Jump to content

विठ्ठलपद्मस्तुति

विकिस्रोत कडून

उपदेशें उद्धरिले किति भक्त ? किती भुजप्रतापानें ?

‘ कळिकाळीं विश्व तरो ’ म्हणसी ‘ निजपादपद्मरसपानें. ’ १


पाय तुजे गतिकारण, जोडियले त्वां तयां वरूनि भले.

पायचि जोडूनि तुजे प्रेमळ संसारसंकटीं निभले. २


श्रीकरलालितकोमळपदकमळें, ज्यांत सुरनदी - उगम,

तापोपशमनपटुतर दाविशि शरणागतांसि बहु सुगम. ३


समपदविलोकनें तूं जनास हें सूचविसि असें वाटे.

समपद यांचें देणें. लागावें चरणभक्तिच्या वाटे. ४


श्रीचरणाची जोडी, पाहुनियां, भक्त जाणते जाले.

जोडी हेचि सुखाची, जोडुनियां यांसि, बहु सुखें धाले. ५


पंढरपुरांत आम्हीं इटेवरी नीट जोडिले पाय,

हा अनुकार न केला उपदेशग्रहण रूसलां काय ? ६


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.