Jump to content

वनस्पतिविचार/पुंकोश व स्त्री कोश

विकिस्रोत कडून
१६०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
प्रकरण १९ वें.
---------------
पुंकोश व स्त्रीकोश.
---------------

 पुंकोश Androecium:हें वर्तुळ पूर्ण फुलांत पाकळ्यानंतर स्त्रीकोशापूर्वी येते. केवळ स्त्रीकेसर फुलांत ह्या वर्तुळाचा अभाव असतो. पुंकेसर फुलांत तीन भाग विशिष्ट प्रकारचे असतात. पहिला भाग केसर ( Filament ) दुसरा भाग, पराग पिटिका (Anther) व तिसरा पिटिकेंतील परागकण. हे तिन्ही मिळून एक पुंकेसर बनतो. कधी कधी केसर असत नाहीं. जसे वांगें, बटाटे वगैरे. जसे पानास पत्र असते तसे पुंकेसरदलास पराग पिटिका असते. पराग पिटिकेचे रंगही पुष्कळ प्रकारचे आडळतात, विशेषेकरून पांढरा रंग पुष्कळ फुलांत असतो. जसे कण्हेर, जाई, धोत्रा, वगैरे.

 केसर filament—हा निरनिराळ्या आकाराचा असतो. गहू, बाजरी, जव वगैरेच्या फुलांमध्ये तो नाजूक व अगदीं तंतुसारखा असतो. कर्दळ, लिली, घायपत, वगैरे फुलांत तो जाड असतो. कधी कधी त्यांवर उपांगे असतात. जसे भोंकर. कांद्याच्या फुलांत त्याच्या उपांगास दातासारखा आकार येतो. रुई, मांदार, हरिणखुरी वगैरेच्या फुलांमध्ये उपांगें शृंंगासारखी असतात. काही ठिकाणी परागपिटिका मुळीच नसून केसर जाड होतात. अशावेळी त्यास लहान पाकळ्या सारखा आकार येतो. गुलाब, कर्दळ वगैरेच्या फुलांत अशा प्रकारची स्थिति आढळते. त्यांची लांबी, जाडी, रुंदी, तसेच वेगवेगळे रंग, वाढण्याची दिशा, हीं निरनिराळ्या फुलांत वेगवेगळ्या तऱ्हेची असतात. गुलछबु, धोत्रा, वगैरे फुलांत तो लांब असतो. तसेच तृण जातींत फुलांच्या आकारमानानें ते लांब असतात. वांगी, बटाटे, भोकर, वगैरेमध्ये ते अगदी लहान असतात, अथवा मुळीच नसतात, असे म्हटले असतां चालेल. बहुतेक त्याची दिशा सरळ, आत वळलेली अथवा लोंबती असते. ह्यासही अपवाद पुष्कळ असतात. पानशेटिया फुलांत केसरास एक जोड असून त्यावर परागपिटिका असते. खरोखर तो व त्यावरील पिटिका, मिळून एक अपूर्ण स्वतंत्र केवल
१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६१
-----
पुंकेसर फूल बनते. म्हणजे पानशेटियाचे फुलांत केवलपुंकेसर, तसेच केवलस्त्रीकेसर फुले आढळतात. प्रथमदर्शनी पानशेटियाचे फूल हे पूर्ण आहे, असे वाटण्याचा संभव आहे; पण उघडून पाहिले असतां फुलाची खरी स्थिति तेव्हांच कळून येते.

 केसर संयुक्त अथवा सुटे असतात. कापूस, अंबाडी, जासवंद, वगैरे फुलांत ते संयुक्त होऊन त्यांची नळी होते. लिंबू, चकोत्रा, महाळूंग वगैरे फुलांत केसर पुष्कळ असून तीन किंवा चार संयुक्त होऊन त्यांचे वेगवेगळे गठ्ठे बनतात. आगस्ता, पावटा, तर वगैरे फुलांत त्यांची संख्या दहा असून पैकी नऊ संयुक्त होतात, व एक सुटा राहतो. शेवरी अगर शेमल (Bombax) फुलांत चकोत्र्याप्रमाणे त्यांचे पांच गठ्ठे होतात, शिवाय हे पांचही गठ्ठे बुडाशी परस्पर चिकटलेले असतात.

 सर्व फुलांत केसरांची लांबी सारखी असते, असें नाहीं. मोहरी, शिरस वगैरेमध्ये ते सहा असून, चार लांब व दोन आखूड असतात. भोंवरीचे फुलांत ते पांच असतात खरे; परंतु चारींचीच वाढ चांगली होते व एक अपूर्ण दशेंत असतो. तुळस, दवणा, केश वगैरे फुलांत दोन केसर लहान व दोन दीर्घ आंब्याचे असतात. फुलांत एकाच केसराची पूर्ण वाढ होते.

 गर्भधारणा झाल्यावर इतर दलाप्रमाणे पुंकेसराचेही काम नसते. ते आपोआप वाळून गळतात. कंपॅॅन्युला नांवाचे फुलांत मात्र अण्डाशयास चिकटून एखादा केसर रहातो.

 परागपिटिका म्हणजे पुरुषतत्व पेटारा आहे. त्यास साधारणपणे चार खाने अगर कप्पे असतात, व ह्या सणांत सुटे परागकण असतात. ही पिटिका मुख्य दोन खणाची असून प्रत्येक खणांत दोन लहान खण असतात. केसराचा भाग सरळ पिटिकेमध्ये वाढल्यामुळे तिचे दोन खण तयार होतात. पुष्कळ वेळां हें लहान खाने पूर्ण होत नाहीत. कारण मध्य पडदा पूर्ण वाढून दुसऱ्या बाजूला टेकला नसतो. अशा वेळेस ह्या लहान खणांचा परस्पर संबंध राहतो. कापूस, भेंडी, शेमल वगैरे फुलांत परागपिटिका एकखणी असते. पिटिकेंतील फरकामुळे त्यांसारख्या इतर वनस्पतींचे त्यापासून वर्गीकरण करितां येते.
१६२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 पिटिकेवर एकदांच दृष्टीस पडते. खांचेची उलटी बाजू ही पिटिकेची मागील बाजू असे म्हणता येईल. कारण त्या बाजूत पिटिकेशीं केसराचा संबंध असतो. व खांचेकडील बाजूस तोंड म्हणता येईल. कांहीं फुलांत हे तोंड फुलांचे आतील बाजूस वळले असते. जसे, पाणकमळे, द्राक्षे, वगैरे. कांहीं फुलांत हे झाड बाहेर वळते, जसे, नाकदवणा, तरवार वगैरे.

 वाटोळे, लांबट, रुंद, आंत बाहेर आलेले, तीरासारखे, काळिजासारखे, असे निरनिराळे आकार, पिटिकेंत आढळतात. केसराप्रमाणे पिटिकेसही उपांगे असतात. परागपिटिका दांडीशी कांहीं विशिष्ट प्रकारे जुड़ली असते. केसराचा संयोग परागपिटिकेच्या बुडाशी असतो. जसे, वांगे वगैरे. अथवा सरळ वाढून परागपिटिकेचे दोन्ही कण त्यास सारखे चिकटतात. केसर अशा ठिकाणी पिटिकेच्या कण्यांतून वाढतो, जसे, धोत्रा वगैरे. कांहीं ठिकाणी पिटिकेच्या एका बाजूशी त्याचा संबंध होऊन पिटिका इकडे तिकडे हालत राहते. तृण जातींत अशा प्रकारची पिटिका आढळते.

 योग्य ऋतु प्राप्त झाला म्हणजे परागपिटिका आपोआप फुटून परागकण बाहेर पडतात. पिटिका फुटण्याची जागा म्हणजे ज्या ठिकाणी खांच असते ती होय. तेथे ती जागा प्रथम फुटून खांचेचे भाग मागे वळतात. म्हणजे आपोआप आंत असलेले मोकळे कण बाहेर पडतात. काही ठिकाणी ही परागपिटिका फुटण्याची तऱ्हा सरळ व उभी असते. जसे, द्राक्षे, धोत्रा, वगैरे कधी पिटिका उभी न फुटतां आडवी फुटते. जसे, कापूस, भेंडी, जासवंदी, अंबाडी वगैरे, तंबाखु, मिरची, वगैरे परागपिटिकेंत जागजागी भोंके पडून त्यांतून परागकण बाहेर गळतात.

 केसर संयुक्त जरी असले, तथापि परागपिटिका स्वतंत्र असतात, अथवा केसरावर उपकेसर येऊन त्यावर पिटिका येतात, म्हणजे त्यांच्या संयोगाबरोबर परागपिटिकेचाही संयोग असावा असे नाही. झेंडू, सूर्यकमळ, कॉसमॉस, शेवंती वगैरे फुलांत परागपिटिका परस्पर संलग्न होऊन त्यांची एक नळी बनून त्यांतून परागवाहिनी ( Snync ) बाहेर पडते. पण चमत्कार असा असतो की, बुड़ाकडे ते सुटे असतात. व टोकाकडे पिटिकेचा संयोग होत असतो.
१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६३
-----
 पिटिकेत असलेली पिवळी भुकटी ही परागधूली होय. ह्या भुकटीचे शेकडो कण प्रत्येक खान्यांत असतात. एक खण निराळा सूक्ष्मदर्शकयंत्रांत पाहावचाचा असल्यास प्रथम एका काचेच्या भांड्यांत पाणी घेऊन त्यांत पुंकेसर हालवावेत, म्हणजे पाण्यामध्ये शेंकडों परागकण मिसळून जातात. नंतर कांच तुकड्यांवर ह्या पाण्याचा एक थेंब घ्यावा व त्यावर बेतानें कांच झांकणी ठेवावी. नंतर सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवून वेध साधून पाहण्यास सुरुवात करावी. कण वाटोळा असून त्यावर दोन आवरणे दृष्टीस पडतात. बाह्य आवरण खरखरीत व चिंवट असते. अंतर आवरण मऊ असते. त्यामध्ये जीवनकण केंद्रबिंदु दिसतात. परागकण खरोखर एक सजीवपेशी आहे. बाह्य आवरण हें अंतर आवरणापासुन उत्पन्न होते. अंतर-आवरण हें पेशीचें सीमादर्शविणारे चिह्न असते. बाह्य आवरण तेलट अगर चिकट असून त्याच आवरणांत परागाचे वेगवेगळे रंग आढळतात. नेहमीचा रंग म्हणजे पांढरा असतो. कधी कधी तांबडा, अस्मानी, पिवळा, वगैरे इतर रंगही आढळतात.

 बाह्य आवरण साधे असते अथवा कधी कधी त्यापासून किरणासारखे सूक्ष्म भाग चेाहोंकडे वाढतात. झेंडूचे परागकण सूर्यबिंबाप्रमाणे वाटोळे असून त्यापासून किरणेही चोहोकडे येतात; पण तेच वांग्यांतील परागकण साधे वाटोळे असतात. आवरणांवर रंध्रेही आढळतात. रंध्रांची संख्या दोन अगर तीन असते. एकदल वनस्पतींत परागकणांवर एकच रंध्र असते; पण द्विदल वनस्पतीमध्ये परागकणांवर तीन रंध्रे असतात. पाण्यात उगवणाच्या फुलांत परागकणांस बाह्य आवरण नसते.

 वाटोळे, त्रिकोणाकृती, चौफुली, शंखाकारी, चक्राकारी, षट्कोनी, वगैरे शेकडो आकार कणास येतात. शिंगाड्यामध्ये परागकण त्रिपेशी अगर चतुःपेशी आढळतात. तसेच ह्या परागकणांवर कांहीं खांचाही असतात. सोनचाफा, पानकमळ वगैरे फुलांत परागकणांवर एक खांच असते. नाकदवण्यामध्ये परागकणांवर दोन खांचा, गुलाब, बदाम, वांगी, बटाटे वगैरेमध्ये तीन खांचा; तसेच भोंकर, तुळस वगैरेमध्ये चार खांचा; अशा निरनिराळ्या खांचा निरनिराळ्या फुलांचे परागकणांवर असतात.

 आवरणाचा खरखरीतपणा, त्यावर येणारे किरणासारखे फांटे, तसेच त्यांची रंध्रे व त्यांवरील ओशटपणा, वगैरे गोष्टी अप्रत्यक्ष रीतीने गर्भधारणेस

१६४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
उपयोगी पडतात. कणाच्या ओशटपणामुळे एकदां कण परागवाहिनीस चिकटला म्हणजे पुनः निघून जाण्याची भीति नसते. तसेच रंध्रे अगर खांचा असल्यामुळे परागकणांतून सजीव तत्त्वामुळे एक नळी तयार होते. ही नळी परागवाहिनींत वाढत जाऊन पुढील रस्ता सोपा व सुलभ होतो. परागकणाच्या खरखरीतपणामुळे किडे अगर फुलपांखरे जेव्हा फुलांवर बसतात, त्यावेळेस कण सहज चिकटून ते दुसऱ्या फुलाकडे नेले जातात. तेलकट व चिकटपणा अशा वेळेस फारच उपयोगी पडतो.

 स्त्रीकोश-( Gynoecium ) ह्या वर्तुळामध्ये बीजोत्पत्ति होते, म्हणूनच ज्या फुलांत ह्या वर्तुळाचा अभाव, त्यामध्यें बीजोत्पत्ति नाहीं. हें वर्तुळ नेहमी फुलांतील मध्यभागी असते. ज्याप्रमाणे मुख्य राजासभोंवती परिवारगण संरक्षणाकरितां असतो, त्याप्रमाणे फुलांत हे वर्तुळ मुख्य असून चारी वाजूंनी इतर परिवारगण वर्तुळांना संरक्षिले जाते. बाह्यवर्तुळे झाल्यावर पुंकेसर वर्तुळरूपी चौकी लागते; मागाहून मुख्य राणीसाहेबांचा महाल लागतो. हें वर्तुळ सर्वांत नाजूक असून त्याचे कामही फार नाजूक असते.

 ह्या वर्तुळांत स्त्रीकेसरदल (Carpel), बीजाण्डे (Ovules), अण्डाशय ( Ovary ), परागवाहिनी ( Style ) व त्यावरील अग्र (Stigma ) इतक्या गोष्टी लक्ष्यांत ठेविण्याजोग्या आहेत, स्त्रीकेसरदल (Carpel ) म्हणजे अण्डाशयास आच्छादन करणारा पडदा होय. तसेच स्त्रीकेसरदलाकडून जी परिवारित मध्य पोकळी बनते, त्यासच अण्डाशय (Ovary ) म्हणतात, म्हणूनच जितकी स्त्रीकेसरदलें असतात, तितकेच अण्डाशय असतात. प्राणि वर्गात अण्डाशय एक अगर दोन असतात; पण वनस्पतिवर्गात त्यांची संख्या स्त्रीकेसरदलांवर अवलंबून असते. नाळेस बीजाण्डे (Ovules ) चिकटलेली असतात. स्त्रीकेसरदलाचे अग्रवाढून त्याची परागवाहिनी ( Style ) बनते, व तिचेच टोक पेल्यासारखे होते. परागकण स्त्रीकेसराग्रांवर (Stigma ) पडून परागवाहिनीतून रस्ता काढीत बीजाण्डाकडे जातात. पुष्कळ वेळां परागवाहिनी ( Style ) असत नाहीं.

 स्त्रीकेसरदलांची संख्या वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे स्त्रीकेसरदले सुटी अगर संयुक्त असतात. बाभूळ, भुयमूग, तूर, उडीद वगैरेमध्ये स्त्रीकेसरदल एक असते. सूर्यकमळ, झेंडू, गहू, बाजरी वगैरेमध्ये स्त्रीकेसरदलें दोन असून
१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६५
-----
ती परस्पर संयुक्त असतात, कापूस, भेंडी, एरंडा, आवळा, लिंबू, संत्र, वगैरेमध्यें तीं दलें दोहोंहून अधिक आढळतात. हिरवा चाफां, गुलाब, अशोक वगैरेमध्ये ही दले अधिक असून, सुटी असतात. म्हणून जेव्हा स्त्रीकेसरदल एकच असते अथवा पुष्कळ दले असून सर्व सुटी असतात, त्यावेळी अण्डाशय साधा समजतात; पण जेव्हां पुष्कळ स्त्रीकेसरदले असून संयुक्त असतात त्यावेळी, तो संयुक्त होतो. जसे-महाळुंग, काकडी वगैरे.

 जेव्हां अण्डाशय एकदली असतो तेव्हां त्यास दोन बाज असतात. म्हणजे एक पोटाकडील बाजू व दुसरी पाठीकडील बाजू. जिकेडे स्त्रीकेसरदलाची मध्यशिर असते, ती पाठीकडील बाजू होते व जेथे त्या दलाचे किनारे एकजागी मिळतात, त्यास पोटाकडील बाजू म्हणतात. बीजाण्डे नेहमीं पोटाकडील बाजूसच आढळतात. जसे-वाटाणे, अळसुंदी, उडीद, वगैरे.

 एकदली अण्डाशयांत बीजाण्ड एकच असते असे नाही. नेहमी एकापेक्षा अधिक बीजाण्डे असून त्यांपैकी कांहीं बीजस्थित पावतात व कांही नाहीशी होतात. बीजस्थिति पावण्यास परागकणांची जरूरी असल्यामुळे, जेवढ्यांचा परागकणांशी संयोग होतो, तेवढीं बीजस्थितीस पोहोंचतात.

 स्त्रीकेसरदलांचा बुडी जरी संयोग झाला असला, तथापि त्यावरील पराग वाहिन्या परस्पर संलग्न असतात असे नाही. जसे, सताप वगैरे. जासवंदीमध्ये त्यांची अग्रे सुटी असून खालील दलें परस्पर संयुक्त असतात, तुळसीच्या वर्गात वर, परागवाहिनी ( Style ) संयुक्त असुन खाली दलें वेगळी असतात. कांहीं ठिकाणी खाली दलें सुटी असून अग्रेही सुटी असतात; पण मध्यभागीं संयोग होतो. जसे, भोंकर, गोंन्नि वगैरे. साधारणपणे दलें संयुक्त असून वर परागवाहिन्या संयुक्त असोत अगर नसोत, तथापि त्या अण्डाशयास संयुक्त म्हणण्यास हरकत नाहीं.

 ज्याप्रमाणे एका स्त्रीकेसरदलांत एकच बीज असावे असा नियम नाहीं, त्याचप्रमाणे एका अण्डाशयास एकच खण अगर कप्पा असावा असाही नियम नाहीं. बाभुळीमध्ये स्त्रीकेसरदल एकच असते, पण फळ पाहिले असता त्यामध्ये पुष्कळ खण आढळतात. बाहव्यामध्ये अशाच प्रकारचा एकदल अण्डाशय असून पुढे त्याचे विभाग पुष्कळ होतात. दलाच्या बाजूपासून, फळ वाढत असतांना पडदे निघून पुष्कळ खण अगर विभाग उत्पन्न होतात.

१६६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
ओव्याचे फुलांत स्त्रीकेसरदलें दोन असून पुढे अण्डाशयांत चार खण उत्पन्न होतात. प्रत्येक दलांत मध्यभागी पडदा येऊन, प्रत्येकाचे दोन विभाग होतात. आतां ही गोष्ट खरी कीं, गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ वाढत असतांना पुष्कळ फरक होत असतात, व त्या घडामोडींत दलांत कमी-अधिक खण अगर कप्पे तयार होतात. कित्येकवेळां प्रथम जरी ज्यास्त दले असली, तरी फळामध्ये तितकीच दलें आढळतील असे नाही. जसे-गहूं, झेंडू, वगैरे. म्हणूनच प्रथम

अण्डाशयांत ज्या गोष्टी आढळतात, त्या पुढे कायम राहतात असे नाही.

 अण्डाशय बहुतकरून पुष्पाधारांवर असतो. त्याचा संयोग पुष्पकोशाशी झाला असता त्यास अधःस्थ म्हणतात. तसेच ते मोकळा व सुटा असला तर त्यास उच्चस्थ म्हणतात, हे मागे सांगितलेच आहे. पाकळ्या अगर पुंकेसरदले ह्यांस पानासारखे कधी कधीं देठ असतात. विशेषे करून अण्डाशयास कधी त्या प्रकारचे देठ आढळत नाहीत; पण ह्या गोष्टीसही अपवाद आहेत. जसे-तिळवण वगैरे. पुष्पाधाराचीच अधिक वाढ होऊन अण्डाशयास देंठ उत्पन्न होतो.

 सुट्या स्त्रीकेसरदलांची संख्या सहज मोजता येते, पण संयुक्त अण्डाशयांत दलें किती आहेत, हे सहज कळत नाही. शिवाय फळ पूर्ण वाढले असतां निरनिराळे खण उत्पन्न झाल्यामुळे केवळ खणांवरून त्यांची संख्या ठरविणे योग्य होणार नाही. परागवाहिन्या अगर त्यांचीं अग्रें ह्यांवरून दलांची संख्या समजणे सुलभ असते. कारण तीं म्हणजे दलांची वाढती टोकें होत. म्हणून जितकी त्यांची संख्या असते, तितका दले असतात. जेव्हां परागवाहिनी संयुक्त असते त्यावेळेस त्यांची अग्रे मोजून दलांची संख्या मोजितां येते.

 अण्डाशयांत ज्या भागास बीजाण्डे चिकटली असतात, त्या भागात नाळ असे म्हणतात. एकदली तसेच बहुदली अण्डाशयांत नाळेची मांडणी वेगवेगळ्या प्रकारची असते. एकदली अण्डाशयांत नाळ बाजूकडे असते. त्यातच बीजें चिकटली असतात. पावट्याची शेंग सोलून पोटाकडील भागाकडे असणारी नाळ तसेच त्यापासून उत्पन्न झालेली बीजे पहावीत, येथे स्त्रीकेसर दलाचे दोन्ही किनारे एकेजागी चिकटून त्यापासून दोरीप्रमाणे जाड भाग बनतो, व त्या जाड भागास नाळ अशी संज्ञा असते. गर्भ वाढत असतांना गर्भास लागणारा पौष्टिक अन्नाचा ओघ नाळेतूनच जात असतो. किनाऱ्याकडे असणारी नाळ

१९ वे ].    पुंकोश व स्त्रीकोश.    १६७
-----
मूग, उडीद, वाटाणे, भुयमूग, हरभरे, वगैरेमध्ये आढळते. जेव्हां अण्डाशय बहुदली असून प्रत्येक दल सुटे अगर मोकळे असेल, तर एकदली अण्डाशयाप्रमाणेच नाळेची व्यवस्था आढळते; पण जेव्हां तो बहुदली तसेंच संयुक्त असतो, त्यावेळेस मात्र नाळेची व्यवस्था वेगळी असते. लिंबू, संत्रा, धोत्रा, कापूस, भेंडी, वगैरेमध्ये तो संयुक्त व बहुदली आहे.

 दलाचे दोन्ही पडदे मध्यभागी जमत जाऊन त्यांचा एक कण बनून त्यासच बीजे चिकटलेली आढळतात. म्हणजे येथे नाळेची व्यवस्था जणु चक्रांतील कण्याप्रमाणे असून त्यापासून बीजे उत्पन्न होतात. जेव्हां संयुक्त अण्डाशय बहुदली असून फक्त त्याचा एक खण असतो, अशा वेळेस बीजें किना-याकडेच आढळतात, व नाळेचा भाग मध्यभागापर्यंत न पोहोंचतां बाहेर बाहेर असतो. अशा प्रकारची उदाहणे पेरू, मटलाई, काकडी, भोपळा, मोहरी, शिरस, मुळे, वगैरे आहेत. काही वेळां फळ वाढू लागले असतां नाळ मऊ होऊन बीजे त्यापासून वेगळी होतात. अगर नाळेतील पेशी मांसल होऊन फळाचा गीर बनतो. पेरूमध्यें नाळेचा गीर होऊन बीजे सर्व फळभर पसरून जातात. टोमॅटो, वांगी, वगैरे मध्ये हीच स्थित आढळते.

 चंदन, पपया, पिंक वगैरेमध्यें अण्डाशय वाढू लागला म्हणजे दलाचे मध्य पडदे अगर दांते गळून, बीजाण्डे अगर बीजें मध्यभागी सुटी व मोकळी होतात. त्यांचा संबंध कोणत्याही प्रकारे दलाशीं न राहता केवळ पुष्पधारावरच ती अवलंबून असतात. पुष्कळ शास्त्रज्ञांची ह्याविषयी भिन्न भिन्न मते

आहेत. कोणी म्हणतात की, प्रथम बीजाण्डाचा दलाशी संबंध असुन पुढे तो संबंध आपोआप गळून जातो. व ती मध्यभागी मोकळी होतात. कोणी म्हणतात की, प्रथमपासूनच त्यांचा संबंध स्त्रीकेसरदलांशी नसून पुष्पाधारापासूनच अण्डाशयात ती उत्पन्न होतात, अशा ठिकाणी पुष्पाधारच नाळेचे काम देत असतो, अथवा नाळ बनतो, असे म्हटले असतां चालेल. कोणत्याही मताप्रमाणे मध्यभागी सुटीं अण्डे असतात, ही गोष्ट खरी; मग त्यांचा उगम कसाही असो. कधी कधी बीजे अव्यवस्थितपणे बहुतेक सर्व अण्डाशयभर पसरतात. कमळामध्यें बीजे अण्डाशय=पडद्यासच चिकटली असतात. कधी कधी दलांच्या पाठीकडील भागी बीजे येतात, म्हणजे पाठीकडील भागी नाळ असते. खरोखर अशी उदाहरणे अपवाददर्शक आहेत. 
१६८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
परागवाहिनी ( style ) जाड अथवा बारीक, लांब अगर आंखूड, केसाळ अथवा केंसविरहित असते. गर्भधारणापूर्ण झाल्यावर ती गळून जाते, पण फळावर तिचे चिह्न नेहमी राहते. तिजवरील केस परागकण गोळा करण्यास उपयोगी पडतात. झेंडूच्या फुलांत ती प्रथम आखूड असून तिच्या सभोंवतीं पुंकेसरदलांच्या परागपीटिकेची नळी बनते. पण पुढे ती वाढत वाढत त्या नळीतून बाहेर पडते. बाहेर पडतांना तिजवरील केंसपीटिकेंतील परागकण चिकटून राहतात, व पुढे त्यांचा गर्भधारणेस उपयोग होतो. कधी कधी ही अण्डाशयाचे टोकापासुन न वाढतां बाजूकडून वाढते. त्या वेळेस तिचा उगम जणू पुष्पाधारापासून झाला आहे की काय, असे वाटण्याचा संभव आहे. जसे, सब्जा, कर्पूरी, तुळस, भोंकर, वगैरे.

 परागवाहिनीपेक्षां तिचे अग्र महत्त्वाचे असते. त्याचा आकार परागकण बरोबर पकडले जाऊन व्यवस्थितपणे अति नेण्यास योग्य असतो. पेल्यासारखा, केसाच्या पुंजक्यासारखा, केसाळ टोपीसारखा, साध्या टोपीसारखा, वगैरे आकार अग्रास येतात. ही अग्राची बाजू चिकट असते. त्यामुळे परागकण पडले म्हणजे वाऱ्याने उडून न जातां त्यावर घट्ट चिकटून बसतात. केसांचाही याच प्रकारचा उपयोग असतो. एकदां केसांत कण अडकले असतां सहसा सुटून जाणे शक्य नसते. काही ठिकाणी लांब परागवाहिनी नसून केवळ हे अग्रच असते. परागवाहिनीची फारशी आवश्यकता आहे असे नाहीं. परागवाहिनी म्हणजे अण्डाशयांत सरळ जाण्याचा परागणकणांचा रस्ता होय. अण्डाशयावर हे स्त्रीकेसराग्र (Stigma) मात्र असले पाहिजे. ते जर नसेल तर मात्र परागकण पकडतां येणार नाहीत; व परागकणांचा उपयोग न होतां वृथा ते गळून वायां जातील, हा परागकण पकडण्याचा सांपळा प्रत्येक अण्डाशयांवर असतो. सांपळ्याशिवाय परागकण आंत शिरणार नाहीत, व परागकणांशिवाय बीजाण्डाचे बीज तयार होणे अशक्य आहे.

 बहुदलधान्यवनस्पतीत मात्र अण्डाशय चोहों बाजूंनी आच्छादित नसून बीजाण्डे त्या दलावर उघडी असतात. अशा ठिकाणी वाऱ्याने परागकण तेथे पोहोचून त्याचा उपयोग होतो. असल्या फुलांत परगवाहिनी अथवा परागकण पकडण्याकरितां जरूर लागणारा सांपळा असत नाही. पण तो उघडा असल्यामुळे पराग आंत येऊ शकतात.