साहित्यिक:ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
Appearance
(साहित्यिक:ज्ञानेश्वर पासून पुनर्निर्देशित)
←आडनावाचे अक्षर: ज्ञ | ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी (१२७५–१२९६) |
संत ज्ञानेश्वर (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव ग्राम, पैठण तालुका, औरंगाबाद जिल्हा येथे झाला.[१] सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.