सहाय्य:आशय
Appearance
मराठी विकिस्त्रोत प्रकल्पात आपले स्वागत! या प्रकल्पामध्ये योगदान देताना पुढील गोष्टींचे भान ठेवावे :
- नवीन सदस्यांनी काम सुरु करण्यापूर्वी विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन अवश्य वाचावे.
- आपण इथे संपादत असलेले साहित्य प्रताधिकारमुक्त आहे याची खात्री करून घ्यावी. भारतातील लेखकांसाठी एक साधा नियम म्हणजे लेखकांच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याच्या हयातीत प्रसिद्ध झालेले त्यांचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य त्या प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. शासकिय पत्रके आणि संसद व विधिमंडळांच्या कामकाजांची पत्रके प्रताधिकारमुक्त असतात.
- विकिस्त्रोत हे मूळ लिखाणाचे भांडार आहे, त्यामुळे ते जसे आहे तसे मुळ स्वरुपात जतन केले जाणे आवश्यक आहे. मजकूर ओसीआर झाल्यानंतर मूळ जसा आहे तसा करायचा आहे. जुन्या लेखकांचे साहित्य ते जसे छापले आहे तसे व्याकरणाच्या जुन्या नियमांनुसार टाईप करावे. लिखाण जसेच्या तसे टाईप करणे हा एक साधा नियम लक्षात ठेवावा.
- विकिस्त्रोतामध्ये आपण इतर लेखकांचे साहित्य संग्रहीत करत असतो, त्यामुळे लिहिलेली मते त्यांची असतात. ती मते आपल्याला पटतात किंवा पटत नाहीत हे महत्त्वाचे नाही, ते जसेच्या तसे जतन करणे महत्वाचे! उदा. जर तुम्ही हिटलरलिखीत पुस्तक इथे लिहत आहात आणि त्यात ज्यू लोकांविषयी काही असहनीय गोष्टी लिहिल्या आहेत, तरीही आपण त्याचे शब्द वगळू नये. जसेच्या तसे छापावे. आपला प्रयत्न आपले मत मांडणे नसून त्याचे मत इतरांना अभ्यासण्यासाठी उपलब्ध करून देणे आहे.
- प्रमाणलिखाणाकडे विशेष लक्ष द्यावे. त्यातही मुळ स्त्रोताप्रमाणे लिखाण करावे.
- ऑनलाईन पॉवरपॉईंट सादरीकरण पहा
- सहाय्य:नामविश्व
- en:Help:Copyright tags हे पान आणि त्यातील समाविष्ट साचे मराठी विकिस्रोत प्रकल्पात आणण्यात साहाय्य हवे आहे
- कॉपीराइट संदर्भातील मार्गदर्शन विषयक पाने आणण्यात प्राधान्य द्यावे त्यानंतर इतर साहाय्य पाने en:Help:Contents येथून आणून क्रमाक्रमाने अनुवादीत करावीत
- काही गोष्टीत मराठी विकिपीडियावरील सहाय्य सुद्धा उपयोगीपडत असल्यास तेही या प्रकल्पात उपलब्ध करून द्यावे.
परिचय
दुवा | वर्णन |
---|---|
परिचय | विकिस्रोत म्हणजे काय या अनुषंगाने घडवलेला परिचय. यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी प्राथमिक मार्गदर्शनही केले आहे. |