सप्तशती गुरूचरित्र/अध्याय सत्ताविसावा

विकिस्रोत कडून

हूं आस्था पूर्ण करुं । असें म्हणूनी श्रीगुरु । दूर पाहती मांग नरु । शिष्यां निरुपिती आणाया ॥१॥

जाउनि शिष्यें तया । आणिती गुरुराया । सात रेखा काढूनिया । आणिती तयावरी तया ॥२॥

तो एक एक लंघितां । सांगे सप्तजन्मवार्ता । अंतीं विद्वदद्विज म्हणतां । जिंक विप्रा म्हणती गुरु ॥३॥

सामर्ष तो पुढें होतां । ये त्यां विप्रां मूढता । द्वादशाब्द राक्षसता । ये मुक्तता त्यानंतर ॥४॥

दुर्गति त्या अनुतापानें । ये स्वल्प गुरुकृपेनें । विप्र होऊनि मांगाने । गार्‍हाणें गुरुसी केलें ॥५॥

सद्वंशजद्विज असून । केवि झालों जातिहीन । हे सांगा विस्तारुन । तें ऐकूण गुरु सांगे ॥६॥

इति०श्री०प०प०वा०स०वि० सारे द्विजगर्वपरिहारो नाम सप्तविंशो०


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]