समर्थ कल्याण संवाद

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


ऐक बा कल्याणा हित उपदेश |

प्राप्त जाहले रहस्य जे कां तूज ||1||

तेथे राही सदा न करी तत्वबोधा |

जनाचिया वादा न प्रवर्ते || 2||

श्रद्धावान पात्र जे भेटती तुज |

त्यांसी सांग गुज श्रीरामाची ||3 ||

देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी |

तयाचिये कानी स्वप्नी नको ||4||

नको त्या दुष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी |

पडेल तुझी तुटी श्रीरामाशी ||5||

श्रीरामाशी तुज न हो वेगळीक |

मानावे स्वसुख योगस्थिती ||6||

योगस्थिती आता गुप्त आहे बापा |

नको सांगू अल्पा देह्बुध्दिते ||7||

देहबुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी ।

वाया हे वैखरी वेचूं नको ।।८ ।।

निमिष्यभरी होउं नको स्वरुपावेगळा ।

अंतरशील रामाला जनायोगे ।। 9 ।।

अनुभवी संताशी करी बा संवाद ।

रामदासी बोधू कल्याणाते ।। १० ।।


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.