हिदुस्थानातील पाऊस व झाडे/जंगलसंरक्षण

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


भाग ७ वा.
---------------
जंगलसंरक्षण.

  हिंदुस्तान देशामध्ये अति प्राचीन कालापासून झाडझाडोऱ्याची समृद्धि कशी होती, हा देश झाडझाडोऱ्याचे समृद्धीस योग्य आहे कीं नाहीं, हल्ली त्याची स्थिति कशी आहे, व त्याचे संरक्षण कसे होत आहे, याचे वर्णन ह्या भागांत आहे.

भूगर्भशास्त्रकाल.

 अति प्राचीन काली म्हणजे हजारों लाखों वर्षांपूर्वी हिंदुस्तान देश झाडझाडोऱ्याने गजबजलेला होता, ह्यांत बिलकुल संदेह नाही. हिंदुस्तान देशभर जागोजागी दगडी कोळशांच्या खाणींचा शोध लागला आहे व अजूनही लागत आहे, हे ह्या गोष्टीची साक्ष देत आहे.* युरोपखंडांतील इंग्लंड वगैरे देशांमधील कोळशांच्या खाणींचा जो काल त्याहून थोडा अलीकडचा काल ह्या देशांतील कोळशांच्या खाणींचा आहे.

भूगर्भशास्त्रानंतरचा काल.

 हा काल म्हणजे पृथ्वीचे रूपांतर होता होतां तिला हल्लींचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतरचा होय. ह्याच कालांत हिंदुस्तान देशास

-----

 *मोठमोठाली जंगले जमिनीच्या पोटामध्ये गडप होऊन त्यांचा

दगडी कोळसा बनला आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. 
११९

हल्लींचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या कालाबद्दल खातरीपूर्वक माहिती मिळण्यास साधन नाहीं. परंतु हिंदुस्तान देशाच्या स्थानावरून व हवामानावरून योग्य अनुमान काढण्यास हरकत नाहीं.

 झाडझाडोऱ्याचे वृद्धीस विवक्षित उष्णतेपेक्षा जास्त उष्णता व विवक्षित ओलाव्यापेक्षा जास्त ओलावा अवश्यक आहे. हिमालय पर्वताचे उच्च शिखरांचा भाग खेरीजकरून बाकी सर्व देशभर उष्णता पुष्कळ म्हणून मागे सांगितलेच आहे. तेव्हां उष्णतेची अनुकूलता उत्तम आहे. आतां, ओलावा कसा आहे ते पाहूं. दक्षिण द्वीपकल्प समुद्राने वेष्टित असल्या कारणाने त्याचा मध्यभाग खेरीजकरून बाकीच्या भाग पाऊस पुष्कळ पडतो व वर्षभर हवेमध्ये आर्द्रता पुष्कळ असते, ह्यामुळे ह्या प्रदेशांत ओलाव्याचे आनुकूल्य उत्तमच आहे. ह्यांतील मध्यभागामध्ये म्हणजे अल्पवृष्टीचे भागामध्ये समुद्राची आर्द्रता चांगली पोहचू शकत नाहीं हे खरे. तथापि, वर्षाचे पावसाचे मान सरासरी २५ इंच असल्याकारणाने इतका ओलावा झाडांचे उत्पत्तीस व वृद्धीस विपुल जरी नाहीं तरी साधारण पुरेसा आहे. उत्तर व मध्य हिंदुस्तानांतील अति वृष्टीचे व अधिक वृष्टीचे जे भाग आहेत तेथेही ओलाव्याची कमतरता नाहीं. एथे अल्पवृष्टीचा जो भाग आहे, त्याची स्थिति वरील अल्प वृष्टीच्या भागासारखीच आहे. राहतां राहिलेला वायव्येकडील अनावृष्टीचा प्रांत. ह्यांत मात्र ओलावा अगदीच नसतो म्हटले तरी चालेल. तथापि, सिंधुनद व पंजाबांतील कांहीं नद्या

ह्यांच्या कांठचा प्रदेश ह्यांमध्ये आर्द्रता विपुल असते. सारांश, 
१२०

देशाचा थोडासा भाग खेरीजकरून बाकी सर्वत्र ओलाव्याचीही उणीव नाहीं.

 वरील दोन गोष्टींशिवाय झाडांचे उत्पत्तीस व वृद्धीस आणखीही एका गोष्टीची अवश्यकता आहे. ती जमिनीचे पृष्ठभागावरील कमी अगर अधिक माती ही होय. परंतु हवा, पाऊस वगैरेच्या आघाताने पृथ्वीचा पृष्ठभाग कुजून त्याची स्वभावतःच नेहमी माती बनत असते. ह्याकरितां ह्या अवश्यकतेची उणीव फारशी कोठेही नसावयाची.

 ह्याप्रमाणे झाडांचे उत्पत्तीस व वृद्धीस बहुतेक सर्व देशभर आनुकूल्य असल्याकारणाने वर निर्दिष्ट केलेल्या काळीं सर्व देश झाडझाडोऱ्याने व्याप्त असला पाहिजे, असे अनुमान काढण्यास कांहीं हरकत नाही. आतां, एवढी गोष्ट खरी की, ज्या ज्या स्थळी हें अनुकूल्य कमीअधिक असेल त्या मानाने समृद्ध कमीजास्त असणार.

वेदकाल.

 वर सांगितलेल्या कालानंतर देशामध्ये प्रथमतः जेव्हां मनुष्य- वस्ती झाली असेल, तेव्हां तीं मनुष्यें राक्षसादि रानटी मनुष्य असली पाहिजेत. अशा मनुष्यांकडून रानांचा नाश होत नाही. धान्य पिकविण्याची कला ह्या लोकांस अवगत नसली पाहिजे. व जरी थोडीबहुत माहीत असली, तरी ती हल्लींच्या दळऱ्ही वगैरे लागवडीच्या नमुन्याची स्थलांतर करणारी असली पाहिजे. अशा

लागवडीने रानांचा कायमचा नाश होत नाहीं. लागवडीकरितां 
१२१
जरी जंगल तुटले, तरी तेथील लागवड बंद होतांच पुनः

जंगलाची उत्पत्ति होते.

 सुधारलेला मनुष्य व त्याची पाळीव जनावरे हे जंगलाचे मुख्य शत्रु होत. हे जेथे जेथे जातील तेथील तेथील रानांचा नाश झालाच पाहिजे. सुधारलेल्या मनुष्याचे मुख्य चिन्ह म्हटलें म्हणजे धान्य पिकविण्याची कला व कायमच्या लागवडीची व्यवस्था हें होय. ह्या लागवडीस रानांचा नाश करणे जरूर आहे, व पाळींव जनावरे बाळगणेही जरूर आहे. शिवाय, मनुष्यांस घरे बांधण्याकरितां वगैरे लागणाऱ्या साहित्याकरितां व जनावरांचे उपजीविकेकरितां रानांचा परोपरीने नाश होणे साहजिकच आहे.

 उत्तर आशियामधून आर्य लोक वसाहत करण्याकरितां जेव्हां हिंदुस्तानांत उतरले, तेव्हांपासून जंगलचे नाशास आरंभ झाला असावा. ह्या लोकांनीच आपल्याबरोबर धान्य पिकविण्याची कला आणिली असावी. ह्या लोकांनीं नद्यांचे कांठचे सुपीक प्रदेश मात्र प्रथमतः लागवडीस आणले असावे. परंतु जनसंख्या कमी असल्या कारणानें वनांचा नाश फारसा होण्यास कारण नव्हते. शिवाय, ह्या कालीं उत्तर हिंदुस्तानचे अलीकडे ह्या लोकांचा संचार झाला नसल्याकारणाने दक्षिणेतील अरण्यें कायम असली पाहिजेत.

 अलीकडील शोधक व विद्वान लोकांच्या मताप्रमाणे वेदकाल म्हणजे दहा हजार वर्षांचे अलीकडला काल होय. वेदामध्यें अरण्यांचीं वर्णने नाहींत. परंतु वनांतील आश्रम व राक्षसादि रानटी लोकांचा

सुळसुळाट ह्यांवरून साधारण सर्व देश अरण्यमय असला पाहिजे. 
१२२
पौराणिक काल.

 हा काल म्हणजे, अलीकडील २००० वर्षांचे पलीकडचा होय. ह्याच कालामध्यें आर्य लोकांची सर्व प्रकारे प्रगति होऊन त्यांचा विस्तार व राज्यस्थापना झाल्या. दक्षिणेत आर्य लोकांचा प्रवेशही ह्याच कालचा होय. मोठमोठालीं शहरे वसली गेली, पुष्कळ जमीन लागवडीस आली, व दूरदूरच्या प्रांतीं दळणवळण वाढले ह्या कारणांनी पुष्कळच रानांचा नाश झाला असावा. तथापि, रानेंवनें काही कमी नव्हतीं. रामायणामध्यें पुष्कळ वनांचा जागोजाग उल्लेख आहे. राजधान्यांपासून एकेक दिवसाचे मजलेवर राने असल्याची वर्णने आहेत, व राजे लोकांनीं मृगयेकरितां राने राखून ठेवण्याची पद्धत होती असे दिसते. बहुतेक दक्षिणदेश दण्डकारण्याने व्याप्त होता. तथापि, आर्य लोकांच्या सहवासाने मूळच्या अनार्य लोकांमध्येसुद्धा सुधारणा होऊन त्यांची राज्ये स्थापन झाली होती॰ उत्तर हिंदुस्तानांमध्ये निषादांचा राजा गुह होता असे वर्णन आहे. व दक्षिणेससुद्धां रावण, वाली, सुग्रीवादिकांची राज्ये होती. परंतु रानांची व्याप्ति किती होती हे सांगण्यास मार्ग नाहीं. भारतकाली सुधारणा जास्त झाली व राज्येही वाढली त्यामुळे वनांचा नाश जास्तच झाला असावा. दण्डकारण्यामध्येसुद्धां विराटाचे राज्य झाले होते. तथापि, शिल्लक राहिलेल्या रानांचा विस्तार कांहीं कमी नसावा. तो अमुकच असावा असे सांगण्यास मात्र

आधार नाहीं. 
१२३
ऐतिहासिक काल.

 अर्वाचीन दोन हजार वर्षांचा जो काल त्याचा यांत समावेश होता. ह्या कालाचे तीन भाग करितां येतील. पहिला, हिंदु राज्यांचा काल सन १००० पर्यंतचा; दुसरा, मुसलमानांचे राज्याचा सन १७५७ चे प्लासीचे लढाईपर्यंतचा; व तिसरा, त्या नंतरचा इंग्रजांचे राज्याचा. ह्या कालामध्येसुद्धा जंगलाचा उत्तरोत्तर ऱ्हासच होत गेला असावा. तो अलीकडे ३०|४० वर्षांपूर्वी मात्र थांबला.

 हिंदुराजांचे कारकीर्दीत जंगलची व्याप्ति किती होती, हे सांगण्यास साधन नाहीं. ख्रिस्ती शकाचे चौथ्या शकामध्ये फाहिमान नांवाचा एक चिनी प्रवासी हिंदुस्तानांत आला होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन लिहून ठेविले आहे. त्यांत तो म्हणतो की, हिंदुस्तान देशाची हवा फार थंडही नाहीं व उष्णही नाहीं. ह्यावरून ह्या वेळेच्या पूर्वी दोन तीन शतकें व नंतर दोन तीन शतकें तरी देशामध्ये जंगलची समृद्धि चांगली असावी असे अनुमान काढिता येईल. शिकारीकरितां राने राखून ठेवण्याची पद्धत चालू असे असे दिसते.

 मुसलमानांचे अमदानींतही जंगलची व्याप्ति किती होती, हें समजण्यास मार्ग नाहीं. परंतु, शिकारीकरितां व डोंगरी किल्ल्यांचे पायथ्याशी त्यांच्या संरक्षणाकरितां जंगले मुद्दाम राखून ठेवीत असत. हीं राने राखून ठेवण्याचे नियमही कडक असून त्यांचा अंमलही सक्तीने

होत असे. परंतु रानसंरक्षणापासून फायदे काय 
१२४

आहेत याचे यथार्थज्ञान त्या काली नसल्यामुळे जंगलसंरक्षणाकडे ह्या राजांनी लक्ष पुरविलें नाहीं. प्लासीचे लढाईपासून इंग्रजांचे राज्यास सुरुवात झाली असे मानता येईल. त्या वेळीच बहुतेक महत्त्वाचे रानांचा नाश झालेला असावा. तथापि, जीं कांहीं जंगले शिल्लक होती, त्यांचा नाश चालू होताच. जंगलरक्षणापासून होणाऱ्या फायद्यांचे अज्ञान व काळीचा वसूल वाढविण्याकडे मनाचा कल ह्या दोन गोष्टी ह्या नाशास मुख्यतः कारणीभूत झाल्या. त्या वेळी रानरक्षण हे लागवडीस हरकत आणणारे समजत. व डोंगरी जमिनी, की ज्यांवर कायमची लागवड बिलकुल होणार नाहीं त्यांचीही मोजणी करून नंबर पाडून लागणीस देण्यांत आल्या. तशांत आगगाड्या सुरू झाल्या; व त्यामुळे जंगलांचा अतोनात नाश झाला. अशा रीतीनें बहुतेक जंगलें नाहींतशी झाल्यानंतर सरकारचे डोळे उघडले व रानरक्षणाची अवश्यकता त्यास भासू लागली.

 ह्या गोष्टीकडे लक्ष जाण्यास प्रथमतः सरकारचे पब्लिक् वर्क्स खाते कारणीभूत झाले. ह्या खात्यास इमारती लाकडांचा पुरवठा होईना, तेव्हा असे होण्याचे कारण काय, ह्याचा विचार सुरू झाला. व जंगलखात्याचा उद्भव हे त्या विचाराचें फल होय.

 रानरक्षण सरकाराने हाती घेणे म्हणजे प्रथमतः लोकांचे हक्कांचा विचार करावा लागतो. माजी राज्यामध्ये जंगलचे हक्क प्रायः मुद्दाम दिलेले नसत, परंतु जंगलाचा उपयोग पाहिजे तसा करून घेण्याची

लोकांची वहिवाट असे. ह्या वहिवाटीचे नियमन करण्याकरिता 
१२५
वेळोवेळीं कानू करण्यांत आले. अखेर इ० स० १८६५ मध्ये

पहिला जंगलचा आक्ट पसार झाला व ह्याची सुधारणा करण्याकरितां सन १८७८ चा आक्ट अमलांत आला. क्षुल्लक फेरफार होऊन हाच कायदा बहुतेक देशभर हल्ली अमलांत आहे.

 कोणत्याही गोष्टीचे रक्षण करणे म्हणजे तिच्या उपयोगाचे नियमन करणे ही ओघाओघानेच येणारी गोष्ट होय. नियमन झालें कीं, प्रतिबंध आलाच. व प्रतिबंध म्हटला म्हणजे कांहीं तरी अडचण सोसणे जरूर आहे. जो कालपावेतों जंगलचे संरक्षण सरकाराने हाती घेतले नसते तोंपावेतों जंगलावर वस्तुतः जरी सरकारची मालकी असते, तरी ती कोणाच्याच मालकीची नाहीत, असे समजून व्यवहार चालतो व लोकांस त्यांमध्ये मनास मानेल तसे वर्तन करण्यास सांपडते. अशा रीतीने निष्प्रतिबंध वागण्याची संवय झाल्यावर तसे वागण्यास प्रतिबंध झाला म्हणजे अडचण व त्रास वाटणे साहजीकच आहे. तशांत, खेड्यांतील लोकांचे संसारास जंगलाची हरघडी जरूर असल्या कारणाने ही अडचण व त्रास अधिकच भासतात यांत नवल नाहीं. ह्याशिवाय साधारण मनुष्य नेहमी तात्पुरत्या नफानुकसानीकडे पाहणारा असल्या कारणानें पंचवीस तीस वर्षांनीं जंगलची स्थिति सुधारली असतां, अगर निकृष्ट झाली असतां आपलें नफानुकसान किती होईल इतकी दूरवर त्याची नजर पोचत नाहीं; व म्हणूनच जंगलखाते त्यास जुलमाचे वाटत असते.

 मागील भागामध्ये जंगलाचे महत्त्व वर्णन केलेले आहे. त्या
१२६

वरून जंगलरक्षण परिणामी लोकांच्या किती फायद्याचे आहे, हें झालेच आहे. इतकेच नव्हे, तर जंगलाचा नाश म्हणजे आपली मोठी हानिच होय. म्हणून जंगलरक्षणापासून थोडीबहुत अडचण व त्रास सोसावा लागला, तरी तो अपरिहार्य समजून रक्षणास आपल्याकडून होईल तितकी मदत प्रत्येकाने केली पाहिजे.

 जंगलखात्याची रचना पुढे सांगितल्याप्रमाणे आहे. हे खाते रेव्हिन्युखात्याचा पोटभाग समजले जाते. जंगलाबद्दल विशिष्ट सल्ला देण्याकरितां हिंदुस्तान सरकाराजवळ इन्स्पेक्टर जनरल् ऑफ फॉरेस्ट्स म्हणून एक कामगार असतो. प्रांतिक सरकाराकडे अशाच प्रकारचा एक कामगार कान्सर्वेटर जनरल म्हणून देण्याचे घाटत आहे. प्रत्येक *इलाख्यांत जे रेव्हिन्यु डिव्हिजन् असतात, त्यांसच प्रायः फॉरेस्ट सर्कल म्हणतात. व त्यावर रेव्हिन्यु कमिशनराप्रमाणे कान्सर्वेटर ऑफ फॉरेस्ट्स हा मुख्य असतो. हा कामगार साधारणतः प्रांतिक सरकाराशीं परस्पर पत्रव्यवहार करू शकतो. ह्याचे हाताखाली जिल्ह्याप्रमाणे भाग असतात त्यांस डिव्हिजन म्हणतात. ह्यांवर अंमलदार असतो त्याचे नांव डिव्हिजनल् फॉरेस्ट ऑफिसर. डिव्हिजनचे पोटविभाग तालुक्यासाखे असतात त्यांस रेंज संज्ञा आहे. व रेंजवरील अधिकाऱ्यास रेंजफॉरेस्ट ऑफिसर म्हणतात. रेंज हा राउंडाचा बनलेला असतो. व त्याजवर भागकारकुनासारखा राउंडगार्ड असतो. राउंडामध्ये बीट असतात; व बिटाचे संरक्षणास जो शिपाई असतो त्यास बीटगार्ड म्हणतात. प्रत्येक बिटामध्ये एक अगर अधिक गांवची जंगलें सामील केलेली असतात.

-----
 *पुढील वर्णन विशेषतः आपल्या मुंबई इलाख्यास लागू आहे. 
१२७

 आतां, हिंदुस्तानामध्ये जंगलची व्याप्ति हल्ली किती आहे हे सांगू. अद्यापपावेतों हिंदुस्तानातील डोंगराळ प्रदेश जंगलानें थोडेफार व्याप्त आहेत, ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. हिमालय पर्वताचा डोंगराळ प्रदेश, मध्य हिंदुस्तानातील विंध्याद्रि व सातपुडा ह्यांतील डोंगराळ प्रदेश, दक्षिणेतील सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश व पूर्वघाटचा प्रदेश हे जंगलाने युक्त आहेत. ह्या भागांतसुद्धा कांहीं कांहीं ठिकाणे उजाड झाली आहेत. परंतु हीं ठिकाणे हल्लीं चालू असलेल्या प्रयत्नांनीं पूर्ववत् जंगलाने व्याप्त होतील अशी आशा आहे.

 निरनिराळे प्रांतांमध्ये हल्ली जंगल किती आहे, हे खालील कोष्टकावरून ध्यानात येईल.

प्रांताचें नांव    जंगलचे क्षेत्रफळ     एकंदर क्षेत्राशीं    
चौरस मैल. शेकडा प्रमाण.
बंगाल ९३६६२ १४
मद्रास १७१८७ २०
मुंबई १४५१० ११
एकूण १२५३५९ १४

१२८

 वरील जंगलाच्या चार जाति करितां येतीलः सदापत्री जंगले, Desiduous जंगलें, रुक्ष जंगलें, व निर्जल जंगलें. निरनिराळे ठिकाणीं पडणारे पावसाचे मानावरून ह्या जाति झाल्या आहेत.

 पहिल्या भागांत सांगितलेले उत्तर हिंदुस्तानचे जे विस्तीर्ण मैदान म्हणजे गंगा व यमुना ह्या नद्यांचे खोरे, ज्यांत संयुक्त प्रांत बहार, व बंगाल ह्यांचा समावेश होतो ते बहुतेक जंगलरहित आहे. एथे जंगल नसण्याचे कारण, हवा पाण्याची प्रतिकूलता नसून जमीन फारच सुपीक असल्यामुळे ती सर्व लागवडीस आलेली आहे हे होय.

 सदापत्री जंगले :–मागें पृष्ठ १०४ ह्यांत सांगितलेल्या जातीची झाडे म्हणजे ज्यांची पाने एकदम गळून पडत नाहीत, अशा झाडांची जंगले पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर मात्र आढळतात. तथापि, दोन्ही ठिकाणच्या जंगलांत सारख्या जातींची झाडे नाहींत. पश्चिम किनाऱ्यावर जो अति वृष्टीचा भाग आहे, त्यांत हीं जंगले आहेत. ह्यांत सागवान, सिसू वगैरे मूल्यवान् झाडे असून शिवाय ताड, माड, बांबू हेही बरेच आढळतात. पूर्व किनाऱ्यावर पाऊस थोडा कमी असल्यामुळे झाडे थोडी लहान आकाराचीं परंतु जास्त कठीण लाकडाची आढळतात. ह्यांत अबनूस हे झाड फार महत्त्वाचे आहे.

 काश्मीर वगैरे हिमालय भागामध्ये मोठमोठालीं पहाडी जंगले आहेत. ह्यांत ओक, देवदार, साल वगैरे झाडें प्रसिद्ध आहेत.

 निर्जल जंगलें:—सिंध, गुजराथ, कच्छ, काठेवाड,

राजपुताना व दक्षिण पंजाब; तसेच दक्षिणेत पूर्व म्हैसूर, बल्लारी 
१२९

वगैरे प्रांत ह्यांत पाऊस अगदी कमी असल्यामुळे जंगले आहेत तीं साधारण खुरटी आहेत, यांना निर्जल जंगले म्हणता येईल, ह्यांत महत्त्वाचे झाड नाहीं.

 गलित–पत्र Deciduous जंगलेः- बाकीचा बहुतेक भाग अधिक वृष्टीचा आहे. त्यांत हीं जंगले आढळतात. हीं जंगले फार महत्त्वाची आहेत. ह्यांचा उपयोग लोक, व्यापारी व सरकार ह्या सर्वांस फारच होतो. ह्यांत सागवान मुख्य असून चंदन, रक्तचंदन, अंजन, ऐन, हिरडा वगैरे झाडे प्रमुख आहेत.

झाडे लावण्यास योग्य स्थलें.

 झाडांपासून किती फायदे आहेत, ह्याचे सविस्तर विवरण एथपयेत केले. आतां, झाडे लावण्यास योग्य स्थळे कोणतीं ह्याबद्दल विचार करूं, म्हणजे एकंदर विषयाचा थोडाबहुत समारोप ओघाओघानेच होईल.

 झाडांपासून अनेक फायदे असल्यामुळे जितकी होईल तितकी झाडांची वृद्धि करणे चांगले; परंतु त्यांतही खाली लिहिलेल्या ठिकाणी ती अवश्य लाविली पाहिजेत.

 पर्वत, डोंगर, टेकड्या यांवर - ह्या ठिकाणी झाडे प्रथमतः लाविली पाहिजेत. पाऊस पडण्याकरितां व पावसाचे पडलेले पाणी सांठून राहण्याकरितां, मातीची वृद्धि करण्याकरितां, व पूर वगैरे येऊन नुकसान न व्हावे ह्याकरितां ह्या स्थानांवर झाडे असणे अवश्य आहे. ही स्थाने खडकाळ व उतरती असल्यामुळे लागण करण्यालायक नसतात; व ती स्वभावतःच झाडांनी आच्छादित

असतात. परंतु ह्या ठिकाणीं कांहीं लागवड जमीन असल्यास ती 
१३०

लागवड करण्याचे सोडून तिच्यांत झाडे लावावी. व ज्या भागांवरील झाडें नाहींतशी झाली आहेत, त्यांजवर नवीन लावावीं. अशा ठिकाणी झाडे असल्यापासून कोणत्याही तऱ्हेचें नुकसान होत नाहीं; व नुकसान होते असा लोकांचा समज नाहीं हें एक बरे आहे.

 नद्या, नाले, ओहोळ, तळी, कालवे ह्यांच्या काठावर - ह्या ठिकाणी झाडे लाविल्यापासून विशेष फायदा हा की, झाडे आपल्या जालसदृश मुळ्यांनीं कांठची जमीन गच्च आवळून धरितात. त्यामुळे कांठची माती झिरपून जाऊन नुकसान होत नाही. हा झाडांचा उपयोग आपले लोकांस चांगला माहीत आहे. पाण्याचा प्रवाह एका बाजूसच वळला जाऊन नद्या, नाले यांस पूर आले म्हणजे प्रतिवर्षी एका कांठची जमीन झिरपून वाहून जाते. तशी ती न जावी म्हणून लोक त्या जमिनीच्या कडेवर झाडे लावीत असतात. इतकेच नव्हे, तर झाडे लावून कित्येक लोक नवीन जमीन उत्पन्न करितात. ओसी म्हणून एक झाड आहे. ते फार जलद वाढणारे असून पाण्यांत असले तरी वाढते. उन्हाळीं, नद्या, नाले यांमध्ये कांठापासून थोडे अंतरावर मातीमध्ये ही झाडे दाट पेरितात; व ती थोडक्याच कालांत इतकी गर्द होतात कीं, पावसाळ्यामध्यें पूर आला म्हणजे त्याबरोबर जो गाळ वाहून येतो तो ह्या झाडोऱ्याने अडकला जाऊन तेथेच पडतो. व ही जमीन प्रतिवर्षी वाढत जाते. ह्या योगाने कधी कधी पाण्याचा प्रवाह फिरला

जाऊन पुढे नुकसान होण्याचे बंद होते. नद्यांचे कांठीं झाडे 
१३१

लाविल्यापासून एक मात्र गैरफायदा आहे. तो असा की, कांठावर झाडे दाट असली तर त्यांचा पाला गळून पडून पाण्यांत कुजून ते खराब होते. ही गोष्ट खरी आहे, परंतु हे नासलेले पाणी पुढे मैदानांत बाहेर पडले म्हणजे हवेतील ऑक्सिजन वायु पाण्याशीं खेळून त्यांतील अपकारक सेंद्रिय द्रव्ये नाहींतशीं करतो. एकंदरीने पाहतां तोट्यापेक्षां नफेच फार आहेत. ह्याकरितां ह्या स्थळीं ही झाडे अवश्य लाविली पाहिजेत. नद्या, नाले यांच्या कांठीं जीं झाडे लावावयाची तीं सोटमुळ्यांची उपयोगी नाहींत. ज्यांच्या मुळ्या जाळ्याप्रमाणे जमिनींत पसरतात अशी झाडे चांगलीं. व अशीच झाडें अवश्य लावावीं.

 शेतांच्या सभोंवतीं — एथे झाडे लाविल्यापासून विशेष फायदा हाच की, झाडांच्या पानांपासून, फळांपासून वगैरे जे खत उत्पन्न होते ते जागच्या जागी उपयोगी पडते. दुसरी गोष्ट, त्या शेतांमध्ये रबीचीं पिके होत असल्यास त्यांस दहिंवरही जास्त मिळण्यास मार्ग होतो. तिसरें, शेतकऱ्यांंस व त्यांच्या गुरांस झाडांपासून आश्रय मिळतो. शेतासभोंवतीं झाडे दाट व कुंपणास उपयोग पडतील अशीं लाविली तर शेतास निराळे कुंपण लावावयाची जरुरी नाहीं. आणखी दर वर्षास कांहीं तरी उत्पन्न होईल, अशा प्रकारची झाडे लाविली असता त्यापासून नफाही आहे. मूल्यवान् फळांची झाडे अशा प्रकारचीं होत. उदाहरणार्थ, आंब्याची झाडे लाविलीं असतां प्रतिवर्षास फळांचे उत्पन्न होणार आहे.

 आतां, अशा रीतीने शेतासभोंवतीं झाडे लावण्यास लोकांची 
१३२

अशी हरकत असते की, अशी झाडे लावल्याने पक्ष्यांस आश्रय मिळून ते झाडांवर वास्तव्य करून पिकाची नुकसानी करतील. परंतु ही समजूत अगदी खोटी आहे. कारण, शेतावर झुंडीच्या झुंडी येऊन पिकाची नासाडी करितात असे जे पक्षी ते एके जागा वास्तव्य करणारे नव्हत; ते स्थलांतर करणारे पक्षी होत. आता, दुसऱ्या जातीचें कांहीं पक्षी ह्या झाडांवर वास्तव्य करतील हे खरे. परंतु पक्ष्यांची अशी रीत आहे की, जोपर्यंत त्यांस खावयास किडा मुंगी मिळते तोपर्यंत ते दाण्यास तोंड लावीत नाहीत. हा एक पक्ष्यांपासून फायदाच * समजावयाचा. कीड मिळेनाशी झाल्यावर मात्र पांखरें दाणे खातील. परंतु पुष्कळ फायदे होत आहेत तर थोडेसे नुकसान सोसले पाहिजे. शेतासभोंवतीं झाडे लावण्यास आणखी अशी एक हरकत आहे की, झाडांच्या सावलीमुळे त्याचे खालीं पीक येत नाहीं, व त्यामुळे पुष्कळ जमीन निरुपयोगी होते. हे म्हणणे अगदी बरोबर आहे. परंतु एथेही वरीलच गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, एकाद्या गोष्टीपासून नुकसान थोडे होत आहे, परंतु फायदा जर जास्त होत आहे तर ती गोष्ट फायद्याची

-----

 * कित्येकांचे असे म्हणणे आहे की, अलीकडे झाडोऱ्याचा फार नाश झाल्यामुळे पक्ष्यांस राहण्यास आश्रय न मिळून त्यांची संख्याही कमी झाली; व त्यायोगानें किडामुंगी यांची वृद्धि जास्त होऊन पिकांची नासाडी होऊ लागली आहे. पक्ष्यांची संख्या जास्त असती तर टोळांची संख्या

वाढली नसती, व वरचेवर ज्या टोळधाडी येतात त्याही आल्या नसत्या, 
१३३

समजावयाची. तिसरी एक अडचण अशी आहे की, शेतासभोवती झाडे लाविल्यापासून त्यांच्या मुळ्या जमिनीमध्ये पसरून तींतील पोषक द्रव्ये तीं नाहींतशीं करितात, व त्यामुळे पिकास ती द्रव्यें मिळत नाहींत. ह्याही म्हणण्यांत तथ्य आहे खरे. परंतु ही अडचण दूर करता येण्यासारखी आहे. शेतासभोंवतीं जी झाडे लावावयाची ती मागे सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या मुळ्या पृष्ठभागावर मात्र पसरतात, अशी लावू नयेत. ज्यांच्या मुळ्या जमिनीमध्ये खोल उतरतात, अशी मात्र झाडे लावावीं. उदाहरणार्थ, विशेषेकरून काळ्या जमिनीमध्ये बाभळीची झाडे लावावी म्हणजे ही अडचण सहजच दूर झाली.

 सडका, आगगाड्या वगैरे हरएक प्रकारच्या मार्गावर : - ह्या ठिकाणी झाडे लाविल्यापासून विशेष फायदा इतकाच की, पांथस्थांस व जनावरांस उन्हाचे तापापासून वगैरे आश्रय मिळावा.

 शहरांत दाट वस्तीच्या ठिकाणीं:– ह्या ठिकाणी झाडे लाविल्यापासून महत्त्वाचा फायदा आहे. प्राण्यांची ज्या ठिकाणी जास्त वस्ती त्या ठिकाणच्या हवेमध्ये कार्बानिक आसिड वायूचे प्रमाण जास्त वाढून हवा बिघडते, व त्यामुळे मनुष्याचे आरो- ग्यास अपाय होतो. परंतु अशा ठिकाणी झाडांची वृद्धि जितकी जास्त असेल तितकी हवा शुद्ध होईल. झाडांचा हा गुण अति प्रसिद्ध असून ह्यांचा अशा ठिकाणी उपयोग करून घेतल्याचे

फारसे आढळांत येत नाहीं. आरोग्यशास्त्रासंबंधे अनेक दुर्घट 
१३४

प्रयत्न सुरू असावे, परंतु हा सुलभ उपाय योजला जाऊ नये हें फार आश्चर्य आहे. शोभा हा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे. ज्या ठिकाणी सर्व कृत्रिम शोभा केलेली असते त्या ठिकाणी स्वाभाविक शोभेची मिसळ झाल्यास मनास किती आल्हाद वाटणार आहे !!

 हरएक प्रकारच्या पडीत जमिनीवर :– एथे झाडे लावि- ल्यापासून फायदा एवढाच की, ही जमीन लागवड करण्यास लायक नसल्यामुळे, या ठिकाणी झाडे लाविल्यापासृन विनाकारण जमीन पडून रहात नाहीं.


---------------------
हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf