वाग्वैजयंती/वाचकांस विज्ञापन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> शार्दूलविक्रीडित

जे जे या समयी मनात भरले स्वच्छंद नानास्थळी, ते ते त्या समयी जपून धरिता ही होय गंगाजळी ! मित्रा ! ही कविता-न गद्य-इजला निर्बंध कैचा बरे ? सारे हे मनि आणुनी मग धरी 'वाग्वैजयंती' करे ॥1॥

वसंततिलका

प्रेमे, सख्या धरी हिला हृदयी सदाही, दे टाकुनी; तुडवि ही अथवा पदांही ! माते दशा समचि या गमतात दोन्ही माझी मलाच लखलाभ सदा असो ही ॥2॥


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg