Jump to content

विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन

विकिस्रोत कडून

मराठी विकिस्रोत वर आलेल्या सर्व नवीन सदस्यांचे आम्ही मराठी विकिस्रोत परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे.

आपण आपल्या नावाची "नवीन नोंदणी" (Sign In) केली असेलच. नसेल तर अवश्य करावी. आपल्याला लेख संपादन करण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी पानाच्या वरील उजव्या कोपऱ्यात "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" येथे क्लिक करून नवीन नोंदणी करावी. जर शक्य असेल तर आपला विपत्र पत्ता (Email Address) नोदणी करताना दिलात तर आपला पत्ता कोणालाही कळू न देता आपल्याशी Email वर इतर सदस्यांना संपर्क साधता येऊ शकतो. पण हे करणे अनिवार्य नाही.

मराठी विकिस्रोत वर आपण काय काय करू शकतो?[संपादन]

 1. प्रताधिकार मुक्त साहित्य विकिस्रोत वर चढवणे
 2. युनिकोड मध्ये ओसीआर (OCR - Optical Character Recognition) बटन वापरून नवीन पाने बनवणे आणि चित्रे Crop Image Tool वापरून पानावर आणणे.
 3. युनिकोड मधील मजकूर तपासणे आणि “तपासले” असे नक्की करणे.
 4. साहित्यिकांची यादी अद्ययावत करणे आणि त्यांच्या जन्म आणि मृत्यू तारखा अचूक भरणे
 5. प्रताधिकार मुक्त साहित्यिकांची माहिती अद्ययावत करणे
 6. इंग्रजी विकि स्रोत मधील सहाय्य पाने मराठी विकिस्रोत वर भाषांतरित करणे
 7. माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणे
 8. सांगकामे (बॉट) म्हणजेच स्वयंचलित यंत्राद्वारे वारंवार करावी लागणारी संपादने करणारी यंत्रणा अधिक अद्ययावत करणे आणि संघटनेला बळकटी आणणे.

सहाय्य पाने[संपादन]

 • मराठी विकिस्रोतवर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिस्रोत" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पहा - सहाय्य:आशय
 • नवीन सदस्यांना मराठी विकिस्रोत वर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर विकिस्रोत:मदतकेंद्र येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिस्रोतचे जाणते सदस्य करतील.
 • मराठी विकिस्रोत या संकल्पनेचा परिचय करून घेण्यासाठी पहा - सहाय्य:परिचय
 • मराठी विकिस्रोतवर संपादन कसे करावे यासाठी पहा - सहाय्य:संपादन
 • मराठी विकिस्रोतकडून असलेल्या अपेक्षा, परीघ, आवाका आणि मर्यादा यांसाठी पहा - विकिस्रोत:हवे होते अपेक्षा, विकिस्रोत परीघ, आवाका आणि मर्यादा
 • मराठी विकिस्रोतवर नवीन सदस्यांकडून अनवधानाने काही ढोबळ चुका होऊ शकतात, त्यासाठी पहा - विकिस्रोत:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी
 • मराठी विकिस्रोत काय आहे त्याही पेक्षा काय नव्हे हे जाणण्यासाठी पहा - विकिस्रोत:विकिस्रोत काय नव्हे
 • मराठी विकिस्रोत काही प्रश्न आणि त्याची जुन्या जाणत्या सदस्यांनी दिलेली समर्पक उत्तरे विकिस्रोत:नीती, ध्येय, धोरणे विषयीचे प्रश्न, सहाय्य:नेहमीचे प्रश्न, किस्रोत:विकिस्रोतच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न येथे मिळू शकतील. या शिवाय अजून काही अडचण आली तर विकिस्रोत:मदतकेंद्र आहेच.
 • मराठी विकिस्रोतसाठी प्रताधिकार मुक्त साहित्य असणे अत्यावश्यक आहे. त्या कायद्याची माहिती येथे पहा - भारतीय प्रताधिकार कायदा १९५७

कुठून सुरुवात करू?[संपादन]

नवीन सदस्यांना नोंदणी केल्यावर पडलेला हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे.

 • मराठी विकिस्रोतचे मुखपृष्ठ पाहिल्यास खालच्या बाजूला "संक्षिप्त सूची" दिलेली आहे. मराठी विकिस्रोत मधील अत्यंत मोठे आणि मुख्य विभागांची नावे आणि उपविभाग यांचे नाम निर्देश केले आहेत. आपल्या आवडीच्या विभागात काम करू शकता.
 • मराठी विकिस्रोतमध्ये डाव्या पट्टीमध्ये "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. तुम्ही या पानावर इतरांकडून होत असलेले बदल तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा आणि लेखाचे स्वतः संपादन करा.
 • मराठी विकिस्रोत प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
 • याशिवाय आपल्याला आवडीचा कोणताही साहित्यिक, याची माहिती मराठी विकिस्रोतवर शोधा आणि त्यात भर घालायला सुरुवात करा. उदा. साने गुरुजी, लोकमान्य टिळक इत्यादी.

आम्हाला आशा आहे की या सर्व गोष्टींचा आपणास उपयोग होईल आणि आपणाकडून "मराठी विकिस्रोत" वर भरपूर काम होईल. या संदर्भात आपण लेखांच्या चर्चापानावर तसेच चावडीवर चर्चा करू शकता.