्रमाणे ह्या पर्वतसमूहामध्ये एक अविच्छिन्न एकसारखी १००० मैल लांबीची रांग आहे. समुद्राचे पृष्ठभागापासून ह्याची सरासरी उंची सुमारे २१००० फूट आहे. ह्या रांगेवर कांहीं कांहीं ठिकाणी कित्येक शिखरे आणखी ५०००-६००० फुटांपर्यंत उंच गेलेली आहेत. म्हणजे ह्या पर्वताची अतिशय उंची कांहीं कांहीं ठिकाणी समुद्राचे पृष्ठभागापासून २८०००-२९००० फूट म्हणजे ५ अगर ५/ मैल आहे. हा पर्वत जसजसा उंच होत गेला आहे, तसतशी त्यावरील हवेची उष्णता कमी कमी होत गेल्यामुळे, भूगोलावर उत्तरेकडे जाऊ लागले असतां ज्याप्रमाणे निरनिराळ्या वनस्पति व प्राणी आढळतात, त्याप्रमाणेच ह्या पर्वतावर स्थिति आहे.

 हिमालय पर्वतावरील वनस्पतिशास्त्राचे वर्णन करण्याकरिता रायल साहेबांनी त्याचे तीन पट्टे कल्पिले आहेत.

 पहिला पट्टा-हा ५००० फूट उंचीपर्यंत समजावयाचा. ह्या ठिकाणीं नियमाप्रमाणे उंचीच्या मानाने उष्णता कमी कमी होत गेलेली आहे. तथापि, उष्ण कटिबंधांतील वनस्पतींची जितका

-----

 *' कटिबंध' ह्याचा अर्थ " पृथ्वीवरील उष्णतेच्या मानावरून कल्पिलेला पट्टा " असा आहे. हवेच्या उष्णतेच्या मानाने पृथ्वीवर पांच पट्टे कल्पिले आहेत. पहिला पट्टा पृथ्वीच्या मध्यभागीं विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस २३/ अंशापर्यंत आहे. एथे उष्णता फार असते. ह्या

कटिबंधास 'उष्ण कटिबंध ' असे म्हणतात. ह्या कटिबंधास लागून उत्तरेस 
अभाव असावा असे थंड हवेच्या मानाने अनुमान होते तितका

अभाव नाहीं. Xकारण, दक्षिण दिशेकडून सूर्यकिरणांचा मारा असल्यामुळे उष्णता पुष्कळ असते व पाऊसही विपुल पडतो, ह्यामुळे वर सांगितलेल्या मैदानाच्या उत्तरेकडील उच्च भागावर ज्याप्रमाणे वनस्पति पूर्णदशेस येतात तशाच एथेही येतात. परंतु कांहीं नाजूक झाडांना एथील तीक्ष्ण हवा व रात्री सुटणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका सहन होत नाहींत. ह्यांपैकीच आंबा व अननस हीं उत्तम फळझाडे होत. ह्याचप्रमाणे हिंवाळ्यामध्ये ह्या कटिबंधाच्या उच्च उच्च शिखरांवर युरोप व इतर समशीतोष्ण देशांतील झाडे व उष्ण देशांतील झाडे हीं एकत्र उगवलेली आढळतात. ह्या भागावर बर्फ सहसा दृष्टीस पडत नाहीं.

 दुसरा पट्टाः—हा ९००० फूट उंचीपर्यंत कल्पिला आहे.

-----
( मागील पृष्ठावरून पुढे चालू ).

एक व दक्षिणेस एक असे दोन कटिबंध आहेत. त्यांस ' समशीतोष्ण कटिबंध ' असे म्हणतात. हे अयनवृत्तांपासून उत्तरेस व दक्षिणेस ४३° आहेत. ह्या ठिकाणीं शीत व उष्ण ह्यांचे मान सरासरी सारखे असते. बाकीचे दोन कटिबंध दोन्ही ध्रुवांपासून २३साचा:स्फ्राक अंशांपर्यंत आहेत. एथे थंडी फार असते.

 X हिमालय पर्वत उष्ण कटिबंधाच्या उत्तरेस असल्यामुळे त्यावर सूर्याचे किरण लंब रेषेने कधीही पडत नाहींत. सूर्याचे किरण दक्षिण दिशेकडून वक्र दिशेने ह्या पर्वताकडे येतात. त्यांस ह्या पर्वताचा अडथळा झाल्यामुळे लंब रेषेनें किरण पडल्याप्रमाणेच ह्या पर्वताचे दक्षिण पाखरावर यांचा परिणाम होतो. ह्या पर्वताच्या उत्तरेच्या पाखरास सूर्यकिरणांचा

ताप फारसा होत नाही. 
एथे हिंवाळ्यांत बर्फ नेहमीं पडते व कधी कधी तर बरेच खोल

पडते; परंतु वसंत ऋतु लागतांच ते वितळून जाते. समशीतोष्ण देशांतील वनस्पति एथे जास्त आढळतात. तथापि, पूर्वी सांगितलेल्या कारणांमुळे उष्ण कटिबंधांत उत्पन्न होणारी झाडे जितक्या उच्च प्रदेशावर उगवण्याचा संभव असतो त्यापेक्षा अधिक उच्च प्रदेशावर हीं उगवलेली आढळतात; व थंड हवेत होणाच्या वनस्पति ह्याच झाडांमध्ये संमिश्र होऊन उगवतात. परंतु शीत व उप्ण ह्यांचा कडाका फारच असल्यामुळे उष्ण कटिबंधांत उगवणारी झाडे चांगली वाढत नाहींत. ताड, माड वगैरे हिंदुस्तानांत होणारी झाडे ह्या ठिकाणी आढळत नाहींत. सर्व झाडझाडोरा युरोपखंडाप्रमाणे दिसतो.

 तिसरा व सर्वांत उंच पट्टाः- हा दुसऱ्या पट्टयापासून हिमालयाच्या शिखरांपर्यंत समजावयाचा. एथील हवा युरोप व अमेरिका खंडाच्या अगदी उत्तरेकडील भागाप्रमाणे आहे, व शेवटी अगदीं शीतकटिबंधांतल्या हवेप्रमाणे आहे, म्हणजे एथे सतत बर्फ असते. मे व जून ह्या महिन्यांमध्ये हिंवाळ्याची कडक थंडी नाहीशी होऊन एकाएकी अतिशय उन्हाळा भासतो. ह्या वेळीं असा चमत्कार दृष्टीस पडतो की, ह्या प्रदेशामध्ये आपण प्रवास करूं लागलों असतां, वरून सूर्याचे किरण इतके तीक्ष्ण भासतात तरी त्यामुळे हवेतील थंडाव्यामध्ये फरक न होतां उष्णतामापक यंत्रामध्ये पाहतां पारा ० अंशाच्या खाली कित्येक अंश असतो. ह्याचे कारण

असे की, सूर्याच्या किरणांपासून जी उष्णता प्राप्त होते ती सर्व
बर्फाचे पाणी करण्यामध्ये अदृश्य होते. पदार्थाचे रूपांतर होऊ

लागले असतां पुष्कळ उष्णता नाहीशी होते असा पदार्थविज्ञान शास्त्राचा नियम आहे.

 हिमालय पर्वत चढून जाऊन उत्तरेकडे वळू लागले म्हणजे अगदीं निराळा देखावा दृष्टीस पडतो. त्या बाजूस तिबेट देश आहे. तो हिंदुस्तान देशाइतका खोल नाहीं, म्हणजे तो एक पठाराचा प्रदेश आहे. ह्या पर्वताच्या त्या पाखरास हिंदुस्तानांत पर्जन्यकाळ असतो त्या वेळी पाऊस पडत नाहीं; व बर्फही फार थोडे पडते. त्या बाजूस इकडच्याप्रमाणे झाडझाडोऱ्याची समृद्धि नाहीं.

 हिमालय पर्वताची हिंदुस्तानचे उत्तरेस भिंत बनून राहिली आहे; इतकेच नाही, तर तिजखेरीज त्या पर्वताच्या दोन्ही टोंकांपासून त्याच्या टेकड्यांचे फांटे दक्षिण दिशेकडे गेले आहेत. ईशान्येकडे जे फांटे गेले आहेत त्यांना नागपर्वत व पतकुईपर्वत अशी नावे आहेत. त्यांच्या योगाने हे स्वतःसिद्ध हिंदुस्तानची ईशान्य सीमा बनून राहिले आहेत. तसेच, हिंदुस्तानच्या वायव्येकडील डोंगरांचे फांटे ब्रिटिश सरकारचे सरहद्दीवर हिमालयापासून तो थेट समुद्रापर्यंत खाली आले आहेत. हे फांटे दक्षिणेकडे येत असतां अनुक्रमें सेफेडकोह, सुलैमानपर्वत व हालापर्वत ह्या नांवांनी प्रसिद्ध आहेत. ह्या पर्वतांच्या शिखरांची उंची ११००० फुटांहून जास्त आहे.

 दक्षिण:-दक्षिणेकडील द्वीपकल्प ह्यास दक्षिण ( डेक्कन )

असे म्हणतात. ह्याची रचना वर सांगितलेले मैदान व त्याची 
उत्तर सीमा जो हिमालयपर्वत त्यासारखी नाहीं. लहान लहान

टेकड्या व कांहीं कांहीं ठिकाणी डोंगर ह्या प्रदेशाच्या पृष्ठभागावर ठिकठिकाणी पसरले आहेत. व ह्यांमध्ये लहान मोठी पुष्कळ पठारें आहेत. अशा तऱ्हेने जमीन समुद्राचे पृष्ठभागापासून बरीच उंच असल्यामुळे उष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंध ह्या दोहों ठिकाणची हवा व वनस्पति ह्या ठिकाणी आढळतात. परंतु विशेष लक्षात ठेवण्यासारखी रचना म्हटली म्हणजे ह्या द्वीपकल्पास समांतर त्रिकोणाकार पर्वत आहेत ही होय. ह्या त्रिकोणाचा पाया म्हणजे उत्तरेकडचा भाग हा खंबायतच्या आखातापासून बंगालच्या उपसागरापर्यंत नर्मदा नदीचे दोन्ही कांठचा उंच डोंगराळ प्रदेश होय. ह्याच प्रदेशांत माळवा व खानदेश हे प्रांत आहेत. ह्या प्रांतांसच मध्य हिंदुस्तान ही संज्ञा देतात. वरील डोंगराळ प्रदेशास विंध्य पर्वताची रांग म्हणतात. तथापि, हा पर्वत इतका पसरट असून इतक्या रुंद प्रदेशावर पसरलेला आहे व तो इतका ठेंगणा आहे कीं, तो डोंगराची एकसारखी रांग न दिसतां तुटक तुटक अशा साधारण पठाराप्रमाणे दिसतो. बहुतकरून ह्या डोंगराची

  • उंची २००० फुटांपेक्षा जास्त नाहीं. ह्या डोंगराच्या दोन्ही

शेवटांपासून दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यास समांतर अशा दोन पर्वतांच्या रांगा गेल्या आहेत, ह्यांस घाट अशी संज्ञा आहे. हे घाट

-----

 *पर्वत, डोंगर व पठार ह्यांच्या ज्या ज्या ठिकाणी उंच्या सांगितलेल्या

आहेत त्या त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पृष्ठभागापासून आहेत असे समजावे. 
१०

ह्या द्वीपकल्पाचे समोरासमोरचे मलबार व कारोमांडल किनारा ह्यांस बहुतांशीं माळ घातल्याप्रमाणेच आहेत की काय असे दिसते. पश्चिमघाट ज्यास सह्याद्रि असे म्हणतात ही पर्वताची रांग अरबी समुद्राचे किनाऱ्याशी समांतर व किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर पसरली आहे. व कांहीं कांहीं ठिकाणी तर अगदी समुद्रास येऊन भिडली आहे. समुद्रापासून पर्वताचे सरासरी अंतर ३० पासून ५० मैलपर्यंत आहे. ह्या पर्वताचे शिखरांवर हिमालय पर्वताचे शिखरांप्रमाणे समशीतोष्ण देशांतील व शीत देशांतील वनस्पति नसून उष्ण देशांतील सुंदर व भव्य ताडमाडांची झाडे व कांहीं सुवासिक झाडे म्हणजे चंदन, मिरी, सुपारी, साबू , व नारळ हीं आढळतात. सर्वांत इमारतीच्या उपयोगी श्रेष्ठ अशीं सागवानाचीं झाडे ह्या पर्वतावर होतात. उत्तरेकडच्या बाजूस ह्या पर्वताची उंची ३००० फुटांहून जास्त नाहीं. साताऱ्याजवळ महाबळेश्वर म्हणून एक शिखर ५००० फूट उंच आहे, व रोगी मनुष्यास हे आरोग्यस्थान आहे. परंतु, ह्या पर्वताची अतिशय उंच शिखरें अक्षांश १५ चे दक्षिणेस मलबार व कानडा ह्यांच्या किनाऱ्यावर आहेत. त्या ठिकाणीं कांहीं कांहीं *ग्रानाइटचीं शिखरे ६००० फूटपर्यंत उंचीची आहेत. म्हैसूरच्या सरहद्दीवर ह्या पर्वतापासून एक आडवी रांग पूर्वपश्चिम गेली आहे; हीस निलगिरी असे म्हणतात. हा पर्वत दक्षिणेमध्ये सर्वात उंच आहे. ह्याचे एक शिखर दोदाबेटा

-----

 *ग्रानाईट हा एक प्रकारचा धोंडा आहे. हा गार, अभ्रक, व हार्नब्लेंड

ह्या तीन खनिज पदार्थाच्या कणांच्या मिश्रणापासून झालेला असतो.
११

हे ८७०० फूट उंच आहे. रायल साहेबांचे मताप्रमाणे दोन्ही घाटांस जोडून टाकणारी ही रांग होय. व एथून फक्त एकच फांटा दक्षिणेकडे कन्याकुमारी केपापर्यंत गेला आहे. पश्चिमकिनारा बहुतकरून फार सखल आहे, व किनाऱ्याशीं समांतर अशा बहुत नद्या वाहतात.

 पूर्वेकडील घाट हे कारोमांडल किनाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूस म्हणजे पश्चिमेस आहेत व साधारणपणे सह्याद्रीइतके उंच नाहींत. तथापि, त्यांस असंख्य शाखा फुटल्या आहेत. समुद्र व डोंगर ह्यांमधील अंतरही जास्त आहे. पश्चिम घाटापासून निघून बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या महानद्यांचा *अंतर्वेदीचा प्रदेश खेरीजकरून बाकीचा भाग रुक्ष व नापीक आहे. कांहीं कांहीं ठिकाणी तर लवणमिश्र वाळूच्या जमिनी आहेत. थोडेसे उत्तरेकडे म्हणजे ओरिसा आणि सरकार ह्या प्रांतांमध्ये उंचवट्याचा प्रदेश अगदी समुद्रास जाऊन मिळाला आहे. व तो बहुतेक लागण नसून डोंगराळ व जंगलयुक्त असा आहे. हिंदुस्तानचे इतर भागांतील लोकांपेक्षा एथील लोक अगदीं रानटी आहेत. ह्याच्याच पुढे गंगा नदीच्या जवळचा कटक प्रांत इतका सखल आहे कीं, एथे समुद्राचे पाणी शिरून तो प्रदेश बुडून जाण्याची नेहमीं भीति असते.

 वर सांगितलेल्या डोंगराच्या रांगांनीं वेढिलेलालेला उच्च प्रदेश हाच दक्षिण हिंदुस्तानचा मुख्य भाग होय. हे एक विस्तीर्ण पठार असून ह्याची सरासरी उंची १५०० फुट आहे. पश्चिमघाट पूर्वघाटा-

-----
 * अंतर्वेदी म्हणजे एका नदीच्या दोन फांट्यांमधील प्रदेश. 
१२

पेक्षा अधिक उंच असल्यामुळे हा भाग पश्चिमेस अधिक उंच असून पूर्वेस उतरता होत गेला आहे. ह्या कारणाने सर्व मोठमोठ्या नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी व महानदी ह्या पश्चिमेस उगम पावून पूर्वेकडे वाहात जातात. ह्या प्रदेशाच्या नैर्ऋत्येकडचा भाग मराठ्यांच्या राज्याचे मुख्य स्थान होते. हा भाग अतिशय जरी डोंगराळ नाहीं तरी खोल खोल दऱ्यानी व्यापला आहे. मध्यभाग म्हणजे गोवळकोंडे, विजापूर वगैरे प्रांत हीं बरीच सपाट मैदाने आहेत; व समुद्राचे पृष्ठभागापासून हा प्रांत बराच उंच असल्या- मुळे घाटाखाली सूर्याचे प्रखरतेपासून जितका त्रास होतो, तितका एथे होत नाहीं. जमीन सपाट असून सुपीक आहे. अगदी दक्षिणे- कडचा प्रांत ज्याला कर्नाटक असे म्हणतात त्यामध्ये दोन पठारें आहेतः एक म्हैसूर व दुसरें बालेघाट. ही दोन्ही पठारें मूळच्या उच्च भागावर आणखी बरीच उंच आहेत. ह्यांपैकी म्हैसूर प्रांत सुमारे ३००० फूट उंच आहे, म्हणून दक्षिणचे पठारावर निर- निराळ्या प्रकारची हवा, जमिनी व पिके आढळतात.

हवामान

 ह्याप्रमाणे स्वाभाविक रचनेचे वर्णन झाले. आतां ह्या देशाची हवा कशी आहे ते पाहूं. आरंभीं सांगितलेच आहे की, हिंदु- स्तानदेश हा विषुववृत्ताचे उत्तरेस ८° पासून ३६° पर्यंत आहे. व कर्कवृत्त हे विषुववृत्ताच्या उत्तरेस २३/ ° वर आहे. म्हणजे हिंदु- स्तानदेश अर्धा उष्ण कटिबंधांत व अर्धा समशीतोष्ण कटिबंधांत

आहे, असे म्हटले तरी चालेल.
१३

 कर्कवृत्त हें उष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंध यांची सीमा आहे. हे वृत्त हिंदुस्तानचे पश्चिमेस सिंधुनदाच्या मुखाच्या दक्षिणेकडून येऊन कच्छ प्रांतांतून गुजराथेमध्ये अहमदाबादेच्या उत्तरेकडून जाऊन, माळव्यामध्ये उजनीच्या उत्तरेकडून जाते. पुढे बहार प्रांतांतून बंगाल प्रांतामध्ये बरद्वान, डाका ह्यांच्या उत्तरेकडून जाऊन ब्रह्मदेशाकडे जाते. ह्या वृत्ताच्या उत्तरेस सूर्य कधीही थेट डोक्यावर येत नाहीं. उत्तरायणामध्येसुद्धा सूर्य दक्षिणेचेच बाजूस असतो. तशी गोष्ट वरील वृत्ताचे दक्षिण बाजूस नाहीं. इकडे वर्षातून दोन वेळां सूर्य थेट डोक्यावर येतो. म्हणजे ज्या वेळीं सूर्य दक्षिणेकडून येऊन उत्तरेकडे जाऊ लागतो त्या वेळी एकदां, व पुनः जेव्हां उत्तरेकडून परतून पुनः दक्षिणेकडे जाऊ लागतो त्या वेळीं एकदां. ह्यास प्रत्यंतर कीं, कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील लोकांस उत्तरायणामध्ये झाडे, घरे वगैरेची सावली दक्षिणेकडे पडलेली दिसते. व दक्षिणायनामध्ये उत्तरेकडे पडलेली दिसते. तशी स्थिति कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील लोकांना होत नाहीं. तिकडे सावली नेहमीं उत्तरेकडे पडलेली दिसते.

 उष्ण कटिबंधांत सरासरी वार्षिक उष्णतेचे मान ७३° पासून ८२ पर्यंत असते. व पुढे अक्षांश ३६ पर्यंत सरासरी ६२° पासून ७१° पर्यंत असते. वर सरासरी वार्षिक उष्णतेचे मान सांगितले. परंतु, सरासरी उष्णतेचे मान सांगितल्याने तेथील उन्हाळ्याचे कडकपणाची कल्पना नेहमीं करितां येते असे नाहीं.

आतां उन्हाळ्यामध्ये जे उष्णतेचे मान असते, त्यापेक्षां हिंवाळ्या
१४

मध्ये थंडीचे मान जितकें कमी असेल त्याच प्रमाणानं वार्षिक सरासरी उष्णतेचे मान कमी असते. ह्याचे उलट, उन्हाळ्यांतील व हिंवाळ्यांतील उष्णतेचे मान जितकें जितके जवळ जवळ असेल, तितकें तितके सरासरी वार्षिक उष्णतेचे मान जास्त होते. ह्यावरून सरासरी वार्षिक उष्णतेचे मान कमी असले तरी त्या ठिकाणी उन्हाळा कमी असतो, असे समजू नये. उदाहरणार्थ असे घेऊ कीं, एके ठिकाणी उन्हाळ्याच्या उष्णतेचे मान १०० अंश आहे; व त्याच ठिकाणी हिंवाळ्यामध्ये उष्णतेचे मान ६० अंश आहे. तेव्हां ह्या ठिकाणचे सरासरी वार्षिक उष्णतेचे मान ८० अंश झाले. आतां, दुसरें एक ठिकाण आहे, तेथे उन्हाळ्यांत उष्णता ९०° असते; व हिंवाळ्यांत उष्णता ८०° असते, अशी कल्पना करू. ह्या ठिकाणीं वर्षाचे सरासरी मान ८५° होते. आतां, ह्या दुसऱ्या ठिकाणी सरासरी वर्षाचे उष्णतेचे मान जरी अधिक आहे, तरी पहिल्या ठिकाणी उन्हाळा विशेष कडक आहे. ह्यावरून हे उघड होते की, वार्षिक उष्णतेचे मान सांगितले असतां, तेथील उन्हाळ्यांतील उष्णतेचे प्रखरतेची कल्पना नेहमी बरोबर करितां येते, असे होत नाहीं.

 उत्तर हिंदुस्तानांत वार्षिक उष्णतेचे सरासरी मान जरी दक्षिणेपेक्षा कमी आहे तरी हा प्रदेश सखल असल्या कारणाने म्हणजे समुद्राचे पृष्ठभागापासून ह्याची उंची फारशी नसल्या कारणानें, तसेच मे व जून महिन्यांमध्ये एथे सूर्याचे किरण अधिक लंब रेषेनें

पडत असल्या कारणाने उन्हाळा फार होतो. विशेषतः वायव्य
१५

दिशेकडे उन्हाळा फारच कडक भासतो. सिंधप्रांतामध्ये बलुचिस्तानचे सरहद्दीवर तर उष्णतेची कमाल होते. जेकबाबाद एथें पारा कधीं कधीं १२५° वर चढतो. इतकी उष्णता हिंदुस्तानांत दुसरे कोठेही नसते. पंजाब ह्याचे खालोखालच असतो. ह्या भागांत जून महिन्यामध्ये भयंकर भट्टी पेटते असे म्हणण्याचा प्रघात आहे. उत्तर हिंदुस्तानांत हिंवाळ्यामध्ये थंडी फार पडते म्हणून हा ऋतु तेथे स्पष्टपणे निराळा भासतो.

 मध्य हिंदुस्तानांत उन्हाळ्यामध्ये उष्णता थोडीशी कमी भासते. हा भाग जरी कर्कवृत्ताजवळ आहे, तरी डोंगराळ असल्याकारणाने उष्णता इतकी भासत नाही. परंतु, थंडीच्या दिवसांत थंडी बरीच असते.

 दक्षिण जरी उष्ण कटिबंधांत आहे, तरी एथे उन्हाळा सौम्य असतो. ह्याची कारणे तीन आहेत. पहिले कारण हें कीं, हा प्रदेश एक विस्तीर्ण पठार असल्या कारणाने म्हणजे समुद्राचे पृष्ठभागापासून हा बराच उंच असल्या कारणाने एथे सूर्याचे किरण फारसे प्रखर नसतात. दुसरी गोष्ट अशी की, मे व जून ह्या महिन्यांमध्ये सूर्य कर्कवृत्ताचे जवळ जवळ असल्यामुळे त्याचे किरण फारसे लंब रेषेने पडत नाहींत. व तिसरी गोष्ट, जून महिन्याचे आरंभींच पाऊस सुरू झाल्या कारणाने एथे थंडावा उत्पन्न होतो. तथापि, हिंवाळाही सौम्यच असल्या कारणानें वार्षिक उष्णतेचे सरासरी मान मात्र जास्त असते.

 एकंदरीने पाहतां, डोंगराळ प्रदेशाचा थोडासा भाग खेरीजक
१६

रून सर्व देशामध्ये उष्णताच जास्त असते, असे म्हणण्यास हरकत नाहीं.

 हिंदुस्तान देशांतील दुसरा हवेचा विशेष म्हटला म्हणजे एथे नियमित काळी मात्र पाऊस पडतो. पावसाळा साधारणतः जून पासून ऑक्टोबर अखेरपावेतों पांच महिने असतो. बाकीचे सात महिने साधारणतः पर्जन्यरहित असतात, असे म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणजे पांच महिने जो पाऊस पडतो, त्याजवरच वर्षभर निर्वाह करावा लागतो.



--------------------