वैय्यक्तिक व सामाजिक
Appearance
पुढल्या वर्षी जून १९६४ मध्ये मी अध्यापनाच्या क्षेत्रातून निवृत्त होत आहे. १९२८ ते १९६४ या तीन तपांच्या काळात हजारो विद्यार्थी माझ्या हाताखालून शिकून गेले. या सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर बुद्धिवादाचे, ज्ञाननिष्ठेचे व राष्ट्रभक्तीचे संस्कार करावे ही माझ्या लेखनामागची एक प्रबळ प्रेरणा होती. ज्यांच्या प्रेरणेमुळे, अशा रीतीने, मी लेखन केले त्या सर्व महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हा निबंधसंग्रह अर्पण केला आहे.
पु. ग. सहस्रबुद्धे
वैयक्तिक व सामाजिक
व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधांतून
निर्माण झालेल्या समस्यांबाबत काही विचार