रामदासवचनामृत

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

________________

GOVERNMENT OF INDIA ARCHÆOLOGICAL SURVEY OF INDIA CENTRAL ARCHÆOLOGICAL LIBRARY ACCESSION NO._35830. CALL No. 891.4617 Ram Ran. 1 I D.G.A. 79 . arrog . ________________

DIRECTOR CENDRAL DE D3425 (Library Reg No. OPTICA COLOAL INDIA ________________

T अध्यात्मग्रंथमाला " तैसें अध्यात्मशास्त्रीं इये । अंतरंगचि अधिकारिये । परि लोकु वाक्चातुर्ये । होईल सुखिया ॥" _ज्ञानेश्वरी : १८.१७५० • 35830 ग्रंथांक ४ guns रामदासवचनामृत - --- . रा. द. रानडे, एम्. ए. 39146/ Ram Ram E DIRECTOR GENERAL OF AAAHE Library Reg. No 94/37 . . . INDI किंमत १॥ रुपया. ________________

पुस्तके मिळण्याची ठिकाणे 9 Academy of Philosophy and Religion, Post Deccan Gymkhana, Poonaa. २ अध्यात्मविद्यापीठ, पोष्ट निंबाळ, जिल्हा विजापूर. 3 आर्यभूषण प्रेस, पुणे. ४ गणेश प्रिंटिंग वक्र, शनिवार पेठ, पुणे.. ५ सर्व बुकसेलर्स, पुणे, मुंबई, नागपूर, वैगरे. . CENTRAL ARCHPL OGICAL LIBRARY, NDTV HI. Acc. No...35.83.................. Date...... .nambh....... Call No...apoldalon metaboliran हे पुस्तक रा. अनंत विनायक पटवर्धन यांनी - आर्यभूषण छापखाना, पुणे, येथें छापिलें. व ते प्रो. रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी पुणे येथे प्रसिद्ध केले. ________________

अध्यात्मग्रंथमाला १. या ग्रंथमालेचे मुख्य प्रयोजन म्हणजे लोकांस परमार्थाचे उज्ज्वल स्वरूप महाराष्ट्रवाङ्मयांतून उघड करून सांगणे हे होय. ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत जे साधु महाराष्ट्रांत निर्माण झाले त्यांनी अशा प्रकारची उज्ज्वल ग्रंथरचना मराठीत करून ठेविली आहे की तिचे वाङ्मयदृष्टया व परमार्थदृष्टया फारच मोठे महत्त्व आहे. परमार्थाबद्दलच्या निरनिराळ्या भ्रामक कल्पनांचे निरसन करून शुद्ध पर. मार्थाचे स्वरूप समजावून देणे हे महाराष्ट्रवाङ्मयाचे पवित्र कर्तव्य आहे. हे कार्य महाराष्ट्रवाङ्मयांतून जितक्या उत्कृष्ट रीतीने सिद्धीस गेलें आहे तितकें हिंदुस्थानच्या इतर प्रांतिक भाषांतून, अगर पाली अगर प्राकृत भाषांतून, अगर खुद्द संस्कृतभाषेतूनही सिद्धीस गेलें . आहे किंवा नाही याची शंकाच आहे. नुसते परमार्थाचे खरे स्वरूप समजून देण्याचे सामर्थ्य महाराष्ट्वाङ्मयांत आहे इतकेच नव्हे, तर सर्व धर्माचे एकीकरण करण्याचे सामर्थ्यही महाराष्ट्रवाङ्मयांत आहे. धर्माधर्मातील लढे केवळ अज्ञानामुळे उत्पन्न होतात; पण परमार्थाचे शुद्ध स्वरूप कळल्यास ते लढे नाहीसे करण्याचे सामर्थ्य त्यांत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. यामुळे आमच्या महा. राष्ट्राच्या धार्मिक वाङ्मयाचा सशास्त्र अभ्यास होणे किती जरूरीचें आहे हे सांगण्याचे कारण नाही.' २. आज या अध्यात्मग्रंथमालेतील पहिली चारच पुस्तकें प्रसिद्ध होत आहेत. ही चार पुस्तके म्हटली म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक वाङ्मयाचा संपूर्ण निष्कर्ष होय. पहिल्या पुस्तकांत ज्ञानेश्वरीतील उताऱ्यांची विषयवार रचना करून ज्ञानेश्वरांची सर्वांगीण पारमाथिक शिकवण कशी होती हे संपूर्ण रीतीने त्यांच्याच शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या पुस्तकांत तीन भाग आहेत. ________________

(२) पहिल्या भागांत निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, व चांगदेव . यांनी जी अभंगरचना केली आहे तिचा संपूर्ण गोषवारा त्यांच्याच शब्दांत दिला आहे. दुसऱ्या भागांत नामदेव व तत्कालीन संतकवि यांच्या निवडक अभंगांची विषयवार रचना करून परमार्थाचे रहस्य त्यांच्या तोंडून सांगितले आहे. या संतकवींमध्ये ज्यांचे ज्यांचे अभंग उपलब्ध आहेत अशा सर्व संतांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. गोरा कुंभार, विसोबा खेचर, सावता माळी, नरहरि सोनार, चोखामेळा, जनाबाई, सेनान्हावी, कान्होपात्रा, या सर्व जातींच्या व व्यवसायांच्या संतांचा उल्लेख येथे केला आहे. तिसऱ्या भागांत भानुदास, जनार्दनस्वामी, व एकनाथ यांच्या अभंगांची विषयवार निवड करून त्यांच्या तोंडून परमार्थाचे रहस्य सांगितले आहे. अध्यात्मग्रंथमालेच्या तिसऱ्या पुस्तकांत संतशिरोमणि तुकारामांचे अध्यात्मचरित्र व अध्यात्मोपदेश त्यांच्याच वचनांच्या आधारे सांगितला आहे. शेवटच्या म्हणजे चवथ्या पुस्तकांत रामदासांच्या दासबोध व इतर संकीर्ण ग्रंथांच्या आधारे रामदासांची पारमार्थिक व व्यावहारिक शिकवण कशी होती हे सांगितले आहे. यावरून ही गोष्ट उघड होईल की, ही चार पुस्तकें म्हणजे महाराष्ट्रधर्माचा मूलरूपानें संपूर्ण इतिहासंच होय. या चारी पुस्तकांस विस्तृत विवेचनात्मक प्रस्तावना जोडल्या असून त्यांमध्ये त्या त्या साधूंचें पारमार्थिक वर्म शक्य तितकें उघड करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या चारी पुस्तकांचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रवाङ्मयामध्ये परमार्थाचे रहस्य निरनिराळ्या संतांनी कसे सांगितले आहे हे पूर्णपणे निदर्शनास येईल. ज्ञान, भक्ति, व कर्म यांचा त्रिवेणीसंगम जर कोठे झाला असेल तर तो आमच्या महाराष्ट्रवाङ्मयांतच होय. ज्ञानेश्वरांप्रमाणे ज्ञानी, नामदेवतुकारामांप्रमाणे भक्तिमान् , व रामदासांप्रमाणे कर्मयोगी लोक आमच्या महाराष्ट्रांतच निर्माण झाले. आजचा आपला प्रसंग ________________

. (३) ज्ञान, भक्ति, व कर्म यांचा समुच्चय करण्याचा आहे. यामुळेही या ग्रंथमालेच्या अभ्यासाचे किती महत्त्व आहे हे सांगावयास नको. ३. आजकाल आपल्या विश्वविद्यालयांतून महाराष्ट्रभाषेचे अध्ययन जारीने सुरू होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. जें स्थान इंग्रजी भाषेमध्ये चॉसर, शेक्सपियर, मिल्टन् , वर्ड्सवर्थ इत्यादिकांनी पटकावले आहे, तेच स्थान वाङ्मयदृष्टीने ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, व रामदास यांनी महाराष्ट्रभाषेत पटकावले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. बायबलचा ज्याप्रमाणे वाङ्मयाच्या दृष्टीने अभ्यास होतो, त्याप्रमाणेच आमच्या साधूंच्या ग्रंथांचा वाङ्मयाच्या दृष्टीनेही अभ्यास व्हावयास पाहिजे. रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजलि हा ग्रंथ उत्कृष्ट आहे यात शंका नाहीं; परंतु तुकारामज्ञानेश्वरांचे अध्ययन केले असता त्यांचे ग्रंथ तितकेच किंवा त्याहूनही सरस आहेत हे वाचकांच्या ध्यानात येईल. किंबहुना, तुकारामज्ञानेश्वरादिकांच्या अगर तत्सदृश साधूंच्या वचनांचा फैलाव जो हिंदुस्थानांत झाला त्याचे गीतांजलि हे एक आधुनिक निदर्शन आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या कारणास्तव महाराष्ट्रवाङ्मयाच्या व महाराष्ट्रधर्माच्या आधारभूत असलेल्या या ग्रंथांचा अभ्यास आमच्या विश्वविद्यालयांतून अवश्य व्हावयास पाहिजे. चमत्कारांच्या दृष्टीने या साधूंच्या चरित्रांकडे न पाहतां त्यांच्या ग्रंथोक्तींच्या दृष्टीने त्यांजकडे पहावयास आपण शिकले पाहिजे; व अशा रीतीने त्यांजकडे पाहिले असतां बुद्धिवादास पटेल अशाच प्रकारचा अनुभव ( Rational Mysticism ) त्यांच्या ग्रंथांत सांगितला आहे असे दिसून येईल. . ४. “अध्यात्मविद्यापीठ"(Academy of Philosophy and . Religion ) या संस्थेतर्फे हिंदी तत्त्वज्ञानाचा इतिहास जो सोळा भागांत लिहिण्यांत यावयाचा आहे, त्यांतील पंधराव्या भागात ही ________________

(४) आजची चारही पुस्तकें अंतर्भूत होतात. या चार मूल पुस्तकांवर विवरणात्मक " Mysticism in Maharashtra" या नां. वाचा ग्रंथ हा त्या हिंदीतत्त्वज्ञानाच्या इतिहासांतील दहावा भाग होय; व तो लौकरच छापून बाहेरही निघेल. या ग्रंथाचे अध्ययन व वाचन विशेषतः युरोपांत आधिक होणार. त्यांत जी प्रमेये केली आहेत त्यांस आधारभूत अगर उपकरणभूत म्हणून हे आजचे चार ग्रंथ प्रकाशित होत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे. या कारणामुळेच या चार पुस्तकांतील काही पुस्तकांच्या शेवटी इंग्रजी हेडिंगें घातली आहेत, त्यांचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे पाश्चात्य लोकांनी आमच्या महाराष्ट्रभाषेचा अभ्यास करून त्यांतील चिद्राने ओळखण्यास शिकले पाहिजे हा होय. । ५ या अध्यात्मग्रंथमालेतील पुढील पुस्तकें जसजशी तयार होतील तसतशी ती प्रसिद्ध करण्यांत येतील. आज त्यांचा नामनिर्देश करण्याचे कारण नाही. तूर्त आजचे चारच ग्रंथ प्रकाशित होत आहेत. पुढे मागें जुळून आल्यास, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञांचे व सत्प. रुषांचे विचार व अनुभव जमेस धरून, शास्त्रीय दृष्टीचा निकष लावून, स्वानुभवास पडताळन, चिकित्सक बुद्धीने आधुनिक लोकांस परमार्थाच्या दृष्टीने उपयोगी पडेल अशा प्रकारचा एक ग्रंथ लिहिण्याची जरूरी आहे; त्यास हे आजचे चारही ग्रंथ उपयोगी पडतील असा भरंवसा आहे. रा. द. रानडे. ________________

प्रस्तावना. १. श्रीसमर्थ रामदास यांच्या चरित्रासंबंधाने खात्रीलायक पुरावा पाहिजे असल्यास तो “वाकेनिशीप्रकरण" या नांवाच्या प्रकरणांत सांपडेल. रामदासांचा काल माघ वद्य ९ शके १६०३ या रोजी झाला. यानंतर चारच दिवसांनी म्हणजे माघ वद्य त्रयोदशीस रामदासांचे पट्टशिष्य दिवाकर गोसावी यांनी सांगितल्यावरून रा. अंताजी गोपाळ वाकनीस यांनी रामदासांच्या चरित्राचे टिपण करून ठेविलें आहे. इतिहाससंशोधक रा. राजवाडे हे काही वर्षांपूर्वी चाफळास गेले असता त्यांस हे " वाकेनिशीप्रकरण" तेथील एका दप्तरांत उपलब्ध झाले. रामदासांचा मुख्य मठ चाफळास असल्याने तेथे उपलब्ध झालेल्या या वाकेनिशी प्रकरणाचे महत्त्व किती आहे हे सांगणे नकोच. हनुमंत स्वामींनी जी रामदासांची बखर लिहिली ती प्रथम शके १७१५ त लिहून नंतर शके १७३९ मध्ये त्यांनी वाढवून ती पुनः लिहिली. रामदासस्वामींच्या निधनानंतर सरासरी शंभर वर्षांनी लिहिलेल्या या बखरीपेक्षा रा. अंताजी गोपाळ वाकनीस यांनी जें रामदासस्वामींच्या निधनानंतर चारच दिवसांनी “ वाकेनिशीप्रकरण " लिहिले आहे त्याची किंमत फारच आहे हे सांगणे नको. या प्रकरणांत ज्या काही अद्भुत चमत्कारांच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सोडून दिल्या, तरी त्याच्या मुळाशी बरेच ऐतिहासिक सत्य आहे हे वरवर पहाणाऱ्यांससुद्धा दिसून येईल; व हे सत्य काय आहे याचा आपण आतां विचार करूं. २. शके १५३० चैत्र शुद्ध १ रामनवमीचे दिवशी रामदासांचा जन्म झाला. शके १५३७ रामदासांच्या वडिलांचे निधन. शके १५४२ रामदास जांबगांवाहून टांकळीस पळून गेले. याबद्दल दोन गोष्टी उपलब्ध आहेत. एक, रामदासांच्या आईनें अत्याग्रह केल्यावरून आपल्या भाचीशी लग्न करण्याचे कबूल करून रामदास ‘सुमुहूर्ते सावधान' म्हटल्याबरोबर मंडपांतून पळून गेले. दुसरी गोष्ट अशी आहे की, रामदासांचे ज्येष्ठ बंधु गंगाधरपंत यांजजवळ रामदासांनी मंत्र मागितला असता त्यांनी तो देण्याचे नाकारले, म्हणून ईश्वराच्या शोधार्थ रामदास नाशिकजवळ टांकळी येथे गेले. ________________

रामदासवचनामृत शके १५४२-५४ रामदासांचे टांकळी येथे नदीवर मध्यान्हापर्यंत गायत्री पुरश्चरण, व मध्यान्हानंतर रामजपयज्ञ. रामदासस श्रीरामचंद्राचा साक्षात्कार. शके १५५४-६६ पुरश्चरण संपल्यावर रामदासांनी केलेल्या तीर्थयात्रा. रामदासांनी या अवधीत ज्या तीर्थयात्रा केल्या व जे देश पाहिले त्यांचे वर्णन त्यांनीच थोडेबहुत "तीर्थावळी" या प्रकरणांत करून ठेविलें आहे (विविध विषय, खंड २, पहा.) शके १५६६ ईश्वरी संकेतानुसार रामदास रुष्णातटाकी येऊन हाच देश आपला सांप्रदाय वाढविण्यास योग्य आहे असे समजून तेथे राहिले. शके १५६९ या साली अंगापुरच्या डोहांतून रामाची मूर्ति रामदासांस मिळाली. शके १५७० था मूर्तीची स्थापना त्यांनी चाफळ येथे कृष्णातटाकी आल्यावर चार वर्षांनी केली. ती मूर्ति अद्यापिही पहावयास सांपडते. __शके १५७१ वाकेनिशी प्रकरणाप्रमाणे या साली रामदासांनी शिवाजास चाफळनजीक शिंगणवाडी येथील बागेंत वैशाख शुद्ध ९ गुरुवार या रोजी अनुग्रह दिला. याबद्दल भिन्न मतही आहे, त्याचा पुढे निर्देश करण्यांत येईल. शके १५७१ आषाढमासी रामदास पंढरपुरास विठोबाच्या दर्शनार्थ गेले. त्यावेळेसच त्यांनी विठ्ठल व राम याबद्दलचे आपलें सुंदर पद केले असेल (क्रमांक १३१ ). तुकाराम व रामदासांची तुकारामांच्या निधनापूर्वी भेट झाली होती अशी जी दंतकथा आहे तिचा प्रसंग कदाचित् रामदासांची ही पंढरपुरची यात्राच असेल. तुकाराम शके १५७२ फाल्गुनांत समाधिस्थ झाले. तेव्हां त्यांची व रामदासाची भेट होणे अशक्य दिसत नाहीं. शके १५७२ वाकेनिशी प्रकरणाप्रमाणे या साली रामदास परळीस रहावयास गेले. इतर मताप्रमाणे शिवाजीस राज्याभिषेक झाल्यावर रामदास सज्जनगडावर रहावयास गेले. शके १५७७ या साली शिवाजीने आपले राज्य समर्थांच्या झोळीत टाकिलें. . शके १५७७ समर्थ जांबस आपल्या मातोश्रींचे निधनप्रसंगी अचानक गेले, व त्यांस मातोश्रींचे शेवटचे दर्शन झाले. ________________

प्रस्तावना ho L w . शके १५९६ मध्ये शिवाजीस राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी दीड महिनापर्यंत सज्जनगडास येऊन राहिला, व त्याने तेथे बरीच रकम अन्नसंतर्पण, परमार्थकार्य, वगैरेत खर्च केली. शके १५९६ याच सालों हिवाळ्यांत समर्थ कोंकाणांमध्ये हेळवाकच्या घळीत होते. तेथे त्यांस कफाचा व तापाचा बराच विकार झाला. हेळवाकास रघुनाथभट यांनी समर्थीस बराच उपचार केला. रामदास चाफळाच्या उष्ण हवेत आल्यावर त्यांनी रघुनाथभट यांस स्वदस्तुरचे लिहिलेले पत्र उपलब्ध आहे (क्र. १०९). त्याचा उल्लेख पुढे येईलच. शके १५९९ मध्ये रामीरामदासांचा देहांत झाला. - शके १६०० त रामदासांनी राम, लक्ष्मण, व सीता यांच्या मूर्ती तंजावर मध्ये करावयास घातल्या. शके १६०० आश्विन शद्ध १० स म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शिवाजीने रामदासांस करून दिलेली सनद अद्याप चालू आहे. ती पुढे दिलेलीच आहे. (क्र. ११५). शके १६०० रामदासांनी कल्याणांस डोमगांवों मठ करून राहण्यास सांगितले. ___ शके १६०१ पौष महिन्यांत शिवाजी महाराज रामदासांच्या भेटीस आले. ही भेट शेवटचीच होय असें रामदासांनी शिवाजीस सुचविले. यानंतर शिवाजी महाराज फार दिवस राहिले नाहीत. शके १६०२ चैत्रमासी शिवाजीचा अंत झाला, व संभाजी आपला अमात्य रामचंद्रपंत यांस घेऊन ज्येष्ठमासी रामदासांच्या दर्शनास आला, व तेथें आद दिवस राहिला. - शके १६०३ माघ शुद्ध १ स तंजावरहुन मूर्ति आल्या. माघ वद्य ५ समर्थांनी त्यांची स्थापना सज्जनगड येथे केली. हल्ली रामदासांच्या समाधीवर -सज्जनगड येथे ज्या मूर्ति दिसतात त्या याच होत. __ शके १६०३ माघ वद्य नवमी रोजी समर्थानी देह ठेविला. ... ३. वरील शकावलीत एका महत्त्वाच्या मुद्यासंबंधानें विद्वान् लोकांमध्ये वाद माजून राहिला आहे; तो मुद्दा म्हटला म्हणजे रामदासांनी शिवाजीस अनुग्रह केव्हां दिला यासंबंधी होय. आजपर्यंत प्रचलित असलेल्या मतांप्रमाणे वाकेनिशी ________________

रामदासवचनामृत . प्रकरणांत दिल्याप्रमाणे रामदासांनी शिवाजीस शके १५७१ या साली अनुग्रह दिला.. हे मत वाकेनिशीप्रकरण व हनुमंत स्वामींची बखर यांच्या बरहुकम असून रा. देव व राजवाडे यांस तें अभिप्रेत आहे. याच्या विरुद्ध मताचे प्रतिपादन प्रो. भाटे व चांदोरकर यांनी केले आहे. या मताप्रमाणे शिवाजीस रामदासांनी शके १५९४ मध्ये अनुग्रह दिला. या दोन मतांमध्ये दक्षिण व उत्तर ध्रुव यांइतकें अंतर आहे हे उघडच दिसत आहे. रा. देव व राजवाडे यांचे मत खरे असल्यास शिवाजीच्या कारकीर्दीच्या अव्वलपासूनच रामदासांचे शिवाजविर पारमार्थिक वर्चस्व असल्याने शिवाजीचा राज्यविस्तार बहुशः रामदासांच्या नेतृत्वाखाली झाला असला पाहिजे. याच्या उलट रा. भाटे व चांदोरकर यांचे मत खरे असल्यास रामदासांचे शिवाजीवर वर्चस्व शिवाजीच्या कारकीर्दीच्या अखेरीसच प्रस्था-. पित झाले असल्याने शिवाजीस रामदासांपासून राज्यस्थापनेची स्फूर्ति मिळाली हे म्हणणे फोल होते. ही मतें इतकी परस्परविरोधी आहेत की त्यांतून मार्ग काढणे कठीण आहे. शिवाय दोहींकडे कागदपत्रांचा पुरावा असल्याने दोन्ही मते जणू काय अभेद्यच आहेत अशी वाटतात. तथापि तारतम्य बुद्धीने यांतील कोणते ग्राह्य आहे याचा आपण थोडक्यांत येथे विचार करूं. .४. भाटे व चांदोरकर यांच्या मताप्रमाणे (१) केशव गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांस शके १५९४ मध्ये जे पत्र लिहिले आहे त्यांत 'राजे यांची पहि-. लीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटस अणावे...झाडी बहुत आहे ' असा उल्लेख आहे. तसेंच ( २ ) शके १५८० मध्ये भास्कर गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांस में पत्र लिहिले आहे त्यांत. त्यांनी शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो...आम्ही बोललो की आम्ही रामदासी. श्रीसमर्थांचे शिष्य चाफळास हों. मग ते बोलले की ते कोठे राहतात व मुळ गांव कोण !' असा उल्लेख आहे. (३) याशिवाय ज्यांवर तारीख नाही अशी दिवाकर गोसावी यांची दोन पत्रे उपलब्ध आहेत. त्यांच्या ताजाकलमांत शिवाजीस शिंगणवाडी येथे परिधावी संवत्सरी परमार्थ झाला असा अनंत गोसावी व चिमा अक्का यांचा अनुक्रमें उल्लेख आहे. या मताप्रमाणे पाहिले असता रामदासांची व शिवाजीची भेट शके १५९४ मध्ये झाली, शके १५८० पर्यंत रामदास कोण होते हैं शिवाजीस माहीतही नव्हते, व परिधावी संवत्सर शके १५९४ मध्ये पडत अस-________________

प्रस्तावना ल्याने आजपर्यंत शके १५७१ मध्ये रामदासांनी शिवाजीस अनुग्रह दिला असें जें मत प्रचलित आहे ते खोटे ठरते. ५. याच्या विरुद्ध रा. देव व राजवाडे यांचे म्हणणे असे आहे की ज्यां पत्रांवर रा. भाटे व चांदोरकर यांची भिस्त आहे ती पत्रे अस्सल नसून नक्कल आहेत. व शिवाय त्यांत जे शक लिहिले आहेत ते स्पष्ट नाहीत, अगर त्यांत हस्तदोष आहे. शिवाय ती पत्रे अस्सल आहेत असे जरी धरून चाललें तरी त्या पत्रांचा अर्थ दुसऱ्या रीतीने लावतां येण्यासारखा आहे. (१) पहिल्या पत्रांत शिवाजी राजे यांची पहिलीच भेट आहे असा जो उल्लेख आहे तो रामदासांच्या भेटीविषयी नसून शिवाजीने चाफळ येथील मठास शके १५९४ मध्ये जी भेट दिली तीस अनुलक्षून आहे. रा. दत्तोपंत आपटे यांनी ही सूचना पुढे मांडली आहे. या सूचनेस दुजोरा म्हणून वरील पत्र लिहिल्यावर चारच महिन्यांनी शिवाजी राजे यांनी दत्ताजीपंत वाकेनिवीस यांस जें पत्र लिहिले आहे त्यांत 'चाफल येथे रामदास गोसावी आहेत. श्रीचे देवालय केले आहे...तथ कटकीचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती...चोरा चिरटियाही उपद्रव होउ न दणे' असा जो उल्लेख आहे तो शिवाजी राजे यांनी चाफळमठास शके १५९४ साली भेट दिली त्यानंतरचा आहे. ( २) रा. भाटे व चांदोरकर यांच्या. दुसऱ्या मुद्यांत भास्कर गोसावी यांशी बोलतांना शिवाजी राजे यांनी हे रामदासांचेच खरे शिण्य आहेत किंवा नाहीत याची परीक्षा पाहण्याकरितांच त्यांस प्रश्न केला असावा असें रा. देव व राजवाडे यांचे म्हणणे आहे. (३) रा. भाटे व चांदोरकर यांच्या तिसऱ्या मुद्यांत दिवाकर गोसावी यांची जी दोन पत्रे उद्धृत केली आहेत त्यांत परिधावी संवत्सरी परमार्थाचा उल्लेख मुळामध्ये केला गेला नसून त्यांच्या ताजाकलमांत केला आहे, म्हणून तो मुळाइतका विश्वसनीय नाही. शिवाय, जरी शके १५७१ मध्ये प्रथम रामदासांचा शिवाजीस अनुग्रह झाला असला, तथापि त्याची पुनरा वृत्ति शके १५९४ मध्ये झाली असण्याचा संभव आहे. • ६. याशिवाय प्रो. भाटे व चांदोरकर यांच्या मताविरुद्ध दोन तीन कारणे आहेत त्यांचाही येथे उल्लेख केला पाहिजे. (४) रामदास शिवाजीचे केवळ 'मोक्षगुरु किंवा धर्मगुरु ' होते व त्यांचे मूळपासून राजकारणाकडे लक्ष नव्हतें ________________

रामदासवचनामृत असे म्हणून चालावयाचें नाही. आम्ही उद्धत केलेल्या दासबोधांतील ज्यांत तुळजाभवानीचा उल्लेख आहे अशा पहिल्या उता-यावरून, शिवाय रामदासांनी तुळजादेवीस " तुझा तूं वाढवी राजा । सीघ्र आम्हांचि देखतां" (क्र. ११२) या उता-यावरून, व शिवाय आनंदवनभुवन ( क्र. ११६ ) या सर्व उताऱ्यांवरून रामदासांचे राजकारणाकडे मूळपासून लक्ष नव्हते असे म्हणणे चुकीचे होईल. शिवाय शके १५८३ मध्ये प्रतापगडावर तुळजाभवानीची स्थापना रामदास यांच्याकडूनच झाली असल्याबद्दलचा पुरावाही आहे ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे. (५) संभाजी याने रामदासांचे शिष्य वासुदेवगोसावी यांस शके १६०२ मध्ये जी सनद दिली आहे त्यांत चंद्र पंचवीस, जिल्हेज, सन इहिदे सबईन अलफ म्हणजे शके १५९३ मध्ये शिवाजीने वासुदेव गोसावी यांस दिलेल्या सनदेचा उल्लेख केला आहे. हा शक शके १५९४ च्या पूर्वीचा असल्याने रामदासांस मात्र शिवाजी शके १५९४ पर्यंत ओळखीत नाहीत व त्यांचे शिष्य वासुदेवगोसावी यांस शके १५९३ मध्ये सनद देण्याइतकें ओळखितात ही मोठ्या चमत्काराची गोष्ट आहे असें रा. देव यांनी म्हटले आहे. (६) परंतु आमच्या मते आतापर्यंत उपलब्ध असलेल्या पुराव्यांत शके १६०० आश्विन शुद्ध १० या रोजी शिवाजीने रामदासांस जी सनद करून दिली आहे ( क्र. ११५) ती सनदच सर्वांत श्रेष्ठ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या सनदेंत रामदासांनी चाफळास श्रीची स्थापना केल्यापासून म्हणजे शके १५७० पासूनच आपल्या व रामदासांच्या संबंधाचा जो साद्यंत वृत्तांत शिवाजीने लिहिला आहे त्यावरून रामदासांची व शिवाजीची भेट शके १५९४ मध्ये झाली या मतास गौणत्व येतें. (१) चाफळची स्थापना, (२) राजकारण व धर्मस्थापनेचा उपदेश, (3) संपादिलेल्या राज्याचें रामदासचरणों समर्पण, (४) राजकारणाचा पुनः उपदेश, (५) साम्राज्यप्राप्तीनंतर चाफळास इनाम, या सर्व गोष्टींचा उलगडा रामदासांचा शिवाजीशी शके १५९४ च्या अगोदर बरीच वर्षे संबंध आला असला पाहिजे असे मानल्यावांचन सुसंगत रीतीने होत नाही. तथापि आणखी काही ऐतिहासिक पुरावा बाहेर आल्यावर याबद्दल यापेक्षा अधिक निश्चित रतिीने लिहिता येईल. । ७. रामदासांच्या ग्रंथांपैकी दासबोध हा भक्तिग्रंथराज आहे असे म्हणण्यास हरकत नाही. रामदासांच्या वेळेसच या ग्रंथाच्या तीन वाढविलेल्या आवृत्त्या ________________

प्रस्तावना निघाल्या असाव्या असे वाटते. दासबोध ग्रंथाची मूळ कल्पना 'एकवीस समासी' अगर ‘जना दासबोध' या नांवानें जो ग्रंथ प्रसिद्ध आहे त्यांत आहे. या जुन्या दासबोधांत व हल्लीच्या आपल्या दासबोधांत पुष्कळ प्रकरणे सारखीच आहेत. त्यांचा जिज्ञासूंनी अवश्य अभ्यास करावा. यानंतर सत्तर समासांमध्ये दासबोध वाढविण्याची कल्पना रामदासांस राचली असावी, व त्याबरहुकूम हल्लीच्या दासबोधाचे पहिले सात दशक लिहिले गेले असावे. दासबोधांतील दशक ७ समास १० यांतील ४२ वी ओंवी "सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । येथे सांगितलें पष्ट सद्गरुभजन ।।" या व पुढील ओव्यांवरून प्रथम दासबोधाची समाप्ति येथेंच करण्याचा रामदासांचा विचार असावा असे दिसते. नंतर प्रसंगानुरूप वाढत वाढत जाऊन इतर समासांची त्यांत भर पडून हल्लींचा दासबोध ग्रंथ झाला आहे. दासबोध ग्रंथ लिहिण्यास दहा वर्षे लागतील असा संकल्प करून रामदास शके १५७६ मध्ये शिवथरच्या घळीत जाऊन बसले असें दिवाकर गोसावी यांनी चाफळहन बहिरामभट यांस लिहिलेले पत्र उपलब्ध आहे त्यावरून दिसते. यावेळी दासबोध ग्रंथ लिहिण्यास सुरुवात झाली असावी. दासबोधांतील दशक ६ समास ' हा शके १५८१ मध्ये लिहिला आहे असे त्यांतील सातव्या ओंवीच्या " च्यारि सहस्र सातशें साठी । इनुकी कलयुगाची राहाटी" या अंतःपुराव्यावरून सिद्ध होते. शिवाय अठराव्या दशकांतील ६ वा समास की ज्यांत रामदासांनी शिवाजीस अफझुलखानाचे भेटीचे वेळी उपदेश केला आहे असे दिसतें तोही शके १५८१ मध्ये लिहिला गेला असावा. एकंदरीत शके १५८१ हें साल दासबोधग्रंथाच्या रचनेत महत्त्वाचे आहे असे म्हणण्यास हरकत नाही. दासबोधाच्या दोन मूळ प्रती आपल्यास उपलब्ध आहेत. डोमगांव मठांतील कल्याणांनी लिहिलेली व रा. देवांनी प्रसिद्ध केलेली एक प्रत, व शिरगांव मठांतील कल्याणांचे बंधु दत्तात्रय यांनी लिहिलेली व ग्वाल्हेरीस रा. पांगारकर यांस उपलब्ध झालेली शके १६०६ मधील दुसरी प्रत. या दोन्ही प्रती शोधून काढण्याबद्दल व रामदासांचा मूळ दासबोध आपल्यास दिल्याबद्दल रा. देव व पांगारकर यांचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत. रा. देवांनी आपल्यास समर्थसेवेस वाहूनच घेतले आहे. मूळप्रतीबरहुकूमच त्यांनी समथांचे जे ग्रंथ ________________

रामदासवचनामृत आजामंत छापले आहेत त्यांतूनच होतां होईल तो पुढील वेंचे घेण्यांत आले आहेत. परंतु जे समर्थाचे ग्रंथ अयाप अत्रकाशित आहेत. त्यांबद्दल दुसरीकडुन वेंचे घेण्याची योजना केली आहे. रामदासांच्या मूळ ग्रंथापकों पण अद्याप अप्रकाशित अशा “ दासबोधाच्या सोलीव अर्थी" तील एका उतान्याबद्दल रा. देव व रा. गणेश गोविंद कारखानीस यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. दासबोधाचा सोलोव अर्थ काय आहे हे या उतान्यावरून सहज कळेल. रामदासांच्या संकीर्णग्रंथांपैको करुणाष्टके, मनाचे श्लोक, जनस्वभावगोसावी, इत्यादि प्रकरणे या पुस्तकाच्या दुस-या भागांत उध्दत केली आहेत ती वाचकांच्या नजरेस येतीलच. ८. रामदासांच्या समकालीन मंडळीमध्ये त्यांचे वडिल बंधु रामीरामदास यांचा येथे प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. रामीरामदास हे रामदासांच्या अगोदर तीन वर्षे जन्मन रामदासांच्या अगोदर तीन वर्षे समाधिस्थ झाले. हे प्रत्यक्ष जरी रामदासीसांप्रदायामध्ये नव्हते, तथापि रामदासांचा व त्यांचा पुष्कळ संबंध आला असला पाहिजे हे उघड आहे. यांचे " भाक्तिरहस्य" व " सुगमोपाय " हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. रामदासांच्या शिष्यांपैकी कल्याण हे प्रमुख होत. रामदासांच्या आज्ञेवरून रामदासांनी देह ठेवण्यापूर्वी तीन वर्षे हे डोमगांव येथे मठांत जाऊन राहिले; आणि रामदासांच्या देहावसानानंतर तेहतीस वर्षांनी ह्मणजे शके १६३६ त त्यांनी देह ठेविला. त्यांनी रामदासांच्या इतर काही शिष्याप्रमाणे चाफळ व सज्जनगड येथील व्यवस्थेसंबंधी तंट्यांत भाग घेतला नाही. रामदासांच्या शरीराचे शके १६०३ मध्ये सज्जनगडावर दहन केल्यावर त्यांच्या अस्थि चाफळ येथे आणन तेथील वृंदावनाखाली ठेवण्यांत आल्या. बरीच वर्षे त्या अस्थि गंगेस पोहोचविण्यासंबंधी विचार चालला होता. शेवटी एकदां ज्या दिवशी त्या अस्थि गंगेस पोहोचविण्याकरितां वृंदावनांतून बाहेर काढण्यात आल्या, त्याच दिवशी कर्नधर्मसंयोगानें कल्याणांनी डोमगांव येथे आपला देह ठेविला. व गुरूच्या व शिष्याच्या अस्थि एकदमच चाफळाहून डोमगांवावरून काशीस नेण्यात आल्या. रामदासांचे आणखी दोघे प्रमुख शिष्य म्हटले म्हणजे दिवाकर गोसावी व उद्धव गोसावी हे होत. या उभयतांमध्ये रामदासांच्या निधनानंतर बरीच वर्षे मठाच्या व्यवस्थेसंबंधी तंटा चालला होताः रामदास जिवंत असतांनाच त्यांनी दिवाकर गोसावी यांस मठाची व्यवस्था ________________

प्रस्तावना करण्यासंबंधी सांगितले होते; आणि देहावसानाचे वेळी त्यांनी उद्धव गोसावी यांस मठाची व्यवस्था करण्यास सांगितले. यामुळे उभयतांचा तंटा वाढत जाऊन शेवटी ते प्रकरण संभाजीपर्यंत गेले. संभाजीने दिवाकर गोसावी यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाने खिन्न होऊन उद्धव गोसावी जे एकदा शके १६०७ मध्ये टांकळीस जाऊन राहिले ते पुनः या प्रांताकडे आले नाहीत. शके १६२१ मध्ये त्यांचे देहावसान होईपर्यंत ते केवळ दुग्ध प्राशन करून होते. वासुदेव गोसावी यांचा उल्लेख शिवाजी व संभाजी यांच्या सनदांसंबंधी पूर्वी केलाच आहे. यांनी मंत्राची जोपासना बरोबर केली नाही म्हणून रामदासांनी यांस एकदां भरसभेत ठोकून काढिले. त्यावेळी ते जे एकदां रामदासांसमोर जमिनीवर पडले ते रामदासांनी क्षमा म्हणेपर्यंत उठलेच नाहीत. आणखी रामदासांच्या शिष्यांपैकी " स्वानुभवदिनकर" या ग्रंथाचे कर्ते दिनकर गोसावी यांचा उल्लेख केला पाहिजे. नगर जिल्ह्यांतील तिसगांव मठाचे हे अधिपति असून स्वानुभवदिनकरांतील यांनी केलेलें योगाचे विवरण ज्ञानेश्वरीबरहुकूम असून - फार वाचनीय आहे. रामदासांच्या शिप्यिणांपैकी वेणुबाई व अक्का या प्रमुख होत. वेणुवाईचा “ सीतास्वयंवर" या नांवाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांचा मठ अद्यापि मिरजेस आहे. रामदासांच्या समोरच त्यांनी सज्जनगड येथे समाधि घेतली, ती आजतागायतही तेथें दृष्टीस पडते. अक्का या रामदासांनंतर चाळीस वर्षे राहिल्या. सज्जनगड येथें रामाच्या मूर्तीवर जे देऊळ बांधले गेले ते यांच्याच नेतृत्वाखाली होय. यांचीही समाधि सज्जनगड येथेच आहे. गिरिधर हे वेणुबाई व चाईयाबाई यांचे शिष्य असून त्यांनी रामदासांस पाहिले होते. रामदासांनी समाधि घेतली त्यावेळी हे पंचवीस वर्षांचे असल्याने रामदासांचे चरित्र त्यांस पूर्ण अवगत असले पाहिजे. हे बीड मठाचे अधिपति असून रामदासांच्या समोर त्यांनी एकदां कीर्तनही केले होते; यांचा ग्रंथ " समर्थप्रताप" हे एक समर्थांचे चरित्रच असल्याने व तेंही प्रत्यक्ष समर्थीस पाहिलेल्या गृहस्थाने लिहिलेले असल्याने त्याची किंमत विशेष आहे. रामदासांनी समाधि घेतल्यावर अर्धशतकाने हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये १८.३६ यांत अफझुलखानाचा वध, चाफळ मठाचा जीर्णोद्धार, व प्रतापगड येथे शके १५८३ साली समर्थीकडून तुळजादेवीची स्थापना, या सर्वांचा उल्लेख आहे. आत्माराम यांनी " दासविश्रामधाम " या चांवाचा जो प्रचंड ग्रंथ लिहिला आहे त्यांतील सर्व कथा गिरिधरांच्या समर्थ ________________

रामदासवचनामृत प्रतापाइतक्या विश्वसनीय नसल्या, तथापि रामदासांची मुख्य शिकवण कोणती, रामदासांस अनुभव कसा प्राप्त झाला, वगैरे गोष्टींबद्दल त्यांतील मजकूर फार विचारणीय आहे. दासबोधविवरण. ९. आता आपण आपल्या प्रस्तुतच्या पुस्तकांत रामदासांच्या ग्रंथांतून जे उतारे घेतले आहेत त्यांच्या अल्पमात्र चर्चेकडे वळू. सर्व विषयाचे संपूर्ण विवेचन करण्यास स्वतंत्र ग्रंथच लिहिला पाहिजे. तथापि या लहानशा प्रस्तावनेंत रामदासवचनामृताचे अल्पमात्र स्वारस्य तरी लोकांस देणे जरूरीचे आहे. क्रमांक १ यांमध्ये रामदासांनी अफझलखानाचे भेटीचे वेळी शिवाजीस केलेला उपदेश ग्रथित केला आहे असें त्यांतील " म्लेंच दुर्जन उदंड । बहुतां दिसांचे माजलें बंड" हे वाक्य, व शिवाजसि देवब ह्मणांची चिंता वाहण्याविषयी उपदेश, यांवरून सिद्ध होत आहे. क्रमांक २ मध्ये रामदासांनी आपल्या वेळेस ब्राह्मणांस अन्नसुद्धा मिळत नव्हते, व म्लेंच्छांनी व अन्य याति यांनी ( अर्थभेद-रणांगणावर ) राज्य पादाक्रांत केले होते असे लिहिले आहे. क्रमांक ३ मध्ये रामदासांनी आपल्या विश्वपाळित्या उपासनेचे वर्णन केलें असून नारायणाचे ध्यान केले असतां लक्ष्मी भक्तांपासून जाणार नाही असें सुचविले आहे. क्रमांक ४ मध्ये दुर्जनांचा संहार करणाऱ्या व भक्तांस आधारभूत अशा देवाचे स्मरण केले असतां मनी इच्छिलेलें कार्य सिद्ध होते; फक्त कर्तृत्वाचा अहंकार आपल्याकडे लावून घेऊ नये असें रामदासांनी सांगितले आहे. १०. क्रमांक ५ पासून ज्ञानचर्चा सुरू झाली आहे. प्रथम क्रमांक ५ मध्ये भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, तर्कमीमांसा, भूतभविष्यज्ञान, दुसन्यांच्या जीवींचे ज्ञान, इत्यादि नानाप्रकारची जी ज्ञाने त्यांस ज्ञान हे नांव योग्य नसून आपलें स्वरूपदर्शन यासच ज्ञान म्हणावें, तोच मुख्य देव जाणावा, महावाक्याचा जप न करितां केवळ विचार करावा, सर्व संतांचें गुह्यज्ञान तें हेंच होय, स्वामी कृपेसहित अंतःकरणांत वसल्यास त्यासच ज्ञान म्हणावें, असें क्रमांक ६ मध्ये लिहिले आहे. क्रमांक ७ यांत अशा ज्ञानाच्या योगाने सर्व पातकांचे भस्म होऊन पुण्य अमूप झाल्याने आपली सीग सांडून जातें असें रामदासांनी लिहिले आहे. नंतर मुख्य देव कोणता याचा विचार सुरूं होऊन IP ________________

प्रस्तावना ११ 4 नानाप्रकारच्या मार्ति वगैरे " देव * या नांवास योग्य नसून फक्त अंतरात्माच देव आहे असे सिद्ध केले आहे. मूर्तीस लोक चोरून नेतील अगर फोडून टाकतील. अशा प्रकारचे देव नर्मदागंडकातीरी लक्षावधि पडले आहेत, पण खन्याः देवाचें सत्त्व कधीही जाणार नाही असें रामदासांनी लिहिले आहे ( क. ८)... जगामध्ये चार प्रकारचे देव प्रसिद्ध आहेत. एक प्रतिमादेव, दुसरा अवतारदेव, तिसरा अंतरात्मादेव, व चौथा निर्विकारी देव. यांमध्ये निर्विकारीदेवासच देव. म्हणावें असें रामदासांनी लिहिले आहे (क्र. ९). शाईचा व्यापार करून कोठें राज्यसंपदा प्राप्त झाली आहे काय ? म्हणून सुरता करून पाहणे यास देवदर्शन म्हणूं, नये (क्र. १०). खरा देव केवळ सद्रूच्या योगानंच प्राप्त होतो व त्यामुळे नानाप्रकारच्या देवांची भीड पडत नाही ( क. ११). अंतर्दवास चुकून धांवा घेऊन तीर्थास गेले असतां जेथे तेथे केवळ धोंडापाणी दिसेल (क्र. १२). नाना देवांच्या अंतर्भूत असलेल्या आत्मदेवाच्या अनुसंधानाने सर्व किल्मिष जळून जाईल (क. १३ ) असें रामदास म्हणतात. ११. रामदासांचा भुताखेतांवर व चमत्कारांवर अगदीच विश्वास नव्हता. असें दिसत नाही. शापामुळे देहधारण, परकायाप्रवेश, वायुरूपाने देवताभूतांचा अंगी संचार, वायुस्वरूप झोटिंगाच्या लीला, या गोष्टींस अभावाने नेऊ नका: (क्र. १४-१५), फक्त ज्यांस संकल्पच नाही अशा ज्ञात्यांस यांच्याने बाधवत नाहीं (क्र. १६), असें रामदासांचे मत आहे. याच्या उलट, विष्णु म्हणजे केवळ विश्वांतील जाणीव, रुद्र म्हणजे केवळ नेणीव, व ब्रह्मा म्हणजे जाणीवनेणीवेचे संमिश्रण (क्र.१७), अगर ब्रह्मयास जगाची उत्पत्ति, विष्णूस प्रतिपालन,. रुद्रास संहार, अशी जी कामें सोंपवून दिली आहेत ती काल्पनिक असून सगळ्या जगाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता केवळ एक अंतर्देव आहे (क. १८) असें रामदासांचे मत आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, हा ऐलीकडील विचार, चंद्रसूर्य-- तारांगणे हा ऐलीकडील विचार, नाना देवांचे अवतार हा ऐलीकडील विचार; ही. दृश्ये केवळ देवाचें महाद्वार होत; यांस ओलांडून गेल्यावाचून देवाचे दर्शन व्हावयाचें नाहीं (क्र. २०). ज्याच्यामुळे सूर्यबिंब धांवतें, धुकटामध्ये अगाधः पाणी साचून राहते, काळाचा दूत म्हणून वारा ज्याच्यामुळे धांव घेतो, विजांच्या, तडाख्यांतही जो अंतर्भूत आहे, त्या देवाचीच उपासना ही माझी उपासना आहे असें रामदास म्हणतात (क्र. २१). ज्याचे नांव सर्वकर्ता, ज्याच्यामुळे .. - ________________

“१२ रामदासवचनामृत मेवमाळा, चंद्रबिंब, रविमंडळ ही आपापल्या ठिकाणी स्थित आहेत, त्यासच देव म्हणावें; देव्हारीच्या देवास उठून ब्रह्मकटाव रचतां येणार नाहीं; जो अंतर्बाह्य व्यापून असणारा अंतरात्मा आहे, त्यासच देव म्हणावें; देव आला, देव गेला ही भाषा दुरिताची आहे (क्र. २२ ); देह, आत्मा, व ब्रह्म यांचा संबंध जड चंचळ निश्चळाप्रमाणे आहे (क २3 ); ज्याप्रमाणे घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश मिळून सर्व एकच आकाश होते, त्याप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा व निर्मळात्मा मिळून सर्व एकच आत्मा होय • (क्र. २४); केवळ भिडेस पडूं नका; ज्याने राजा ओळखिला तो भलत्यास राव म्हणणार नाही (क्र. २५ ) असे सांगून मुख्य देवास शोधून काढणे हेच तत्त्वज्ञानाचे लक्षण होय असें रामदासांनी सांगितले आहे. ..१२. या देवाचा साक्षात्कार कसा करून घ्यावा हा एक मोठा प्रश्नच आहे. जगांतील नाशिवंत वस्तूंचा भरंवसा नसल्याने ज्यास सुख पाहिजे असेल त्याने केवळ रघुनाथभजन केले पाहिजे ( क्र. २६); या संसाराच्या यात्रेत देवाचा फायदा करून घेतला नाही तर आपले कष्ट सफल होणार नाहीत (क. २७); या देहाचे हे एक बरें आहे की जी जी परमार्थवांछा या देहामध्ये करावी ती ती तृप्त होते, या नरदेहास येऊन हजारों लोक उद्धरागतीस गेले आहेत ( क. २८); शिवाय मृत्यूच्या वेदना सोसवत नाहीत हे सगळ्यांच्या अनुभवाचेंच आहे (क्र. २९). या मृत्यूपुढे महापराक्रमी राजे, महान् व्युत्पन्न पंडित, मोठमोठे योगाभ्यासी, महान् महान् संत, कोणीच टिकले नाहीत. फक्त एकच . टिकले की ज्यांनी स्वरूपसाक्षात्कार करून घेतला (क्र. ३०). यामुळे सर्व गोष्टी सोडून देवास धुंडणे हेच आपले संसारांतील मुख्य कर्तव्य आहे (क्र. ३१). याच जन्मी ईश्वरसाक्षात्कार झाला तर त्याचा उपयोग; पुढील जन्मावर कोगी भिस्त ठेवावी ? उधार आणि रोकडें धन यामध्ये जो फरक आहे तोच विदेहमुक्ति व जीवन्मुक्ति यांच्यामध्ये आहे (क्र. ३२); परंतु मनुष्याची दृष्टि अंध झाली असल्याने द्रव्यहारा नेत्राने पाहणे, द्रव्यदारा कानाने ऐकणे, यांखेरीज दुसरा व्यापारच त्यास सुचत नाहीं (क्र. ३३). या बद्भुस्थितीतून विनिर्मुक्त होण्यास गुरूची आवश्यकता आहे. मागें महान महान् संतसाधु, रामकृष्णादिक . "अवतार, यांनी गुरूचाच आश्रय केलेला आहे (क्र. 3). सद्गुरुरूपा झाल्याखेरीज अनुभवचिद्रत्नांच्या भांडारगृहाची किल्ली हातास येत नाही ( क्र. ३५). ________________

प्रस्तावना . असा जो गुरु तो एकापरी देवापेक्षाही श्रेष्ठ समजला पाहिजे (क्र. ३६); अशा सद्गुरूस सागर, मेरु, गगन, पृथ्वी, गभस्ति, फणिवर, कल्पतरु, इत्यादिकांपैकी कोणतीही उपमा लागू पडत नाही. सद्रूचे वर्णन करतां येणे अशक्य आहे, हेच त्याचे वर्णन होय (क्र. ३७). अशा सद्गरूची चिन्हें कोणती म्हणाल तर ती शुद्ध आत्मज्ञान, स्वरूपस्थितीचे समाधान, प्रबळ वैराग्य, निर्मळ आचार, अखंड अध्यात्मश्रवण, तत्त्वज्ञानविचार ही होत (क्र. ३८). ज्याच्या पोटांत अमृत गेले त्याचे शरीर तेजस्वी व्हावयासच पाहिजे. जो स्वरूपस्थितीने वर्ततो तोच साधु. राज्यावर बसल्यावर अंगी राजकळा सहजच बाणते; त्याप्रमाणे स्वरूपारूढ झाल्यावर कामक्रोध, मदमत्सर, लोभशोक, मोहभय, इत्यादि विकार सहजच नाहीसे होतात. स्वधर्माची व्याख्या म्हणजे केवळ स्वरूपस्थितीत राहणे हीच होय (क्र. ३९ ). आजपर्यंत कोणत्या चक्रवर्ती राजाने सायुज्यमुक्ति दिली आहे ? जे त्रैलोक्यांत नाही त्याचे दान संतसज्जन करितात. जे चंद्रसूर्याने प्रकाशित होत नाही ते या साधूच्यामुळे प्रकट होते (क्र. ४०); असे साधु जेथें भजन करितात तेथे प्रत्यक्ष जगदीश उभा असतो ( क्र. १). या साधूंच्या मार्गे जे चमत्कार होतात ते केवळ हे पुण्यमार्गाने चालले म्हणूनच होतात. अशा साधूंस वासना धरून पुनः जन्म घेण्यास लावू नका (क्र. १२); पूर्वी मोठमोठे भक्त होऊन गले व त्यांचे सामर्थ्यही अद्भत होते असे समजून हल्लीच्या साधूंस तुच्छ करूं नका; शरीराचा ध्यास केवळ सामर्थ्यसिद्धीकडे असल्याने मनुष्य सहज ईश्वराचा मार्ग चुकून जातो; तर असें न करतां ईश्वरप्राप्तीच्या कामनेखेरीज दुसरी कोणतीही कामना मनात बाळगू नये (क्र. ४३). १३. ज्याच्यामध्ये ही ईश्वरकामना उत्पन्न झाली, जो अत्यंत साक्षपी, धैर्यवान् व प्रज्ञावंत आहे, जो त्रिविधतापाने पोळून जाऊन गुरुवचनावर दृढभाव ठेवितो, व आकाश कोसळून पडले असतांही ज्याच्या शुद्ध भावार्थात पालट होत नाही, तोच सच्छिण्य होय (क्र. 7 ). अशा शिण्यास मोक्षप्राप्तीस . मुळीच वेळ लागत नाही. लोहपरिससंयोग, गंगासरितासंयोग, अगर बिंदुसागर-संयोगाप्रमाणे अशा शिष्यास तत्क्षणीच मोक्ष मिळतो ( क. ४५). ज्यांत सत्त्व गुणाचे वर्चस्व असेल असाच सच्छिण्य शिष्यराज या नांवास शोभतो. सत्त्वगुणाची लक्षणे म्हटली म्हणजे संसारदुःख विसरून भक्तिमार्गाकडे तांतडीने ओढ घेणे, ________________

रामदासवचनामृत नीच दास्यत्वाची गोडी पतकरणे, यथानुशक्ति सामग्री घेऊन ईश्वरयज्ञास प्रवृत्तः होणे, मुखी नाम हाती टाळी वाहन ईश्वराचे गुणसंकीर्तन करणे, आघातांत धारिष्ट धरणे, पदार्थमात्रावर चित्त न लागतां मनांत भगवंताचा ध्यास लागणे, भगवंता.. करितां सर्व सुख सोडून देणे, शरीर सत्कार्थी लावण्याचा निश्चय करणे, समुद्राऐशी चित्तांत सांठवण बाळगणे ही होत (क. ४६ ). ईश्वरसाक्षात्कारास मुख्य साधन म्हटले म्हणजे नामस्मरण हे होय. प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नेमानें साधन करून नेहमी नामस्मरण करति जावें, सुखदुःख, संपत्तिविपत्ति, संकट आनंद वगैरे कोणत्याही स्थितीत नामस्मरण सोडूं नये. नामाने संकट नासतात, व विघ्नं निवारतात; महापापी तेच पवित्र होतात. कांहीं न करिता नामजप केला असतां चक्रपाणी संतुष्ट होऊन भक्तांस सांभाळतो. लहानथोर, उच्चनीच, बाह्मणअंत्यज, हा भेद नामस्मरणामध्ये नाही ( क्र. ४७). नामस्मरणरूप उपासनेचा पाठिंबा जेथें नाहीं तेथें जय प्राप्त होणार नाही (क्र. ४८ ).. प्रत्येक चळवळीच्या मुळाशी भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे. पायरीनें पायरी चढून मुळापर्यंत शोधिलें असतां याचा उलगडा होणार आहे (क्र.४९). ईश्वराबइल नामस्मरणरूप भक्ति करणे ती निष्काम करावी. कामनेने मिळालेले फळ व निष्काम भजनाने मिळालेला भगवंत यांमध्ये महदंतर आहे. निष्कामभजन करणान्या भक्ताच्या मनांत जो हेतु उत्पन्न होतो तो देव आपणच पुरवितो. ( क. ५० ). निष्कामभजनाच्या जोडीला श्रवणाचे बळ पाहिजे. श्रवणानें भक्ति व विरक्ति उद्भवतात, चित्तशुद्धि होते, निश्चय घडतो, आशंका फिटतात, मन ताब्यांत येते व त्यास भगवंताची भूक लागते ( क. ५१ ). श्रवणाप्रमाणेचः कीर्तनाचीही फार जरूरी आहे. कीर्तनांत स्त्रियादिकांचे कोतुक वर्णिले असतां श्रोत्यावक्त्यांचे मन कामाकार होऊन ईश्वराचें ध्यान नाहींसें होतें. निःशंक निर्लज्ज कीर्तन केलें असतां गुप्त परमात्मा प्रकट होतो ( क्र.५२ ). अशा रीतीने, ज्याच्या जवळ ईश्वर अखंड राहतो तो जे सहज बोलतो ते ईश्वराचेच शब्द. होत ( क. ५३ ). .. १४. साधकांस ध्यानक्रिया सांगितली असतां मनामध्ये कल्पनेचे काहूर उठून ध्यानयोग सिद्ध होत नाही हा साधकांचा.अनुभव सर्वांस माहीत. आहेच.... याकरितां मन निर्विकल्प करण्याबद्दल रामदासांनी एक उपाय सुचविला आहे. जसा काम कामाने मरतो तशी कल्पना कल्पनेने मरते (क्र. ५.). निर्दि ________________

- प्रस्तावना कल्पाच ध्यान केले असतां कल्पना सहजच नाहीशा होतात ( क्र. ५५ ). खरें ध्यान व खोटें ध्यान यांमध्ये इतकाच फरक आहे की, ख-या ध्यानांत आत्म्याचे चिंतन होतें, व खोट्या ध्यानांत अनात्म्याचे चिंतन होतें. ध्येय व ध्याता यांमध्ये अनन्यलक्षण उत्पन्न झाल्यासच ध्यानाची परिसमाप्ति झाली असें म्हणता येईल. बाजारी लोकांस प्रमाण आणि अप्रमाण या गोष्टी कळत नसल्याने खोट्याच गोष्टी उठवून ते वाउग्याच बोंबा मारतात. साधकांनी मानसपूजा व प्रत्यक्ष दर्शन यांमध्ये महदंतर आहे असे समजून ख-या ध्यानाचा मार्ग शोधून काढावा (क्र. ५६ ). ज्यास आत्मज्ञानाची किल्ली मिळाली, संदेहनिवृत्तीकरितां जो परिश्रम करतो, जीर्ण जर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जो जीणोद्धार करण्यास प्रवृत्त होतो, असत्किया सोडून स्वरूपाकडे जो अखंड निजध्यास लावितो, जे लखू जातांही लक्षवत नाही त्यास जो लक्षितो, जेथें मनबुद्धीचा प्रवेशही नाही त्याचे जो अनुभवाने आकलन करितो, व उन्मनीच्या शेवटी आपली आपणांस ज्यास अखंड भेट अनुभवितां येते, त्यासच साधक म्हणता येईल ( क्र. ५७ ). अशा साधकामध्ये व देवामध्ये सख्यभक्ति उत्पन्न होते. आपली संसारव्यथा सोडून आपण देवाचें चिंतन केले असतां देव आपली चिंता करतो. देवाच्या सख्यत्वासाठी आपले सौख्य, जिवलग, प्रपंच, व प्राण वेचण्यासही साधकाने तयार व्हावें. आपण ज्याप्रमाणे वचनें बोलावीत त्याप्रमाणे प्रत्युत्तरें येतात. म्हणून आपण ज्या भावना ईश्वराविषयी ठेवाव्यात त्या भावना ईश्वर आपल्याविषयी ठेवितो (क्र. ५८). महापूजेच्या अंती ज्याप्रमाणे देवास मस्तक वाहतात त्याप्रमाणे आत्मनिवेदनभक्ति आहे. देव व भक्त हे दोघे एकच आहेत अशी ज्याची खात्री पटली तोच साधु या जगांत मोक्षदायक जाणावा (क्र. ५९ ). आपण आत्मरूप आहों अशी खात्री पटल्यावर देह प्रारब्धाच्या ओघांत खशाल सोडून देण्यास काय हरकत आहे (क्र. ६.) सलोकता, समीपता, सरूपता या तीन्ही मुक्तांपेक्षां ईश्वराशी जीत तादात्म्य होते अशी सायुज्यमुक्ति श्रेष्ठ आहे (क्र. ६१ ). ज्याने आपण आपणांस ओळखिलें तो जीत असतांच मुक्त होऊन गेला.. देह पुण्यनदीच्या तीरावर पडावा, दक्षिणायनापेक्षा उत्तरायणंच देह सोडण्यास योग्य, “ अग्निोतिरहः शुक्लः" हा अर्चिार्ग धूम्रमागीपेक्षा श्रेष्ठ होय, अशा प्रकारच्या खोट्या कल्पना साधूच्या मनास शिवत नाहीत. जो जीवन्मुक्त झाला त्याचा देह । रानांत पडो, अगर स्मशानांत पडो, तो धन्यच होय (क्र. ६२)... ________________

रामदावसचनामृत १५. सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर साधनाची जरूरी राहते किंवा नाही याबद्दल रामदासांनी दोन निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी मते प्रतिपादली आहेत. एकदा त्यांनी असे म्हटले आहे की साधन हा देहाचा धर्म असल्याने देह असेपर्यंत साधन हे केलेच पाहिजे. सिद्ध झाल्यावर हा अद्यापिही साधन करतो अर्से लोक म्हणतील या लज्जेने साधन टाकून देणे हे शहाणपणाचे काम नव्हे (क. ६३). याच्या उलट दुसरे एके ठिकाणी त्यांनी असे म्हटले आहे की, साधनाने साध्य प्राप्त झाल्यावर साधनाची खटपट करणे म्हणजे कुंभार राजा झाल्यावर पुनः त्याने आपली मडकी घडणे,अगर रंक राजा झाल्यावर रंकपणाचा गलबला त्याने पुनः चालविणे, तीथीने तीर्थास जाणे, अगर उन्मन्यवस्थेने मनास आवरणे, याप्रमाणेच चमत्कारिक आहे (क्र. ६४). मुख्य साक्षात्काराचे लक्षण म्हटले म्हणजे पापाची खंडणा झाली व जन्मयातना चुकली असा अनुभव आला पाहिजे, देवभक्तांतील विभक्तता निघून गेली पाहिजे, ब्रह्मांडाच्या कर्त्यास ओळखून मुख्य कर्तृत्वाचे स्वरूप कळले पाहिजे; येथे अनुमान राहिल्यास केलेला परमार्थ वायां गेला असें रामदासांनी म्हटले आहे ( क्र. ६५ ). योग्यांच्या अनुभवदृष्टीपुढे जे उदंड धन आहे त्याची किंमत लोकांस कशी कळावी ? जो काष्ठस्वार्थ करतो, अगर शुभा एकवटतो, त्यास श्रेष्ठरत्नांची किंमत कशी कळणार ? हे गुप्तधन सांपडण्याकरितां सद्रूच्या उपदेशाचें अंजन लेइले पाहिजे ( क्र. ६६). ज्यास भेटूं जातां तुटी पडते, व ज्याची न भेटतां भेट होते, जे पाहूं जातां दिसत नाही, व न पाहतांही जें सर्वत्र दिसते, तेच स्वरूप असे समजावे (क्र. ६७ ). ज्यास तस्कराचे भय नाही, ज्यास राजभय, अमिभय अगर श्वापदभय मुळीच नाहीत, जे अधिक व न्यून होत नाही, जे मिळविण्याकरितां योगियांच्या अनुज्ञेप्रमाणे आकाशमार्गीच्या गुप्तपंथाने चालावे लागते, ज्याची प्राप्ति झाली असतां राजाचे सामर्थ्य अंगी बाणते, व ज्याच्यावांचून राजेही भिकारीसे दिसतात, तोच केवळ परमार्थ होय ( क.६९). ज्यास शस्त्राने तोडिलें असतां तुटत नाही, जे अग्नीवर असून जळत नाही, जे सर्वत्र सूक्ष्म रीतीने भरलेले आहे ( क्र. ७० ), जे अनंत ब्रह्मांडाखालतें व अनंत ब्रह्मांडावरुते आहे, जळाने जसें जळचरांस • व्यापावें तसें में सर्व सृष्टीस व्यापून आहे, जे वनास भेदिले असून ज्याचा मृदुपणा गेला नाही, जे कधीही विन्मुख न होतां अखंड सन्मुख असते, ज्या ________________

प्रस्तावना १७. मध्येच पाहणे ऐकणे, वगैरे क्रिया घडतात, जे अत्यंत निकट पदार्थाच्याही अलीकडचे आहे, जे वाचू लागले असतां अक्षरांमध्येच दिसते, जे कोणतीही वस्तु घेण्याच्या अगोदर हातांत येते, जे चर्मदृष्टीचे देखणे नसून ज्ञानदृष्टीचे देखणे आहे, तेंच परब्रह्म होय ( क. ७१ ), जें धरूं जातां धरवत नाही, जें टाकू जातां टाकवत नाही, जे सर्वांचे मस्तकी सूर्याप्रमाणे प्रकाशतें, ज्यास पहावयास ती क्षेत्रांस जावे लागत नाही, जे बेसलेठायींच सबाह्यांतरी व्यापून दिसते, जे वामसव्य, अधऊर्च, सन्मुखविन्मुख सर्वत्र एकदम असते, ज्याच्या असंभाव्य विस्ताराची कल्पनाही कोणास होणार नाही, अशा त्या विमळ ब्रह्माची सरी कोणास द्यावी ( क्र. ७२ ) ? अशा रीतीने रामदासांनी. ब्रह्माच्या सर्वगत अस्तित्वाचे मोठ्या बहारीने वर्णन केले आहे. १६. रामदासांसारखे कर्मयोगी रामदासच होत. परमार्थाचा अनुभव . घेऊन जगांत योग्य रीतीने वर्तणूक करण्याचे भाग्य थोड्या साधूसच लाभते. अशा साधूंत रामदासांची प्रामुख्याने गणना होते असे म्हणण्यास हरकत नाही. विशेषेकरून त्यांच्या दासबोधग्रंथांत पारमार्थिक कर्मयोग्याची वर्तणूक कशी असावी याबद्दल त्यांनी जे विचार प्रकट केले आहेत ते आपल्या स्वतःच्याच अनुभवावरून केले आहेत; तथापि त्यांपासून इतरांनीही पुष्कळ बोध घेण्यासाखा आहे. साधूने कीर्तिरूपानें उदंड विख्यात असावे, परंतु पाहूं गेलें असतां त्याने एकाएकी सांपडूं नये, असें रामदासांनी लिहिले आहे. ज्या स्थळास जावयाचें तें सांगं नये, व जे ठिकाण सांगावे त्या ठिकाणी जाऊं नये; अशा प्रकारे आपली स्थितिगति लोकांच्या निदर्शनास आणू नये, असें रामदासांनी म्हटले आहे. . लोकांस जे पहावेसे वाटते ते याने पाहूं नये. याने उदंड समुदाय करावे; पण गप्तरूपाने करावे. लोकांचे निरनिराळे अधिकार शोधून त्यांस जवळ अगर दूर . ठेवावें; पण आपला मगज कांहीतरी बाळगून रहावें. महंतानें महंत करून त्यांस नाना देशी विखुरावें (क्र. ७३ ). आपण मनापासून भक्ति केल्यास अशा महापुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणन लोक त्यांस धुंडीत येतील. शिष्यास कोणतीही गोष्ट न मागण्याची त्याने प्रतिज्ञा करावी. फक्त आपणांमागें जगदीशास भजत जावे इतकेंच मागावें (क. ७४.). ज्याप्रमाणे आत्मा ठायींच्या ठायीं गुप्त होतो त्याप्रमाणे साधूने तेथल्या तेथेंच नाहीसे होऊन सर्व लोकांस गुप्तरीतीने वर्तवीत असावें (क्र. ७५ ). मुख्य लोकांचे मनोगत राखणे - THS ________________

“१८ रामदासवचनामृत N । हेच मोठ्या चातुर्याचे लक्षण होय ( क्र. ७७ ). आपण करून करवावें; आपण विवरून विवरवावें; आपण भजनमागास धरून लोकांकडूनही : धरवावें. जो करून बोलेल त्याचेच शब्द जगांत प्रमाण मानितात ( क्र. ७८ ); नष्ट लोकांशी गांठ पडली असतां नष्टांकडूनच त्यांचा पराभव करवावा; हुंब्यास हुंबा लावून द्यावा; खटनटाची फजिती खटनटाकडूनच करवावी. ज्याला समुदाय मोठा व्हावा अशी इच्छा असेल त्याच्या तनावा बळकट असाव्या लागतात. जो दुसन्यांवर विसंबून राहतो त्याचा कार्यभाग बुडतो. जो आपणच कष्टत जातो त्यासच स्वीकृत कार्यात यश येते ( क्र. ७९ ). " कांहीं गल्बला कांहीं निवळ" अशा संमिश्रणाने आपला काल घालवीत जावा ( क्र. ८०). लोक आपली मार्गप्रतीक्षा करीत असतां वेळेस तत्काळ अशा साधने पुढे उभे रहावे. वडिलांचे मन जसें सर्व मुलांवर असते त्याप्रमाणे अशा महापुरुषाने सर्वत्रांची चिंता करीत जावी (क्र. ८१ ). आपण जेथे तेथे नित्य नवा असून लोकांस हा असावा असें नेहमी वाटत असावें. काही तरी एक उत्कट कार्य केल्याखेरजि कीर्ति होत नाही हे मनांत बाळगावें. जेथें अखंड तजविजा चाळणा होतात तेथें कार्य करण्याचे निरनिराळे मार्ग सुचतात. यामुळे एकांतांत जाऊन विवेक करावा, व आत्मारामाचे दर्शन घ्यावे ( क्र. ८२). जो एक क्षणही वायां जाऊं देणार नाही त्यासच तीक्ष्णबुद्धीचा म्हणावें. ज्याच्या तोंडांतून अखंड वाक्प्रवाह सुरू असतो त्यासच लोकांची अंतःकरणे आपल्या ताब्यात घेतां येतात. जेथें तेथे लोकांस भजनास लावून आपण तेथून निसटावें. उदासवृत्तीच्या बळाने आल्यागेल्याची क्षिती नाही असे झाले पाहिजे. आपण जेथे कोणीच पाहणार नाही अशा खनाळामध्ये जाऊन ईश्वराचे ध्यान करून सर्वत्रांची चिंता वाहिली असता त्यांची मनें सहजच आपल्याकडे आकृष्ट होतील. अशा मनुण्यानेच जन्मास येऊन सार्थक केलें असें रामदासांनी लिहिले आहे ( क. ८३). ___संकीणग्रंथविवरण. १७. रामदासांचा " जुना दासबोध " या नांवाचा जो ग्रंथ आहे तो आपल्या दासबोधाचें मूळ होय असे आपण वर पाहिलेच आहे. त्यांतील व . - यांतील शिकवण यांत फारच साम्य आहे हे त्यांचा अभ्यास करणाऱ्यांस सहज दिसून येईल. येथे आपणांस जुन्या दासबोधापैकी दोनचारच नवे मुद्दे उद्धृत ________________

प्रस्तावना करावयाचे आहेत. क्रमांक ५ यांत “ देह पडो का देव जोडो" अशा भावनेने देवाच्या पाठीशी लागल्यावांचन देवाचे दर्शन व्हावयाचे नाही असें रामदासांनी लिहिले आहे ( क्र. ८५). क्रमांक ८६ यांत ज्यास परमार्थ करावयाचा आहे. . त्याने प्रपंचाची मिठी सोडविली पाहिजे असे स्पष्ट सांगितले आहे. दासबोधांत याच्या उलट " प्रपंचपरमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी" असें जें रामदासांनी सांगितले आहे ते ध्यानात ठेविले पाहिजे. क्रमांक ८७ मध्ये कोणास कळू न देतां अंतरीच रामाचा अखंड जप चालल्यावर जो साक्षात्कार होतो तो आपल्यास लोकांनी मोठे म्हणावें या बुद्धीने लोकांस सांगितला असता तो पुनः होणार नाही असा रामदास आपल्या जीवींचा अनुभव सांगतात. क्रमांक ८८ मध्ये रामास मागणे असेल तर आपण राम व्हावे, व रामानें आपलें दास्य करावें, इतकेंच त्यास मागावें असें सांगितले आहे. १८. मनाचे श्लोक सर्व उद्भत करण्यास येथे जागा नाही. तथापि त्यांतील काही निवडक श्लोक या पुस्तकांत घेतल्यावांचन गत्यंतरच नव्हते. भक्तिपंथ हाच सगळ्यांत सोपा पंथ, प्रभाती रामाचे चिंतन करावें, ज्यामुळे आपली कीर्त मागें उरेल अशा प्रकारची क्रिया येथे करावी; समर्थाच्या सेवकास वक्र पाहण्यास काळही समर्थ होणार नाही; देव अल्पमात्र आपले धारिष्ट पहात असतो; संकटांत स्वामी एकदम उडी घालतो; देवकार्यांत देह झिजविण्याची वासना आपण बळकट ठेवावी; राम हा कल्पतरु असल्याने त्याच्या खाली मागितलेली फळे येतात; जातां, येतां, जेवितां, सखी होतां, नामस्मरण करावें, देव हा श्वेतही नाही व पीतही नाही, हाती घेऊं गेलें असतां तो सांपडत नाही, विधीस निर्माण करणारा, विष्णूचे प्रतिपालन करणारा, व शंकरास शेवटी जाळणारा तोच मुख्य देव होय; असा जो मोठा देव तो या जगांत चोरला असल्याने गुरूवांचन तो दिसत नाहीं; व या देवाचे स्वरूप नभासारखें विस्तीर्ण, व्यापक, अलिप्त, व निर्विकार आहे, अशा प्रकारच्या कल्पना ज्या मनाच्या श्लोकांत रामदासांनी सांगितल्या आहेत त्या सर्वांच्या माहितीच्याच आहेत. १९. प्रस्तुत पुस्तकांत समर्थांच्या "पंचसमासी" पैकी दोनच उतारे .घतले आहेत. पहिल्यांत मन पांगळून बुद्धि ज्यावेळी स्वरूपांत लीन होते, अनुभव अनुभवामध्ये मुरून जातो, व निष्कलंक निर्मळ आत्मा प्रकाशमान होतो त्या स्थितीसच स्वरूपानुसंधान म्हणावे असें रामदासांनी म्हटले आहे (क. ९०), दुसऱ्यांत सर्वत्र रामदर्शन कसे होते हे रामदासांनी सांगितले आहे. वृत्ति ________________

२० रामदासवचनामृत मुळाकडे पाहू लागल्यास तिला रामच दिसतो; मन मुरडले असता त्यास रामच भेटतो; वदन चुकवू गेले असतां सन्मुख रामच दिसतो; एकदां सन्मुख झाल्यावर केव्हाही राम विन्मुख होत नाही; विसरून पाहिले असतां सुद्धा रामाचेंच दर्शन होते; अशी खूण सर्वत्रांस सांगून रामदास या जगांतून पार झाले असें म्हटले आहे ( क्र. ९१). "मानपंचक" या प्रकरणांतूनही दोनच उतारे घेतले आहेत. पहिल्यांत रामराज्याचे वर्णन आहे. रामराज्य त्यासच म्हणावें की, ज्यांत बहुवृष्टि अनावृष्टि नाहीत; चिंता व व्याधि यांचा लेशही नाही; युद्ध व दारिद्र्य नाहींच नाहीत; सर्वत्र सत्याचे साम्राज्य आहे; भूमि अद्भुत पिकतात, व वृक्ष सदा फळे देतात; श्वापद, पक्षी वगैरे जीव नेहमी आनंदरूप विचरतात; च कीर्तन व नामघोष यांच्या गर्जनेने सर्व पृथ्वी दुमदुमून जाते ( क्र. ९२ ). दुसन्या उता-यांत रामाचें ध्यान करणे, अगर शिवाचे ध्यान करणे, अगर शक्तीचें ध्यान करणे, अगर इतर कोणत्याही देवतेचे ध्यान करणे, हे सर्व सारखेच होय असें रामदासांनी सांगितले आहे. मानवांचे सेवक नानापरीने कष्टतात; मी देवांचा देव सेविल्याने धन्य झालो असे रामदासांनी येथे उदार काढले आहेत ( क्र. ९३ ). “निर्गुण ध्यान" या प्रकरणांतून एकच उतारा घेतला आहे. मुमुक्षु, साधक, सिद्ध, योगी, वीतरागी, जोगी, जंगम, फकीर, ऋषि, मुनि, अवतार, सर्व याच मार्गाने स्वरूपस्थितप्रित गेले आहेत असें रामदासांनी म्हटले आहे (क्र. ९.). .. २०. रामदासांच्या समग्रग्रंथांत "जनस्वभावगोसावी" या नांवाचे एक मकरण आहे. त्याकडे लोकांचे जितकें लक्ष जावें तितकें गेलेले नाही असे दिसते. या केवळ सत्तर ओंव्यांच्या प्रकरणांत त्यांनी भोंदू गुरूंचे वर्णन अशा बहारीने केलें आहे की ते जर या गुरूंनी मनांत बाळगले तर त्यांस भोंदूपणा करण्याच्या नवीन क्लप्त्याच सुचावयाच्या नाहीत. मुख्य, अनुभवावांचन बोलणारे हे सर्व भोंदू गुरूच होत असें रामदासांचे मत आहे. काही गुरु विष्ठेचा अंगिकार करून अगर ओंगळपणाच्या सबबीने गुरु बनतात; कांहीं भूतांस व वेताळांस चेतवं शकतात, नानाप्रकारची चेटके करून, स्मशानांत राहून, जिकडे तिकडे सर्पच सर्प करून, नपुंसकास वनिता भोगण्याचे सामर्थ्य देऊन, सर्व धातूंचे सोनेरुपै. बनवून कांही गरूपणाप्रत पावतात; कांही गुरु आज गुप्त होऊन उद्या उमटतात; कांहीं व्याघ्रावर बसून हातांत साचा चाबूक घेऊन धांवतात (37), आणि कांही तर अचेतनेच चालवितात (३३), अगर रेड्याकडून वेद बोलवितात ________________

प्रस्तावना (73). यांत रामदासांनी चांगदेव व ज्ञानदेव यांच्याबद्दलचे जे चमत्कार जगांत प्रचलित आहेत त्यांचा उल्लेख केला असावा असे दिसते. काही दुसन्यांच्या जीवींचें जाणतात, व कांहीं वांझेचे वांझपण फेडतात; व काही तर वाळलेल्या काष्ठास पल्लवित करितात ( ४६ ). यांत रामदासांनी प्रत्यक्ष दा. १६.१ यांत वाल्मिक ऋषसिंबंधी “ शुष्ककाष्ठी अंकुर फटले । तपोवळे जयाच्या" अशा प्रकारचे जे उद्गार काढिले आहेत त्यांचाच उल्लेख आहे. कांहीं गुरु गर्भिणीस कन्या अगर पुत्र होईल हे सांगतात, काही पूर्वेचे पश्चिमेस अकस्मात् जातात; जळावर आसन घालून कांही परतीरास बसून जातात; कांहीं गोसावी तर वाघच बनतात; एका गोसाव्यास वाळवंटांत पुरले असताही तो जिवंत राहतो; व काही गोसावी तर मद्यमांसाची फुले बनवितात (६१). या , ओवीत मोरया गोसावी यांनी जो चमत्कार केला अशी दंतकथा आहे तिचा उल्लेख असावा असे दिसते. असो. असे नानाप्रकारचे चमत्कार करणारे गुरु आहेत. पण तोच गुरु खरा की ज्यास अध्यात्मविद्या कळली (६८), व जो आत्मज्ञानपारंगत झाला (६९). - २१. रामदास इतके बुद्धिवादी होते तथापि त्यांच्या अंतःकरणांत करुणेचा पाझर होता. त्यांचे अंतःकरण वजापेक्षां कठीण, पण कुसमापक्षाही मृदु होते, हे त्यांच्या असंख्य करुणाष्टकांवरून सिद्ध होत आहे. येथे सर्व करुणाष्टके घेण्यास जागा नाही, म्हणून काही महत्त्वाचीच करुणाष्टके तेवढी उध्दत केली आहेत. सदासर्वदा देवाचा योग घडावा व त्याचे कारणी आपला देह पडावा (क.९७) असें रामदासांनी म्हटले आहे. साधुजनांच्या संगतीने समाधान वाटते; पण त्यांचा वियोग झाला असता दुःख होऊन काळ कंठेनासा होतो ( क्र. ९८); लोकांमध्ये रामाचा दास या नांवाने मला पाचारितात, पण अंतरांत त्याच्या भक्तीचा लेशही नाही (क्र. ९९ ) ! संसाराकडे व प्रपंचाकडे माझें मन अयाप ओढ घेते ( क्र. १०० ); पळपळ आयुष्य जात असतां व काळ लळलळ विष ओकीत असतां रामावांचन या जगांत सौख्यच नाही (क्र. १०१ ); मनासारिखी सुंदर भार्या, कन्या, जावई, मुले, धनधान्य, अलंकार, बसनें, आरो• ‘ग्य, शांततायुक्त ग्राम, साधूंची संगति, व देवाची प्राप्ति होणे, हा फार सुरुताचा योग आहे असें रामदासांनी म्हटले आहे ( क. १०२). माझ्या अंतरींचा निश्चय घडिघडि बिघडत असल्याने मजवर करुणेचा तूं पूर लोट (क्र.१०३); माझ्या हातून कोणतेही कार्य झाले नसून मी फक्त भूमिभार झालो आहे (क. ________________

२२ रामदासवचनामृत १०४); सर्व सोडून एकदम निघून जावें असें मनास वाटते, व उपाधीस देखन कंटाळा येतो (क. १०५.); विषयकर्दमांत लोळत असतां मला चिळस उपजत नाही ( क. १०६); मी टोणपा झालो असल्याने मनांत फार उद्वेग वाटतो तुला उदंड भक्त असल्याने तूं आम्हांस कशास विचारशील ( क्र. १०७ ); तुझ्या साधूचे रुपणपण लोकांत न दिसावें म्हणून तुझ्या सामर्थ्याचा अल्प वांटा मी मागत आहे ( क. १०८); अशा प्रकारचे रामदासांचे करुणाष्टकांतील उद्गार फार हृदयस्पर्शी आहेत. या करुणावचनांवरून ज्ञान व भक्ति यांची रामदासांत किती उत्तम सांगड होती हे दिसून येईल. २२. ज्ञान व भक्ति यांबरोबरच समर्थांचा जो राजकारणातील कर्मयोग होता तोही फार अवर्णनीय होता. रामदास हे राजकारणी नसून ते केवळ "मोक्षगरु" अगर " धर्मगुरु " होते हैं मत आमच्या ऐतिहासिक प्रकरणांतील उतारे जे वाचतील त्यांस सहजच सदोष वाटणार आहे. क्रमांक १०९ मध्ये रामदास हेळवाकच्या घळीतून चाफळास कसे आले, तेथे त्यांची व्याधीही कशी... बरी झाली, रघुनाथभटजीवर त्यांचे प्रेम किती होते, आपल्या शिष्यांविषयी निकट भाव त्यांचे ठायी किती वसत होता, हे त्यांच्या स्वहस्तलिखित. पत्रावरुन सहज दृग्गोचर होणार आहे ( क्र. १०९). क्रमांक ११० वरून रामदासांनी देशोदेशी विखुरलेल्या आपल्या निरनिराळ्या महंतांस सांप्रदाय वाढविण्याविषयी कशी आज्ञा केली होती ते व्यक्त होत आहे. “समुदाय" करणे हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य धडा होता. जवळच्या सोयऱ्याधायांच्या मुलांस एकांतांत बोलावून ईश्वराचे भजन करावे असे त्यांस सांगून जप देऊन नंतर आम्हांकडे पाठवावें म्हणजे आम्ही त्यांचा गोवा उगवून घेऊं, असें रामदासांनी आपल्या भक्तांस सांगितले आहे. क्रमांक १११ मध्ये सुंदरमठ अगर शिवथर येथील घळीचे रामदासांनी सुंदर वर्णन केले आहे तें पहावें. तोच समर्थ देव की ज्याने आपल्या शिण्यास सुद्धा समर्थ म्हणविले. अशा देवार्ने सुंदरमठांत वास करून आपला दास संनिध ठेवला व सगळा प्रांतच पावन केला. या सुंदरमठाचे सौंदर्य बावी, पोखरणी, झरे इत्यादिकांनी विशेषच वाढत आहे. ज्या कड्याकपाटांत जातांना भय वाटावे अशा स्थळी. रघुनाथाचे वैभव दृष्टीस पडते. संनिध तर प्रतापगडची रामवरदायिनी माता आहे, असे रामदासांनी म्हटले आहे. क्रमांक ११२ मध्ये अफझुलखानामुळे . मानेना म्हणून पश्चिमेकडे जगन्माता कशी गेली, रामास वरदायिनी रामदासासहीं कशी वरदायिनी झाली, सदानंदामध्ये तिचा "उदो उदो" कसा झाला, अशा रीतीने प्रतापगडच्या भवानीचे वर्णन करून आपला राजा तूंच वाढीव अशी ________________

L U . . - -


- L AI . ..... .. . . . ..LLA J .. . प्रस्तावना २३ तीस रामदासांनी प्रार्थना केली आहे.क्रमांक ११३ मध्ये शिवाजीचे देवब्राह्मणांच्या "संरक्षणाबद्दल अभिनंदन करून शेवटी उदंड राजकारण तटल्यामुळे तुमच्या देशांत वास्तव्य केले असतांही तुम्ही आमचें वर्तमान घेतले नाही याबद्दल खेद प्रदर्शित करून शिवाजीचे मन जास्तच आपल्याकडे रामदासांनी ओढून घेतले आहे. क्रमांक ११४ मध्ये क्षत्रियांचे काम म्हटलें म्हणजे मारतां मारतां मरणे हे होय; अशा शूर क्षत्रियांनी तकवा न सोडितां तलवार चालविली असतां जय अवश्यमेव प्राप्त होतो; मराठा तितका मेळवून आपला महाराष्ट्रधर्म वाढविला पाहिजे; देवधर्माचें उच्छेदन झाल्यास त्यापेक्षा मृत्यु बरा असा क्षात्रधर्म सांगितला आहे.क्रमांक ११५मधील सनदेंत चाफळच्या स्थापनेपासून शिवाजीचा व रामदासांचा जो संबंध घडून आला त्याबद्दलचा साद्यंत इतिहास शिवाजीने लिहिला आहे हे वर सांगितलेच आहे. क्रमांक ११६मध्ये "आनंदवनभुवन" या नांवाच्या प्रकरणांत रामदासांनी पुढे होणार ते पाहून बायबलमधील सेंट जॉनप्रमाणे आपले विचार प्रकट केले आहेत. मुख्य देवच उठल्यावर इतरांची किंमत काय ? अभक्तांचा क्षय होऊन हिंदुस्थान बळावलें आहे, औरंगजेबाचे राज्य नष्ट होऊन पूर्वीप्रमाणे सुराज्य स्थापन झाले आहे, रामवरदायिनी माता हातांत गर्द घेऊन रायासमागमें चालली आहे, व पूर्वीप्रमाणेच पुढेही भक्तांचे रक्षण करीत आहे, असें रामदासांनी पाहिलेले दिव्यदर्शन या आनंदवनभुवनांत त्यांनी प्रथित केले आहे. अशाप्रकारचे उद्गार वाचल्यावर रामदास राजकारणी नव्हते असे कोण म्हणेल ! २३. रामदासांचे गुरु कोण असा एक प्रश्न नेहमी विचारण्यांत येतो. त्याचे उत्तर रामदासांनी क्रमांक ११७ मध्ये दिले आहे. त्यावरून रामचंद्राचा दृष्टांत होऊन रामदासांस मंत्र मिळाला असावा असे दिसते. मारुतीची उपासना रामचंद्रांनी दृष्टांतांत सांगितल्याप्रमाणे रामदासांनी केली असें त्यांत लिहिले आहे. क्रमांक ११८ मध्ये रामदासांनी आपल्या पित्यास म्हणजे सूर्याजीपंतांस गांवाबाहेर भीमदेवालयामध्ये रामलक्ष्मणांपासून उपदेश कसा झाला, तुझे पुत्र रामदास्याचा ध्वज उभारतील असा वर त्यास कसा मिळाला, शेवटी वडिलांच्या निधनानंतर ज्येष्ठ बंधूंनी मंत्र न सांगितल्यामुळे रामदासांसही त्याच देवालयांत रामाचा दृष्टांत कसा झाला, हे बालपणीचें आपलें चरित्रकथन रामदासांनी केले आहे. क्रमांक १.१९ मध्ये हनुमंतवेलीवरून राममंडपावर चढून आत्मज्ञानाचे फळ आपल्यास कसें प्राप्त झाले हे रामदासांनी सुंदर रीतीने सांगितले आहे. क्रमांक १२० मध्ये मनास मागे टाकणाऱ्या प्राणदात्या मारुतीची उपासना त्यांनी सांगितली आहे. शेवटी तेरा अक्षरी मंत्राचा तेरा कोटि जप केल्यास देवाचे दर्शन होईल असें रामदासांनी अभिवचन दिले आहे (क्र. १२२). २४. रामदासांची पदें, अभंग, वगैरे तुकारामज्ञानेश्वरांच्या इतकी जरी संख्येने नसली तरी त्यांतील शिकवण ज्ञानेश्वरतुकारामांच्या प्रमाणेच ईश्वरप्राप्ती ________________

२४ रामदासवचनामृत ची आहे. कोणत्याही स्थितीत आपण राघवाची कास सोडूं नये (क्र. १२३). आपण हजारों अन्याय केले तरी अनुताप झाल्यास गुरु क्षमा. करतील (क्र. १२४); शिंक, जांभई, खोकला इतका काळही आपण व्यर्थ जाऊं देता कामा नये (क. १२६); अशाने एकदम थोर लाभ होतो (क.. १२७) साधनांची खटपट व्यर्थ ठरते (क्र. १२८); गृहांत अगर वनांत सारखेच रामदर्शन होतें (क्र. १२९); एकदां रामाचे दर्शन झाल्यावर पुनः राम विन्मुख होत नाही ( क्र. १३०); राम व विठ्ठल हे सारखेच आहेत; जसा भाव तसा देव ( क्र. १३१ ); अशी शिकवण रामदासांनी आपल्या अभंगांत व पदांत केली आहे. २५. स्फुट प्रकरणांत शक्ति व युक्ति या दोन्हींखेरीज काम चालत नाही असें सांगून सर्व प्राणिमात्रांच्या शरीरांत खेळणारी विश्वव्यापिनी शक्ति, अगर भवानी माता, इला आपण हुडकून काढली असें रामदासांनी सांगितले आहे (क्र.१३२). देव व देउळे यांमधील भेद लोक मानीत नाहीत; देवळासाठींच लोक भांडतात, त्यांस देव चुकवून राहतो; देव मोठा ठक असल्याने जीर्ण देवालयें तो सोडून जातो; ब्रह्मा, विष्णु महेश्वर, हे देव नसून ती देवालयेच होत; अशा त्या निश्चल देवाचें ध्यान सर्वांनी करावें असें रामदासांनी पुनः सांगितले आहे ( क्र. १३३). क्रमांक १३४ हा उतारा आजपर्यंत अप्रसिद्ध होता. तो रा. शंकर श्रीकृष्ण देव व रा. गणेश गोविंद कारखानीस यांच्यामुळे आम्हांस प्रकाशित करण्यास सांपडला आहे, याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. या उताऱ्यांत गुरुशिष्यसंवादरूपाने दासबोधाचा सोलीव अर्थ दिला आहे. ईश्वरसाक्षात्काराच्या वाटेत जे नानाप्रकारचे अनुभव येतात ते यांत कल्याण व रामदास यांच्या. संवादांत अथित केले असल्याने या उताऱ्याचे फारच महत्त्व आहे हे सांगावयास नको. क्रमांक १३५ मध्ये ज्ञानदेवांनी “धर्म जागो निवृत्तीचा " असें में सुंदर पद केले आहे त्याबरहुकूम रामदासांनी " राघवाचा धर्म जागो" अशा तिीचें पद करून देवास “मागणे निरसे जेणें । ऐसें देगा रामराया " अशा प्रकारचे एकच मागणे मागितले आहे. हे सर्व पद बहारीचे असल्याने रामदासांच्या निष्कामभक्तीचा येथे कळसच झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. २६. या ग्रंथाचे कामी रा. सा. वासुदेवराव दामले, रा. गणेश गोविंद कारखानीस, रा. शंकर केशव धर्माधिकारी, व रा. जगन्नाथ रघुनाथ लेले या सर्वांची जी मदत झाली आहे, त्याबद्दल मी त्या सर्वांचा फार आभारी आहे.. आर्यभूषण छापखान्याच्या चालकांनी फार मेहनत घेऊन व झीज सोसून हे पुस्तक छापून दिले त्याबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे. रा. द. रानडे ________________

. अनुक्रमणिका. रामदासवचनामृत भाग पहिला. । . . १. प्रासंगिक. क्रमांक १. रामदासांचा शिवाजीस उपदेश. २. ब्राह्मणांच्या दुःस्थितीबद्दल रामदासांचे उद्गार. ३. रामदासांचे स्वतःच्या उपासनेचे वर्णन. ... ४. रामदासांची रामभक्ति. . २. तात्त्विक. ५. ज्ञानाचे व्यतिरेकात्मक वर्णन. ... ६. ज्ञान म्हणजे काय ? ७. आत्मज्ञानाच्या योगाने सर्व पातकांचा व दुःखांचा नाश होतो. ८. मूर्ति म्हणजे देव नव्हे. ... ९. नाना देव आणि एक देव. ... १०. खरा देव म्हणजे मूर्ति नव्हे. ११. देवांचा जो देव तो गुरूच्या योगानें कळतो. १२. अंतरात्मा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. १३. आत्मा हा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. १४. देवता व भुते यांचे अस्तित्व. १५. देवता वायुरूपाने राहतात. ________________

रामदासवचनामृत क्रमांक १६. भुते संतांस बाधा करू शकत नाहीत. ... १७. देवांचे जाणीवरूपाने अस्तित्व.. १८. ब्रह्मा, विष्णु, महेश, यांचे केवळ प्रवृत्तिरूपाने अस्तित्व. १९. अनृताचे प्राबल्य. २०. ब्रह्मांडापैलीकडील गोष्टी. ... . २१. सृष्टिकर्त्यांस ओळखणे हीच उपासना. ... २२. देव कोणास म्हणावें? ... . २३. देह, आत्मा, आणि ब्रह्म यांचा संबंध. ... २४. चारही आत्मे मिळून एकच होत. ... २५. ब्रह्माचे स्वरूप. ... ... .. ३. साक्षात्कार. २६. देवाचे भजन कां करावें? ... ... २७. या संसारयात्रेमध्ये देवाचा नफा पहावा. ... २८. अध्यात्मप्राप्तीविषयीं देहाचा उपयोग.. ... २९. अंतकालची दुःस्थिति. ... ३०. मृत्यूचे सामर्थ्य. ३१. “ सर्व सांडून शोधा मजला." ३२. याच जन्मीं परमेश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे. ३३. बद्ध मनुष्याचे वर्णन. ३४. गुरूची आवश्यकता. ... . ३५. “ सद्गुरुकृपा तेचि किली.” ३६. देवापेक्षां गुरु श्रेष्ठ आहे. ३७. " म्हणौनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना. " ३८. सद्गुरूचे लक्षण. ... ३९. साधुलक्षण. .. ४०. “जें त्रैलोकी नाही दान । तें करिती संतसज्जन.” ________________

1T . . अनुक्रमणिका क्रमांक ४१. संतसभावर्णन. ... .... ... ... ४२. संत चमत्कार करीत नाहीत, देव संतांबद्दल चमत्कार करितो... ४३. ज्ञान आणि सामर्थ्य. ४४. शिष्यलक्षण. ... ४५. मोक्ष कसा मिळतो? ४६. सत्त्वगुणलक्षण. ... ४७. नाममहिमा. ... ४८. “ उपासनेचा मोठा आश्रयो." . ४९. “ परंतु तेथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे." ५०. ईश्वराबद्दल अहेतुक प्रेम. ... ... ५१. श्रवणनिरूपण. .... ५२. “ निःशंक निर्लज कीर्तन । करितां रंग मांजे." ५३. भक्तियुक्त काव्य हेच प्रासादिक काव्य होय. ५४. कल्पना कशी मोडावी? ... ५५. “ निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडे स्वभावे." ५६. खोटें ध्यान व खरें ध्यान, ... ५७. साधकलक्षण. ५८. सख्यभक्तिनिरूपण. . ५९. आत्मनिवेदनभक्ति. १०३ ६०. आत्मनिवेदन म्हणजेच आत्मज्ञान. १०५ ६१. मुक्तिचतुष्टयनिरूपण. ... ६२. जीवन्मुक्तलक्षण. ... ६३. “ साधन सोडितां होये । मुक्तपणे बद्ध." ६४, “कुल्लाळ पावला राज्यपदवी । आतां रासमें कासया । राखावी." ६५. साक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावें? १०० ________________

रामदासवचनामृत . क्रमांक ६६. योग्यांच्या गुप्तधनाचे वर्णन. ११३ ६७. अनुभवाचे उलट सुलट प्रकार. ... ११५ ६८." जैसा भाव जयापासी, तैसा देव तयासी." ११६ ६९. परमार्थवर्णन. ... ... ११६ ७०. प्रचीतिनिरूपण... .. ११९. ७१. विमळब्रह्मनिरूपण. ... ... १२० .७२. ब्रह्माचें सर्वगत अस्तित्व. ... १२५. ४. कर्मयोग. ७३. निःस्पृह वर्तणूक. १२७ ७४. उत्तमपुरुषनिरूपण. १२९ ७५. महंतलक्षणे. १३२ ७६. “ जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे. " ७७. शिकवणनिरूपण. ७८. विवेकनिरूपण. . १३५ ७९. राजकारणनिरूपण. १३७. ८०. “ कांहीं गल्बला काही निवळ । ऐसा कंठित जावा काळ. " १४० ८१. समर्थलक्षण. ... १४१ ८२. “ भगवत्कीर्तीने भरावें । भूमंडळ.” ... ८३. रामदासांचे आत्मचरित्र. .... ५. उपसंहार. ८४. “ समर्थकृपेची वचनें । तो हा दासबोध." १३३ लपण. १३४ १४३ १४५ ________________

रामदासवचनामृत भाग दुसरा. ६, जुना दासबोध. क्रमांक ८५. देह पडे कां देव जोडे! ... ... जु. दा. ७.१३-२१ १५३. ८६. प्रपंचपरमार्थ. ... ... ... ... .. - जु. दा. ११.५४-६० १५४ : ८७. अनुभव सांगू नये. ... ___ जु. दा. १५:३७-४६ १५४ ८८. रामास मागणे. .... ... ... ... जु. दा. १६:१-१७ - १५५. ७. मनाचे श्लोक. ८०. मनास प्रार्थना. ... ... .... .. म. श्लो. (२१) १५७ . ८. पंचसमासी. ९०. स्वरूपानुसंधान. ... ... पं. स. ४.१८-३० १६१: ९१. सर्वत्र रामदर्शन. ... ........ - पं. स. ५.५-३३ १६२: ९. मानपंचक. ९२. रामराज्य... ... ... मा. पं. १.७-२५ . १६३. . ________________

रामदासवचनामृत १६५ १६७ - - १६८ १७५ क्रमांक ९३. सर्व देव मिळून एकच. ... ... ... ___ मा. पं. ४.१२५ १०. निर्गुणध्यान. ९४. परममार्गाचे वर्णन. ... ... ___ नि. ध्या. ५२-७४ ११. जनस्वभावगोसावी. ९५. भोंदू गुरूंचे वर्णन. ... ... . ज. गो. १-७० १२. राममंत्राचे श्लोक, ९६. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. ... रा. मं. श्लो. (८) १३. करुणाष्टके. ९७. रघुनायेका, मागणें हेंचि आतां. . ९८. उदासीन हा काळ कोठे न कंठे. ९९. नसे भक्ति ना ज्ञान.. - १००. सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी.... १०१. रघुविरभजनाची... ... . १०२. जनी जाणिजे योग हा सुकृताचा. १०३. अनुदिनि अनुतापें. १०४. तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलो. १०५. रघूनायका, काय कैसें करावें ... .१०६. रामाचा धांवा. ... : १०७. बुद्धि दे रघुनायका. .. ११०८. रामदासांस कफव्यथा झाली असता त्यांनी केलेलें मारुतीचें करुणाष्टक. ... ... ... ... १७७ १७८ १७९ १७९ १८० १८१ १८४ १८५ १८६ . १८७ १८८ . . ________________

14 १९० . १९२ १९३ . १९४ १९७ अनुक्रमणिका १४. ऐतिहासिक. क्रमांक १०९. समर्थांचे स्वहस्तलिखित पत्र..... सांप्रदायाची कागदपत्रे. ११०. रामदासांचे महंतांस पत्र. ... विविध विषय १. १४१-१४२ १११. सुंदरमठ. ... ... विविध विषय २. १३७--१३८ ११२. प्रतापगडच्या भवानीचे स्तोत्र. ... .. रामदासांची कविता ३९३. १-२० ११३. शिवाजीचे वर्णन. ... ... ... ११४. क्षात्रधर्म. ... ११५. शिवाजीची सनद. ११६. आनंदवनभुवन. ... रामदासांची कविता ४२१. १-५३ १५. सांप्रदायिक. ११७. रामदासांचे गुरु कोण ? ११८. रामदासांचें स्वचरित्रकथन. ... . ११९. हनुमंत आमुची कुळवल्ली. ... १२०. “भीमरूपी" स्तोत्र. ... १२१. छत्रसिंहासनी. ... ... १२२. रामाचे दर्शन केव्हां होईल ?... १६, अभंग, पदें, वगैरे. १२३. “ राघवाची कास न सोडी सत्य !" - १२४. आतां तरी जाय जाय. ... १२५. देव जवळ असून भेट नाही. . . २०१ ... उकाण! २०३ २०४ . २०६ २०७ २०८ २०८. २०९. २१० ________________

रामदासवचनामृत ' पृष्ठ २११ क्रमांक १२६. एकही क्षण वायां न दवडितां देवाचें चिंतन. २१० १२७. देवाचा वियोग नाहीं तो योग. १२८. देव एकाएकी प्रसन्न होतो. ... २११ १२९. देवाचे सर्वत्र दर्शन. ..... २११ १३०. राघवाच्या भेटीने अमृतत्व. .... १३१. विठ्ठल व राम. ... ... १७. स्फुट प्रकरणे. १३२. शक्ति व युक्ति ... रामदासांची कविता ४३६. २२--५७ ।। १३३. देव व देउळे. ..., रामदासांची कविता ४३९. १-२२ २ "१३४. गुरुशिष्यसंवादात्मक दासबोधाचा सोंलीव अर्थ.. ... सोलीव अर्थ १५-३० २१५ "१३५. श्रीसमर्थकृत पांगूळ. ... विविधविषय २. ८९ २१७ - सोली ________________

। रामदासवचनामृत भाग पहिला दासबोध .. ________________

रामदासवचनामृत (दासबोध) १. प्रासंगिक । १. रामदासांचा शिवाजीस उपदेश. बरें ईश्वर आहे साभिमानी। विशेष तुळजा भोवानी। परंतु विचार पाहोनि । कार्ये करणे ॥९॥ अखंडचि सावधाना । बहुत काये करावी सूचना। .. परंतु काहीं येक अनुमाना। आणिले पाहिजे ॥१०॥ समर्थापासी बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चय करूनियां मन । लोक असती ॥११॥ म्लेंच दुर्जन उदंड। बहुतां दिसांचे माजलें बंड। या कारणे अखंड । सावधान असावें ॥१२॥ सकळकर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकारूं। तया पुरुषाचा विचारु । विरुळा जाणे ॥१३॥ न्यायनीति विवेक विचार । नाना प्रसंग प्रकार। परीक्षणे परांतर । देणे ईश्वराचें ॥१४॥ महायेत्न सावधपणें । समई धारिष्ट धरणे। अद्भतचि कार्य करणे । देणे ईश्वराचें ॥१५॥ ________________

रामदासवचनामृत-दासबोध. येश कीर्ती प्रताप महिमा। उत्तम गुणासी नाहीं सीमा। नाही दुसरी उपमा । देणे ईश्वराचें ॥१६॥ देव ब्राह्मण आचार विचार । कितेक जनासी आधार । सदा घडे परोपकार । देणे ईश्वराचें ॥१७॥ येहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणे राहाणे। बहुत जनाचे साहाणें । देणे ईश्वराचें ॥१८॥ देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणां चिंता वाहाणें। बहुत जनासी पाळणें । देणे ईश्वराचें ॥१९॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार। जाले आहेत पुढे होणार । देणे ईश्वराचें ॥२०॥ दा. १८. ६. ९-२०. २. ब्राह्मणांच्या दुःस्थितीबद्दल रामदासांचे उद्गार. नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला। वेदशास्त्रब्राह्मणाला। कोण पुसे ॥२९॥ ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकार। वर्णानां ब्राह्मणो गुरुः । ऐसें वचन ॥३०॥ ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले। गुरुत्व सांडून जाले। शिष्य शिष्यांचे ॥३१॥ कित्येक दावलमलकांस जाती। कित्येक पीरास भजती। कित्येक तुरुक होती। आपले इच्छेनें ॥३२॥ ऐसा कलियुगींचा आचार । कोठे राहिला विचार। पुढे पुढे वर्णसंकर। होणार आहे ॥ ३३॥ १ कैवार. २ मुसलमानांचा एक अवलिया. ________________

3] प्रासंगिक गुरुत्व आलें नीच याती। कांहींएक वाढली महती। शंद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ ३४ ॥ हे ब्राह्मणास कळेना। त्याची वृत्तिच वळेना। 'मिथ्या आभिमान गळेना। मूर्खपणाचा ॥ ३५॥ राज्य नेलें म्लेंचि क्षेत्रीं । गुरुत्वं नेले कुपात्रीं। आपण अरत्रीं ना परत्रीं। कांहींच नाहीं ॥३६॥ ब्राह्मणास ग्रामणीने बुडविलें। विष्णूने श्रीवत्स मिरविलें। त्याच विष्णूने श्रापिलें । फरशरामें ॥ ३७॥ आम्हीही तेचि ब्राह्मण । दुःखें बोलिलें हे वचन । वडिल गेंले ग्रामणी करून । आम्हांभोवते ॥ ३८ ॥ आतांचे ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें जालें। तुम्हां बहुतांचे प्रचितीस आलें। किंवा नाहीं ॥३९॥ 'बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचे अदृष्ट जाणावें। प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा केले पाहिजे॥४०॥ दा. १४. ७. २९-४०. ३. रामदासांचे स्वतःच्या उपासनेचे वर्णन. 'सकळांवडिल अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥१८॥ जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें। उगेंचि आले आणि गेलें । देवाचकरितां ॥१९॥ म्हणौन सकळां वडिल देव। त्यासी होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥२०॥ र क्षत्रियांनी. २ येथें ना तथे. ३ ग्रामण्याने. ४ मिळविलें. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. करी आपुला व्यासंग । कदापि नोहे ध्यानभंग।। बोलणं चालणे बंग। पडोंच नेदी॥२१॥ में वडिली निर्माण केलें। तें पाहिजे पाहिले। काये काये वडिलीं केलें। किती पाहावें ॥ २२ ॥ तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाला। अल्प चेतने तयाला । अल्पभाग्य ॥२३॥ तया नारायणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं। मग ते लक्ष्मी तयापासुनी। जाईल कोटें ॥२४॥ नारायेण असे विश्वीं। त्याची पूजा करीत जावी। . याकारणें तोषवावी । कोणी तरी काया॥ २५॥ उपासना शोधून पाहिली । तो ते विश्वपाळिती जाली । न कळे लीळा परीक्षिली। न वचे कोणा ॥२६॥ देवाची लीळा देवविण । आणीक दुसरा पाहे कोण। पाहाणे तितुकें आपण । देवाच असे ॥२७॥ उपासना सकळां ठाई। आत्माराम कोठे नाही। याकारणे ठाई ठाई। रामें आटोपिलें ॥ २८ ॥ ऐसी माझी उपासना। आणितां नये अनुमाना। नेऊनि घाली निरंजना- पैलीकडे ॥ २९॥ दा. १५. ९. १८-२९. ४. रामदासांची रामभक्ति. आमुचे कुळी रघुनाथ । रघुनाथें आमुचा परमार्थ । जो समर्थाचाहि समर्थ। देवां सोडविता ॥ २१॥ . १ व्यंग. २ प्रकाशित जाला. ३ विश्वाचे पाळण करणारी. ५ व्यापिलें। ________________

A प्रासंगिक त्याचे आम्ही सेवकजन। सेवेकरितां जालें ज्ञान। . तथे अभावं धरितां पतन। पाविजेल की॥२२॥ गुरु सांगती सारासार । त्यास कैसें म्हणावे असार । तुज काय सांगणे विचार । शाहाणे जाणती ॥ २३॥ ... समर्थाचे मनींचें तुटे। तेंचि जाणावें अदृष्ट खोटें। राज्यपदापासून करंटें । वेलें जैसें ॥ २४ ॥ मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी। विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५ ॥ वस्तुभजन करीना । ना न करी ऐसेंही म्हणेना। तरी हे जाणावी कल्पना । दडोन राहिली ॥ २६ ॥ ना ते ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान। येथे नाही किं अनुमान । प्रत्यय तुझा ॥ २७॥ तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनी लागावें। तणांचे ज्ञान बोलावें। चळेना ऐसें ॥२८॥ करी दुर्जनाचा संहार । भक्तजनासी आधार । ऐसा हा तो चमत्कार । रोकडा चाले ॥ २९॥ मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेचि नासोन जातें। कृपा केलियां रघुनाथें । प्रचित येते ॥३०॥ रघुनाथभजने ज्ञान झालें । रघुनाथभजने महत्त्व वाढले । म्हणौनियां तुवां केलें। पाहिजे आधीं ॥ ३१॥ हे तो आहे सप्रचित । आणि तुज वाटेना प्रचित। साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥३२॥ - . . . १ अविश्वास. २ च्युत झालें. ३ प्रत्यक्ष, रोखठोक. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [ रघुनाथ स्मरानि कार्य करावें । तें तात्काळचि सिद्धी पावे।। कर्ता राम हे असावें । अभ्यांतरीं ॥३३॥ कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुणनिवेदन । निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४ ॥ मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा। प्रचित पाहासी तरी आतां । सीघ्रचि पाहे ॥ ३५ ॥ मी कर्ता ऐसें म्हणसी। तेणें तूं कष्टी होसी । राम कर्ता म्हणतां पावसी । येश कीर्ती प्रताप ॥ ३६॥ दा. ६. ७. २१-३६. २. तात्त्विक. - ५. ज्ञानाचें व्यतिरेकात्मक वर्णन. भूत भविष्य वर्तमान । ठाउके आहे परिच्छिन्ने । यासीहि म्हणिजे तें ज्ञान । परी ते ज्ञान नव्हे ॥ ३॥ बहुत केलें विद्यापठण । संगीत शास्त्र रागज्ञान । वैदिक शास्त्र वेदाधेनं । हेही ज्ञान नव्हे ॥ ४ ॥ नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा। नाना नरांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥६॥ नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा। नाना श्वापदांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ७॥ . १ संपूर्ण. २ अधेन = अध्ययन, ________________

- - ६५] . - तात्त्विक. नाना पशुंची परीक्षा । नाना पक्षांची परीक्षा। नाना भूतांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ८॥ नाना यानांची परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा। नाना शस्त्रांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ९॥ नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा। नाना रत्नांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥१०॥ नाना पाषाण परीक्षा । नाना काष्ठांची परीक्षा। नाना वाद्यांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ ११॥ नाना पुष्पांची परीक्षा। नाना फळांची परीक्षा। नाना वल्लींची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ १४॥ नाना दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा। नाना चिन्हांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ १५ ॥ नाना मंत्रांची परीक्षा । नाना यंत्रांची परीक्षा । नाना मूर्तीची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥१६॥ नाना क्षेत्रांची परीक्षा । नाना गृहांची परीक्षा । नाना पात्रांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ १७॥ - नाना होणार परीक्षा । नाना समयांची परीक्षा। नाना तीची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥१८॥ नाना शब्दांची परीक्षा । नाना अर्थाची परीक्षा। नाना भाषांची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ २१॥ नाना मतांची परीक्षा । नाना ज्ञानांची परीक्षा। नाना वृत्तींची परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ २३ ॥ नाना रूपांची परीक्षा । नाना रसनेची परीक्षा । नाना सुगंध परीक्षा । हे ज्ञान नव्हे ॥ २४ ॥ ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [५ नेमकचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें ॥ सीघ्रचि कवित्व करणें । हे ज्ञान नव्हे ॥ २६ ॥ नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा। स्वरपालवी संकेतकळा । हे ज्ञान नव्हे ॥ २७॥ काव्यकुशळ संगीतकळा । गीतप्रबंध नृत्यकला। सभाचातुर्य शब्दकळा । हे ज्ञान नव्हे ॥ २८॥ नाना लाघवें चित्रकळा । नाना वायें संगीत कळा। नाना प्रकारे विचित्र कळा । हे ज्ञान नव्हे ॥ ३०॥. आदिकरूनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा। चौदा विद्या सिद्धि कळा । हे ज्ञान नव्हे ॥ ३१ ॥ असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्रपरिपूर्ण । तरी ते कौशल्यता परी ज्ञान । ह्मणोंचि नये ॥ ३२ ॥ .. हे ज्ञान होयसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें । जेथें प्रकृतीचे पिसें । समूळ वावै ॥ ३३ ॥ जाणावें दुसऱ्याचे जीवीचें । हे ज्ञान वाटे साचें। परंतु हे आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४ ॥ माहानुभाव महाभला । मानसपूजा करितां चुकला। कोणी येके पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनि ॥ ३५ ॥ ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासी परमज्ञाता म्हणती। परंतु जेणे मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६॥ बहुत प्रकारीची ज्ञानें। सांगों जातां असाधारणे। सायोज्यप्राप्ती होये जेणें । तें ज्ञान वेगळे ॥ ३७॥ दा. ५. ५. ३-३७. १ वेगळं. २ पेड. ३ व्यर्थ. ________________

। तात्त्विक. ६. ज्ञान म्हणजे काय ? ऐक ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ॥१॥ मुख्य देवास जाणावें । सत्यस्वरूप वोळखावें । नित्यानित्य विचारावें । या नाव ज्ञान ॥२॥ जेथें दृश्यप्रकृति सरे । पंचभातक वोसरे। समूळ द्वैत निवारे । या नाव ज्ञान ॥३॥ मनबुद्धिअगोचर । न चले तर्काचा विचार। उलेख परेहूनि पर। या नाव ज्ञान ॥४॥ जेथें नाहीं दृश्यभान । जेथे जाणीव हे अज्ञान। विमळ शुद्ध स्वरूपज्ञान यासि बोलिजे ॥५॥ सर्वसाक्षी अवस्ता तुर्यो । ज्ञान ऐसें म्हणती तया। परी ते जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥६॥ दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे। शुद्धस्वरूप जाणिजे । या नाव स्वरूपज्ञान ॥७॥ जेथें सर्वचि नाही ठाईचें । तेथे सर्वसाक्षित्व कैंचें। म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८॥ ज्ञान म्हणजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणौनि शुद्ध ज्ञान तें संतत । वेगळेचि असें ॥९॥ ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण । या नाव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ माहावाक्य उपदेश भला। परी त्याचा जप नाहीं बोलिला। तेथींचा तो विचारचि केला पाहिजे साधकें ॥११॥ १ उल्लेख, निर्देश. २ चतुर्थावस्था. ३ सत्य. ४ स्वतंत्र, अगर नेहमी. ________________

4 . . . . । रामदासवचनामृत-दासबोध. [६. माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार। त्याच्या जपें अंधकार । न फिटे भ्रांतीचा ॥१२॥ माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्त्वतां । त्याचा जपं करितां वृथा । सीणचि होये ॥ १३॥ माहावाक्याचे विवरण । हे मुख्य ज्ञानाचे लक्षण। शुद्ध लक्ष्यांशे आपण । वस्तुच आहे ॥१४॥ आपला आपणासि लाभ । हे ज्ञान परम दुल्लभ। जें आदिअंती स्वयंभ । स्वरूपंचि स्वयें ॥ १५॥ जेथून हे सर्वही प्रगटे । आणी सकळही जेथें आटे। तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥१६॥ मते आणि मतांतरें । जेथें होती निर्विकारें। अति सूक्ष्म विचारें। पाहातां ऐक्य ॥१७॥ जें या चराचराचें मूळ । शुद्धं स्वरूप निर्मळ । या नाव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८ ॥ शोधितां आपले मूळस्थान । सहजचि उडे अज्ञान । या नाव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९ ॥ आपणासि वोळखों जातां । आंगीं बाणे सर्वज्ञता। तेणे एकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २०॥ मी कोण ऐसा हेत । धरून पाहातां देहातीत । अवलोकिता नेमस्त । स्वरूपचि होये ॥ २१ ॥ असो पूर्वी थोर थोर । जेणे ज्ञाने पैलपार । · पावले ते साचार । ऐक आतां ॥ २२ ॥ .. । १ दुर्लभ. ________________

६६] तात्त्विक. व्यास वसिष्ठ महामुनी । शुकनारद समाधानी। जनकादिक महाज्ञानी । येणेंचि ज्ञानं ॥ २३ ॥ वामदेवादिक यागेश्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्वर। .. शौनिकादि अध्यात्मसार । वेदांतमते ॥ २४॥ सनकादिक मुख्य करूनी। आदिनाथ मीन गोरक्षमुनी। आणीक बोलतां वचनीं । अगाध असती ॥ २५॥ सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव । जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥२६॥ जें वेदशास्त्रांचे सार । सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७ ॥ साधुसंत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचे गुह्यज्ञान । तें सांगिजेल आतां ॥ २८ ॥ तीर्थे व्रतें तपेंदाने । जें न जोडें धूम्रपानें। पंचाग्नी गोरांजने । जे प्राप्त नव्हे ॥ २९॥ सकळ साधनांचे फळ । ज्ञानाची सिगंची केवळ । जेणें संशयाचे मूळ । निशेष तुटे ॥ ३०॥ छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत । या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१ ॥ जे नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी । तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥ पाहिलें नस्तां संस्कृतीं। रीग नाहीं महाष्ट ग्रंथीं। हृदई वसल्या कृपामूर्ती । सद्गुरु स्वामी ॥ ३३ ॥ १ कित्येक. २ आत्मसाक्षात्कार. ३ एक प्रकारचे अग्निसाधन. ४ शेवट. ५ प्रवेश ________________

PHD रामदासवचनामृत-दासबोध. आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदई वसे ॥ ३४ ॥ न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवण सायास। प्रेत्नेविण सौरसं । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥ ग्रंथ मात्र महाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या संस्कृतामधे पष्टं। थोर तो वेदांत ॥ ३६॥ त्या वेदांतापरतें कांहीं। सर्वथा श्रेष्ठ नाहीं। जेथें वेदगर्भ सर्वही । प्रगट जाला ॥ ३७ ॥ असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचाही मथितार्थ । अतिगहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८ ॥ अरे गहनाचेहि गहन । तें 1 जाण सद्गुरुवचन । सद्गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९ ॥ सद्गुरुवचन तोचि वेदांत । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४० ॥ जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन । जेणें माझें समाधान । अत्यंत जालें ॥४१॥ तें हे माझें जिवीचे गुज । मी सांगेन म्हणतो तुज। जरी अवधान देसी मज । तरी आतां येच क्षणीं ॥४? शिष्य म्लान वदनें बोले । धरिले सदृढ पाउले। मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥ अहं ब्रह्मास्मि माहावाक्य । येथीचा अर्थ अतयं । तोही सांगतो ऐक्य । गुरुशिष्य.जेथें ॥ ४४ ॥ १ सुलभ. २ सष्ट, ________________

६] . तात्त्विक.. ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसी ब्रह्म। येविषई संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५ ॥ नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन। ते समग्रप्रकारें कथन । कीजेल आतां ॥४६॥ निर्माण पंचभूतें यीयें। कल्पांतीं नासती येथान्वयें। प्रकृति पुरुष जियें । तेही ब्रह्म होती ॥४॥ दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता। मुळीच आहे ॥४८॥ सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळीच ऐक्यता। पिंडब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठे ॥ ४९ ॥ ज्ञानवन्ही प्रगटे । तेणें दृश्य केरें आटे। तदाकारें मूळ तुटे। भिन्नत्वाचें ॥ ५० ॥ मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तो दृश्य असतांच ओसरे। . सहजचि येणेप्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥ असो गुरूचे ठाई अनन्यता । तरी तुजसी कायेसी रेचिंता। वेगळेपणे अभक्ता। उरोंचि नको ॥५२॥ आतां हेचि दृढीकर्ण । व्हावया करी सद्गुरुभजन । सद्गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३॥ या नाव शिष्या आत्मज्ञान । येणे पाविजे समाधान । भवभयाचे बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४॥ देह मी वाटे ज्या नरा। तो जाणावा आत्महत्यारा। देहाभिमाने येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५ ॥ असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६ ॥ १ इये, हीं. २ कस्पटासमान, तुच्छ. ३ गघाळा. ४ बाहेर. ________________

___रामदासवचनामृत-दासबोध. [ ६ कोणासीच नाही बंधन । भ्रांतिस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७ ॥ शिष्या येकांतीं बैसावें । स्वरूपी विश्रांतीस जावें। तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥५८॥ अखंड घडे श्रवण मनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण जालिया ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥ शिष्या मुक्तपणे अनर्गळं । करिसी इंद्रिये बाष्कळ । तेणे तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥६॥ विषई वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें। मणी टाकितांची लाधलें। राज्य जेवीं॥६१॥ मणी होतां सीगटाचा । लोभ धरूनियां तयाचा। मूर्खपणे राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२ ॥ ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया पुरुषास में ध्यान । तयास तेंचि प्राप्त ॥ ६३॥ म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविधा। तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४ ॥ . दा. ५. ६. १-६४. ७. आत्मज्ञानाच्या योगाने सर्व पातकांचा व दुःखांचा नाश होतो. पापाचे वळलें शरीर । पापाच घडे तदनंतर। अंतरीं रोग वरिवरी उपचार । काय करी ॥ ५९॥ नाना क्षेत्री हे मुंडिलें । नाना तीर्थों में दंडिलें। नाना निग्रहीं खंडिलें । ठाई ठाई ॥ ६०॥ १ अनिर्बद्ध. २ शिंगाचा. ३ घडलें. . ________________

तात्त्विक. नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा ततमुद्रेनें लांसिलें । जरी हे वरिवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१॥ सेणाचे गोळे गिळिले । गोमुत्राचे मोधे घेतले । माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी ॥ ६२ ॥ वेश वरीवरी केला । परी अंतरी दोष भरला ॥ त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्थाटणें । सर्वांहून कोटिगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥ आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यासी नाही मर्यादा । दुष्ट पातकाची बाधा । निरसोन गेली ॥६५॥ वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियाचें रूप । पुण्य जालें अमूप । सुकृतें सीमा सांडिली ॥६६॥ या प्रचितीच्या गोष्टी । प्रचित पहावी आत्मदृष्टी। प्रचिती वेगळे कष्टी । होऊच नये ॥ ६७॥ आगा ये प्रचितीचे लोक हो।प्रचित नस्तां अवघा शोक हो। रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्चयाचा ॥ ६८॥ ___ दा. १०. १०. ५९-६८. ८. मूर्ति म्हणजे देव नव्हे. पाषाणाचा देव केला। एके दिवशीं भंगोन गेला । तेणें भक्त दुःखवला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३ ॥ देव हारपला घरीं। येक देव नेला चोरी। येक देव दुराचारी। फोडिला बळें ॥३४॥ १ भाजलें, हागले. २ अमर्याद. ________________

१६ - रामदासवचनामृत-दासबोध. येक देव जापाणिला । येक देव उदकीं टाकिला। येक देव नेऊन घातला । पायातळीं ॥ ३५ ॥ . काय सांगों तीर्थमहिमा । मोडूनि गेला दुरात्मा। थोर सत्व होतें तें मौ । काय जाले कळेना ॥ ३६॥ देव घडिला सोनारी । देव वोतिला वोतारी । येक देव घडिला पाथरी । पाषाणाचा ॥ ३७ ॥ नर्बदागंडिकातीरी । देव पडिले लक्षवरी। त्यांची संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥ चक्रतीर्थी चक्रांकित । देव असती असंख्यात । नाहीं मनीं निश्चितार्थ । येक देव ॥ ३९ ॥ बाण तांदळे तांबनाणे । स्फटिक देव्हारा पूजणें।। ऐसे देव कोण जाणे । खरे किं खोटे ॥ ४०॥ देव रेसिमाचा केला । तोही तुटोनियां गेला। आतां नवा नेम धरिला । मृत्तिकेचा ॥४१॥ आमचा देव बहु सत्य । आम्हां आकांती पावत । पूर्ण करी मनोरथ । सपकाळ ॥ ४२ ॥ आतां याचे सत्व गेलें । प्राप्त होतें तें जालें। प्राप्त न वचे पालटिले । ईश्वराचेनि ॥४३॥ धातु पाषाण मृत्तिका। चित्रलेप काष्ठ देखा। तथे देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥४४॥ हे आपुली कल्पना । प्राप्ताऐसी फळे जाणा। परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याची ॥ ४५ ॥ .दा. ६.६.३३-४५. १ भ्रष्टविला. २ मग. ________________

.. तात्त्विक... ९. नाना देव आणि एक देव. लोक कोण्या पंथें जाती। आणि कोण्या देवास भजती। ऐसी हे रोकडी प्रचीती । सावध ऐका ॥२८॥ मृत्तिका धातु पाषाणादिक । ऐसीया प्रतिमा अनेक। बहुतेक लोकांचा दंडक । प्रतिमादेवीं ॥ २९ ॥ नाना देवांचे अवतार । चरित्रे ऐकती येक नर। जपध्यान निरंतर । करिती पूजा ॥३०॥ येक सकळांचा अंतरात्मा । विश्वीं वर्ते जो विश्वात्मा। द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा। मानिती येक ॥ ३१ ॥ येक ते निर्मळ निश्चळ । कदापी नव्हेती चंचळ। अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥ येक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा। तिसरा तो अंतरात्मा। चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥ ऐसे हे चत्वार देव । स्सृष्टीमधील स्वभाव। या वेगळा अंतर्भाव । कोचि नाहीं॥ ३४ ॥ अवघे येकचि मानिती। ते साक्ष देव जाणती। परंतु अष्टधा प्रकृति । वोळखिली पाहिजे ॥ ३५ ॥ प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव। भावातीत माहानभाव । विवेके जाणावा ॥३६॥ जो निर्मळास ध्याईल। तो निर्मळचि होईल। जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७॥ क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजेती। सारासार जाणती । ते माहानभाव ॥ ३८॥ १ प्रचार. . ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [r. ___ अरे जो चंचळासि ध्याईल। तो सहजचि चळेल। जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥ . दा. ११. २. २८-३९. १०. खग देव म्हणजे मूर्ति नव्हे. मृत्तिकापूजन करावें । आणि सर्वेचिं विसर्जावें। हैं मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥१॥ देव पूजावा आणी टाकावा । हे प्रशस्त न वैटे जीवा। याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥२॥ देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं। म्हणोनि याचा कांहीं। विचार पाहावा ॥३॥ देव नाना शरीरें धरितो। धरुनी मागुती सोडितो। तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥७॥ विचार पाहातां तगेना । त्यांस देव ऐसें म्हणवेना। परंतु जन राहेना । काये करावें ॥८॥ थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहाती। तैसीच आहे हेही गती। उपासनेची ॥९॥ थोर व्यापार ठाकना जनीं । म्हणोनि केली रखतवानी। राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥१०॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव। अज्ञाने तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११॥ १ लगेच. २ वाटे. ३ सर्व. ४ प्रतिमा, ५ मिळेना. ६ शाईचा व्यापार. ________________

११] तात्त्विक... . माया उल्लंघाया कारणे । देवासी नाना उपाय करणें । अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणे । प्रत्ययाने ॥१४॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खन्यासी तगेनात बालंटें। मन अधोमुख उफराटें । केले पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती ॥१८॥ पिंड पडतां अवघेचि जातें । परंतु परब्रह्म राहातें। शाश्वत समजोन मग तें। दृढ धरावें ॥३०॥ दा. २०. ९. १-३०. ११. देवांचा जो देव तो गुरूच्या योगाने कळते. - मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव। काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपें ॥१॥ रुविच्या लाकडाचे देव पोवळ्यांचे देव । बाण तांदळे नर्मदे देवा शालिग्राम काश्मिरी देव । सूर्यकांत सोमकांत ॥२॥ तांबनाणी हेमनाणीं। कोणी पूजिती देवार्चनीं। चक्रांकित चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती॥३॥ मुळी द्रष्टा देव तो येक । त्याचे जाहाले अनेक । समजोन पाहातां विवेक । उमजों लागें ॥६॥ लोकांची पाहातां रीती। लोक देवार्चनें करिती। अथवा क्षेत्रदेव पाहाती। ठाई ठाई ॥ १८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोन धरिती निर्धार । परी ते अवघे सविस्तर । होऊन गेले ॥१९॥ १ आरोप. २ भिंतीवरची चित्रं. ३ क्षेत्रांतील देव. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. येक ब्रह्मविष्णुमहेश । ऐकोन ह्मणती हे विशेष। गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २०॥ देवासि नाहीं थानमान । कोठे करावे भजन । हा विचार पाहातां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥ भूमंडळी देव नाना । त्यांची भीड उलंघेना। मुख्य देव तो कळेना । काही केल्या ॥ २३ ॥ हे ज्ञानदृष्टीने पाहावें । पाहोन तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥२८॥ ऐसी सूक्ष्म स्थितिगती । कळतां चुके अधोगती। सद्गुरुचेनि सद्गती । तात्काळ होते ॥ ३० ॥ दा. १९. ५. १-३०. १२. अंतरात्मा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. ब्रह्म निराकार निश्चळ । आत्म्यास विकार चंचळ । तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥१॥ देवाचा ठावचि लागेना । येक देव नेमस्त कळेना । बहुत देवीं अनुमानेना। येक देव ॥२॥ म्हणोनि विचार असावा । विचारे देव शोधावा । बहुत देवांचा गोवा । पडोंचि नये ॥३॥ देव क्षेत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला। पृथ्वीमधे दंडक चालिला । येणे रीती॥४॥ नाना प्रतिमादेवांचे मूळ । तो हा क्षत्रदेवचि केवळ । नाना क्षत्रे भूमंडळ । शोधून पाहावें ॥५॥ १ स्थान अथवा प्रमाण. २ गुंता. ________________

१३] तात्त्विक.. क्षत्रदेवं पाषाणाचा। विचार पाहातां तयाचा । तंत लागला मुळाचा । अवताराकडे ॥६॥ अवतारी देव संपले । देहे धरून वर्ती लागले। त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७॥ त्यां तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहातां । कर्ता भोक्ता तत्त्वतां । प्रत्यक्ष आहे ॥ ८ ॥ युगानयुगे तिन्ही लोक । येकचि चालवी अनेक । हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥९॥ आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर। जाणीवरूपे कळिवर । विवेकें वर्तवी ॥१०॥ तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती। प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥११॥ मग विचारिती अंतःकरणीं । जेथें तेथें धोंडा पाणी । उगेंचि वणवण हिंडोनि । कायें होतें ॥१२॥ . ऐसा ज्यासी विचार कळला । तेणे सत्संग धरिला । सत्संगें देव सांपडला । बहुत जनासी ॥१३॥ . दा. १८. ८. १-१३. १३. आत्मा हा सर्व देवांहून श्रेष्ठ आहे. सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ । भूमंडळी भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६॥ नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरूपें जाला। भोक्ता सकळ वैभवाला । तोचि येक ॥१७॥ १ क्षेत्रांतील देव. २ तंतु. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [१३ याचा पाहातां विचार । उदंड लांबला जोजार। . होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥ कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती । सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच घडे ॥ १९॥ कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो। भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २०॥ प्राणी साभिमानें भुलले । देहाकडे पाहात गेले। मुख्य अंतरात्म्यास चुकले । अंतरी असोनि ॥ २१ ॥ आरेया आत्मयांची चळवळ पाहे। ऐसा भूमंडळी कोण आहे। अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहीं येक ॥ २२ ॥ त्या अनुसंधानासरिसें । जळोनि जाइजे किल्मिषं। अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसें । विवरोन पाहाती ॥ २३ ॥ अंतरानेष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले। बाह्यात्कारें भरंगळेले । लोकाचारें ॥ २४ ॥ दा. १८. १. १६-२४. . १४ देवता व भुते यांचे अस्तित्व. कित्येक प्राणी निःशेष मरती। पुन्हां मागुतें जीव येती। ढकलून दिल्हें तेणें दुःखवती । हस्तपादादिक ॥ ६॥ सर्पदृष्टि जालियावरि । ती दिवसा उठवी धन्वंतरी। तेव्हां ते माघारी । वासना येते की॥ ७॥ कित्येक सर्वे होऊन पडती। कित्येक तयास उठविती येमलोकीहून आणविती । माधारे प्राणी ॥ ८॥ १ विस्तार. २ भरकटले, फसले. ३ शवें. ________________

१५] ... तात्त्विक. कित्येक पूर्वी श्रापिले। ते शापें देह पावले । उश्रापकाळी पुन्हां आले । पूर्वदेहीं ॥९॥ कित्येकी बहुजन्म घेतले । कित्येक परकाया प्रवेशले। ऐसे आले आणि गेले। बहुत लोक ॥ १०॥ . दा. ९. ८.६-१०. वायोरूपें देवतें भुर्ते । अंगीं भरती अकस्मातें। वीध केलियां प्रेतें। सावध होती ॥ २०॥ राहाणे ब्राह्मण समंध जाती। राहाणे ठेवणीं सांपडतीं। नाना गुंतले उगवती । प्रत्यक्ष राहाणे ॥ २१॥ दा. ९. ८. २०-२१. वायोकरितां रागोद्धार । कळे वोळखीचा निर्धार। दीप लागे मेघ पडे हा चमत्कार । रागोद्धारीं ॥ ३१॥ .. दा. ९. ८. ३१. १५. देवता वायुरूपाने राहातात. देव देवता देवतें भुतें । पृथ्वीमधे असंख्यातें। परंतु या समस्तातें । वायोस्वरूप बोलिजे॥९॥ वायोस्वरूप सदा असणे । प्रसंगें नाना देह धरणें । गुप्त प्रगट होणे जाणे । समस्तांसी ॥१०॥ दा. १०. ३. ९-१० आतां रोकडी प्रचीती। मनुष्ये गुप्त प्रगटती । मौ त्या देवांच्याच मूर्ति । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥ १ विधि. २ गुते. ३ मग. ________________

२४ रामदासवचनामृत-दासबोध.. देव देवता भुतें देवतें । चढतें सामर्थ्य आहे तेथें । येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥ झोटिंग वायोस्वरूप असती । सवेंच खुळखुळां चालती। खोबरी खारिका टाकून देती। अकस्मात ॥ २५ ॥ अवघेचि न्याल अभावें । तरी हे बहुतेकांस ठावें। आपुल्याला अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥ मनुष्य धरिती शरीरवेष । नाना परकायाप्रवेश । मा तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥२७॥ म्हणोनि वायोस्वरूप देह धरिले । ब्रह्मा विष्णु महेश जाले। पुढे तेचि विस्तारले । पुत्रपौत्रीं ॥२८॥ दा. १०, ४. २३-२८ १६. भुते संतांस बाधा करू शकत नाहीत. तैसें देव देवता देवतें भुतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें। आपलाल्या सामर्थ्य ते । सृष्टीमधे फिरती ॥ २०॥ सदा विचरती वायोस्वरूपें । स्वइच्छा पालटिती रूपें । अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पें । त्यास बाधिती ॥२१॥ ज्ञात्यास संकल्पचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना। या कारणे आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥ दा. १०. ९. २०-२२. १७. देवांचे जाणीवरूपाने अस्तित्व. जाणीव म्हणिजे अंतःकर्ण । अंतःकर्ण विष्णूचा अंश जाण । विष्णु करितो पाळण । येणे प्रकारें ॥२६॥ १ मग. ________________

१८] तात्त्विक. नेणता प्राणी संव्हारितो। नेणीव तमोगुण बोलिजे तो। तमोगुणे रुद्र संव्हारितो। येणेप्रकारें ॥ २७॥ कांही जाणीव कांहीं नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव । जाणतां नेणतां जीव । जन्मास येती ॥ २८॥ जाणीवेनें होतें सुख । नेणीवेनें होतें दुःख । सुखदुःख आवश्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९॥ जाणण्यानेणण्याची बुद्धी । तोचि देहीं जाणावा विधी। स्थूळ देहीं ब्रह्मा त्रिशुद्धि । उत्पत्तिकर्ता ॥ ३०॥ ऐसा उत्पत्ति स्थिति संहार । प्रसंगें बोलिला विचार । परंतु याचा निर्धार । प्रत्ये पाहावा ॥३१॥ दा. १०. १. २६-३१. स्वामीने विचार दाखविला । येथे विष्णूचा अभाव दिसोन आला ब्रह्मा विष्णु महेशाला। उरी नाहीं ॥१॥ उत्पत्ति स्थिति संव्हार । ब्रह्मा विष्णु महेश्वर । याचा पाहातां विचार । प्रत्ययो नाहीं ॥ २॥ दा. १०. २. १-२. १८. ब्रह्मा, विष्णु, महेश यांचें केवळ प्रवृत्तिरूपाने आस्तित्व. ब्रह्मा जन्मास घालितो। विष्णु प्रतिपाळ कारतो। रुद्र अवघे संव्हारितो। ऐसें बोलती॥ १०॥ तरी हे प्रवृत्तीचे बोलणे । प्रत्ययास आणी उणें। प्रत्यय पाहातां श्लाघ्यवाणे । होणार नाहीं ॥११॥ .. १ प्रत्ययाने, प्रचीतीने २ टाव, ठिकाण. ________________

. रामदासवचनामृत दासबोध. [१८.. ब्रह्मचास कोणें जन्मास घातले । विष्णूस कोणे प्रतिपाळिलें। रुद्रास कवणे संहारिलें । महाप्रळयीं ॥ १२ ॥ ___दा. ९. ७. १०-१२. १९. अनृताचे प्रावल्य. मिथ्य तेंचि जालें सत्य । सत्य तेंचि जालें असत्य । मायाविभ्रमाचे कृत्य । ऐसें असे पाहातां ॥१॥ सत्य कळावया कारणे । बोलिली नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥ असत्य अंतरीं बिंबलें। न सांगतां तें दृढ जालें। सत्य असोन हारपलें । जेथील तेथें ॥ ३ ॥ वेदशास्त्रे पुराणे सांगती । सत्याचा निश्चय करिती। तरी नये आत्मप्रचिती । सत्यस्वरूप ॥ ४॥ सत्य असोन आच्छादलें । मिथ्या नसोन सत्य जालें। ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥५॥ दा. ७. १०. १-५, २०. ब्रह्मांडापलीकडील गोष्टी. या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी। 6 जाली नव्हती सृष्टि । मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥४७॥ सप्तकुंचक प्रचंड । जाले नव्हतें ब्रह्मांड। मायें अविद्येचे बंड । ऐलिकडे ॥ ४८॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलिकडिल विचार। पृथ्वी मेरु सप्तसागर । पलिकडे ॥४९॥ १ सात आवरणांचें. FAE. . ________________

१२१) तात्त्विका नाना लोक नाना स्थानें । चंद्र सूर्य तारांगणें । . सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥५॥ शेष फर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गे अष्टदिक्पाळ । तेतिस कोटी देव सकळ । ऐलिकडे ॥५१॥ बारा आदित्य अकरा रुद्र । नवनाग सप्त ऋषेश्वर । नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥५२॥ मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पत्ति। ... आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥ ५३॥ सकळ विस्ताराचे मूळ । तें मूळमायाच केवळ। मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४॥ सूक्ष्म भूतें जे बोलिली । तेचि पुढे जडत्वा आलीं। ते सकळही बोलिलीं। पुढिले समासीं ॥ ५५ ॥ पंचभूते पृथकाकारें । पुढें निरोपिली विस्तारें। वोळखीकारणे अत्यादरें। श्रोतीं श्रवण करावीं ॥५६॥ पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणे कळे हा प्रांजळ । दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७॥ महाद्वार बोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें। तैसें दृश्य हे सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥ दा. ८. ४.४७-६८. २१. सृष्टिकर्त्यास ओळखणे हीच उपासना. ईश्वरें केवढे सूत्र केलें । सूर्यबिंब धांवाया लाविलें। धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥२३॥ ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [३. पर्वताऐसे ढग उचलती। सूर्यबिंबासी आच्छादिती। तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४॥ झिडकझिडकु धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारों। ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥ बैसती विजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धांके। गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥ येहलोकांसी एक वर्म केलें । महदूभूतें महदूभूत आळिलें। सकळां समभागें चालिलें। सृष्टिरचनेसी ॥ २७॥ ऐसे अनंत भेद आत्मयाचे। सकळ जाणती ऐसें कैंचे। विवरतां विवरतां मनाचे। फडके होती ॥२८॥ ऐसी माझी उपासना । उपासकी आणावी मना। अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥ ___दा. २०. ८. २३-२९. २२. देव कोणास म्हणावें ? बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी। येक देव कोणेपरी । ठाई पडेना ॥८॥ बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना। तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करूनी ॥९॥ बहु देव बहु भक्त । इच्छया झाले आसक्त । बहु ऋषि बहु मत । वेगळालें ॥१०॥ बहु निवडतां निवडेना। एक निश्चय घडेना। शास्त्रे भांडती पडेना । निश्चय ठाई ॥११॥ १ सोसाट्याने. २ शिपाई. ३ भितो. ४ तुकडे. ________________

. २२] - - तात्त्विक. TA बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध। ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥१२॥ सहस्रामधे कोणी येक । पाहे देवाचा विवेक। परी त्या देवाचे कौतुक । ठाई न पडे ॥१३॥ ठाई न पडे कैसें म्हणतां । तेथे लागली अहंता। देव राहिला परता। अहंतागुणें ॥१४॥ आतां असो हे बोलणें । नाना योग ज्या कारणे। तो देव कोण्या गुणें । ठाई पडे ॥१५॥ देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें । तेंचि बोलणे स्वभावें । बोलिजेल ॥१६॥ जेणे केलें चराचर । केले सृष्टयादि व्यापार। सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥१७॥ तेणे केल्या मेघमाळा । चंद्रबिंबी अमृतकला। तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥१८॥ जयाची मर्यादा सागरा । जेणें स्थापिले फणिवरा। जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥१९॥ च्यारी खाणी च्यारी वाणी। चोयांशी लक्ष जीवयोनी। जेणें निर्मिले लोक तिनी । तया नांव देव ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । हे जयाचे अवतार। तोचि हा देव निर्धार । निश्चयेसीं ॥ २१॥ देव्हारांचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव । तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥२२॥ १ ब्रह्मांडव्यूह. ________________

- - - T रामदासवचनामृत-दासबोध. ठाई ठाई देव असती । तेहिं केली नाही क्षिती। चंद्रसूर्य तारा जीमूती' । तयांचेनि नव्हे ॥ २३॥ सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव। ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥२४॥ येथें आशंका उठिली । ते पुढिलिये समासी फिटली । आतां वृत्ति सावध केली पाहिजे श्रोतीं ॥२५॥ पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं में भकास। तये निर्मळी वायोस। जन्म झाला ॥ २६॥ वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी। ऐसी जयाची करणी। अघटित घडली ॥२७॥ उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली। ऐसी विचित्र कळा केली । त्या नांव देव ॥२८॥ देवें निर्मिली हे क्षिती। तिचे पोटीं पाषाण होती। तयासचि देव म्हणती। विवेकहीन ॥२९॥ जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टिपूर्वी होता। मग हे तयाची सत्ता । निर्माण झाली ॥ ३०॥ कुल्लाळ पात्रापूर्वी आहे। पात्रे कांहीं कुल्लाळ नव्हे । तैसा देव पूर्वीच आहे। पाषाण नव्हे सर्वथा ॥३१॥ मृत्तिकेचे शैन्य केलें। कर्ते वेगळे राहिले। कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥३२॥ तथापी होईल पंचभूतिक । निर्गुण नव्हे काहीं येक। कार्याकारणाचा विवेक । भुतांपरता नाहीं ॥३३॥ - १ ढग, २ शून्य. ३ कुंभार. ________________

- - 5२२] तात्त्विक. अवधी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टिहूनि पर्ता। तेथे संशयाची वार्ता । कार्टूचि नये ॥ ३४ ॥ खांबसूत्रींची बाहुली । जेणे पुरुषे नाचविली। ताचि बाहुली हे बोली। घडे केवीं ॥ ३५ ॥ छायामंडपींची सेना । सृष्टिसारिखीच रचना। सूत्रे चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६॥ तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव। जेणे केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७॥ जें जें जया करणे पडे । तें तें तो हैं कैसें घडे। म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥ सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें । परी तो गोपुरकर्ता नव्हे । निश्चयेंसि ॥ ३९ ॥ तैसें जग निर्मिले जेणें । तो वेगळा पूर्णपणे॥ एक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥४०॥ एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा । तो सर्वांमध्ये परी निराळा । असोन सर्वी ॥४१॥ म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासि अलिप्त आत्मारामु । अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥४२॥ मायोपाधी जगडंबर । आहे सर्वही साचार।। ऐसा हा विपरीत विचार। कोठेंचि नाहीं॥४३॥ म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वोपर जो परमात्मा। अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥ तयास म्हणावें देव । येर हे अवघेचि वाव । ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतींचा ॥४५॥ ________________

C रामदासवचनामृत दासबोध, [६ २२ पदार्थ वस्तु नासिवंत । हें तो अनुभवास येत । याकारणे भगवंत । पदार्थावेगळा ॥४६॥ देव विमळ आणी चंचळ । शास्त्रे बोलतीं सकळ । तया निश्चळास सकळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ।। देव आला देव गेला । देव उपजला देव मेला। ऐसें बोलतां दुरिताला । काये उणें ॥४८॥ जन्ममरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा। देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्य कैसेनि ॥४९॥ उपजणे आणी मरणें । येणे जाणे दुःख भोगणें । हे त्या देवाचे करणे। तो कारण वेगळा ॥५०॥ .. दा. ८. १. ८-५. २३. देह, अत्मा आणि ब्रह्म यांचा संबंध, जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयांचा। निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैंचा। जेथे तेथें ॥ १२ ॥ निश्चळ चंचळ आणि जड । पिंडी करावा निवाड! प्रत्ययावेगळे जाड । बोलणें नाहीं॥१३॥ पिंडामधून आत्मा जातो। तेव्हां निवाडा कळी येतो। देहे जड हा पडतो। देखतदेखतां ॥१४॥ जड तितुकें पडिलें । चंचळ तितुकें निधोनि गेलें। जड चंचळाचे रूप आलें । प्रत्ययासी॥ १५ ॥ निश्चळ आहे सकळां ठाई । हें तो पाहाणे नलगे कांहीं। गुणविकार तेथें नाहीं। निश्चळासी॥१६॥. जैसे पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड। जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥ . - . ________________

२४] तात्त्विक. महाभूतांचा खंबार केला। आत्मा घालून पुतळा जाला। चालिला सृष्टचिा गल्बला । येणे रीती ॥१८॥ आत्मा माया विकार करी। आळ घालिती ब्रह्मावरी। प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥ ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड। शोधून पाहातां जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥ गगनासी खंडितां नये । गगनाचे नासेल काय। जरी जाला माहांपळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥ जें सहारामधे सांपडलें । तें सहजाच नासिवंत जालें। जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥ न कळतां वाटे कोडें । कळतां अवघे दिसे उघडे । म्हणानि येकांती निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥ मिळतां प्रत्ययाचे संत । येकांतापरिस येकांत।. केली पाहिजे सावचित्त । नाना चर्चा ॥ २४॥ .... दा. २०. ७. १२-२४. २४. चारही आत्मे मिळून एकच होत. पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारी। हे जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥ येक जीवात्मा दुसरा शिवात्मा।तिसरा परमात्मा जोविश्वात्मा। चौथा जाणिज निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥ भेद उंच नीच भासती । परी च्यारी येकचि असती। येविषीं दृष्टांत संमती। सावध ऐका ॥ ४६॥ १ सांगाडा. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [२r घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश। अवघे मिळोनी आकाश । येकचि असे ॥४७॥ तैसा जीवात्मा आणी शिवात्मा। परमात्माआणी निर्मळात्मा। अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥४८॥. घटीं व्यापक जें आकाश । तया नांव घटाकाश । पिंडी व्यापक ब्रह्मांश। त्यास जीवात्मा बोलिजे॥४९॥ मठीं व्यापक जे आकाश । तया नाव मठाकाश । ..... तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥५०॥ मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश । ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥५१॥ उपाधीवेगळे आकाश । तया नांव चिदाकाश। तैसा निर्मळात्मा परेश । तो उपाधीवेगळा ॥५२॥ उपाधीयोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न । तैसा आत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३॥ ..... दा. ८. ७. ४ ४-५३. । २५. ब्रह्माचे स्वरूप. सर्व उपाधीचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट । निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळा ठाई ॥११॥ उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला। मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥१२॥ देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण । निर्गुणज्ञाने विज्ञान । होत असे ॥१३॥ कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ । मिथ्यत्वे दृश्य सकळ । होत जातें ॥१४॥ ________________

२५] तात्त्विक.. जे होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें। जेथे होणे जाणें नाहीं तें । विवेके ओळखावें ॥१५॥ एक ज्ञान एक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान । हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥१६॥.... वेदांत सिद्धांत धादांत । याची पहावी प्रचित। निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७॥.......... तें ज्ञानदृष्टीने पाहावें । पाहोन अनन्य राहावें। मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥१८॥ दृश्यास दिसतें दृश्य । मनास भासतो भास। दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥१९॥ . पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहे अंतरीं। अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥ चंचळ ते स्थिरावेना । निश्चळ ते कदापि चळेना। आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥२१॥ । जे विकारे वाढे मोडे। तेथें शाश्वतता कैची घडे। . कल्पांत होतांच विघडे । सकळ कांहीं ॥२२॥ जें अंतरींच भ्रमलें। मायासंभ्रमें संभ्रमलें। तयास हे कैसें उकलें। आव्हांट चक्र ॥२३॥ भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेने सिद्धांत कळेना। भिडेनें देव आकळेना। अंतर्यामीं ॥ २४॥ वैद्याची प्रचित येईना। आणि भीडही उल्लंघेना। तरी मग रोगी वांचेना। ऐसें जाणावें ॥ २५॥.. १ स्वप्रत्यय, २ अफाट. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. जेणें राजा वोळविला । तो राव म्हणेना भलत्याला। जेणे देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६॥ जयास माईकाची भीड । तें काय बोलेल द्वाड। विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥२७॥ भीड माये ऐलीकडे। परब्रह्म तें पैलीकडे । पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥२८॥ दा. १४. ९. ११-२८. ३. साक्षात्कार. २६. देवाचें भजन कां करावें ? कोण समयो येईल कैसा। याचा न कळे किं भर्वसा। जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥३९॥ तैसें वैभव हे सकळ । कोण जाणे कैसी वेळ। पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४० ॥ पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली। देह पडतांच ठेविली। आहे नीच योनी ॥४१॥ श्वानसूकरादिक नीच याती। भोगणें घडे विपत्ती। तेथें कांहीं उत्तम गती। पाविजेत नाहीं ॥४२॥ मागां गर्भवासी आटांटी। भोगितां जालासी रे हिंपुटी। तेथुनियां थोरा कष्टीं। सुटलासि दैवें ॥४३॥ दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचि होती सर्वे। तैसेचि पुढे येकलें जावें । लागेल बापा ॥४४॥ यातना. ________________

33.२६] ... साक्षात्कार.... कैची माता कैचा पिता। कैची बहिण कैचा भ्राता । कैचीं सुहृदें कैची वनिता। पुत्रकळत्रादिक ॥४५॥ हे तूं जाण मावेची। आधवीं सोइरी सुखाची। हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती ॥४६॥ कैचा प्रपंच कैचें कुळ । कासया होतोसी व्याकुळ। धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥४७॥ कैचें घर कैचा संसार । कासया करिसी जोजार। जन्मवरी वाहोन भार । सेखी सांडून जासी ॥४८॥ कैचें तारुण्य कैचें वैभव । कैचे सोहळे हावभाव। हे सकळही जाण माव । माईक माया ॥४९॥ येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी। माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५० ॥ .. तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसी मायबापे किती। स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥५१॥ .. कर्मयोगें सकळ मिळालीं। येके स्थळी जन्मास आलीं। ते तुवां आपुली मानिलीं। कैसी रे पढतमूर्खा ॥५२॥ तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतराचा कोण विचार। आतां येक भगवंत साचार । धरी भावार्थबळें ॥ ५३॥ येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणे। नाना स्तुती आणि स्तवनें । मर्यादा धरावी॥ ५४॥ जो अन्न देतो उदासी। शरीर विकावें लागे त्यासी। मा जेणे घातले जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५ ॥ १ मायेची. २ जाणारे, नश्वर, ३ खटपट, उठाठेव. ४ शेवटी. - ________________

TET -IIIRTEEH . .. ३८ रामदासवचनामृत-दासबोध. अहिनिशी ज्या भगवंता । सकल जीवांची लागली चिंता । मेघ वरुषे जयाची सत्ता। सिंधु मर्यादा धरी ॥५६॥ भूमि धरिली धराधरे । प्रगट होईजे दिनकरें॥ ऐसी सृष्टि सत्तामात्रे । चालवी जो कां ॥५७ ॥ ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव । जो सांभाळी सकळ जीव । कृपाळूपणें ॥५८॥ ऐसा सर्वात्मा श्रीराम। सांडून धरिती विषयकाम । ते प्राणी दुरात्मे अधम । केलें पावती॥ ५९॥ रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश । माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥६०॥ जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा। विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१ ॥... सांडून राम आनंदघन । ज्याचें मनीं विषयचिंतन । त्यासी कैचें समाधान । लोलंगतांसी ॥६२॥ जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनी लागावें। स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥६३ ॥ दा. ३. १०. ३९-६३. २७. या संसारयात्रेमध्ये देवाचा नफा पहावा. येथील येथे अवघेचि राहातें । ऐसें प्रत्ययास येते। कोण काय घेऊन जातें । सांगाना कां ॥२८॥ पदार्थी असावें उदास । विवेक पाहावा सावकास। ... येणेकरितां जगदीश । अलभ्य लाभे॥ २९ ॥ १ शेष. २ लोलुप. . ________________

. . २८] साक्षात्कार.... जगदीशापरता लाभ नाहीं। कार्याकारण सर्वकांहीं। संसार करित असतांही । समाधान ॥ ३०॥ मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक । तैसोच आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१॥ राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला।। तरी सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥ ऐसे हैं पराधेन जिणें । यामधे दुखणे बाहाणे। नाना उद्वेग चिंता करणे । किती म्हणोनि ॥ ३३॥ हाट भरला संसाराचा । नफा पाहावा. देवाचा। तरीच या कष्टाचा । परियोये होतो ॥ ३४॥ .. दा. १२. ८. २८-३४. २८. अध्यात्मप्राप्तीविषयी देहाचा उपयोग. धन्य धन्य हा नरदहो । येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थलाहो। तो तो पावे सिद्धीतें ॥१॥ या नरदेहाचेनि लागधेगें । येक लागले भक्तिसंगें। येकी परम वीतरागें । गिरिकंदरें सीवलीं ॥२॥ येक फिरती तीर्थाटणें । येक करिती पुरश्चरणे। येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥३॥ यक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले। येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्रीं वित्पन्न ॥४॥ येकी हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला। येकी देव ठाई पाडिला । भावार्थबळें ॥५॥ १ बाजार. २ मोबदला. ३ इच्छा. ४ लगबगीनें. ________________

रामदासवचनामृत-दासबोध... [६ २८ येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात ।. येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥६॥ येक तेजीं तेजचि जाले । येक जळी मिळोन गेले। येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥ येक येकाचे बहुधा होती । येक देखतचि निघोन जाती। येक बैसले असतांचि भ्रमती । नाना स्थानी समुद्रीं ॥ ८॥ येक भयानकावरी बैसती। येक अचेतने चालविती। येक प्रेतें उठविती । तपोबळे करूनी ॥९॥ येक तेजें मंद करिती । येक जळे आटविती । येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥१०॥ ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी। ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊन गेले ॥११॥ येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध। ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥१२॥ येक नवावधाभक्तिराजपंथें । गेले तरले परलोकींच्या । निजस्वार्थे । येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥१३॥ येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकी राहिले। येक कैलासीं बैसले । शिवरूप होउनी ॥ १४ ॥ येक इंद्रलोकीं इंद्र झाले । येक पितृलोकी मिळाले। येक ते उडंगणीं बैसले । येक ते क्षीरसागरीं ॥ १५ ॥ १ आक्रमिती. २ प्राप्त झाल्या. ३ नक्षत्रलोक. ________________

। २८ ] साक्षात्कार.. सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता। या चत्वार मुक्ती तत्त्वता । इच्छा सेऊन राहिले ॥ १६ ॥ ऐसे सिद्ध साधु संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।। ऐसा हा नरदेह विख्यात । काय ह्मणौनि वर्णावा ॥ १७ ॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें। मुख्य सारासारविचारें। बहुत सुटले ॥ १८॥ या नरदेहाचेनि समंधे । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सांडून स्वानंदें। सुखी जाले ॥ १९॥ नरदेहीं येऊन सकळ । उद्धरागती पावले केवळ । येथे संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २० ॥ पशुदेहीं नाहीं गती । ऐसें सर्वत्र बोलती। म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१ ॥ संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधु समाधानी। भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२ ॥ तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी। षड्दर्शनी तापसी। नरदेहींच जाले ॥ २३ ॥ म्हणौनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्ये वरिष्ठ । जयाचेनि चुके अरिष्ट । येमयातनेचें ॥ २४ ॥ नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन। परंतु हा परोपकारी झिजवून । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥ अश्व वृषभ गाई म्हैसी। नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळूपणे सोडितां त्यांसी। कोणी तरी धरील ॥२६॥ तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जाव अथवा राहो। 'परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥२७॥ ________________

- रामदासवचनामृत-दासबोध. [२८ नरदेह पांगुळ असतां । तरी तो कार्यास न येतां। अथवा थोटा जरी असतां । तरी परोपकारास न ये ॥२८॥ नरदेह अंध असिला । तरी तो निपटाचे वायां गेला। अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९॥ नरदेह असिला मुका। तरी घेतां नये आशंका। अशक्त रोगी नासका । तरी तो निष्कारण ॥ ३०॥ नरदेह आसिला मूर्ख । अथवा फेंपन्या समंधाचे दुःख । तरी तो जाणावा निरर्थक । निश्चयेंसी ॥३१॥ इतुके हैं नस्तां वेंगे। नरदेह आणी सकळ सांग । तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२ ॥ दा. १. १०. १-३२. २९. अंतकालची दुःस्थिति. परंतु अंतीं नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें। पूर्वी भोगिली नाना सुखें। अंती दुःख सोसवेना ॥ २६ ॥ कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडीना। मृत्य दुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७॥ नाना आवेवहीन जालें। तैसोंच पाहिजे वर्तलें। प्राणी अंतकाळी गेलें । कासावीस होउनी ॥ २८॥ रूप लावण्य अवघे जाते । शरीरसामर्थ्य अवधे राहतें । कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥ अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान । एसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥३०॥ १ सर्वस्वी. २ व्यंग: ३ सर्व, ४. दुःखांत. ________________

33.] साक्षात्कारः भोगून अभोक्ता म्हणती। हे तो आवधीच फजिती। लोक उगेच बोलती। पाहिल्याविण ॥ ३१ ॥ अंतकाळ आहे कठीण । शरीर सोडिना प्राण। बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२॥ . दा. १७. ६. २६-३२. ____३०. मृत्यूचे सामर्थ्य संसार म्हणिजे सर्वच स्वार । नाहीं मरणास उधार । मापी लागले शरीर । घडीने घडी ॥१॥ नित्य काळाची संगती। नकळे होणाराची गती। कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसी विदेसीं ॥२॥ सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश। भरतां न भरतां निमिष्य । जाणे लागे ॥३॥ अवचितें काळाचे म्हणियोरे । मारित सुटती येकसरे । नेऊन घालिती पुढारे । मृत्यपंथें ॥४॥ होतां मृत्याची आटाटी। कोणी घालून सकती पाठीं। सर्वत्रांस कुटाकुटी। मागे पुढे होतसे ॥ ५॥ मृत्यकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं। महाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥६॥ मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा झुंजार। मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥७॥ मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी। मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहाखळ ॥ ८॥ १ दुकळलेला. २ शिपाई, ३ यातना.४ खरोखर. ________________

. रामदासवचनामृत-दासबोध. _ [ मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य। मृत्य न म्हणे आढ्य । सर्वगुणें ॥९॥ मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे श्रीमंत । मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १०॥ मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवर्ती। मृत्य न म्हणे हा करामती । कैवांड जाणे ॥११॥ मृत्य न म्हणे हयपती । मृत्य न म्हणे गजपती। मृत्य न म्हणे नरपती। विख्यात राजा ॥१२॥ 'मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी। मृत्य न म्हणे वेतनी। वेतनधर्ता ॥१३॥ मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई। मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंडराजे ॥ १४ ॥ मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न । मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ॥१७॥ मृत्य न म्हणे धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत। मृत्य न म्हणे हा पंड़ित । महाभला ॥ १८॥ मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री। मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २०॥ मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ । मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥२१॥ मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी। मृत्य न म्हणे तत्त्वज्ञानी । तत्त्ववेत्ता ॥२३॥ १ युक्त. २ युक्त्या. ३ समुदाय असलेला. ________________

६ १७॥ .] साक्षात्कार. मृत्य न म्हणे योगाभ्यासी। मृत्य न म्हणे संन्यासी। मृत्य न म्हणे काळासी। वंचू जाणे ॥ २४॥ मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध। मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५ ॥ मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।. मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन ॥ २६ ॥ मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर । मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७॥ मृत्य न म्हणे हठयोगी। मृत्य न म्हणे राजयोगी। मृत्य न म्हणे वीतरागी। निरंतर ॥ २८॥ मृत्य न म्हणे ब्रह्मचारी। मृत्य न म्हणे जटाधारी। मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ २९॥ . मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत । मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥ मृत्य न म्हणे स्वाधेन । मृत्य न म्हणे पराधेन । सकळ जीवांस प्राशन । मृत्यचि करी ॥ ३१ ॥ येक मृत्यमार्गी लागले । येकी आर्ध पंथ क्रमिले। येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२ ॥ मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३ ॥ मृत्य न म्हणे हा आधारू । मृत्य न म्हणे उदारु । मृत्य न म्हणे हा सुंदरु । चतुरांग जाणे ॥ ३४ ॥ मृत्य न म्हणे पुण्य पुरुष । मृत्य न म्हणे हरिदास । मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥ . . ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [.३० आतां असो हे बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें । मागे पुढे विश्वास जाणे । मृत्यपंथें ॥ ३६॥ . च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयांसी लक्ष जीवयोनी। जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥ मृत्याभेणे पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा। मृत्यास न ये चुकावितां । कांहीं केल्या ॥ ३८॥ मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी । मृत्य न म्हणे हा उपवासी। निरंतर ॥ ३९॥ .. मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हारहर। मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥४०॥ श्रोती कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा। उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ॥४१॥ येथे न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात । प्रगट जाणती समस्त । लहानथोर ॥४२॥ ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकची करावें। जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥४४॥ येरवी प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥ गेले बहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे। गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ॥४६॥ गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी। गेले बहुत संग्रामी । संग्रामसौर ॥४७॥ १ सर्व लोकांस. २ किंतु, संशय. ३ शूर.:...:...:.. ________________

- .. 30 ] : साक्षात्कार. 5 गेले बहुतां बळांचे। गेले बहुतां काळांचे । गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे॥४८॥ गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक । गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥४९॥ गेले विद्येचे सागर। गेले बळाचेडोंगर। गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथें ॥५०॥ गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे। गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥५१॥ गेले बहुत शस्त्रधारी। गेले बहुत परोपकारी। गेले बहुत नानापरी। धर्मरक्षक ॥ ५२ ॥ गेले बहुत प्रतापाचे। गेले बहुत सत्कीर्तीचे। गेले बहुत नीतीचे। नीतिवंत राजे॥५३॥ गेले बहुत मतवादी। गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत वेवादी । बहुतां परीचे ॥५४॥ गेली पंडितांची थोटें । गेली शब्दांची कचाटें। गेली वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥ गेले तापस्यांचे भार। गेले संन्यासी अपार । गेले विचारकर्ते सार। मृत्यपंथें ॥५६॥ गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी। गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ॥ ५ ॥ गेले ब्राम्हणसमुदाये । गेले बहुत आचार्ये । गेले बहुत सांगों काये। किती ह्मणोनि ॥५८॥ । १.व्याप. २ समुदाय. ३ बंडे, ________________

रामदासवचनामृत-दासबोध. असो ऐसे सकळही गेले । परंतु येकचि राहिले। जे स्वरूपाकार जाले । आत्मज्ञानी॥ ५९॥ दा. ३. ९. १-२९. ३१. “ सर्व सांडून शोधा मजला." याकारणे सर्व सांडावें । येक देवास धुंडावें। तरीच वर्म पडे ठावें । कांहीएक ॥ २१॥ नाना सुखें देवें केलीं। लोकें तयास चुकलीं। ऐसीं चुकतांच गेलीं । जन्मवरी ॥२२॥ सर्व सांडून शोधा मजला । ऐसें देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य केला। भगवंताचा ॥२३॥ म्हणोन नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती। मनी सुखचि इच्छिति । परी तें कैंचें ॥२४॥ उदंड सुख जया लागलें । वेडे तयास चुकलें। सुख सुख म्हणतांच मेलें । दुःख भोगितां ॥ २५ ॥ शहाण्याने ऐसें न करावें। सुख होये तेंचि करावें। देवास धुंडित जावें । ब्रह्मांडापरतें ॥२६॥ मुख्य देवचि ठाई पडिला । मग काये उणे तयाला। लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥२७॥ विवेकाचे फळ तें सुख । अविवेकाचे फळ ते दुःख । यांत मानेल तें आवश्यक । केले पाहिजे ॥ २८ ॥ कर्तयासी वोळखावें। यास विवेक म्हणावें। विवेक सांडितां व्हावें । परम दुःखी ॥२९॥ .. दा. १३. ७. २१-२९... ________________

६३२] साक्षात्कार. ३२. याच जन्मी परमेश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे. संसारत्याग न करितां । प्रपंचउपाधी न सांडितां। जनामध्ये सार्थकता। विचारेंचि होये ॥ २४ ॥ हे प्रचिताचे बोलणें । विवेकें प्रचित पाहणें । प्रचित पाहे तें शाहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५ ॥ सप्रचित आणी अनुमान । उधार आणी रोकडें धन । मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यास महदांतर ॥ २६ ॥ पुढे जन्मांतरी होणार । हा तो अवघाच उधार। तैसा नव्हे सारासार । तत्काळ लाभे ॥ २७ ॥ तत्काळचि लाभ होतो। प्राणी संसारी सुटतो। संशय अवघाचि तुटतो। जन्ममरणाचा ॥२८॥ याचि जन्में येणेंचि काळे । संसारीं होइजे निराळे । मोक्ष पाविजे निश्चळे । स्वरूपाकारें ॥ २९॥ ये गोष्टीस करी अनुमान । तो सिद्धचि पावेल पतन। मिथ्या वदे त्यास आण । उपासनेची ॥ ३०॥ हे येथार्थचि आहे बोलणें । विवेकें सीघचि मुक्त होणें । असोनी काहींच नसणे। जनामधे ॥३१॥ देवपद आहे निर्गुण । देवपदी अनन्यपण। हाचि अर्थ पहाता पूर्ण । समाधान बाणे॥ ३२ ॥ देहींच विदेह होणे। करून कांहींच न करणे । जीवन्मुक्तांची लक्षणे । जीवन्मुक्त जाणे ॥ ३३ ॥ ___दा, ६. ९. २४-३३. १शपथ. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [33 ____३३. बद्ध मनुष्याचे वर्णन. परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर। संसारभार जोजारं । या नांव बद्ध ॥ ३७॥ सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी। देहेबुद्धीची घातली बेडी । या नांव बद्ध ॥ ३८ ॥ हाती द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ । सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥ ३९॥ नेत्रीं द्रव्यदारा पाहावी । श्रवणीं द्रव्यदारा ऐकावी। चिंतनी द्रव्यदारा चिंतावी। या नांव बद्ध ॥ ४० ॥ काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण । द्रव्यदारेचे करी भजन । या नांव बद्ध ॥४१॥ इंद्रियें करून निश्चळ । चंचळ होऊ नेदी पळ। द्रव्यदारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥४२॥ द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्यदारा तोचि परमार्थ । द्रव्यदारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥४३॥ वेर्थ जाऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ । कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥४४॥ दा. ५. ७. ३७-४४. . ३४. गुरूची आवश्यकता. ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्गुरु करावा। ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्गुरुविण नाहीं ॥१९॥ १ जोराचा, अत्यंत. ________________

५१ कार - - $3r] - साक्षात्कार. स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण । ब्रह्मज्ञान नसतां सीण। जन्ममृत्य चुकेना ॥२०॥ सद्गुरुविण ज्ञान कांहीं। सर्वथा होणार नाहीं। अज्ञान प्राणी प्रवाहीं। वाहातचि गेले ॥ २१ ॥ ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मास मूळ जालें। म्हणोनि सद्गुरूची पाउलें । सदृढ धरावीं ॥ २२ ॥ जयास वाटे देव पहावा । तेणे सत्संग धरावा। सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥२३॥ नाना साधनें बापुडौं । सद्गुरुविण करिती वेडीं। गुरुकृपेविण कुडकुंडीं। वेर्थचि होतीं ॥२४॥ कार्तिकस्नाने माघस्नानें । व्रतें उद्यापने दाने। गोरांजनें धूम्रपाने । साधिती पंचाग्नी ॥ २५ ॥ हरिकथा पुराण श्रवण । आदरें करिती निरूपण। सर्व तीर्थे परम कठिण। फिरती प्राणी ॥ २६ ॥ झळफलित देवतार्चनें । स्नाने संध्या दर्भासनें। टिळे माळा गोपीचंदनें। ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥ अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णे। मंत्र यंत्राची तांब्रपणे। नाना प्रकारची उपकरणें । साहित्यशोभा॥२८॥ घंटा घणघणा वाजती । स्तोत्रं स्तवनें आणी स्तुती। आसने मुद्रा ध्याने करिती । प्रदक्षिणा नमस्कार ॥२९॥ पंचायत्न पूजा केली । मृत्तिकेची लिंगें लाखोली। बेलें नारिकेळे भरिलों । संपूर्ण सांग पूजा ॥३०॥ १ . रण. २ पोकळ. ३ एकप्रकारचे साधन. ४ पंचायतन. 35820 --- - - ________________

Ji रामदासवचनामृत-दासबोध. [$ 30 उपोषणे निष्ठानेम । परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती वर्म । चुकले प्राणी ॥ ३१ ॥ येज्ञादिकें कर्मे केलीं। हृदई फळाशा कल्पिली । आपले इच्छेने घेतली । सूति जन्माची ॥ ३२ ॥ करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास। रिद्धि सिद्धि सावकाश । वोळल्या जरी॥३३॥ तरी सद्गुरुकृपेंविरहित । सर्वथा न घडे स्वहित। येमपुरीचा अनर्थ । चुकेना येणे ॥ ३४ ॥ जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती। गुरुकृपेंविण अधोगति । गर्भवास चुकेना ॥ ३५ ॥ ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्तिभाव आणी भजन। सकळही फोल ब्रह्मज्ञान । जव तें प्रात नाहीं ॥ ३६ ॥ सद्गुरुकृपा न जोडे । आणी भलतीचकडे वावडे । जैसें आंधळे चाचरोन पडे । गारी आणी गडधरों ॥ ३७॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान-प्रकाश होये ॥ ३८ ॥ सद्गुरुविण जन्म निर्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९ ॥ सद्गुरुचेनि अभयंकरें। प्रगट होईजे ईश्वरें । संसारदुःखें अपारें । नासोनि जाती ॥ ४० ॥ मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्वर । तयांसही ज्ञानविज्ञानविचार। सद्गुरूचेनी॥४१॥ १ प्राप्ति. २ हस्तगत झाल्या. ३ भटकतो: ४ चांचाइन. ५ खळग्यांत, ________________

- 8 ३५] साक्षात्कार. श्रीरामकृष्ण आदिकरूनी। अतितत्पर गुरुभजनीं। सिद्ध साधु आणी संतजनीं। गुरुदास्य केलें ॥४२॥ सकळ सृष्टीचे चाळक । हरिहर ब्रह्मादिक। तेही सद्गुरुपदी रंक । महत्त्वा न चढती ॥४३॥ असो जयास मोक्ष व्हावा। तेणे सद्गुरु करावा। सद्गुरुविण मोक्ष पावावा । हे कल्पांती न घडे ॥४४॥ दा. . १. १९-४४. ३५. " सद्गुरुकृपा तेचि किली." आतां मनासि जें अप्राप्त । तें कैसे होईल प्राप्त। ऐसें म्हणाल तरी कृत्य। सद्गुरुविण नाहीं ॥१२॥ भांडारगृहे भरलीं। परी असती आडकलीं। हातास न येतां किली। सर्वही अप्राप्त ॥१३॥ तरी ते किली ते कवण। मज करावी निरूपण। .. ऐसा श्रोता पुसे खूण। वक्तयासी ॥१४॥ सद्गुरुकृपा तेचि किली। जेणे बुद्धि प्रकाशली। द्वैतकपाट उघडलीं। येकसरी ॥१५॥ तेथें सुख असे वोड। नाहीं मनास पवार्ड। मनोंवण कैवार्ड। साधनाचा ॥१६॥ त्याची मनेंविण प्राप्ती। किं वासनेविण तृप्ती। तेथें न चले वित्पत्ती। कल्पनेची ॥१७॥ तें परेहूनि पर। मनबुद्धिअगोचर। संग सोडितां सत्वर । पाविजे ते॥१८॥ । " १ फार. २ प्रवेश. ३ प्रकार. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [३५ संग सोडावा आपुला । मग पहावें तयाला। अनुभवी तो या बोला। सुखावेल गा ॥१९॥ . दा. ७. २. १२-१९. ३६. देवापेक्षां गुरु श्रेष्ठ आहे. सद्गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा। सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें ॥४०॥ सद्गुरुस्वरूप तें संत । आणी देवास मांडेल कल्पांत। तेथे कैंचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥४१॥ म्हणोन सद्गुरुसामर्थ्य अधिक। जेथें आटती ब्रह्मादिक । अल्पबुद्धी मानवी रंक । तयांसि हे कळेना ॥४२॥ गुरुदेवास बराबरी। करी तो शिष्य दुराचारी। . भ्रांति बैसली अभ्यांतरीं। सिद्धांत नेणवे ॥४३॥ देव मानुषी भाविला। मंत्री देवपणासि आला। सद्गुरु न वचे कल्पिला। ईश्वराचेनि ॥४४॥ म्हणोनि सद्गुरु पूर्णपणें । देवाहून आधिक कोटिगुणें। जयासि वर्णितां भांडणें । वेदशास्त्रीं लागलीं ॥४५॥ असो सद्गुरुपदापुढे । दुजें कांहींच न चढे। देवसामर्थ्य तें केवढें। मायाजनित ॥४६॥ दा. ५. ३. ४०-४६. ३७. " म्हणौनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना." आतां सद्गुरु वर्णवेना। जेथें माया स्पर्शी सकेना। ते स्वरूप मज अज्ञाना। काय कळे ॥१॥ . TU . ________________

. साक्षात्कार. ६३७] साक्षात्कार. नकळे नकळे नोति नेति । ऐसें बोलतसे श्रुति। तेथे मज मूर्खाची मति । पवाडेल' कोठे ॥ २॥ मज न कळे हा विचारु । दुहूनि माझा नमस्कारु । गुरुदेवा पैलपारु । पाववी मज ॥३॥ होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा। आतां असाल तैसें असा । सद्गुरु स्वामी ॥ ४॥ मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन । माया जाली लज्जायमान । काय करूं ॥५॥ नातुडे मुख्य परमात्मा। म्हणौनि करावी लागे प्रतिमा । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥६॥ आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं। तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥७॥ जय जयाजि सद्गुरुराजा । विश्वंभरा विश्वबीजा। परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधू ॥ ८॥ तुझीयेन अभयंकरें। अनावर माया हे वोसरे। जैसे सूर्यप्रकाशे अंधारें। पळोन जाये ॥९॥ आदित्य अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे। नीसी जालिया नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १० ॥ तैसा नव्हे स्वामीरावो । करी जन्ममृत्य वाव । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥११॥ सुवर्णाचे लोहो कांहीं। सर्वथा होणार नाहीं। तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२ ॥ .. १ शिरेल. २ निशा. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [$3. कां सरिता गंगेसी मिळाली। मिळणी होतां गंगा जाली। मग जरी वेगळी केली। तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३ ॥ परी ते सरिता मिळणीमागें। वाहाळ मानिजेत जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥१४॥ परिस आपणा ऐसें करीना। सुवर्ण लोहो पालटेना। उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरूचा ॥ १५ ॥ शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करितां नये। म्हणौनि उपमा न साहे। सद्गुरूसी परिसाची ॥ १६ ॥ उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥ उपमे द्यावा जरि मेरू । तरी तो जड पाषाण कठोरू । तैसा नव्हे की सद्गुरु । कोमळ दीनाचा ॥१८॥ उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण। याकारणे दृष्टांत हीन । सद्गुरूस गगनाचा ॥ १९॥ धीरपणे उपमूं जगती । तरी हेही खचेल कल्पांतीं । म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीन वसुंधरा ॥०॥ आतां उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती। शास्त्रे मर्यादा बोलती। सद्गुरु अमर्याद ॥ २१॥ म्हणौनि उपमे उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणिवर । तरी तोही भारवाही ॥ २२ ॥ आतां उपमे द्यावें जळ । तरी ते काळांतरीं आटेल सकळ ॥ सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥ सदगुरुसी उपमा अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ। सद्गुरुकृपा यथार्थ। अमर करी ॥२४॥ - ________________

536] साक्षात्कार... सद्गुरूसी म्हणावें कल्पतरू। तरी हा कल्पनातीत विचारू । कल्पवृक्षाचा अंगिकारू । कोण करी ॥ २५ ॥ चिंतामात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी। कामधेनूची दुभणी । नि:कामासो न लगती ॥ २६ ॥ सद्गुरु म्हणों लक्ष्मविंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत । ज्याचे द्वारी असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥ . स्वर्गलोक इंद्रसंपती । हे काळांतरों विटंबती। सद्गुरूकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना ॥ २८॥ हरीहर ब्रम्हादिक । नाश पावती सकळिक । सर्वदा अविनाश येक । सद्गुरुपद ॥ २९ ॥ तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी।। पंचभूतिक उठाठेवी । नचले तेथें ॥ ३० ॥ .म्हणौनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना। अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥ दा. १. ४. १-३'. ___ ३८. सद्गुरूचे लक्षण. म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भावाचा ॥४४॥ मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान। निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती ॥४५॥ याही वरि वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ । विशेष आचारे निर्मळ । स्वधर्मविषई ॥४६॥ १दुभतीं. २ नाश पावतात. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [sic याहीवरी अध्यात्मश्रवण । हरिकथानिरूपण।। जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥४७॥ जेथें सारासार विचार । जेथे होये जगोद्धार । नवविधा भक्तीचा आधार । बहुत जनासी ॥४८॥ म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठिले साधन है। हे सद्गुरूचे लक्षण । श्रोती ओळखावें ॥४९॥ अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचे भजन। तेथें बहु भक्तजन । विश्रांति पावती ॥५०॥ नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥५१॥ म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्म कर्म आणि साधन। कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२ ॥ यामधे येक उणे असे । तेणें तें विलक्षण दिसे। म्हणौन सर्वहि विलसे । सद्गुरूपासीं ॥ ५३॥ . दा. ५. २. ४४-५३. - ३९. साधुलक्षण, अंतरीं गलियां अमृत । बाह्य काया लखलखित । अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणे कैसीं ॥१॥ जालें आत्मज्ञान बरवें । हे कैसेनि पां जाणावें । म्हणोनि बोलिली स्वभावें । साधुलक्षणें ॥२॥ ऐक सिद्धाचे लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण । तथे पाहातां वेगळेपण । मुळीच नाहीं ॥३॥ ________________

३९] साक्षात्कार. . स्वरूप होऊन राहिजे। तया नांव सिद्ध बोलिजे। . सिद्धस्वरूपींच साजे। सिद्धपण ॥४॥ वेदशास्त्रीं में प्रसिद्ध । सस्वरूप स्वतासिद्ध। तयासिच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥५॥ तथापि बोलों कांहीं येक । साधकास कळाया विवेक। सिद्धलक्षणाचे कौतुक। तें हैं ऐसें असे ॥६॥ अंतरस्थित स्वरूप जाली। पुढें काया कैसी वर्तली। जैसी स्वप्नीची नोथिली । स्वानरचना ॥७॥ तथापि सिद्धाचे लक्षण । कांहीं करूं निरूपण। जेणे बाणे अंतरण । परमार्थाची ॥ ८॥ सदा स्वरूपानुसंधान ।हें मुख्य साधूचे लक्षण । जनीं असोन आपण। जनावेगळा ॥९॥ स्वरूपी दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता। पुढे लागली ममता। निरूपणाची ॥ १०॥ हे साधकाचे लक्षण । परी सिद्धाआंगीं असे जाण। सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥११॥ बाह्य साधकाचे परी। आणी स्वरूपाकार अंतरीं। सिद्धलक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐसें ॥ १२ ॥ संदेहरहित साधन । तेंचि सिद्धाचे लक्षण। अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसें ॥ १३ ॥ अचळ जाली अंतरस्थिती। तेथे चळणास कैंची गती। स्वरूपी लागतां वृत्ती । स्वरूपचि जाली॥१४॥ १ नश्वर. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [३९ मग तो चळतांच अचळ । चंचळपणे निश्चळ। निश्चळ असोन चंचळ । देह त्याचा ॥ १५॥ स्वरूपी स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला। अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ येथे कारण अंतरस्थिती। अंतरीच पाहिजे निवृत्ती। अंतर लागले भगवंतीं। तोचि साधु ॥ १७॥ बाह्य भलतैसें असावें । परी अंतर स्वरूपी लागावें। लक्षणे दिसती स्वभावें । साधुअंगीं ॥ १८ ॥ रांजी बैसता अवलिळा । आंगीं बाणे राजकळा। स्वरूपी लागतां जिव्हाळा । लक्षणे बाणती ॥ १९॥ येरव्हीं अभ्यास करितां । हाता न चढती सर्वथा। . स्वरूपी राहावें तत्वता । स्वरूप होऊनि ॥२०॥ अभ्यासाचा मुगुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणीं। संतसंगें निरूपणीं। स्थिती बाणे ॥ २१ ॥ ऐसी लक्षणे बरवीं । स्वरूपाकारें अभ्यासावीं। स्वरूप सोडितां गोसावी। भांबावती॥ २२ ॥ आतां असो हे बोलणें । ऐका साधूची लक्षणे । जेणे समाधान बाणे । साधकाअंगीं ॥२३॥ स्वरूपी भरतां कल्पना । तेथें कैंची उरेल कामना। म्हणोनियां साधुजना । कामचि नाहीं ॥ २४ ॥ कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणें गुणे क्रोध यावा। साधुजनाचा अक्ष ठेवा । जाणार नाहीं ॥ २५ ॥ । ।। १ राज्यीं. २ सहज. ३ कायमचा. ________________

. . 5३९] . साक्षात्कार. म्हणोनि ते क्रोधरहित । जाणती स्वरूप संत। नासिवंत हे पदार्थ । सांडुनियां ॥ २६॥ । तेथें नाहीं दुसरी परी । क्रोध यावा कोणावरी। क्रोधरहित सचराचरीं। साधुजन वर्तती ॥ २७ ॥ आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद । याकारणें वादवेवाद । तुटोन गेला ॥२८॥ . साधुस्वरूप निर्विकार । तेथें कैंचा तिरस्कार । आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ॥ २९॥ साधु वस्तु आनायासें। याकारणें मत्सर नसे। मदमत्सराचें पिसें । साधुसी नाहीं ॥३०॥ साधु स्वरूप स्वयंभ । तेथें कैचा असेल दंभ । जेथे द्वैताचा आरंभ । जालाच नाहीं ॥ ३१॥ जेणे दृश्य केलें विसंच । तयास कैंचा हो प्रपंच। याकारणें निःप्रपंच । साधु जाणावा ॥ ३२॥ अवघे ब्रह्मांड त्याचें घर। पंचभूतिक हा जोजार ।। मिथ्या जाणोन सत्वर । त्याग केला ॥३३॥ याकारणे लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे। जयाची वासना समरसे । शुद्धस्वरूपीं ॥ ३४ ॥ आपुला आपण आधवा । स्वार्थ कोणाचा करावा । म्हणोनि साधु तो जाणावा ॥ शोकरहित ॥ ३५॥ दृश्य सांडून नासिवंत । स्वरूप सेविलें शाश्वत। याकारणे शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६॥ - १ नाहीसं. २ पसारा. ________________

रामदासवचनामृत दासबोध. शोके दुःखवावी वृत्ती। तरी ते जाहाली निवृत्ति। म्हणौनि साधु आदिअंतीं। शोकरहित ॥ ३७॥ मोहे झळंबावे मन । तरी तें जाहाले उन्मन । याकारणे साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ साधु वस्तु अद्वये । तेथे कैंचें वाटेल भये। परब्रह्म तें निर्भये । तोचि साधु ॥ ३९॥ याकारणें भयातीत । साधु निर्भय निवांत। सकळास मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥ सत्यस्वरूपं अमर जाला । भयें कैंचें वाटेल त्याला याकारणे साधुजनाला। भयेचि नाहीं ॥४१॥ जेथें नाहीं द्वंदभेद । आपला आपण अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ ॥ बुद्धीने नेमिले निर्गुणा । त्यास कोणीच नेईना। याकारणे साधुजना। खेदचि नाहीं ॥ ४३॥ आपण येकला ठाईचा । स्वार्थ करावा कोणाचा। दृश्य नस्तां स्वार्थाचा । ठावचि नाहीं॥४४॥ साधु आपणचि येक । तेथें कैंचा दुःखशोक। दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥ ४५ ॥ आशा धरितां परमार्थाची। दुराशा तुटली स्वाथाची । म्हणोन नैराशता साधूची । वोळखण ॥ ४६॥ मृदपणे जैसे गगन । तैसें साधूचे लक्षण । याकारणे साधुवचन । कठीण नाहीं ॥४७॥ १ पछाडावें. २ निश्चय केला. ________________

- - साक्षात्कार. स्वरूपाचा संयोगों । स्वरूपचि जाला योगी। याकारणें वीतरागी । निरंतर ॥४८॥ स्थिति बाणतां स्वरूपाची चिंता सोडिली देहाचा। याकारणे होणाराची। चिंता नसे ॥४९॥ . स्वरूपी लागतां बुद्धी । तुटे अवधी उपाधी। याकारणे निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥ साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साह। म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥ अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परमदक्ष। चोदूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५२ ॥ स्वरूपी न साहे मळ । म्हणौन साधु तो निर्मळ । साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥५३॥ सकळ धर्मामधे धर्म । स्वरूपी राहणे हा स्वधर्म । हेचि जाणिजे मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥५४॥ दा. ८. ९. १-५४. ४०.“ में त्रैलोकी नाही दान। तें करिती संतसज्जन." आतां वंदीन संतसज्जन । जे परमार्थाचे अधिष्ठान। जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥१॥ जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ। तेचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनो ॥२२॥ वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे । नाना साधनीं सायासें। न पडे ठाई ॥३॥ १ कैवार. ________________

1 रामदासवचनामृत-दासबोध. [Fro जेथें परीक्षवंत ठकले । नातरी डोळसचि अंध जाले । पाहात असतांचि चुकले । निजवस्तूसी ॥४॥ जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना। नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥५॥ सोळाकळी पूर्ण शशी । दाखवू सकेना वस्तूसी। तीव्र आदित्य कळाराशी । तोहि दाखवीना ॥६॥ जया सूर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे। नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥७॥ चिरलें वाळाय तेहि प्रकाशी । परी तो दाखविना वस्तूसी। तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥ जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले। जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥९॥ वेळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी। जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥ जो बोलकेपणे विशेष । सहस्त्र मुखांचा जो शेष। तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥११॥ वेदें प्रकाशिले सर्वही । वेद विरहित कांहीं नाहीं। तो वेद कोणासही । दाखऊ सकेना ॥ १२॥ .. तोच वस्तु संतसंगें । रवानुभवें कळों लागे। त्यांचा महिमा वचनी सांगें । ऐसा कवणु ॥ १३ ॥ विचित्र कळा ये मायेची। परी वोळखी न संगवे वस्तूची। मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥ वस्तूसी वर्णिलें न वचे । तेंचि स्वरूप संतांचें। याकारणे वचनाचें। कार्य नाहीं ॥ १५ ॥ १ लोकरीचा तंतु. २ बालाप्र. 41 . ________________

नतिन Bro] साक्षात्कार. संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥१६॥ संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती। नातरी भक्तीची फळश्रुती। ते हे संत॥१७॥ संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचे सत्पात्र। नातरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥१८॥ संत समाधीचे मंदिर। संत विवेकाचे भांडार। नातरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥१९॥ संत सत्याचा निश्चयो। संत सार्थकाचा जयो। संत प्राप्तीचा समयो। सिद्धरूप ॥२०॥ मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१ ॥ जे समर्थपणे उदार । जे कां अत्यंत दानशूर। तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला नवचे ॥ २२ ॥ महाराजे चक्रवती । जाले आहेत पुढे होती। परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥ जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन । तयां संतांचें महिमान । काय म्हणौनि वर्णावें ॥ २४ ॥ जें त्रैलोक्याहूनि वेगळे । जें वेदश्रुतीसी नाकळे । तोच जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥२५॥ ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा। जयांचनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६ ॥ . . दा.१.५. १ चक्रवर्ती. २ सांपडते. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [४१ ४१. संतसभावर्णन. आतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा। जेथें स्वयं जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥१॥ "नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ। मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥१॥m नाहीं वैकुंठींचा ठाई। नाहीं योगियांचा हृदई । माझे भक्त गाती ठाई ठाई। तेथे मी तिष्ठतु नारदा ॥२॥ याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ। नामघोषं घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥३॥ प्रेमळ भक्तांची गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें। वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥४॥ परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद । अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें ॥ ५॥ नाना समाधानें तृप्ति । नाना आशंकानिवृत्ति । चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विलासें ॥६॥ भक्त प्रेमळ भाविक । सभ्य संखोल सात्विक। रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥७॥ कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ । सुचिष्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥८॥ योगी वीतरागी उदास। नेमक निग्रह तापस। विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥९॥ • दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी। येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥ १गंभीर. ________________

१] साक्षात्कार... पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी। माहायोगी आणी जनस्वी । जनसारिखे ॥११॥ ... सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक। येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२ ॥ 'संतसज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन । प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते॥१३॥ . योगी वित्पन्न ऋषेश्वर ।धूर्त तार्किक कवेश्वर। मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥१४॥ ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी। तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी। योगाभ्यासी योगज्ञानी। उदासीन ॥१५॥ पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक । भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥ माहाभले महाश्रोत्री। याज्ञिक आणी आग्नहोत्री। वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते॥१७॥ भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥१८॥ शांति मा दयासीळ । पवित्र आणी सत्वशीळ । अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥१९॥ ऐसे जे कां सभानायक। जेथें नित्यानित्यविवेक । त्यांचा महिमा अलोकिक । काय म्हणोनि वर्णावा ॥२०॥ जेथे श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये। तेथें जनासी तरणोपाय । सहजचि होये ॥२१॥ १ ज्ञानी. २ दिगंबर. ३ आमिहोत्री. ४ क्षमा. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [ rt उत्तम गुणाची मंडळी । सत्यधीर सत्वागळी। नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥२२॥ विद्यापात्रे कळापात्रं । विशेष गुणाची सत्पात्रे । भगवंताची प्रीतिपात्रे । मिळाली जेथें ॥ २३॥ प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी । गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४ ॥ वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ । अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामी ॥ २५ ॥ ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन । जयांचेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ २६ ॥ ऐसिये सभेचा गजर । तेथे माझा नमस्कार। जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७ ॥ दा. १.८.१-२७ ४२. संत चमत्कार करीत नाहीत, देव संतांबद्दल चमत्कार करितो अवतारादिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त। त्यांचे सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥१॥ हे श्रोतयांची आशंका। पाहातां प्रश्न केला निका। सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥२॥ ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागे त्यांचे सामर्थ्य चाले। परंतु ते नाही आले । वासना धरूनी ॥३॥ लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार। परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥४॥ १ सत्वाने श्रेष्ठ. २ नवेपणा. ३ रोखठोक. ________________

.. .. .. . . .. . .. . . . .. . . . . साक्षात्कार... जीत असतां नेणों किती । जनामधे चमत्कार होती। ऐसीयाची सद्यप्रचिती। रोकडी पाहावी ॥५॥ तो तरी आपण नाहीं गेला । लोकी प्रत्यक्ष देखिला। ऐसा हा चमत्कार झाला । यास काये म्हणावें ॥६॥ तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ। अन्नेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥७॥ .. आवडे तें स्वमीं देखिलें । तरी काय तेथून आलें। म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य का दिसे ॥ ८॥ . एवं आपली कल्पना । स्वभी येती पदार्थ नाना। तरी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊं नाहीं ॥ ९॥ येथे तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पू नका। उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥१०॥ ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचे सामर्थ्य उगेंच चाले। कां जे पुण्यमार्गे चालिले । म्हणोनियां ॥ ११॥ याकारणे पुण्यमार्गे चालावें । भजन देवाचे वाढवावें । न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गे ॥१२॥ दा. १०. ७. १-१२. ४३. ज्ञान आणि सामर्थ्य. निरूपणीं सामर्थ्यसिद्धी । श्रवण होता दुराशा बाधी। नाना चमत्कारें बुद्धी । दंडळू लागे ॥ ३३ ॥ पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत। आणी सामर्थ्यही अद्भुत । सिद्धीचनि योगें ॥ ३४ ॥ . १ डळमळू. ________________

. 4 रामदासवचनामृत-दासबोध. [FY ऐसें तयांचे सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ । ... ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५ ॥ निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥३६ ॥ बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेने वेडी केलीं। .. कामना इच्छितांचि मेलीं। बापुडी मूर्खे ॥ ३७॥ निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत । अवध्या वेगळे मत । अझै ज्याचें ॥ ३८ ॥ अक्ष ठेवा सकळांचा । परी पांगडों फिटेना शरीराचा। तेणे मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९ ॥ सिद्धी आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्य देहास महत्व आलें । तेणें बेचाडै बळकावलें । देहबुद्धीचें ॥४०॥ सांडून अझै सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नाहीं ॥४१॥ ईश्वरोंविण जे कामना । तेणेंचि गुणें नाना यातना। पावती होती पतना । वरपडे प्राणी ॥ ४२ ॥ होतां शरीरासी अंत । सामर्थ्यहि निघोन जात । सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥४३॥ दा. ५. २. ३३-४३. ४४. शिष्यलक्षण. मुख्य सच्छिण्याचे लक्षण । सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥ १ खोटे. २ ममत्व. ३ प्रस्थ, बंड. ४ योग्य. ५ शेवटी. - ________________

br] साक्षात्कार, शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ । शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥२०॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त । सर्व प्रकारीं ॥ २१ ॥ शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥२२॥ शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार । शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषईं ॥ २३॥ शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी। शिष्य पाहिजे अर्थातरी । प्रवेशकर्ता ॥ २४ ॥ शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणाचा ॥ २५ ॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त। शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥ २६ ॥ शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे संतासंत । विचारघेता ॥ २७ ॥ शिष्य पाहिजे धारिष्टाचा। शिष्य पाहिजे दृढव्रताचा। शिष्य पाहिजे उत्तम कुळींचा । पुण्यसीळ ॥२८॥ शिष्य असावा सात्त्विक । शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक । साधनकर्ता॥ २९॥ शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कायाक्लेशी। शिष्य असावा परमार्थासी । वाढऊं जाणे ॥ ३०॥ . १प्रयत्न करणारा, ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [Fre शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगमित्र । शिष्य असावा सत्पात्र । सर्वगुणें ॥३१॥ शिष्य असावा सद्विद्येचा। शिष्य असावा सद्भावाचा । शिष्य असावा अंतरींचा । परम शुद्ध ॥ ३२॥ शिष्य नसावा अविवेकी। शिष्य नसावा गर्भसुखी। शिष्य असावा संसारदुःखी । संतप्त देहीं ॥ ३३ ॥ जो संसारदुःखें दुःखवला । जो विविधता पोळला । तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ॥ ३४॥ बहु दुःख भोगिले जेणें । तयासीच परमार्थ बाणे। संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५ ॥ जया संसाराचा त्रास । तयासीच उपजे विस्वास। विस्वासबळे दृढ कास । धरिली सद्गुरूची ॥३६॥ दा. ५. ३. १९-३६. अहो सद्गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तयापासी ज्ञानबळे वैभवासी । तृणतुच्छ केलें ॥४७॥ सद्गुरुकृपेचनि बळें । अपरोक्षज्ञानाचेनि उसाळे । मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न ये ॥४८॥ ऐसें सच्छिष्याचे वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव । तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ॥४९॥ अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध जालें। पुढे सद्गुवरुचनें निवाले। सच्छिष्य ऐसे ॥ ५० ॥ १ उसाळयाने. ________________

- - - हो . ५] साक्षात्कार. ... लागतां सद्गुरुवचनपंथें । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थे । पालट न धरिजे ॥५१॥ . __दा. ५.३. ४७-५१. ४५. मोक्ष कसा मिळतो ? | आतां असो हे उपपत्ती। आशंकेची कोण गती। कितां दिवसां होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥४१॥ ऐका याचे प्रत्योत्तर । कथेसि व्हावें निरोत्तर। संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥४२॥ लोहो परिसेसी लागला। थेंबटा सागरी मिळाला। गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥४३ ॥ सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष । इतरांस तें अलक्ष। लक्षिलें न वचे ॥४४॥ येथे शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां न लगे वेळ। अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥४५॥ प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण। अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६॥ प्रज्ञविणे अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु नाकळे । ... प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥४७॥ .. देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती। सत्संगें सद्गती । विलंबचि नाहीं॥४८॥ . . सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनी सायास । करणेचि नलगे ॥४९॥ HTTE . . . १. प्रयत्न करणारा. THE ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [४५. इतर भाविक साबंडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥ दा. ८.६. ४१-५०. ४६. सत्त्वगुणलक्षण. ईश्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणे लोकिक । सदा सन्निध विवेक । तो सत्त्वगुण ॥९॥ संसारदुःख विसरवी। भक्तिमार्ग विमळ दावी। भजनक्रिया उपजवी । तो सत्वगुण ॥ १०॥ परमार्थाची आवडी । उठे भावार्थाची गोडी। परोपकारी तांतडी। तो सत्वगुण ॥ ११॥ स्नान संध्या पुण्यसाळ । अभ्यांतरींचा निर्मळ । शरीरवस्त्रे सोज्वळ । तो सत्वगुण ॥१२॥ येजन आणी याजन । आधेन आणी अध्यापन । स्वयें करी दान पुण्य । तो सत्वगुण ॥१३॥ निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी। क्रिया पालटे. रोकडी। तो सत्वगुण ॥ १४ ॥ अश्वदानें गजदानें । गादोनें भूमिदानें। नांना रत्नांची दाने । करी तो सत्वगुण ॥ १५॥ धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान। करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६॥ कार्तिकस्नाने माघस्नानें । व्रतें उद्यापर्ने दानें । निष्काम ताथै उपोषणें । तो सत्वगुण ॥१७॥ १ भोळे. २ उठे. ३ अध्ययन. ________________

ला . . . ... साक्षात्कार. सहस्रभोजने लक्षभोजनें। विविध प्रकारांची दाने । निष्काम करी सत्वगुण । कामना रजोगुण ॥ १८॥ तीर्थी अपी जो अंग्रारें। बांधे वापी सरोवरें। बांधे देवालये सिखरें । तो सत्वगुण ॥१९॥ देवद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा। वृंदावनें पार पिंपळा । बांधे तो सत्वगुण ॥ २० ॥.... लावी वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें। .... निववी तापस्यांची मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥ . संध्यामठ आणी भुंयेरी। पाईरयिा नदीतीरीं । भांडारगृहें देवद्वारीं। बांधे तो सत्वगुण ॥ २२॥ नाना देवांची जे स्थाने । तेथें नंदादीप घालणें । वाहे आळंकार भूषणें । तो सत्वगुण ॥ २३ ॥. जेंगट मृदांग टाळ । दमामे नगारे काहळ ।। नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥ नाना सामग्री सुंदर । देवाळई घाली नर। हरिभजनीं जो तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥ छेत्रे आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणे ।। वाहे चामरें सूर्यपानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥ वृंदावने तुळसीवनें । रंगमाळा संमार्जनें। ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७॥ सुंदरें नाना उपकरणे। मंडप चांदवे आसनें। देवाळई समर्पणें । हा सत्वगुण ॥ २८॥ १ अप्रहारें. २ धर्मशाळा. २ पायऱ्या. ४ भुयारें. ५ झांगट. F inadi ________________

७६ : रामदासवचनामृत-दासबोध. [r६ : देवाकारणे खाद्य । नाना प्रकारी नैवेद्य । .... अपूर्व फळे अर्की सद्य । तो सत्वगुण ॥ २९॥ . ऐसी भक्तीची आवडी। नीच दास्यत्वाची गोडी। स्वयें देवद्वार झाडी। तो सत्वगुण ॥ ३० ॥ "तिथी पर्व मोहोत्साव । तेथें ज्याचा अंतर्भाव। काया वाचा मनें सर्व। अी तो सत्वगुण ॥ ३१॥ हरिकथेसी तत्पर । गधे माळा आणी धुशर। घेऊन उभी निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥ ‘नर अथवा नारी । येथानशक्ति सामग्री। घेऊन उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३३ ॥ महत्कृत्य सांडून मागें । देवास ये लागवेगें। भक्ति निकट आंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४॥ थोरपण सांडून दुरी। नीच कृत्य आंगिकारी। तिष्ठत उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥ देवालागी उपोषण । वर्जी तांबोल भोजन। नित्य नेम जपध्यान । करी तो सत्वगुण ॥ ३६ ॥ . शब्द कठीण न बोले । अतिनेमेसी चाले। योगी जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥ ३७॥ सांडूनियां अभिमान । निष्काम करी कीर्तन । श्वेदै रोमांचस्फुरण । तो सत्वगुण ॥ ३८॥ - अंतरी देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन । पडे देहाचे विस्मरण । तो सत्वगुण ॥ ३९॥ १ बुक्का. २ स्वेद. ३ भरून आले. ________________

साक्षात्कार - हरिकथेची अतिप्रीति । सर्वथा नये विकृति। आदिक प्रेमा आदिअंतीं। तो सत्वगुण ॥ ४०॥ मुखीं नाम हाती टाळी । नाचत बोले ब्रीदावळी। घेऊन लावी पायधुळी। तो सत्वगुण ॥४१॥ देहाभिमान गळे । विषई वैराग्य प्रबळे। मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥ कांहीं करावा उपाये । संसारी गुतोन काये। उकलवी ऐसें हृदये । तो सत्वगुण ॥ ४३ ॥ संसारासी त्रासे मन। कांहीं करावें भजन । ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥४४॥ असतां आपुले आश्रमी । अत्यादरें नित्यनेमी। सदा प्रीती लागे रामी। तो सत्वगुण ॥ ४५ ॥ सकळांचा आला वीट । परमार्थी जो निकट । आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥४६॥ सर्वकाळ उदासीन । नाना भोगी विटे मन। . आठवे भगवद्भजन। तो सत्वगुण ॥ ४७॥ पदार्थी न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत।। ऐसा दृढ भावार्थ । तो सत्वगुण ॥ ४८॥ लोक बोलती विकारी। तरी आदिकप्रेमा धरी। निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ४९ ॥ अंतरीं स्फूर्ती स्फुरे । सस्वरूपी तर्क भरे। नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥५०॥ . . - - १ अधिक. २ स्वस्वरूप. ________________

r६ . रामदासवचनामृत-दासबोध. [ शरीर लावावें कारणीं। साक्षेप उठे अंतःकर्णी ॥ सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥५१॥ शांति मा आणि दया । निश्चय उपजे जया। सत्वगुण जाणावा तया । अंतरीं आला ॥५२॥ आले आतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । येथानशक्ती दान देत । तो सत्वगुण ॥ ५३॥ तडितापडी दैन्यवाणे । आले आश्रमाचेनि गुणें। तयालागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४॥ आश्रमी अन्नाची आपदा । परी विमुख नव्हे कदा। शक्तिनसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५॥ जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना। जयास नाहीं कामना । तो सत्वगुण ॥५६॥ होणार तैसें होत जात । प्रपंची जाला आघात। डळमलिना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७॥ ... येका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें। केलें देहाचे सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८॥ विषई धांवे वासना । परी तो कदा डळमळिना। ज्याचे धारिष्ट चळेना । तो सत्वगुण ॥ ५९॥ देह आपदेनें पीडिला । क्षुधे तृषेनें वोसावला। तरी निश्चयो राहिला । तो सत्वगुण ॥ ६०॥ श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान। शुद्ध जालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१॥ १ व्याकुळ झाला. ________________

७९ EU sro S६ ] र साक्षात्कार. जयास अहंकार नसे । नैराशता विलसे। जयापासीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ६२॥ सकळांसी नम्र बोले । मर्यादा धरून चाले। सर्वजण तोषविले । तो सत्वगुण ॥ ६३ ॥ सकळ जनासी आर्जव । नाहीं विरोधास ठाव । परोपकारी वेची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥ आपकार्याहून जीवीं। परकार्यसिद्धी करावी । मरोन कीर्ती उरवावी। तो सत्वगुण ॥ ६५ ॥ पराव्याचे दोषंगुण । दृष्टीस देखे आपण । समुद्रा ऐसी सांठवण । तो सत्वगुण ॥६६॥ नीच उत्तर साहाणे । प्रत्योत्तर न देणे। । आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ॥ ६७॥ अन्यायेंवीण गांजिती । नानापरी पीडा करिती। तितुकेंहि सांठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८॥ शरीरें घीस साहाणें । दुर्जनासी मिळोन जाणे । निंदकास उपकार करणे । हा सत्वगुण ॥ ६९ ॥ मन भलतीकडे धांवे। तें विवेके आवरावें। इंद्रिये दमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥ सक्रिया आचरावी । असक्रिया त्यागावी। वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥ जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण। .. नाना मंत्री देवतार्चन । करी तो सत्वगुण ॥ ७२ ॥ आपल्या. २ दोषणाप्रमाणे. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. पर्वकाळी अतिसादर । वसंतपूजेस तत्पर । जयंत्यांची प्रीति थोर । तो सत्वगुण ॥७३॥ विदेसि मेले मरणें । तयास संस्कार देणें। अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥ कोणी येकास मारी। तयास जाऊन वारी। जीव बंधनमुक्त करी । तो सत्वगुण ॥ ७५ ॥ लिंगें लाखोली अभिशेष । नामस्मरणीं विश्वास । ... देवदर्शनी अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६॥ संत देखोन धांवे । परमसुख हेलावे । नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७॥ संतकृपा होय जयास । तेणें उद्धरिला वंश । तो ईश्वराचा अंश । सत्वगुणें ॥ ७८॥ सन्मार्ग दाखवी जना। जो लावी हरिभजना। ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्वगुण ॥ ७९ ॥ . दा. २. ७. ९-७९. ४७. नाममहिमा. मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन । आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ति ॥१॥ स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें। नामस्मरण पावावें । समाधान ॥२॥ नित्यनेम प्रातःकाळीं । माध्यानकाळी सायंकाळीं। नामस्मरण सर्वकाळी । करीत जावें ॥३॥ .... १ परदेशांत. २ अभिषेक. ३ डोलतो. ________________

Fr७] साक्षात्कार. सुख दुःख उद्धेग चिंता । अथवा आनंदरूप असतां। नामस्मरणेंविण सर्वथा। राहोंच नये ॥४॥ हरुषकाळी विषमकाळीं। पर्वकाळी प्रस्तावकाळीं। विश्रांतिकाळी निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥५॥ कोडें सांकडे संकट । नाना संसार खटपट । अवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥६॥ चालता बोलतां धंदा करितां। खातां जेवितां सुखी होता। नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥७॥ संपत्ती अथवा विपत्ती। जैसी पडेल काळगती। नामस्मरणाची स्थिती। सांडूच नये ॥८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता। नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥९॥ आधी आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥१०॥ नामें संकट नासती । नामें विघ्नं निवारती। नामस्मरणें पाविजेती । उत्तमपदें ॥ १२ ॥ भूत पिशाच्य नाना छंद । ब्रह्मगि हो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठं नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती। नामें चेडें चेटकें नासती। नामें होये उत्तम गती। अंतकाळी ॥१३॥ बाळपणीं तारुण्यकाळीं। कठिण काळी वृद्धाप्यकाळीं। सर्वकाळी अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥१४॥ १ पश्चात्ताप. २ अवदशा. ३ ग्रह. ________________

८२ . रामदासवचनामृत-दासबोध. [४७ नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनाभेकरूनि ॥ १५ ॥...... उफराट्या नामासाठीं। बाल्मिक तरला उठाउठी।... भविष्य बदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥१६॥... हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥ ... नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले। .......... महापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥ परमेश्वराची अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें। . . नामस्मरण करितां येमें । बाधिजेना ॥ १९ ॥ सहस्रां नामामधे कोणी येक। म्हणता होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक । होइजे स्वयं ॥ २० ॥ ... कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी। .. तेणे संतुष्ट चक्रपाणी। भक्तांलागी सांभाळी ॥ २१ ॥ . नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर। ... माहांदोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२ ॥... अगाध महिमा न बचे बदला । नामें बहुतजन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३ ॥ चहूं वर्णा नामाधिकार । नामी नाही लहानथोर । .... जडमूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥ म्हणोन नाम अखंड स्मरावें । रूप मनी आठवावें । .... तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५ ॥ दा. ४. ३. ________________

. . साक्षात्कार. ४८. "उपासनेचा मोठा आश्रयो." अगाध गुण भगवंताचे। शेष वर्जू न शके वाचे। वेदविधि तेहि कांचे । देवेंविण ॥ २३॥ आत्माराम सकळां पाळी । अवधे त्रयलोक्य सांभाळी। तया येकविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं। त्रयलोकींचे प्राणी सर्वही। प्रेतरूपी॥ २५ ॥ आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचे जिणें। बरा विवेक समजणे ! अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणे में विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैंचें। कोणीयेके जगदीशाचें। भजन करावें ॥ २७॥ उपासना प्रगट झाली। तरी हे विचारणा कळली। याकारणे पाहिजे केली। विचारणा देवाची ॥ २८ ॥ उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनविणं निराश्रयो। उदंड केले तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थाची नाही पाठी। तयास भलताच कुटी। याकारणे उठाउठी। भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास । येणे पाविजे परलोकास । दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ३१॥ दा. १६.१०. २३-३१. . ४९. “ परंतु तेथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे.".. सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें। परंतु येथे भगवंताचें । अधिष्टान पाहिजे ॥२६॥ ? निरर्थक, २ तरच. ३ जलद. . . 1 . ________________

- ८४ रामदासवचनामृत-दासबोध. [re कर्ता जगदीश है तो खरें। परी विभाग आला पृथकाकारें। तेथें अहंतेचे काविरें। बाधिजेना॥ २७॥ हरिदाता हरिभॊक्ता। ऐसे चालतें तत्त्वतां । ये गोष्टीचा आतां । विचार पहावा ॥ २८ ॥ सकळकर्ता परमेश्वरू। आपला माइक विचारू। जैसे कळेल तैसें करूं। जगदांतरें ॥२९॥ देवायेवढें चपळ नाहीं। ब्रह्मायेवढे निश्चळ नाहीं। पाइरीने पाइरी चढोन पाहीं। मूळपरियंत ॥३०॥ दा. २०. ४. २६-३०. ५०. ईश्वराबद्दल अहेतुक प्रेम. नि:काम बुद्धीचिया भजना। त्रैलोकीं नाहीं तुलना। सामथ्र्येविण घडेना। निःकाम भजन ॥१९॥ कामनेने फळ घडे। नि:काम भजनें भगवंत जोडे। . फळभगवंता कोणीकडे। महदांतर ॥२०॥ नाना फळे देवापासीं । आणी फळ अंतरी भगवंतासी। याकारणे परमेश्वरासी। निःकाम भजावें ॥ २१॥ . निःकाम भजनाचे फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळे । तेथे बापुडी फळें । कोणीकडे ॥२२॥ भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें। तेथे वेगळे भावावें । नलगे कदा ॥ २३॥ दोन्हीं सामर्थे येक होतां । काळास नाटोपे सर्वथा। तेथे इतरांची कोण कथा। कीटकन्यायें ॥ २४॥ १ वेड, भूतबधा. ________________

- १५.] साक्षात्कार. म्हणोन निकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान। तयास तुळितां त्रिभुवन । उणे वाटे ॥२५॥ येथे बुद्धीचा प्रकाश । आणीक न चढे विशेष । प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥ दा. १०. ७. १९-२६. ५१. श्रवणनिरूपण. ऐका परमार्थाचे साधन । जेणे होये समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥१॥ श्रवणे आतुडे भक्ती । श्रवणे उद्भवे विरक्ती। श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥२॥ श्रवणें घडे चित्तशुद्धी। श्रवणे होये दृढबुद्धी। श्रवणें तुटे उपाधी। अभिमानाची ॥३॥ श्रवणें निश्चयो घडे । श्रवणें ममता मोडे। श्रवणें अंतरीं जडे । समाधान ॥४॥ श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशय तुटे। श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥५॥ श्रवणे आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥६॥ श्रवणें मीपण जाये । श्रवणे धोका नये । श्रवणें नाना अपाये । भस्म होती ॥७॥ 'श्रवणे होये कार्यसिद्धी। श्रवणे लागे समाधी। श्रवणें घडे सर्व सिद्धी । समाधानासी ॥८॥ सत्संगावरी श्रवण । तेणे कळे निरूपण। श्रवणे होईजे आपण । तदाकार ॥९॥


PAPES ________________

- tan - रामदासवचनामृत-दासबोध. श्रवणे प्रबोध वाढे। श्रवणें प्रज्ञा चढे। श्रवणे विषयांचे वोढे । तुटोन जाती ॥ १०॥ . .. श्रवणे विचार कळे । श्रवणें ज्ञान हे प्रबळे। श्रवणें वस्तु निवळे । साधकासी ॥११॥ श्रवणे सद्बुद्धि लागे। श्रवणें विवेक जागे। श्रवणें मन हे मागे । भगवंतासी ॥ १२ ॥ श्रवणे कुसंग तुटे । श्रवणें काम वोहंटे। श्रवणे धोका आटे । येकसरां ॥१३॥ श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे। श्रवणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४ ॥ श्रवणे होये उत्तम गती। श्रवणे आतुडे शांती। श्रवणे पाविजे निवृत्ती । अचळपद् ॥ १५॥ . श्रवणा ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व काहीं। भवनदीचा प्रवाहीं । तरणोपाव श्रवणें ॥१६॥ श्रवण भजनाचा आरंभ। श्रवण सर्वां सर्वारंभ । श्रवणे होये स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७॥ प्रवृत्ती अथवा निवृत्ती । श्रवणेंविण न घडे प्राप्ती। हे तो सकळांस प्रचिती। प्रत्यक्ष आहे ॥ १८॥ : ऐकिल्याविण कळेना । हे ठाउके आहे जना। या कारणे मूळ प्रेत्ना । श्रवण आधीं ॥ १९॥ . जें जन्मीं ऐकिलचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं। म्हणोनियां दुजें कांहीं। साम्यता न घडे ॥२०॥ १ कमी होतो. २ एकदम. ३ आपोआप. ________________

६५१] साक्षात्कार, बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता। श्रवणेंविण तत्वतां । कार्य न चले ॥२१॥ न देखतां दिनकर। पडे अवघा अंधकार।.. श्रवणेंविण प्रकार तैसा होये ॥ २२॥ कैसी नवविधा भक्ती। कैसी चतुर्विधा मुक्ती। कैसी आहे सहजस्थिती। हं श्रवणविण न कळे ॥ २३॥ नकळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण। न कळे कैसें उपासन। विधियुक्त ॥२४॥ नाना व्रतें नाना दाने । नाना तपें नाना साधनें। नाना योग तीर्थाटणे। श्रवणेंविण न कळती ॥ २५ ॥ नाना विद्या पिंडज्ञान। नाना तत्त्वांचे शोधन। नाना कटा ब्रम्हज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥२६॥ अठरा भार वनस्पती । येका जळे प्रबळती। .... एका रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥२७॥ सकळ जीवां एक पृथ्वी । सकळ जीवां एक रवी। सकळ जीवां वर्तवी । येक वायो॥२८॥.. . सकळ जीवा येक पैस। जयास बोलिजे आकाश। सकळ जीवांचा वास । एका परब्रह्मीं ॥ २९ ॥ . तैसें सकळ जीवांस मिळोन । सार येकचि साधन। तें हे जाण श्रवण । प्राणिमात्रांसी ॥ ३० ॥ नाना देश भाषा मते । भूमंडळी असंख्यातें। सर्वीस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥ ३१ ॥ श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्ष होती। मुमुक्षाचे साधक अती। नेमसिं चालता ॥ ३२ ॥ ________________

रामदासवचनामृत-दासबोध. साधकाचे होती सिद्ध । आंगी बाणतां प्रबोध । हे तो आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३ ॥ ठाईचे खळ चांडाळ । तेचि होती पुण्यसिळ। ऐसा गुण तत्काळ । श्रवणाचा ॥ ३४॥ जो दुर्बुद्धि दुरात्मा। तोचि होय पुण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे॥ ३५ ॥ तीर्थी व्रतांची फळश्रुती। पुढे होणार सांगती। तैसें नव्हे हातीचा हातीं। सप्रचित श्रवण ॥ ३६ ॥ नाना रोग नाना व्याधी। तत्काळ तोडिजे औषधी। तैसी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७॥ श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रगटे बळें । मुख्य परमात्माच आकळे । स्वानुभवासी ॥ ३८॥ या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान। निजध्यासें समाधान । होत असे ॥ ३९॥ बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे। अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेहता ॥४०॥ संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणे होये निर्मूळ । पुढे सहजचि प्रांजळ । समाधान ॥४१॥ जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैचें समाधान । मुक्तपणाचे बंधन । जडलें पाई ॥ ४२ ॥ मुमुक्ष साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो अबद्ध। श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होये ॥४३॥ १ बाणते. ________________

१५२] साक्षात्कार. जेथें नाहीं नित्यश्रवण । ते जाणावें विलक्षण । तेथें साधकें येक क्षण । कमूं नये सर्वथा ॥४४॥ जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ। मागें केलें तितुकें वेर्थ । श्रवणेंविण होये ॥ ४५ ॥ तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें। नित्यनेमें तरावें । संसारसागरीं ॥४६॥ सेविलेंच सेवावें अन्न । घेतलेंचि घ्यावे जीवन। तैसें श्रवण मनन । केलेंचि करावें॥ ४७॥ श्रवणाचा अनादर । आळसें करी जो नर। त्याचा होये अपहार । स्वहितविषई ॥४८॥ आळसाचे संरक्षण । परमार्थाची बुडवण । याकारणे श्रवण । केलेंचि पाहिजे ॥४९॥. आतां श्रवण कैसे करावें । कोण्या ग्रंथास पहावें। पुढिले समासीं आघवे । सांगिजेल ॥५०॥ दा. ७. ८. ५२. "निःशंक निर्लज कीर्तन । करितां रंग माने." श्रृंघारिक नवरसिक । यामधे सांडावें येक । स्त्रियादिकांचे कौतुक । वणू नये कीं ॥ २१॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधे तत्वतां। धारिष्टापासून श्रोता । चळे तत्काळ ॥ २२ ॥ म्हणऊन तें तजावें । जें बाधक साधका स्वभावें। घेतां अंतरीं ठसावें। ध्यान स्त्रियांचें ॥ २३॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन। कैचें आठवेल ध्यान । ईश्वराचें ॥ २४॥ ________________

INE JUR - रामदासवचनामृत-दासबोध. [$ ५२ स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरी भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥ हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष्य येक जरी आकळे । ध्यानी परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानी गुतले मन । कैचें आठवेल जन । निःशंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥२७॥ रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसी वित्पन्न । अर्थान्वयाचे कीर्तन । करूं जाणे ॥ २८॥ छपन्न भाषा नाना कळा । कंठ माधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणे अन्न । कळावंतांचे जे सन । ते कळाकार जालें ॥ ३०॥ श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणाची अवकळा। देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१॥ सपी वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी। नाना कळा देवासी। आड तैशा ॥ ३२ ॥ सांडून देव सर्वज्ञ । नादामध्ये व्हावें मग्न । तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ येक मन गुंतलें स्वरी । कोणे चिंतावा श्रीहरी । बळेचि धरोनियां चोरीं। शिश्रषा घेतली ॥ ३४॥ करितां देवाचे दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥ १ भरतो. २ अन्य, ३ भूत, हडळ. ________________

IM - ६५३] . साक्षात्कार. भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी। कळावंतां तैसी परी । कळेने केली॥ ३६॥ मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी। ... तोचि ये संसारीं। धन्य जाणा ॥ ३७॥ . . दा.१४. ५. २१-३७. ५३. भक्तियुक्त काव्य हेच प्रासादिक काव्य होय. वैभव कांता कांचन । जयास वाटे हे वमन। । अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ जयास घडीने घडी। लागे भगवतीं आवडी। चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥ जो भगवद्भजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण। सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगे रंगलें ॥ २४॥.. जया अंतरीं भगवंत । अचळ राहिला निवांत । तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥ अंतरीं बैसला गोविंद । तेणे लागला भक्तिछंद । भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥ आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी। भावें करुणाकीर्तन करी। प्रेमभरें नाचतु॥ २७ ॥ भगवंती लागलें मन । तेणें नाठवे देहभान। . शंका लज्जा पळोन । दुरी ठेली ॥२८॥ तो प्रेमरंगे रंगला । तो भक्तिमदें मातला। तेणें अहंभाव घातला । पायातळीं ॥ २९ ॥ गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक । दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥३०॥ ________________

रामदासवचनामृत-दासबोध.. [७५३ ऐसा भगवंती रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला। स्वइच्छा वर्गी लागला । ध्यान कीर्ति प्रताप ॥ ३१॥ नाना ध्याने नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती। तयापुढे नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये संसारीं विरक्त । तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥ त्याचे भक्तीचे कौतुक । तया नांव प्रसादिक । सहज बोलतां विवेक । प्रगट होये ॥ ३४॥ दा. १४. ३. २२-३४. ५४. कल्पना कशी मोडावी? कल्पना अंतरी सबळ । नस्ते दावी ब्रह्मगोळ। क्षणा येकातें निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१॥ क्षणा येका धोका वाहे । क्षणा येका स्थिर राहे। क्षणा येका पाहे । विस्मित होउनि ॥ २२ ॥ क्षणा येकातें उमजे। क्षणा येकातें निर्बुजे। नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३ ॥ कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचे फळ । कल्पना तेचि केवळ । मोक्षदाती ॥ २४ ॥ असो ऐसी हे कल्पना । साधनें दे समाधाना। येरवी हे पतना। मूळच कीं ॥२५॥ म्हणोन सर्वांचे मूळ । ते हे कल्पनाच केवळ । इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६ ॥ १ समजत नाही. ________________

५] साक्षात्कार. श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान। मिथ्या कल्पनेचे भान । उडान जाये ॥ २७॥ शुद्ध ब्रह्माचा निश्चयो । करी कल्पनेचा जयो।। निश्चितार्थे संशयो । तुटोन गेला ॥२८॥ मिथ्या कल्पनेचे कोडें । कैसे राहे साचापुढें। जैसे सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९॥ तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे। मग तुटे अपैसें । द्वैतानुसंधान ॥ ३० ॥ कल्पनने कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आंतुडे । आकाशमार्गी ॥ ३१॥ शुद्ध कल्पनेचे बळ । जालियां नासे सबळे । होंच वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२॥ शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण । सस्वरूपी विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३॥ सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचे निर्शन । अद्वयनिश्चयाचे ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥ ३४॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अबुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्चितार्थ । आणी संबळ वेथ । द्वैत कल्पी॥ ३६॥ अद्वैतकल्पना प्रकाशे । तेचि क्षणी द्वैत नासे। द्वैतासरिसी निरसे। प्रबळं कल्पना ॥ ३७॥ AC १ आपाआप. २ सांपडेतो. ३ शबल, ४ स्वस्वरूपी. ५ निरसन, निवारण. SHA ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [५४ कल्पनेने कल्पना सरे। ऐसी जाणावी चतुरें। सबळ गेलिया नंतरें । शुद्ध उरली ॥ ३८॥ दा. ७. ५.२.१-३८. ५५. " निर्विकल्पास कल्यावें। कल्पना मोडे स्वभावें." असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम। अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥४७॥ आपुलेन अनुभवें । कल्पनेसि मोडावें। मग सुकाळी पडावें । अनुभवाचे ॥४८॥ निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें। मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥ कल्पनेचें येक बरें । मोहरितांच मोहरे। स्वरूपी घालितां भरे । निर्विकल्पी ॥ ५० ॥ निर्विकल्पासी कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता । निःसंगाल भेटों जातां । निःसंग होइजे ॥५१॥ पदार्था ऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हाती धरोनि द्यावें। असो हे अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥५२॥ . . दा. ७. ३. ४७-५२. ५६. खोटें ध्यान व खरें ध्यान. अखंड ध्यानाचे लक्षण । अखंड देवाचे स्मरण। याचे कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४॥ सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष । आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानी धरिती ॥ २५ ॥ १खुलवितांच. ________________

६ ५६ ] - साक्षात्कार. परी तें धरितांहि धरेना । ध्यानी येती बेक्ति नाना। उगेंच कष्टती मना । कासाविस करूनी ॥ २६॥ मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें येकाचं येकचि दिसे। भासों नये तेंचि भासे । विलक्षण ॥ २७ ॥ ... ध्यान देवाचें करावें । किंवा देवाल्यांचं करावें। होंच बरें विवरांवें । आपले ठाई ॥२८॥ देह देऊळ आत्मा देव । कोठे धरूं पाहातां भाव । देव वोळखोन जीव । तेथेचि लावावा ॥ २९ ॥ .. . अंतरनिष्ठा ध्यान ऐसें । दंडकध्यान अनारिसें। प्रत्ययविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥३०॥ अनुमाने अनुमान वाढे । ध्यान धरितां सोंच मोडे। .. उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥३१॥ ... देवास देहधारी कल्पिती । तेथे नाना विकल्प उठती। भोगणे त्यागणे विपत्ति । देहयोगें ॥३२॥ ऐसें मनी आठवते । विचारिता भलतेंचि होतें। दिसों नये ते दिसते। नाना स्वमीं ॥ ३३॥ दिसतें तें सांगतां नये । बळें भावार्थ धरितां नये। साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन। मनामधे विकल्पदर्शन । होऊच नये ॥ ३५ ॥ फुटके मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें। तेथे कोण सार्थक जालें पाहाना मां ॥३६॥ १ व्यक्ति. २ देवालयाचें. ३ रूढींचें. ४ निराळे. ५ फुटकें.. - - - --- - -- - -- - - - - -- - - Hin ________________

रामदासवचनामृत दासबोध. [$ ५६ अखंड ध्याने न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें तें कोण । ध्यानी आठवतें तें कोण। दोनीमधे अनन्यलक्षण । आसिल पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९॥ ऐसी हे प्रत्ययाची कामें । प्रत्ययेविण बाधिजे भ्रमें। लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४०॥ दंडकध्यानाचे लक्षण । धरून बैसलें अवलक्षण । प्रमाण आणी अप्रमाण । बाजारी नेणती ॥४१॥ मिथ्या समाचार उठविती । वाउग्याच बोंबा घालिती। मनास आणितां अंतीं । आवघेचि मिथ्या ॥४२॥ कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणी येक सिकवी त्याला मुकुट काढोनि माळ घाला । म्हणजे बरें॥४३॥ मनाचेथे काये दुष्काळ । जे आखुड कल्पिली माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जाणावे ॥४४॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती। दोरे फुलें गुंफावी न लगती। कल्पनेचि माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥ बुद्धीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मूर्खासी खळखळ । कोणे करावी ॥४६॥ जेणें जैसा परमार्थ केला । तेसाचि'पृथ्वीवरि दंडक चालिला। साता पांचाचा बळावला । साभिमान ॥४७॥ - - १ बाजारबुणगे. २ कोटी, लहान. ३ गलबला. ________________

६५.] साक्षात्कार. प्रत्ययेविण साभिमान । रोगी मारिले झांकून। तेथे अवघाचि अनुमान । ज्ञान कैंचें ॥४८॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । • मायापूर्वपक्ष खंडावा । विवेकवळें ॥४९॥ दा. १४. ८. २४-४९. ६७. साधकलक्षण. जो संतांसी शरण गेला । संतजनी आश्वासिला। मग तो साधक बोलिला। ग्रंथांतरीं ॥ ३॥ उपदेशिले आत्मज्ञान । तुटले संसारबंधन। दृढतकारणे करी साधन । या नांव साधक ॥४॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी। मननें अर्थातर काढी। या नांव साधक ॥ ५ ॥ होतां सारासारविचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तरं । आत्मज्ञान पाहे ॥६॥ नानासंदेहनिवृत्ती। व्हावया धरी सत्संगती। आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसि आणी ॥ ७॥ देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सहढ धरी। श्रवण मनन केलेंचि करी। या नांव साधक ॥ ८॥ विसंचूंनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥९॥ तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधने साधी । लावी ऐक्यतेची समाधी। या नांव साधक ॥१०॥ .. १ दृढतर. २ नाहीसे करून. STOT - ________________

HTTTTTT-mm रामदासवचनामृत-दासबोध. [५. आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार।। विवेके पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११ ॥ उत्तमें साधूची लक्षणे । अंगिकारी निरूपणें । बळेचि स्वरूपाकार होणे । या नांव साधक ॥ १२ ॥ असत्क्रिया ते सोडिली । आणी सक्रिया ते वाढविली। स्वरूपस्थिती बळावली । या नांव साधक ॥ १३ ॥ अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास। स्वरूपी लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४ ॥ दृढीनश्चयोचनि बळें । दृश्य असतांच नाडळे । सदा स्वरूपी मिसळे । या नांव साधक ॥ १५ ॥ प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं। आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥१६॥ जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें। तेंचि जेणे दृढ केलें । या नांव साधक ॥ १७ ॥ जें बोलतांचि वाचा धरी । जे पाहातांचि अंध करी। तें साधी नानापरी । या नांव साधक ॥१८॥ जे साधूं जातां साधवेना ।जें लहूं जातां लक्षवेना । तेंचि अनुभवे आणी मना । या नांव साधक ॥ १९॥ जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे। तेंचि अनुभवा आणी बळें । या नांव साधक ॥२०॥ स्वानुभवाचेनि योगें। वस्तु साधी लागवेगें। तेचि वस्तु होये आंगें । या नांव साधक ॥ २१॥ अनुभवाची आंगे जाणे । योगियांचे खुणे बाणे। कांहींच न होन असणे। या नांव साधकः ॥२९॥ ________________

९९ ५७] साक्षात्कार. परती सारून उपाधी । असाध्य वस्तु साधने साधी। स्वरूपी करी दृढबुद्धि । या नांव साधक ॥ २३ ।। देवाभक्तांचे मूळ । शोधून पाहे सकळ । साध्यचि होये तत्काळ । या नांव साधक ॥ २४ ॥ विवेकबळे गुप्त जाला । आ–आप मावळला। दिसतो परी देखिला । नाहींच कोणी ॥ २५ ॥ मीपण मागे सांडिलें । स्वयें आपणांस धुंडिलें। तुर्येसहि वोलांडिलें । या नांव साधक ॥ २६ ॥ पुढे उन्मनीचा शेवटीं । आपली आपण अखंड भेटी। अखंड अनुभवी ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७॥ द्वैताचा तटको तोडिला । भासाचा भास मोडिला। देही असोनि विदेह झाला । या नांव साधक ॥ २८ ॥ जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती। सकळ संदेहनिवृत्ती। या नांव साधक ॥ २९ ॥ पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वनाकार । निर्गुणी जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३०॥ . स्वप्नी भये जे वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें। सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१ ॥ निद्रा सांडूनि चेइरो जाला । तो स्वमभयापासून सुटला। माया सांडून तैसा गेला। साधक स्वरूपी ॥ ३३ ॥ ऐसी अंतरस्थिती बाणली। बाद्य निस्पृहता अवलंबिली। संसारउपाधी त्यागिली। या नांव साधक ॥ ३४॥ १ संबंध. २ जागा. ________________

INnar रामदासवचनामृत-दासबोध. $ ५.०० कामापासून सुटला । क्रोधापासूनि पळाला। मदमत्सर सांडिला । एकीकडे ॥ ३५ ॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें । परमार्थास माजविलें । विरक्तिवळें ॥ ३६॥ अविद्येपासून फडकला । प्रपंचापासून निष्टला . लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥ थोरपणासि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें। महत्वासि झिंजोडिलें । विरक्तिबळें ॥ ३८॥ भेदाचा मडघा मोडिला। अहंकार सोडूनि पाडिला । पाई धरूनि आपटिला । संदेहशत्रु ॥ ३९ ॥ विकल्पाचा केला वधु । थापें मारिला भवसिंधु । सकळ भूतांचा विरोधु । तोडून टाकिला ॥ ४०॥ भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगे मोडिलें। मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥४१॥ अभ्यासाचा संग धरिला। साक्षपासरिसा निघाला। प्रेत्न सांगाती भला । साधनपंथें ॥ ५५ ॥ दा. ५. ९. ३-५५.. ५८. सख्यभक्तिनिरूपण. मागां जालें निरूपण । सातवे भक्तीचे लक्षण । आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥१॥ देवासी परमसख्य करावें । प्रेम प्रीतीने बांधावें। आठवे भक्तीचे जाणावें । लक्षण ऐसें ॥२॥ १ निराळा झाला. २ निसटला. ३ फेंकून दिले. ४ प्रयत्न, ________________

५८] । साक्षात्कार. देवास जयाची अत्यंत प्रीति । आपण वर्तावें तेणे रीती। येणेकरितां भगवंतीं। सख्य घडे नेमस्त ॥ ३॥ भक्ति भाव आणी भजन । निरूपण आणी कथाकीर्तन। प्रेमळ भक्तांचे गायन । आवडे देवा ॥४॥ आपण तैसेचि वावें । आपणांसि तेच आवडावें। मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥५॥ . देवाच्या सख्यत्वाकारणें। आपले सौख्य सोडून देणें। अनन्यभावे जिवे प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६॥ . सांडून आपली संसारवेथा.। करित जावी देवाची चिंता। निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचिं सांगाव्या ॥७॥ देवाच्या सख्यत्वासाठीं। पडाव्या जिवलगांसी तुटी। सर्व अर्पा सेवटीं। प्राण तोहि वेंचावा ॥ ८॥ आपुलें अवघेचि जावें। परी देवासी सख्य राहावें। ऐसी प्रीती जीवें भावें । भगवंती लागावी ॥९॥ देव मणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावें निर्वाण । परम प्रीतीचे लक्षण । तें हैं ऐसें असे ॥ १०॥ ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता। पांडव लाखाजोहरी जळतां । विवरद्वारे काढिले ॥११॥ देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं। आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२ ॥ आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे। आपण त्रास घेतां जीवें । देवहीं त्रासे ॥१३॥ १ अमीत. २ प्रत्युत्तरें. ________________

१०२ रामदासवचनामृत-दासबोध. [५८ “ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । १ । जैसें जयाचें भजन । तैसाचि देवही आपण । म्हणौन हे अवघे जाण । आपणाचिपासीं ॥ १४ ॥ आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५॥ मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना। चंद्र वेळेसि उगवेना । तरी चकोर अनन्य ॥ १६ ॥ ऐसे असावें सख्यत्व । विवेके धरावें सत्व। भगवंतावरील ममत्व । सांडूंचि नये ॥ १७॥ सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत। विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८॥ देवावेगळे कोणी नाहीं । ऐसें बोलती सर्वही। परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९॥ म्हणोनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें। अंतरीं सदृढ धरावें । परमेश्वरासी ॥२०॥ आपुलिया मनोगताकारणे । देवावरी क्रोधास येणें । ऐसी नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ॥ २१ ॥ देवाचे जे मनोगत । तेंचि आपुले उचित । इच्छेसाठी भगवंत । अंतरूं नये की॥ २२ ॥ देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें। मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३ ॥ पहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी । माता वधी बाळकासी। विपत्तिकाळीं ॥ २४॥ ________________

। ६५९] साक्षात्कार. देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला। शरणगतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५ ॥ देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी। देव होय साहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥ देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धांविनला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणे ॥ २७ ॥ . देव कृपेचा सागर । देव करुणेचा जळधरु। देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८ ॥ देव प्रीती राखों जाणे । देवासि करावें साजणें। जिवलगें आवघीं पिसुणे । कामा न येती ॥ २९॥ सख्य देवाचें तुटेना। प्रीति देवाचि विटेना। देव कदा पालटेना। शरणागतांसी ॥ ३०॥ म्हणोनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें। आठवें भक्तीचे जाणावें। लक्षण ऐसें ॥३१॥ जैसा देव तैसा गुरू । शास्त्रीं बोलिला हा विचारू । म्हणौन सख्यत्वाचा प्रकारू । सद्गुरूसी असावा ॥ ३२ ॥ ___दा, ४. ८. ५९. आत्मनिवेदनभक्ति. महापूजेचा अंतीं । देवास मस्तक वाहाती। तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची॥९॥ आपणास निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती। तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो॥ १०॥ १ सख्य. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [६५९ आपणांस कैसे निवेदावें। कोठे जाऊन पडावें। किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥ ऐसें ऐकोन बोलणें। वक्ता बदे सर्वज्ञपणे । श्रोतां सावधान होणें । एकाग्रचित्तें ॥ १२॥ आत्मनिवेदनाचे लक्षण । आधी पाहावें मी कोण । मग परमात्मा निर्गुण । तो ओळखावा ॥ १३ ॥ देवाभक्ताचे शोधन । करितां होतें आत्मनिवेदन । देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥ देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता। देवभक्तविभक्तता । मुळीच नाहीं॥ १५॥ विभक्त नाही म्हणोन भक्त । बंद्धन नाही म्हणोनि मुक्त। अयुक्त नाहीं बोलणे युक्त । शास्त्राधारे ॥ १६ ॥ देवाभक्ताचे पाहातां मूळ । होये भेदाचे निर्मूळ । येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥ तयासि होतां मिळणी । उरी नाही दुजेपणीं। देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥१८॥ आत्मनिवेदनाचे अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती।। तये नांव सायोज्यमुक्ती। सत्य जाणावी ॥१९॥ जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरोपणे बोधला। मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २०॥ नदी मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी । लोहो सोने होतां माघारीं । काळिमा नये ॥२१॥ १ बंधम. २ मेदबुद्धि. ________________

__ १०५ .६० ] साक्षात्कार. तैसा भगवंती मिळाला । तो न बचे वेगळा केला। देव भक्त आपण जाला। विभक्त नव्हे ।। २२ ॥ देव भक्त दोनी येक । ज्यासी कळला विवेक । साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥ आतां असो हे बोलणें । देव पहावा भक्तपणे । तेणे त्याचे ऐश्वर्य वाणे । तत्काळ आंगीं ॥ २४॥ ___ दा. ८. ८. ९-२४. ६०, आत्मनिवेदन म्हणजेच आत्मज्ञान. आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें। आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ ३९ ॥ आधी अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन । पुढे आत्मानिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥ आत्मनिवेदनाउपरी । निखळ वस्तु निरंतरीं । आपण आत्मा अंतरीं । बोध जाला ॥४१॥ त्या ब्रह्मबोधे ब्रह्मचि जाला । संसारखेद तो उडाला। देहो प्रारब्धी टाकिला । सावकास ॥ ४२ ॥ यासी म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न । भक्तचि जाला ॥४३॥ आता होणार तें होयेना कां । आणि जाणार तें जायेना कां। तुटली मनांतील आशंका। जन्ममृत्याची ॥ ४४ ॥ संसारीं पुंडावें चुकलें । देवां भक्तां ऐक्य जालें। मुख्य देवास वोळखिलें । सत्संगेंकरूनि ॥४५॥ .. - दा. ६. २. ३९-४५. १ येरझारा करणे. ________________

१०६ रामदासवचनामृत-दासबोध. ६१. मुक्तिचतुष्टयनिरूपण. येथे ज्या देवाचे भजन करावें । तेथे ते देवलोकी राहावें। सलोकता मुक्तीचे जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३ ॥ लोकी राहावें ते सलोकता। समीप असावे ते समीपता। स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता । तिसरी मुक्ती ॥ २४ ॥ देवस्वरूप जाला देही। श्रीवत्स को तुभ लक्ष्मी नाहीं। स्वरूपतेचे लक्षण पाही । ऐसें असे ॥ २५॥ सुकृत आहे तो भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती। आपण देव ते असती। जैसे तैसे ॥ २६ ॥ म्हणोनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ति ते शाश्वत है। तोहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥ ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती । तेव्हां अवधेच देव जाती। मां मुक्ति कैच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति तेही अचळ । सायोज्यमुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥२९॥ __ दा. ४.१०. २३-२९, ६२. जीवन्मुक्तलक्षण. मागां जालें निरूपण । देखिलें आपणासि आपण। तेणे बाणली खूण । परमार्थाची ॥७॥ तेणें समाधान जालें । चित्त चैतनी मिळालें। निजस्वरूपें वोळखिलें । निजवस्तुसी ॥ ८॥ १ मग. २ चैतन्यांत, आत्मस्वरूपात. ________________

६६२] - साक्षात्कार. १०७ -- -- । प्रारब्धी टाकिला देहो । बोधे फिटला संदेहो। आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कळीवर ॥९॥ ज्ञानियांचे जे शरीर । तें मिथ्यत्वे निर्विकार । जेथे पडे तेंचि सार । पुण्यभूमी ॥ १० ॥ साधुदर्शने पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ। साधु न येतां जिणे वेर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥११॥ पुण्यनदीचे जें तीर । तेथे पडावें शरीर। हा इतर जनाचा विचार । साधु तो नित्यमुक्त ॥ १२ ॥ उत्तरायेण ते उत्तम । दक्षणायेन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेह ॥१३॥ शुक्लपक्ष उत्तरायेण । गृहीं दीप दिवा मरण । अंती राहावें स्मरण । गतीकारणें ॥१४॥ इतुकें नलगे योगियासी । तो जीतचि मुक्त पुण्यरासी । तिळांजुळी पापपुण्यासी। दिधली तेणें ॥ १५ ॥ देहाचा अंत बरा आला। देह सुखरूप गेला। त्यासी म्हणती धन्य जाला । अज्ञान जन ॥ १६ ॥ जनाचे विपरीत मत । अंती भेटतो भगवंत। ऐसें कल्पून धात। करिती आपुला स्वयें ॥१७॥ जितां सार्थक नाहीं केलें । वर्थ आयुष्य निघोन गेलें । मुळी धान्येचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैचें ॥ १८ ॥ जरी केलें ईश्वरभजन । तरीच होईजे पाचन ।। जैसें वेव्हारितां धन । ससि माथां लागे ॥ १९॥ . १ कलेवर, शरीर. २ राशि. ________________

N -२०० रामदासवचनामृत-दासबोध. [६६३ दिधल्याविण पाविजेना। पेरिल्याविण उगवेना। ऐसें हे वाक्य जना । ठाउकेंचि आहे ॥२०॥ न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठे मुशारा। तैस अंती अभक्त नरां । स्वहित न घडे ॥ २१ ॥ जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती। असो जे जे जैसें करिती। ते ते पावती तैसें ॥ २२ ॥ एवं न करितां भगवद्भजन । अंती नहीजे पावन । जरी आलें बरें मरण । तरी भक्तीविण अधोगती ॥ २३ ॥ म्हणोन साधूनें आपलें । जीत अस्तांच सार्थक केलें। शरीर कारणी लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥ जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचे शरीर पडो रानी। अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य जालें ॥ २५ ॥ साधूचा देह खितपला । अथवा श्वानादिकी भक्षिला। हे प्रशस्त न वाटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥ अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन । परी बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्य येईल कैंचा। विवेकबळें जन्ममृत्याचा । घोट भरिला जेणें ॥ २८ ॥ स्वरूपानुसंधानबळें । सगळी मायाच नाडळे। तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९ ॥ तो जीतचि असतां मेला । मरणास मारून ज्याला । जन्ममृत्य न स्मरे त्याला। विवेकबळें ॥३०॥ १ पगार. २ न होईजे. ३ घुटका. ४ सांपडत नाही. ५ जगला. ________________

531 साक्षात्कार. - - - SNN तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा। दृश्यपदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥ .... होती. दा. ७. १०, ७-३१. ६३. “ साधन सोडिता होये । मुक्तपणे बद्ध." मी तों ब्रह्मचि जालों स्वतां । साधन कोण करील आता है. ऐसे मनी कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४॥ ब्रह्मीं कल्पना न साहे। तेचि तेथे उभी राहे। . तयेसि शोधून पाहे । तोचि साधु ॥ ५५॥ निर्विकल्पासी कल्पावें । परी कल्पिते आपण न व्हावें । मीपणासी त्यागावें । येणें रिती ॥ ५६ ॥ या ब्रह्मविद्येच्या लंपणी । कांहींच नसावें असोनि । दक्ष आणी समाधानी । तोच हे जाणे ॥ ५७ ॥ जयासी आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें। तेथें कल्पनेच्या नांवें । सुन्य आलें ॥ ५८॥ पदींहून चळों नये । करावे साधन उपाये। तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची॥ ५९॥ राजा राजपदी असतां । उगीच चाले सर्व सत्ता। साध्यचि होऊन तत्वता । साधन करावें॥ ६०॥ साधन आले देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा। ऐसा करूनि अकर्ता । सहजचि जाला ॥ ६१ ॥ देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत अस्तां स्वभावें । देह कैंचा ॥२॥ . १ लपंडाव. ________________

"११० रामदासवचनामृत-दासबोध. [६७ ना ते साधन ना तें देह । आपला आपण निःसंदेह । देहींच असोन विदेह- स्थिति ऐसी ॥ ६३ ॥ साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता। आळस प्रबळे तत्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४॥ परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे। मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥६५॥ निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें वेवाद पडे । उपाधीमिसें येऊन जडे । अभिमान आंगीं ॥६६॥ तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे। म्हणे साधनाचें पिसे । काय करावे ॥ ६७ ॥ " किं करोमि व गच्छामि किं गृण्हामि त्यजामि किम्। आत्मना पूरितं सर्व महाकल्पांबुना यथा " ॥१॥ वचन आधारी लाविलें । जैसे शस्त्र फिरविलें। स्वता हाणोन घेतलें । जयापरी ॥ ६८॥ तैसा उपायाचा अपाये । विपरीतपणे स्वहित जाये। साधन सोडितां होये । मुक्तपणे बद्ध ॥६९॥ साधन करितांचि सिद्धपण । हातींचे जाईल निघोन । तेणें गुणें साधन । करूंच नावडे ॥ ७० ॥ लोक म्हणती हा साधक । हेचि लज्या वाटे येक। साधन करिती ब्रह्मादिक । हे ठाउकें नाहीं ॥७१ ॥ दा. ७. ७.५४-७१. ६४. “कुल्लाळ पावला राज्यपदवी। आतां रासमें कासया राखावी." साधनें जें कांहीं साधावें । तें तों आपणचि स्वभावें। आतां साधकाच्या नावें । सुन्याकार ॥ १७॥ १ मिषाने. २ यथेच्छ वर्तणूक. ३ सलोखा. ४ पेड, ________________

६.] साक्षात्कार. १११ कुल्लाळ पावला राज्यपदवी । आतां रासमें कासया राखावी। कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥ तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनाचा उपाव । साध्य जालियां कैंचा ठाव । साधनासी ॥१९॥ साधने काय साधावें । नेमें काये फळ ध्यावें । आपण वस्तु, भरंगळोवें । कासयासी ॥ २० ॥ देह तरी पांचां भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा । परमात्मा तरा अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥ उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेतां कांहींच नसे । तत्वे तत्व निरसें। पुढे निखळ आत्मा ॥ २२ ॥ आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणे। माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥ ऐसें अवघेचि आहे । आणी आपणही कोणीयेक आहे। हे सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥ शोधू जाणे सकळांसी। परी पाहों नेणे आपणांसी। ऐसा ज्ञानी येकदेसी। वृत्तिरूपें ॥ २५ ॥ ते वृत्तिरूप जरि पाहिलें । तरी मग काही नाही राहिलें। प्रकृतिनिरासें अवघेचि गेलें। विकारवंत ॥ २६॥ उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण। ऐसी हे परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७॥ फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक। फळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे॥२८॥ १ मटकावे. २ निघून जाते. ३ शुद्ध. ४ एकदेशी, अपूर्ण. ________________

११२ __ रामदासवचनामृत-दासबोध. [६.६४. रंक होता राजा झाला । बरं पाहातां प्रत्ययो आला। रंकपणाचा गल्बला । रंकी करावा ॥२९॥ वेदशास्त्रे पुराणें । नाना साधनें निरूपणें । सिद्ध साधु ज्याकारणें । नाना सायास करितो ॥ ३०॥ तें ब्रह्मरूप आपणाच आंगें । सारासारविचारप्रसंगें। करणे न करणे वाउगें । कांहींच नाहीं ॥३१॥ रंक राजआज्ञेसि भ्यालें । तेंचि पुढे राजा जालें। मग ते भयेचि उडालें। रंकपणासरिसें ॥ ३२ ॥ वेदें बेदाज्ञेनें चालावें । सच्छास्त्रे शास्त्र अभ्यासावें। तीर्थे तीर्थास जावें । कोण्या प्रकारें ॥ ३३ ॥ अमृतें सेवावें अमृत । अनंते पाहावा अनंत । भगवंतें लक्षावा भगवंत । कोण्या प्रकारें ॥ ३४ ॥ संतें असंत त्यागावें । निर्गुणें निर्गुणासी भंगावें। स्वरूपं स्वरूपी रंगावें। कोण्या प्रकारे॥ ३५॥ अंजने ल्यावें अंजन । धनें साधावें धन । निरंजनें निरंजन। कैसें अनुभवावें ॥ ३६॥ साध्य करावें साधनासी । ध्येय धरावें ध्यानासी । उन्मनें आवरावें मनासी । कोण्याप्रकारें ॥ ३७॥ दा. ९. १०. १७-३७. ६५. साक्षात्कार झाला हे कशावरून ओळखावें ? पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली। ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥२१॥ १ साध्याने. २ ध्यान. ________________

६६६] - साक्षात्कार. ११३ परमेश्वरास वोळखिलें । आपण कोणसे कळले।। आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥ ब्रह्मांड कोण केलें । कासयाचे उभारिलें। मुख्य कास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥ येथे अनुमान राहिला। तरी परमार्थ केला तो वायां गेला । प्राणी संशई बुडाला। प्रचितीविण ॥ २४ ॥ हे परमार्थाचें वर्म । लटिकें बोलेल तो अधम । लटिकें मानील तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥ येथे बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा । असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥ माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावे साचार। मिथ्या बोलता उत्तर । प्रभूस लागे ॥ २७ ॥ म्हणौनि सत्यचि बोलिलें । कास पाहिजे वोळखिलें। मायोद्भवाचे शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥ दा. १०. ८. २१-२८. ६६. योग्यांच्या गुप्तधनाचे वर्णन. गुप्त आहे उदंड धन । काय जाणती सेवक जन। तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचें ॥१॥ गुप्त ठेविले उदंड अर्थ । आणी प्रगट दिसती पदार्थ । शाहाणे शोधिती स्वार्थ । अंतरी असे ॥२॥ तैसें दृश्य हे माईक । पाहात असती सकळ लोक। परी जयांस ठाउका विवेक । ते तदनंतर जाणती ॥३॥ १ थोरपणा. २ शब्द. ३ तदंतर, त्यांचे रहस्य. ________________

११४ रामदासवचनामृत-दासबोध. ६६ द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें । तयाचें अभ्यांतर कळलें । समर्थ जनासी ॥४॥ तैसे ज्ञाते ते समर्थ । तोहें वोळखिला परमार्थ । इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थाचा ॥ ५॥ काबाडी वाहाती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड। हे जयाचे तयास गोड । कर्मयोगें ॥६॥ येक काष्ठस्वार्थ करिती । येक शुभा येकवाटिती। तैसे नव्हेत की नृपती । सारभोक्ते ॥ ७॥ जयांस आहे विचार । ते सुकासनी जाले स्वार । इतर जवळिल भार । वाहताच मेले ॥८॥ येक दिव्यान्ने भक्षिती। येक विष्ठा सावड़िती। आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥९॥ सार सेविजे श्रेष्ठीं। असार घेइजे वृथापृष्टी । साराअसाराची गोष्टी। सज्ञान जाणती ॥१०॥ गुप्त परीस चिंतामणी । प्रगट खडे कांचमणी । गुप्त हेमरत्नखाणी । प्रगट पाषाण मृतिका ॥ ११ ॥ अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पति अमोल । येरंड धोत्रे बहुसाल । प्रगट सिंपी॥१२॥ कोठे दिसेना कल्पतरु । उदंड सेरांचा विस्तारु । पाहातां नाहीं मळियागरु । बोरि बाभळा उदंडी ॥ १३ ॥ कामधेनु जाणिजे इंद्रे । सृष्टींत उदंड खिल्लारें। महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतर कर्मानुसार ॥ १४॥ १ गोवऱ्या. २ एकत्र करितात. ३ मुख सनीं. ४ वृथापुष्ट. ५ उजवीकडच्या तोंडाचा ६ शेर, चंदन, ८ पुष्कळ. ________________

६६५] साक्षात्कार. ११५ नाना व्यापार करिती जन । आवघेचि म्हणती सकांचन । परंतु कुबेराचें महिमान । कोणासीचि नये ॥ १५ ॥ तैसा ज्ञानी योगेश्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्वर । इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥१६॥ तस्मात् सार तें दिसेना। आणी असार तें दिसे जना। सारासार विवंचना । साधु जाणती ॥ १७॥ इतरांस हे काय सांगणें । खरे खोटें कोण जाणे। साधुसंतांचिये खुणे । साधुसंत जाणती ॥ १८॥ दिसेना में गुप्त धन । तयासि करणे लागे अंजन । गुप्त परमात्मा सज्जन-। संगतीं शोधावा ॥ १९॥ रायाचे सन्निध होतां । सहजचि लाभे श्रीमंतता। तसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥२०॥ . दा. ६. २. १-२०. ६७. अनुभवाचे उलट सुलट प्रकार. तें आठवितां विसरिजे। कां ते विसरोनि आठविजे। जाणोनियां नेणिजे । परब्रह्म ते॥१९॥ त्यास न भेटतां होये भेटी । भेटों जातां पडे तुटी। ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥२०॥ ते साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना। लागला संमंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥ ते असतचि सदा असे । नातरी पाहातां दुरासे। न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥ १ दूर असे. .. . HT E T . - I ________________

११६ रामदासवचनामृत-दासबोध. [६५. जेथें उपाये तोचि अपाये । आणी अपाये तोचि उपाये। हे अनुभवेंविण काये । उमजों जाणे ॥ २३ ॥ दा. ७. ७. १९-२३. ६८. " जैसा भाव जयापासीं । तैसा देव तयासी." जैसा भाव जयापासीं। तैसा देव तयासी। जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्रांचा ॥ १३ ॥ जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक। नवल तयाचे कौतुक । जैशास तैसा ॥ १४ ॥ जैसें जयाचें भजन । तैसेंचि दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणही दुरावे ॥ १५ ॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैशास तैसें भासे। तयाचे सूत्र असे । आपणाचपासीं ॥१६॥ जसे आपण करावें । तैसेचि तेणे व्हावें। जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंहि टवकारे ॥ १७ ॥ भृकुटीस घालोनि मिठी । पाहातां क्रोधे तेंहि उठी। आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥ जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला। जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥१९॥ दा. ३. १०. १३–१९. ६९. परमार्थवर्णन. आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ । नांतरी समर्थामध्ये समर्थ। योग हा ॥१॥ खोटा. ________________

- ६९] . साक्षात्कार. आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम। कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥ नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥३॥ आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे । उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥४॥ आकाशमार्गी ग्रप्त पंथ । जाणती योगिये समर्थ। इतरांस हा गुह्यार्थ। सहसा न कळे ॥ ५॥ साराचेही निजसार । अखंड अझै अपार। नेऊ न सकती तश्कर । कांही केल्या ॥६॥ तयासि नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये। अथवा स्वापदभये । बोलोंच नये ॥७॥ परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना। काळांतरी चळेना । जेथींचा तेथें ॥८॥ ऐसें तें निज ठेवणें । कदापी पालटों नेण । अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥९॥ अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना।। नातरी पहातां दिसेना । गुरुअंजनेंविण ॥१०॥ मागा योगये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ । यासी बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥११॥ जेंहीं शोधून पाहिला । त्यांसी अर्थ सांपडला। येरां असोनि अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२ ॥ १ सदोदित. २ चोर. ३ जागा. ४ अधिक.५ झिजेमा. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची। आणी पदवी सायोज्यतेची। सन्निधची लाभे ॥ १३ ॥ माया विवेके मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४ ॥ ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड। पंचभूतांचे थोतांड । तुच्छ वाटे ॥ १५॥ प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका। शुद्ध आत्मा विवेका । अंतरीं आला ॥ १६ ॥ ब्रह्मास्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी । दृश्याची जुनी जर्जरी। कुहिट जाली ॥१७॥ ऐसा हा परमार्थ। जो करी त्याचा निजस्वार्थ । आतां या समर्थास समर्थ। किती म्हणोनि म्हणावें ॥ १८ ॥ या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता। योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥ परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां । सेखीं सात्विक जडजीवां । सत्संगेंकरूनि ॥ २० ॥ परमार्थ जन्माचे सार्थक । परमार्थ संसारीं तारक। परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥ परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार । परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २१॥ परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी। या परमार्थाची सरी । कोणांस द्यावी ॥ २३ ॥ - ____ १ लपंडाव, मिथ्या. २ विटली. ३ शेवटी. ________________

११९ ६७.] साक्षात्कार. अनंत जन्मींचे पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे । मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४ ॥ दा. १.९. १.२४. ७०. प्रचीतिनिरूपण, तें हैं दृश्य नासिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥ में शस्त्रे तोडितां तुटेना । जे पावकें जाळितां जळेना । कालवितां कालवेना। आपेंकरुनी ॥१६॥ में वायोचेनि उडेना । जे पडेना ना झडेना । जें घडेना ना दडेना । परब्रह्म ते ॥ १७॥ ज्यासी वर्णचि नसे । जें साहूनि अनारिसें। परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८॥ दिसेना तरी काय जालें। परंतु तें सर्वत्र संचलें। सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथे तेथें ॥ १९॥ दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पाहावें। परंतु गुज तें जाणावें । गोप्य आहे ॥ २०॥ प्रगट तें जाणावें असार । आणी गुप्त तें जाणावें सार । गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥२१॥ जें उमजेना तें उमजावें । जें दिसेना ते पाहावें। जे कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२ ॥ गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें ॥ कॉनडेंचि अभ्यासावें। सावकाश ॥२३॥ १ संवय. २ गौप्य, गुप्त. ३ कठीण, ________________

१२० रामदासवचनामृत-दासबोध. वेद विरंची आणी शेष । जेथें सिणले निशेष । तेंचि साधावें विशेष । परब्रह्म तें ॥२४॥ तरी ते कोणेपरी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें। अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५ ॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे । वर्णवक्त ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६॥ तयास म्हणावे देव । वरकड लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव । जनाकारणे ॥ २७॥ दा. ६. २. १५-२७. ७१. विमळब्रह्मनिरूपण. ब्रह्म नभाहून निर्मळ । पाहातां तैसेंचि पोकळ । अरूप आणि विशाळ । मर्यादेवेगळें ॥१ येकवीस स्वर्गे सप्त पाताळ । मिळोन येक ब्रह्मगोळ । ऐसी अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २॥ अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतं । तेणवण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥३॥ जळी स्थळी काष्ठी पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी। तेणेंविण रिता प्राणो । येकही नाहीं ॥४॥ जळचरांस जैसे जळ । बाह्याभ्यांतरी निखळ । तैसें ब्रह्म हे केवळ । जीवमात्रांसी॥५॥ जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां नये। . म्हणौनि उपमा न साहे । जळाची तया ॥६॥ १ ब्रह्मदेव. २ व्यक्ति. ३ निखिल, पूर्णपणे. ________________

साक्षात्कार. १२१ आकाशाबाहेरी पळों जातां । पुढे आकाशेंचि तत्वतां । तैसा तया अनंता। अंतचि नाहीं ॥ ७॥ परी जें अखंड भेटले । सर्वांगास लिगटले । अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥८॥ तयामधेचि असिजे । परी तयास नेणिजे। उमजे भास नुमजे । परब्रह्म ते॥९॥ आकाशामधे आभाळ । तेणं आकाश वाटे डहुंळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १० ॥ नेहार देतां आकाशीं । चक्रे दिसती डोळ्यांसी। तसे दृश्य ज्ञानियांसी। मिथ्यारूप ॥ ११ ॥ मिथ्याचि परी आभासे । निद्रिस्तांस स्वप्न जैसें । जागां जालियां अपैसें । बुझो लागे ॥१२॥ तैसें आपुलेन अनुभवें । ज्ञाने जागृतीसि यावें। मग माईक स्वभावें । कळों लागे ॥ १३॥ आतां असो हे कुवाडे । जें ब्रह्मांडापलीकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोन दाऊं ॥१४॥ ब्रह्म ब्रह्मांडी कालवलें । पदार्थासी व्यापोन ठेलें। सर्वामधे विस्तारलें। अंशमात्रं ॥१५॥ ब्रह्मामधे सृष्टि भासे। सृष्टिमधे ब्रह्म असे। अनुभव घेतां आभासे । अंशमात्र ॥१६॥ अंशमाने सृष्टीभीतरी । बाहेरी मर्यादा कोण करी। सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । माईल कैसें । १७॥ १ गढूळ. २ दृष्टि. ३ आपोआप. ४ समजों. ५ को.. ६ निश्चयानें. ________________

१२२ रामदासवचनामृत-शासबोध. [$७१ अमृतीमधे आकाश । सगळे साठवितां प्रयास । म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो॥१८॥ ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें। सर्वामधे परी संचलें । संचलेपणे ॥ १९ ॥ पंचभूती असे मिश्रित । परंतु ते पंचभूतातीत । पंकी आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥ ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणे घडे। परी दृष्टांती साहित्य पडे । विचारिता आकाश ॥ २१ ।। खंब्रह्म ऐसी श्रुती। गगनसदृशं हे स्मृती। म्हणोनि ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥ काळिमा नस्तां पितळ । मग तें सोनेंचि केवळ । सुन्यत्व नस्तां निवळ । आकाश ब्रह्म ।। २३ ॥ म्हणोनि ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन। आडळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा। परंतु ते स्थिरावेना । वायुच ऐसी ॥ २५ ॥ असो ऐसी माया माईक । शाश्वत तें ब्रह्म येक। पाहों जातां अनेक । व्यापून आहे ॥ २६॥ पृथ्वीसी भेदून आहे । परी तें ब्रह्म कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदत्वासी ॥२७॥ पृथ्वीहूनि मृद जळ । जळाहूनि तो अनळ । अनळाहूनि कोमळ । वायो जाणावा ॥२८॥ १ गिंडी. २ समजावयासाठी. ३ सामग्री. ________________

६ ७१] साक्षात्कार. वायोहून ते गगन । अत्यंतचि मृद जाण । गगनाहून मृद पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९॥ वज्रास असें भेदिले । परी मृदुत्व नाहीं गेलें। उपमेराहित संचलें । कठिण ना मृद ॥ ३०॥ पृथ्वीमधे व्यापून असे । पृथ्वी नासे तें न नासे। जळ शोषे तें न शोषे । जळी असोनि ॥ ३१॥ तेजीं असे परी जळेना । पवनी असे परी चळेना। गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२ ॥ शरीर अवघे व्यापलें । परी तें नाहीं आडळलें। जवळिच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३ ॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामधे पाहाणे घडे। बाह्याभ्यांतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४॥ तयामधेचि आपण । आपणा सबाह्य तें जाण । दृश्यावेगळी खूण । गगनासारिखी॥ ३५ ॥ कांहीं नाहींसें वाटले । तेथेंचि ते कोंदाटलें। जैसे न दिसे आपलें। आपणांसि धन ॥ ३६॥ जो जो पदार्थ दृष्टी पडे । ते त्या पदार्था ऐलिकडे । अनुभवें हें कुवाडें। उकलावै ॥ ३७॥ मागे पुढे आकाश । पदार्थेविण जो पैस। पृथ्वीविण भकास। येकरूप ॥ ३८॥ जें जें रूप आणी नाम । तो तो नाथिलाच भ्रम । नामरूपातीत वर्म। अनुभवी जाणे ॥ ३९॥ . १ कोडे. २ अवकाश. ३ खोटा. ________________

[६७१ १२४ रामदासवचनामृत-दासबोध. नभी धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसे दावी वोडंबरं । माया देवी॥४०॥ ऐसी माया अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत। सर्वा ठाई सदोदित । भरले असे ॥ ४१ ॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमधेचि आहे । नेत्री रिघोनि राहे । मृदपणे ॥ ४२ ॥ श्रवणे शब्द ऐकतां । मनें विचार पाहातां । मना सवाद्य तत्वतां । परब्रह्म तें ॥ ४३ । चरणे चालतां मार्गी । जें आडळे सर्वागीं। करें घेतां वस्तुलागीं। आडवें ब्रह्म ॥ ४४॥ असो इंद्रियेंसमुदाव। तयामधे वर्ते सर्व। जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥ तें जवळिच असे । पाहों जातां न दिसे। न दिसोन वसे । कांहीं येक ॥ ४६॥ . जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टिचेनि अभावें । आपुलेन स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७॥ ज्ञानदृष्टीचे देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे। अंतरवृत्तीचिये खुणे। अंतरवृत्ति साक्ष ॥४८॥ जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया। ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥४९॥ साक्षत्व वृत्तीचे कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण । जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥५०॥ R . १ अवडंबर, मिथ्या खेळ. २ अक्षरें ________________

६.१] साक्षात्कार. जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ति मुरे । परब्रह्मीं ॥ ५१ ॥ ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत । योगी जना येकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२ ॥ दा. ७. ४. ७२. ब्रह्माचें सर्वगत अस्तित्व. धरूं जातां धरितां नये । टाकू जातां टाकितां नये। जेथे तेथे आहेच आहे । परब्रह्म तें ॥१॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें। सन्मुखपण चुकेना तें । कांही केल्यां ॥२॥ बैसले माणुस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिले । आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें। तिकडे आकाशचि भोंवतें बळें आकाशाबाहेर तें। कैसें जावें ॥४॥ जिकडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकी राहे । माध्यानी मार्तड जैसा ॥५॥ परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी। कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥६॥ नाना तीर्थं नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी। तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठाई ॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८॥ - - . १ पहावयासी. ________________

१२६ रामदासवचनामृत-दासबोध. पक्षी अंतराळी गेला । भोवतें आकाशचि तयाला। तैसें ब्रह्म प्राणीयांला । व्यापून आहे ॥९॥ परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवढाचा सेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १०॥ दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥ वैकुंठकैळासस्वर्गलोकीं। इंद्रलोकी चौदा लोकीं। पन्नगादिक पाताळलोकीं । तेथेहि आहे ॥ १२ ॥ कासीपासून रामेश्वर । आवघे दाटलें अपार । परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें येकलें । येकदाचि सकळांसी व्यापिलें। सकळांस स्पीन राहिलें। सकळां ठाई ॥१४॥ परब्रह्म पाउसे भिजेना । अथवा चिखलाने भरेना। पुरामधे परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ येकसरें सन्मुख विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक। आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला। असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥१७॥ येकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास। भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥१८॥ संतसाधुमाहानुभावां । देवदानवमानवां । ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९॥ कोणेकडे सेवटा जावें । कोणीकडे काये पाहावें। असंभाव्य ते नेमावें । काये म्हणोनि ॥२०॥ ________________

७३] कर्मयोग स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे । ज्ञानदृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांडनिरास । मग ते ब्रह्म निराभास। येथूनि तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक है तो खरें। दृश्य आहे तो हैं उत्तरें। व्याविण कोण्या प्रकारे । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥ दा. २०.१०.१-२३. ४. कर्मयोग. ७३. निःस्पृहवर्तणूक. मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो । जैसा बहुधा होऊन भोगितो। नाना सुखें ॥१॥ तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥२॥ कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळी सर्व सत्ता। त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणु ॥३॥ ऐसें महंते असावें । सर्व सार शोधून घ्यावें । पाहों जातां न संपडावें । येकायेकी ॥४॥ कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त । वेष पहातां शाश्वत । येकहि नाहीं॥५॥ प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनास कळेना। पाहों जातां आढळेना । काये कैसें ॥ ६ ॥ १शून्य. ________________

१२८ रामदासवचनामृत-दासबोध. [ . वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषणं तें भूषण। चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी ॥७॥ त्यागी वोळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन । लोक शोधून पाहाती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥ पुर्ते कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणासी बोलेना। पुते येके स्थळी राहेना । उठोन जातो ॥९॥ जातें स्थळ ते सांगेना । सांगितलें तेथें तरी जायेना। आपुली स्थिती अनुमाना। येवोंच नेदी ॥१०॥ लोकीं केलें तें चुकावी । लोकी भाविलें तें उलथवी । लोकीं तर्किलें तें दावी । निर्फळ करूनि ॥ ११ ॥ लोकांस पाद्याचा आदर । तेथें याचा अनादर । लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छया ॥ १२ ॥ एवं कल्पितां कल्पेना। ना तर्कितांहि तर्केना । कदापी भावितां भावेना । योगेश्वर ॥ १३॥ ऐस अंतर सांपडेना । शरीर ठाई पडेना। क्षण येक विशंभेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥ लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघोच निर्फळ होती। जनाची जना लाजवी वृत्ति । तेव्हां योगेश्वर ॥१५॥ बहुती शोधून पाहिले । बहुतांच्या मनास आलें। तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥१६॥ अखंड येकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा। काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥ १७॥ . . १ विचार. २ सोडीना. ________________

६ ७४] कर्मयोग. १२९ उत्तम गुण तितुके ध्यावे । घेऊन जनास सिकवावे। उदंड समुदाथे करावे । परी गुप्तरूपें ॥१८॥ अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग। लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥१९॥ आधी कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ । साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ॥ २० ॥ लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाणजाणोन धरावे । जवळी दुरी॥ २१ ॥ अधिकारपरत्वे कार्य होते। अधिकार नस्तां वेर्थ जातें। जाणोनि शोधावी चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥ अधिकार पाहोन कार्य सांगणे । साक्षेप पाहोन विश्वास धरणे। आपला मगज राखणे । कांहीं तरी ॥ २३ ॥ हे प्रचितीचें बोलिलें। आधी केले मग सांगितलें। मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी येकें ॥२४॥ महंतें महंत करावे । युक्तिबुद्धीने भरावे। जाणते करून विखरावे । नाना देसीं ॥ २५॥ दा. ११. १०. ७४. उत्तमपुरुषनिरूपण.. नेमकपणे वतॊ लागला । तो बहुतांस कळों आला। सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥ १४ ॥ ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष । जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥१५॥ ________________

- -- -- रामदासवचनामृत-दासबोध. [sur उदंड धिःकारून बोलती । तरी चळों नेदावी शांती। दुर्जनास मिळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥ उत्तम गुगी शंघारला । ज्ञानवैराग्य शोभला। तोचि येक जाणाचा भला । भूमंडळी ॥ १७॥ स्वयें आपण कष्टावें । बहुतांचे सोशित जावें। झिजोन कीर्तीस उरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥ कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पहातां कीर्ती नाही। विचाविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९॥ परांतरास न लावावा ढका। कदापि पडों नेदावा चुका । क्ष्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २०॥ आपले अथवा परावें । कार्य अवघेचि करावें । प्रसंगी कामास चुकवावें । हे विहित नव्हे ॥ २१ ॥ वर बोलतां सुख वाटते। हे तो प्रत्यक्ष कळतें। आत्मवत् परावें तें। मानीत जावें ॥ २२ ॥ कठिण शब्द वाईट वाटतें । तो प्रत्ययास येतें। तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥ आपणास चिमोटा घेतला। तेणें कासावीस जाला। आणावरून दुसन्याला । राखत जावें ॥ २४ ॥ जे दुसन्यास दुःख करी । ते अपवित्र वैखरी। आपणास घात करी। कोणियेके प्रसंगीं ॥२५॥ पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें। तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥२६॥ १ धका. २ क्षमा. ३ चिमटा. ________________

१३१ § ur] कर्मयोग. आपुल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें। परंतु कष्टी करावें । हे राक्षसी क्रिया ॥२७॥ दंभ दर्प अभिमान। क्रोध आणि कठिण वचन । हे अज्ञानाचे लक्षण । भगवद्गीतेत बोलिलें ॥२८॥ जो उत्तम गुणे शोभला। तोचि पुरुष माहा भला। . कित्तेक लोक तयाला । शोधीत फिरती ॥२९॥ क्रियेवीण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन। भलें तेथें अवलोकन । कदापि न करिती ॥ ३०॥ मनापासून भक्ति करणे । उत्तम गुण अगत्य धरणें। तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥ ऐसा जो माहानुभाव । तेणे करावा समुदाय । भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥३२॥ आपण आवंचितें मरोन जावे। मग भजन कोणे करावें। याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥ आमची प्रतिज्ञा ऐसी। कांहीं न मागावें शिष्यासी। आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४॥ याकारणे समुदाव। जाला पाहिजे मोहोछाव। हातोपातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५॥ आतां समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणे। श्रोतीं येथे सावधपणें । मन घालावें ॥३६॥ जेणे बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधंशक्ति । बहुतांचे मनोगत हातीं। घेतले पाहिजे ॥ ३७॥ का तापमानामा पानी निक, सामाजिक कार का नाम प्रयास १ अवचित, एकदम. २ उद्बोधन. ________________

१३२ रामदासवचनामृत-दासबोध. [sur मागां बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण। प्रबोधशक्तीचे लक्षण । पुढे चाले ॥ ३८ ॥ बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करून बोलणें । तयाची वचनें प्रमाणे । मानिती जनीं ॥ ३९ ॥ जें जें मनास मानेना । तें तें जनही मानीना। आपण येकला जन नाना । सृष्टिमधे ॥ ४० ॥ म्हणोन सांगांती असावें । मानत मानत शिकवावे। हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥४१॥ . दा. १२. १०. १४-४ १. __७५. महंतलक्षणे. जयास येत्नचि आवडे । नाना प्रसंगी पैवाडे । धीटपणे प्रगटे, दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥ सांकडीमधे व? जाणे । उपाधीमधे मिळों जाणे। अलिप्तपणे राखों जाणे । आपणांसी ॥ १३॥ .. आहे तरी सर्वा ठाई। पाहों जातां कोठेंचि नाहीं। जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई । गुप्त जाला ॥ १४ ॥ त्यावेगळे कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे। न दिसोन वर्तवीत असे । प्राणीमात्रांसी ॥१५॥ तैसाच हाही नानापरी । बहुत जनांस शाहाणे करी। नाना विद्या त्या विवरी। स्थूळ सूक्ष्मा ॥१६॥ आपणाकरितां शाहाणे होती। ते सहजचि सोये धरिती। जाणतेपणाची महंती। ऐसी असे ॥१७॥ १ सोबती. २ शिरतो. ________________

- १३३ 58.६] __ कर्मयोग. राखों जाणे नीतिन्याये। न करी न करवी अन्याये। कठीण प्रसंगी उपाये । करूं जाणे ॥ १८॥ ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा। दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥१९॥ दा. ११. ६. १२-१९. ७६. " जंव उत्तम गुण न कळे । तो या जनास काये कळे." बोलतो खरें चालतों खरें । त्यास मानिती लहानथोरें । न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥ लोकांस कळेना तंवरी। विवेके मा जो न करी । तेणेकरितां बराबरी। होत जाते ॥१६॥ जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना। चंदन आणि वृक्ष नाना। सगट होती ॥ १७ ॥ जंव उत्तम गुण न कळे । तो या जनास काये कळे । उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥१८॥ जगदांतर निवळत गेलें । जगदांतरीं सख्य जालें। मग जाणावें वोळले । विश्वजन ॥ १९॥ जनीं जनार्दनं वोळला । तरी काये उणे तयाला। राजी राखावें सकळांला । कठिण आहे ॥ २० ॥ पोरलें तें उगवतें । उसिणे द्यावे घ्यावे लागतें। वर्म काढितां भंगते। परांतर ॥ २१॥ लोकिकी बरेपण केलें । तेणें सांख्य वाढलें। उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥२२॥ १ धैर्य. २ क्षमा. ३ वश झाले. ________________

१३४ रामदासवचनामृत-दासबोध. [Fe हैं आवघे आपणांपासीं । येथे बोल नाहीं जनासी। सिकंवा आपल्या मनासी।क्षणक्षणा ॥ २३ ॥ खळ दुर्जन भेटला। क्षमेचा धीर बुडाला। तरी मौनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥ लोक नाना परीक्षा जाणती। अंतरपरीक्षा नेणती। तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥ आपणास आहे मरण । म्हणोन राखावें बरेपण। काठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥ - दा. १२. २. १५-२६. ७७. शिकवणनिरूपण. तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदई धरावें। सत्कीर्तीने भरावें । भूमंडळ ॥२०॥ उत्तमासि उत्तम माने । कनिष्ठांस तें न माने। म्हणौन करंटे देवाने । करून ठेविले ॥२१॥ सांडा अवघे करंटपण । धरावें उत्तम लक्षण । हरिकथा पुराण श्रवण । नीति न्याये ॥ २२ ॥ वष्याचा विवेक । राजी राखणे सकळ लोक। हळु हळु पुण्यश्लोक । करीत जावे ॥ २३ ॥ मुलाचे चालीने चालावें । मुलाच्या मनोगते बोलावें । तैसें जनांस शिकवावें । हळुहळु ॥ २४॥ मुख्य मनोगत राखणे । हेचि चातुर्याची लक्षणे । चतुर तो चतुरांग जाणे । इतर ती वेडीं ॥ २५ ॥ १ चार्राकडचे ज्ञान, चारी अंगें. - ________________

१६५ ७] कर्मयोग. वेड्यास वेडे म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये। तरीच घडे दिग्विजये। निस्पृहासी ॥ २६ ॥ उदंड स्थळी उदंड प्रसंग । जाणोनि करणे येथासांग । प्राणिमात्रांचा अंतरंग । होऊन जावें ॥ २७॥ मनोगत राखों न जातां। परस्परें होये अवस्ता। मनोगत तोडितां वेवस्ता । बरी नाहीं ॥ २८ ॥ याकारणे मनोगत । राखेल तो मोठा महंत । मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥ २९ ।। दा, १३. १०. २०-२९. ७८. विवेकनिरूपण. उपासना करूनियां पुढें । पुरवले पाहिजे चहूंकडे । भूमंडळी जिकडे तिकडे । जाणती तया ॥८॥ जाणती परी आडळेना । काय करितो ते कळेना। नाना देसीचे लोक नाना । येऊन जाती॥९॥ तितुक्यांची अंतरें धरावीं। विवेकें विचारें भरावीं। कडोविकेडीची विवरावी । अंतःकर्णे ॥१०॥ किती लोक ते कळेना । किती समुदाय आकळेना। सकळ लोक श्रवणमनना । मधे घाली॥११॥ फ. समजाविस करणे । गद्यपद्य सांगणे। । परांतरासी राखणे । सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणे विवेक । सावधापुढे अविवेक । येईल कैंचा ॥१३॥ . १ व्यवस्था, स्थिति. २ धरसोडीची. ३ समुदाय. ४ समजूत. ________________

। १३६ रामदासवचनामृत-दासबोध. [६५८ जितुकें कांही आपणास ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें। शाहाणे करून सोडावे । बहुत जन ॥१४॥ परोपरी सिकवणे । आडणुका सांगत जाणे। निवळ करून सोडणें । निस्पृहांसी ॥१५॥ होईल ते आपण करावें । न होतां जनाकरवी करवावें । भगवद्भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥१६॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें। आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या लोकांचा कंटाळा आलातरी नूतन प्रांत पाहिजे धरिला। जितुकें होईल तितुक्याला । आळस करूं नये ॥ १८॥ देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला। लागवेगें नूतन लोकांला । शाहाणे करावें ॥ १९ ॥ उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निसुगपंण कामा नये । कोणीयकविषीं ॥ २० ॥ काम नासणार नासतें। आपण वेडें उगेंच पाहातें। आळसी हृदयसुन्य तें । काये करूं जाणे ॥ २१ ॥ धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला। नाना बुद्धी शक्ताला । म्हणोनि सिकवाच्या ॥२२॥ व्याप होईल तो राहावें। व्याप राहातां उठोन जावें। आनंदरूप फिरावें । कोठे तरी ॥ २३॥ . उपाधीपासूनि सुटला । तो निस्पृहपणे बळावला। जिकडे अनुकूल तिकडे चालिला। सावकास ॥ २४ ॥ - - १ कंटाळा. २ उद्योग. ________________

७९] कमयोग. १३७ - कीर्ति पाहातां सुख नाहीं। सुख पाहाता की नाहीं। केल्याविण कांहींच नाहीं । कोठे तरी ॥ २५ ॥ येरवीं काय राहाते। होणार तितुकें होऊन जातें। प्राणी मात्र अशक्त तें। पुढें आहे ॥२६॥ आधींच तकवा सोडिला । मधेचि धीवसा सांडिला । तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥२७॥ संसार मुळीच नासका। विवेकें करावा नेटका। नेटका करितां फिका । होत जातो ॥२८॥ ऐसा याचा जिनसानो । पाहातां कळों येतें मना। परंतु धीर सांडावा ना । कोणीयेकें ॥ २९॥ ... दा. १९. १०. (-२९. ७९. राजकारणनिरूपण. ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास।. तेणें अखंड सावकास । येकांत सेवावा ॥१॥ जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती। प्राणीमात्रांची स्थिती गती। कळों येते ॥२॥ जरी हा चाळणाचि करीना । तरी काहींच उमजेना। हिसेवझाडाचि पाहीना। दिवाळखोर ॥३॥ येक मिरासी साधिती । येक सीध्या गाविती। व्यापकपणाची स्थिती। ऐसी आहे ॥ ४॥ जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें। कृत्रिम अवघेचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५॥ १ धीर. २ स्वभाव. ३ गमाविती. ________________

१३८ रामदासवचनामृत-दासबोध. [७९. अखंड राहता सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । याकारण विश्रांतीतें। घेतां नये ॥६॥ आळसे आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला। अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥७॥ उदंड उपासनेची कामें। लावीत जावी नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८॥ या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हतां कष्टी। राजकारणे मंडळ वेष्टी। चहुंकडे ॥१०॥ नष्टासी नट योजावे । वाचाळासी वाचाळ आणावे। आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११॥ कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी। कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥१२॥ न कळता करी कार्य में तें । तें काम तत्काळचि होतें। गचगचेत पडतां तें। चमत्कारें नव्हे ॥१३॥ ऐकोनी आवडी लागावी । देखोनी बळकटचि व्हावी । सलगीने आपली पदवी । सेवकामध्ये ॥ १४ ॥ कोणी येक काम करितां होते। न करितां ते मागे पडतें। याकारणे ढिलेपण ते । असोंचि नये ॥१५॥ जो दुसन्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला। जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६॥ अवध्यांस अवधे कळलें । तेव्हां तें रितें पडिलें। याकारणें ऐसे घडलें। न पाहिजे कीं ॥१७॥ १ व्याप, १ बाघळटपणा. ३ अतिविचार. ________________

१३९ - -- 3 ६७९] कर्मयोग. मुख्य सूत्र हातीं ध्यावें । करणें तें लोकांकरवी करवावें । कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधे ॥ १८ ॥ ग्रामण्य वर्मी सांपडावें । रगडून पीठचि करावें। करूनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥२०॥ खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें। तेणे अवघे प्रगट जालें । बरे वाईट ॥२१॥ समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावां असाव्या बळकटा। मठ करूनि ताठा । धरूं नये ॥२२॥ दुर्जन प्राणी समजावे। परी ते प्रगट न करावे। सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देउनी ॥ २३ ॥ जनामधे दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट। याकारणे ते वाट । बुझुनि टाकावी ॥ २४॥ गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुफुरिती भुजा। ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥ तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाखे। सहजचि होती ॥२६॥ हे धूर्तपणाची कामें। राजकारण करावें नेमें। ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥२७॥ कोठेच पडेना दृष्टीं । ठाई ठाई त्याच्या गोष्टी। वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥२८॥ हुन्यास हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा।। लौंदास पुढे उभा करावा। दुसरा लौंद ॥२९॥ - - १ कांटे. २ नाणणा-या देया. ३ कैवारी. ४ घाटगंग. ________________

। १४० रामदासवचनामृत-दासबोध घटसी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट । खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥ जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्याल सी थाटे। इतुकें होतें परी धनी कोठे । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ दा. १९. ९. २०. “ काही गमला काही निवळ । ऐसा कंठित जावा काळ. " ज्यासी उपाधी आवरेना । तेणें उपाधी वाढवावी ना। सावचित्त करूनिया मना । समाधाने असावें ॥ १९ ॥ धावांवों उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोकहि कष्टी। हे कामा नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० लोक बहुत कष्टी जाला । आपणही अत्यंत त्रासला। वेर्थचि केला गल्बला । कासयासी ॥ २१ ॥ असो उपाधीचे काम ऐसें । कांहीं बरें कांहीं कोणोंसें। सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२॥ लोकांपासीं भावार्थ कैंचा । आपण जगवावा तयांचा। शेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥ अंतरात्म्याकडे.सकळ लागे । निर्गुणी हे कांहींच नलगे। नाना प्रकारीचे दगे। चंचळामधे ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचे स्थळ । ते येक निर्मळ निश्चळ। . तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५॥ उद्वेग अवघे तुटोन जाती। मनास वाटे विश्रांति । ऐसी दुल्लभ परब्रह्मास्थिति । विवेकें सांभाळावी ॥२६॥ १ वावदूक. २ मजलस, सभा. ३ कुरकुर. ४ वाकडे. ५ दंभस्फोट.. ________________

१४१ १] कर्मयोग. आपणास उपाधी मुळीच नाही । रुणानुबंधे मिळालीं सर्वही। आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जाले पाहिजे ॥ २७॥ जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊन बैसला। आटोपेना तो गल्बला । कासयासी ॥२८॥ काहीं गल्बला कांहीं निवळ। ऐसा कंठित जावा काळ।.. जेणेकरितां विश्रांति वेळ । आपणासि फावे ॥ २९॥ उपाधी कांहीं रहात नाहीं। समाधानायेवढे थोर नाहीं।। नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥ दा. १९. ८. १९-३०, ८१. समर्थलक्षण. तो सकळ जनासी व्हावा । जेथे तेथें नित्य नवा । मूर्खपणे अनुमान गोवा । कांहींच नाहीं ॥५॥ नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र । प्रगट कीर्ती स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥६॥ राखे सकळांचे अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥७॥ नम्रपणे पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे । बोलाऐसें व? जाणे । उत्तम क्रिया ॥८॥ जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥९॥ तो परोपकार करितचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला मग काये उणे तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥ ________________

१] रामदासवचनामृत-दासबोध. [ बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे । उणे कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । जाणे संगीत गायेनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥ सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणीयेकाचे उणें । पडोंचि नेदी॥१३॥ न्याय नीति भजन मर्यादा । काळ सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तमगुणे शृंघारला । तो बहुतांमधे शोभला । प्रगट प्रतापें उगवला। मार्तड जैसा ॥१५॥ जाणता पुरुष असेल जेथें । कळ्हो कैचा उठेल तेथे । उत्तम गुणाविषयी रितें । तें प्राणी करंटें ॥१६॥ प्रपंची जाणे राजकारण । परमार्थी साकल्यविवरण। सर्वामधे उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें येक पुढे येक । ऐसा कदापी नाही दंडक । सर्वत्रांसी अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥ अंतरासी लागेल ढका। ऐसी वर्तणूक करूं नका। जेथें तेथें विवेका। प्रगट करी ॥१९॥ कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्यविधी । विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥२०॥ पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥२१॥ १ वाट, २ रिवाज, रीत. ३ आवड, ________________

10] कर्मयोग. आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लहान थोर। तैसाचि करी परोपकार । मनापासुनी ॥ २२ ॥ दुसऱ्याच्या दुःखें दुखवे । दुसऱ्याच्या सुखें सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उदंड मुले नानापरी । वडिलांचे मन अवध्यांवरी। तैसी अवध्यांची चिंता करी । माहांपुरुष ॥ २४॥ जयास कोणाचे सोसेना । तयाची निःकांचन वासना। धीकारल्या धीकारेना । तोचि माहांपुरुष ॥ २५ ॥ मिथ्या शरीर निदिले। तरी याचे काये गेलें। ज्ञात्यासि आणि जिंकिलें । देहेबुद्धीने ॥ २६ ॥ हे अवघे अवलक्षण । ज्ञाता देही विलक्षण । कांहीं तरी उत्तम गुण । जनी दाखवावे ॥२७॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गुणास प्राणी खेदे । तीक्षण बुद्धि लोक साधे। काये जाणती ॥२८॥ लोकी अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांची प्रचिती। मग ते लोक पाठी राखती। नाना प्रकारी ॥ २९॥ बहुतांसी वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार। धीर उदार गंभीर । माहांपुरुष ॥३०॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तें समर्थाचं लक्षण। अवगुण तें करंटलक्षण । सहजचि जालें ॥ ३१॥ . दा. १९. ४. ६-३१. ८२." भावकीतीने भरावें । भूमंडळ." कोण्हास कांहींच न मागावें। भगवद्भजन वाढवावें। विवेकबळे जन लावावे । भजनाकडे ॥११॥ -- - - -


- - - - -


________________

१४४ रामदासवचनामृत-दासबोध. [८ परांतर रक्षायाची कामें। बहुत कठीण विवेकवर्मे । स्वइच्छेने स्वधर्मे । लोकराहाटी ॥ १२ ॥ आपण तुरुक गुरु केला । शिष्य चांभार मेळविला । नीच यातीने नासला । समुदाय ॥ १३ ॥ ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या। भक्तमंडळ्या मानाच्या। संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कट भव्य तेंचि ध्यावें । मळमळित अवघेचि टाकावें ।। निस्पृहपणे विख्यात व्हावें । भूमंडळी ॥ १५ ॥ अक्षर बरे वाचणे बरें । अर्थातर सांगणे बरें। गाणे नाचणे अवघेचि बरें। पाठांतर ॥१६॥ दीक्षा बरी मीत्री बरी। तीक्षण बुद्धि राजकारणी बरी । आपणास राखे नानापरी । अलिप्तपणे ॥ १७॥ विड हरिकथेचा छंदु । सकळांस लागे नामवे? । प्रगट जयाचा प्रबोधु । सूर्य जैसा ॥१८॥ दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निवऊं जाणे । सकळांचें मनीचे जाणे । ज्याचे त्यापरी ॥ १९॥ संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे। अखंड अभ्यासी लगटे । समुदाय ॥ २० ॥ जेथे तेथे नित्य नवा । जनासी वाटे हा असावा। परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी॥२१॥ उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट च्यातुर्य उत्कट भजन । उत्कट योग अनुष्ठान । ठाई ठाई ॥ २२ ॥ उत्कट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगांती फांकली। उत्कट भक्तीने निवाली। जनमंडळी ॥ २३ ॥ १ वहिवाट. २ मैत्री. ३ वेध. ________________

६८3 ] कर्मयोग. कांहीं येक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण। उगेंच वणवण हिंडोन । काय होतें ॥ २४॥ नाहीं देह्याचा भरवसा । केव्हां सरेल वयसा। प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ याकारणे सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें।। भगवत्कीर्तीने भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आपणास जें जें अनुकूळ । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ २७ ॥ विवेकामधे सांपडेना। ऐसें तो कांहींच असेना। येकांती विवेक अनुमाना । आणून सोडी ॥२८॥ अखंड तजवीजा चाळणा जेथें । पाहतां काये उणें तेथें: येकांविण प्राणीयांतें। बुद्धि कैंची ॥ २९॥ येकांती विवेक करावा । आत्माराम वोळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३०॥ ___ दा. १९. ६. ११-३०. ८३. रामदासांचे आत्मचरित्र. पृथ्वीमधे मानवी शरीरें । उदंड दाटली लहानथोरें। पालटती मनोविकारें। क्षणक्षणा ॥१॥ जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती। सारिख्या नस्ती आदिअंतीं। नेमाच नाहीं पाहावे किती। काये म्हणोनि ॥२॥ कित्येक म्लेंच होऊन गेले। कित्येक फिरंगणांत आटले। देशभाषेनें रुधिले । कितीयेक ॥३॥ १ आयुष्य. २ फिरंगी लोकांचा देश. ३ नाडले. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [८3 महाष्टदेश थोडा उरला । राजकारणे लोक रुधिला। अवकाश नाही जेवायाला । उदंड कामें ॥४॥ कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त जाले। रात्रंदिवस करूं लागले। युद्धचर्चा ॥ ५॥ उदिम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहीसा झाला। अवघा पोटधंदाच लागला । निरंतर ॥६॥ शडदर्शनें नाना मते । पाषां. वाढलों बहुतें । पृथ्वीमधे जेथतेथें । उपदेसिती ॥७॥ स्मार्थी आणि वैष्णवीं। उरलों सुरली नेली आघवीं। ऐसी पाहातां गथागोवी । उदंड जाली ॥ ८॥ कित्येक कामनेचे भक्त । ठाई ठाई जाले आसक्त । युक्त अथवा अयुक्त । पाहातो कोण ॥ ९॥ या गल्बल्यामध्ये गल्बला । कोणी कोणी वाढविला । त्यास देखों सकेनासा जाला । वैदिक लोक ॥१०॥ त्याहिमधे हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥ याकारणें ज्ञान दुल्लभ । पुण्ये घडे अलभ्य लाभ। विचारवंतां सुल्लभ । सकळ कांहीं ॥ १२ ॥ विचार कळला सांगतां नये । उदंड येती अंतराये । उपाय योजितां अपाये। आडवे येती॥१३॥ त्याहिमधे जो तिक्षण । रिकामा जाऊ नेदी क्षण। .. धूर्त तार्किक विचक्षण । सकळां माने ॥ १४ ॥ । व्यापारी. २ सहा दर्शनें. ३ गडबड. ४ तीव्रबुद्धीचा. ________________

A . 53] कर्मयोग. १४७ नाना जिनस उदंड पाठ । वदों लागला घडधडाट। अव्हाटचि केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥ प्रबोधशक्तीची अनंत द्वारें। जाणे सकळांची अंतरें। निरूपणे तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥ मते मतांतरें सगट । प्रत्यये बोलोन करी सपाट । दंडक सांडून नीट । वेधी जना ॥ १७ ॥ नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें । उदास वृत्तीच्या गुमानें । उठोन जातो॥१८॥ प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला । नाना मार्ग सांडूनि त्याला । शरण येती ॥ १९॥ परी तो कोठे आडळेना । कोणे स्थळी सांपडेना । वेष पाहतां हीनदीना। सारिखा दिसे ॥ २०॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकान्यासारिखा स्वरूपें। तेथे येशकीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥ ठाई ठाई भजन लावी। आपण तेथून चुकावी। मत्सर मतांची गोवी । लागोंच नेदी ॥ २२ ॥ . खनाळामधे जाऊन राहे । तेथे कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ २३ ॥ अवघड स्थळी कठीण लोक । तेथें राहणे नेमक। सृष्टीमधे सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥ तेथे कोणाचें चालेना । अणुमात्र अनुमानेना। कॅट्ट घालून राजकारणा । लोक लावी ॥२५॥ १३चे. २ अफाट, विस्तीर्ण. ३ अनुभव. ४ रूढि. ५ जोराने. ६ दया, दुर्घटस्प, ७निश्चय. ________________

रामदासवचनामृत-दासबोध. [८३ लोकी लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले । भूमंडळी सत्ता चाले। गुप्तरूपें ॥ २६॥ ठाई ठाई उदंड तांबे । मनुष्यमात्र तितुके झोंबे । चहुंकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळी थोर थोर। प्रत्ययाने प्राणीमात्र । सोडविले ॥ २८॥... ऐसे कैवार्ड उदंड जाणे। तेणें लोक होती शाहाणे । जेथे तेथे प्रत्यये बाणे । प्राणिमात्रांसी ॥ २९॥ ऐसी कीर्ति करून जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हे स्वभावें । सेकेतें बोलिलें ॥ ३०॥ __दा. १५. २. १-३०. ५. उपसंहार. ८४. " समर्थकृपेची वचनें । तो हा दासबोध." जाले साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥२६॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा। साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं॥२७॥ स्वमीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें। सहजचि अनुवाच्य जालें । बोलतां नये ॥२८॥ ऐसें हें विवेके जाणावें। प्रत्यये खुणेसी बाणावें। जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९॥ १ संमुदायं. २ प्रकार, युक्त्या . ________________

। १४९ For ] उपसंहार. . भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेची वचनें । तो हा दासबोध ॥ ३०॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारे घेतां शोध। मननकर्त्यास विशद। परमार्थ होतो ॥ ३१॥ वीस दशक दोनीसे समास । साधकं पाहावें सावकास । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचे कार्य प्रयोजन। येथे प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥ देहे तंव पांचा भूतांचा। कर्ता आत्मा तेथींचा। आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी॥३४॥ सकळ करणे जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें। ऐशा अप्रमाण बोलण्याचें । काये घ्यावें ॥ ३५ ॥ सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला । तेथे कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६॥ ऐसी हे विचाराची कामें। उगेंच भ्रमों नये भ्रमें। जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७॥ दा. २०. १०. २६-३७. का -- - - - - १दोनशे - - ________________

D रामदासवचनामृत भाग दुसरा संकीर्ण ग्रंथ ________________

REVIE रामदासवचनामृत ( संकीर्ण ग्रंथ) ६. जुना दासबोध, ८५. देह पडे कां देव जोडे ! निग्रहनेमाचं बळ । असतां प्राप्ति तात्काळ । दुराशा करी तळमळ । निग्रहभ्रष्टो ॥१३॥ जेथें निग्रसी धाष्टी वसे । तेथें देव सन्निधचि असे। सोडी संशयाचे पिसें । एतद्विषयीं ॥ १४॥ तरी निग्रह धारिष्ट जडे । हे वैराग्येवीण न घडे। दृढ वैराग्य होतां उडे । पांग देहाचा ॥ १५ ॥ देह पडे कां देव जोडे । ऐशी हांव आंगी जडे। तेणें गुणें वैराग्य घडे। महाप्रबळ ॥ १७ ॥ देहपांग निःशेष भंगे। तेव्हां प्राप्तीसी वेळ नलगे। देव भक्तापाठी लागे। “नांभी नाभी' म्हणोनि ॥ १८॥ बाळक आपणा रक्षं नेणें । म्हणोनि मातेसि लागे रक्षणे : तेंचि बाळक शहाणे । होतां माता विसंबे ॥१९॥ तैसा भक्त भगवंती प्रेमा । लावूनि उलंघी देहसीमा। तयाचा सांभाळ आत्मयारामा। करणे घडे नेमस्त ॥२०॥ १ इच्छा. २ भिऊ नको. ३ दुर्लक्ष करणे. ________________

१५४ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [८५ सर्वस्वाची आस तुटे । तरीच सगुणमूर्ति प्रगटे। दुःख संसारींचें फिटे । एकसरा ॥२१॥ जु. दा. ७. १३-२१. . ८६. प्रपंचपरमार्थ. गृहासी आग लागली । देखोनि कां बोंब केली। लोकांची मांदी मेळविली । आगी विझवाया कारणें ॥ तैसी परमार्थी बोंब मारावी । कांहीं काढाकाटी करावी । हळू हळू सोडवावी । मिठी प्रपंचाची ॥ प्रपंचधुडका पेटला। मध्ये परमार्थ जळूनि गेला। ऐसें देखोनि तुम्हांला । कैसे बरे वाटते॥ मुक्ताफळ आणि दिव्यांबर । नाना वस्तूंचे भांडार। भस्म करूनि वैश्वानर । विझोनि जाई जेंवीं ॥ तैसा प्रपंच हा परमार्थासी । जाळोनि भोगू नेदी आपणांसी। आयुष्य गेलियां प्राणियासी। विमुख होय ॥ जरी हा प्रपंच शाश्वत जाणतो । तरी आम्ही यासीच धरितों। हा अशाश्वत म्हणोनि रडतों। तुम्हां भोंवतीं ॥ तुम्हीं कैसे रे परमार्थी । परघात आणि अपस्वार्थी। डोळे झांकूनि दोहीं अर्थी । नागवलेत की रे॥ जु. दा. ११. ५४-६०. ८७. अनुभव सांगू नये. आताही जयास वाटे भेटावें । रामें मज सांभाळीत जावें। ऐसें दृढ घेतलें जीवें । तरी ऐका मी सांगेन ॥ ३७॥ १ अमि, वणवा. . ________________

- -- minine ८८] जुना दासबोध. श्रीराम जयराम जयजयराम । ऐसा कांहीं एक करूनियां नेम। जप कीजे तेणें आत्माराम । जोडेल नियमें ॥ ३८ ॥ परी कोणासी कळों नेदावा । जप अंतरीच करावा। जैसा कृपणासी धनठेवा । सांपडला एकांतीं ॥ ३९ ॥ राम जपे त्याचे चित्त पाहतो । जप करितां शीण येतो। विकल्प' अंतरीं प्रवेशतो। तरी ढळेना मेरू जैसा ॥ ४०॥ कां प्रपंची होती थोर आघात । तेणें चित्त होय दुश्चित । देहासी आपदा होती अत्यंत । तरी रामासि विसरूं नये ॥४१॥ जप नेमिला तो चुकों नेदावा । त्यावेगळा सर्वदा स्मरावा ! मळत्यागीही न विसंबावा । कर्मठपणे करूनि ॥ ४२ ॥ ऐसे अखंड नाम स्मरावें । परी दुसरियासी कळों नेदावें। निदिध्यास लागलियां राघवें । पाविजे तात्काळ ॥ ४३ ।। वैरें निदिध्यास रावणे केला । त्याचा संकल्प त्यासी फळला।। मा जेणें दास्यत्वे उपासिला । तो राम कैसा नव्हे ॥४४॥ कांहीं साक्षात्कार झाला । तो सांगों नये दुसरियाला। जरी ओळकेपणे सांगितला । तरी पुन्हां होणार नाहीं ॥ ४५ ॥ पुन्हां साक्षात्कार कैंचा। जाला तरी वरपंगाचा। हा मी आपुले जीवाचा । अनुभव सांगतों ॥ ४६॥ जु. दा. १५. ३७-४६. ८८. रामास मागणे. रामासि इतुकें मागावें । जे आपण रामचि व्हावें। कां रामासि दास करावें । आपणा ऐसें॥ १ संशय. २ आशाळभूतषमा, मूर्खपणा. ३ वरवरचा, दिखाऊ. TETTET TITION ________________

. १५६ . रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [८८ तूं ऐसा कां मीच असोन । त्याहून नलगे आम्हांसि आन। तुझ्या ठायीं दासपण । आणीन तरी मी होय ॥ तुवां स्वामी होऊनि बैसावें । आणि आम्हांसभोवतें भोंवावें। रागेजोनी बाहतां न यावें। हे काय बरें॥ तूं राज्य सांडुनियां जालियां उदास । तरी आम्हीही तुझीच दास । तां काय बोलिजेल बापास। तैसें आम्हीही तुज करूं॥ तुवां पाषाण तारिले । तरी आम्हीही जडजीव उद्धरिले। तुवां देव मुक्त केले । बंधनापासूनी॥ तरी आम्हीही भाविकांसी। सोडवूनियां मोक्षपदासी। पावविलें तयांसी । मागुता जन्म नाहीं॥ तुवां जरामरण केलें दुरी । तें मुळीच नाहीं आमुचे धरीं। तूं राजा अकरा सहस्त्रवरी । तरी आम्हांसी संख्या नाहीं॥ तुवां पुरी नेली वैकुंठा । आम्ही वैकुंठींच्या बारा वाटा। करूनि मांडिला चोहटा। तया वैकुंठाचा ॥ ऐसे बोलती रामदास । निधडे सर्वस्वं उदास। वैभव वाटे जयांस । कसपट जैसें ॥ ऐसें बोलणे ऐकिलें । रामें मंदहास्य केलें। धांवोनियां ह्रदयीं धरिलें । आपुलिया निजदासा ॥ ऐसा भक्ताचा वेळाइत । दासाभोंवता भोंवत । एक क्षणीं न विसंबत । भावार्थ देखोनि भुलला ॥ राम दासांमध्ये उभा । तेणें दासांसी आली शोभा। रामस्वरूपाची प्रभा । कोंदाटली सबाह्य ॥ .. १ हाक मारणे. २ चवाटा. ३ बछेनुसार काम करणारा, आज्ञाधारक शिपाई... ________________

१५७ हु ८९] मनाचे श्लोक. रामें आपणांसारिखें केलें। दास दासपणेसी मुकले। रामासि मिळोनि एकचि जाले । एकपणाही वेगळे ॥ स्वामीसेवकपणे आनंदले। हर्षेकरुनि उचंबळले। परस्परें गिळोनि ठेले । लोभ आला म्हणोनि॥ ऐसे देवाभक्तांचे साजणें । जीव घेणे जीव देणे । पुन्हां मागुते येणे जाणे । न घडे कदा ॥ नवविधा भक्ति याचिकारणे । जे आपण स्वयें रामचि होणें। स्वयेंचि रामपणे ठाकणे । स्वानुभवें करूनो ॥ जु. दा. १६. १-१६. ७ मनाचे श्लोक. - - - - ८९. मनास प्रार्थना. मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरि पाविजे तो स्वभावें ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य तें सर्वभावें करावें ॥२॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो।। जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो॥३॥ देहे त्यागितां कीर्ति मागे उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ १ प्रीति, सख्य. ________________

[७८९ D मा। रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. मना चंदनाचे परी ती झिजावें। परी अंतरीं सज्जना नीववावें ॥८॥ मना पाहतां सत्य हे मृत्यभूमी। जितांबोलती सर्वही जीव मीमी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५॥ भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरी। नुपेक्षी कदा कोपल्यां दंडधारी ॥२७॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३०॥ असे हो जया अंतरीं भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ अनन्यास रक्षीतसे च्यापपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥३६॥ १ त्वां. २ जिवंत असतांना. ३ देणारा, दान करणारा. ________________

- ९] मनाचे श्लोक सदा चकवाकासि मार्तड जैसा। उडी घालितो संकटीं स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ ३७॥ जयाचेनि संगें समाधान भंगे। अहंता अकस्मात् येऊनि लागे॥ तये संगतीची जनी कोण गोडी। जये संगतीने मती राम सोडी॥४५॥ सदा देवकाजी झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य वाचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥ मना राम कल्पतरु कामधेनु । निधी सार चिंतामणी काय वानूं ॥ जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां ॥ ६ ॥ उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे । तया अंतरीं सर्वदा तेंचि आहे ॥ जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागुता शोक जीवीं धरावा ॥ ६१ ॥ घनशाम हा राम लावण्यरूपी। महां धीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटों सेवकांचा कुढावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६७॥ १ सूर्य. २ नौबद, नगारा. ३ संरक्षण. --- - 351 ________________

. १६० [६८१ काहीं। रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. जनीं भोजनी नाम वाचे वदावें। अती आदरें गद्य घोषे म्हणावें ॥ हरीचिंतने अन्न जेवीत जावें। तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥ ८९ ॥ गजेंद्र महां संकटी वास पाहे। तया कारणे श्रीहरी धांवताहे ॥ उडी घातली जाहला जीवदानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥ ११८॥ नसे पीत ना श्वेत ना शाम कांहीं। नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं॥ म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥ दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें । बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ॥ करीं घेउं जातां कदा आढळेना। जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥१५५ ॥ विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरु जाळितो लोक संव्हारकाळीं। परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले। तया देवरायासि कोण्ही न बोले॥ जगी थोरला देव तो चोरलासे। गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ।। १७९॥ ________________

९०] .. १६१ . पंचसमासी. नभासारिखें रूप या राघवाचें । मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें ॥ तया पाहतां देहबुधी उरेना। सदा सर्वदा आत पोटी पुरेना ॥ १९ ॥ म श्लो ८. पंचसमासी. ९०. स्वरूपानुसंधान. हे नवविध भजन । सायुज्यमुक्त साधन। तणे करितां शुद्ध ज्ञान। प्राण्यास होय ॥१८॥ .... शुद्ध ज्ञानाचे बळें । अंतरीं वैराग्य प्रबळे। तेणें लिंगदेह मोकळे । होय वासनेसीं॥१९॥ लागे स्वरूपानुसंधान । नाठवे देहाभिमान। विश्रांतीतें देखे मन । तद्रूप होय ॥ २०॥ आदिपुरुष एकला। नाहीं द्वैताचा गलबला। • संगत्यागें अवलंबिला। शुद्ध एकांत ॥२१॥ तेथें मन पांगुळलें । आपणांस विसरलें। आपणास भुलोन गेलें। स्वरूपबोधे ॥२२॥ मी कोण हे न कळे । अवघा आत्मा प्रबळे। तेणे बळें मन मावळे । कर्पूरन्यायें ॥२३॥ तेथें शब्द कुंठित झाला । अनुभव अनुभवी निमाला। आतां असो हा गलबला । कोणी करावा ॥ २४॥ १ पांगुळे होणे. २ कर्पूरअग्निन्याय. ११ ________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६९० वाटे एकांतासी जावें । पुनः हे अनुभवावें। उगें निवांत असावें। कल्पकोटी॥ २५॥ नको वक्तृत्व उपाधि। पांगुळली स्वरूपी बुद्धि। लागली सहज समाधि। हेतुरहित ॥२६॥ गुरु शिष्य एक झाले। अनुभवबोधी बुडाले। त्यांचे शुद्धीस जे गेले । तया तीच गती ॥२७॥ तुटला संसारबंधु । आटोनि गेला भवसिंधु। बुडाला बोधी प्रबोधु। विवेकबळें ॥२८॥ ज्ञानाग्नि प्रगट झाला । मायाकर्पूर जळाला। विवेकें अविवेक ग्रासिला । तये ठायीं ॥२९॥ झालें साधनाचें फळ । चुकले जन्माचें मूळ । निष्कलंक आणि निर्मळ । तोचि आत्मा ॥ ३०॥ पं. स. ४. १८-३०. ९१. सर्वत्र रामदर्शन. एवं ज्ञाता समाधानी । प्रारब्धयोगें वर्ते जनीं। परि अनुसंधान मनीं । वेगळेचि ॥ ५ वृत्ति गुंतली स्वानुभवें । जनीं तेंचि भासे आघवें। सबाह्य व्यापिलें देवें । ब्रह्मांड अवधे॥६॥ वृत्ति मुळाकडे पाहे । त्यास राम दिसताहे। स्तब्ध होवोनियां राहे । रामचि दिसे ॥७॥ मन मुरडे आटे । तंव मागौं राम भेटे। मागे पुढे प्रगटे । रामचि अवघा ॥ ८॥ ________________

१६३ १९२] मानपंचक.. दाही दिशा अवलोकितां । रामचि भासे तत्वतां । वदन चुकवू जातां । सन्मुख राम ॥९॥ राम झालिया सन्मुख । कल्पांती नोहे विन्मुख। नेत्र झाकितां अधिक । रामचि दिसे ॥ १०॥ मग विसरोनि पाहिलें । तंव तें रामचि झालें। जीव सर्वस्वे वेधले । संपूर्ण रामें ॥११॥ मग आपणा पाहे । तंव रामचि झाला आहे । उभय साक्षी जो राहे । तोचि राम ॥ १२॥ रामेंविण सर्वथा कांहीं । अणुमात्र रितें नाहीं। दृश्य द्रष्टा दर्शन तेंही। रामचि भासे ॥१३॥ प्रपंच सारिला मानसें। दृढ लागले रामपिसें । । देह वर्ते भ्रमिष्ट जैसें । पिशाचवत् ॥१४॥ रामरूपी वेधले मन । तेणें राहे कुलाभिमान । पूर्वदशेचे लक्षण । पालटोनि गेलें ॥१५॥ ऐसी खूण सकळांस । सांगोनि गेला रामदास। सत्संगें जगदीश । नेमस्त भेटे ॥३३॥ पं. स. ५. ५-३३. ९. मानपंचक. ९२. रामराज्य. राज्य या रघुनाथाचें। कळीकाळासी नातुडे। बहुवृष्टी अनावृष्टी । हे कदा न घडे जनीं ॥७॥ .. ________________

१६४ १२ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. उद्वेग पाहतां नाहीं। चिंतामात्र नसे जनीं। व्याधी नाहीं रोग नाहीं । लोक आरोग्य नांदती ॥८॥ युध्य नाहिंच आयोध्या'। राग ना मछरु नसे बंद निर्बद ही नाहीं। दंड दोष कदा नसे ॥९॥ कुरूपी पाहतां नाहीं। जरा मृत्य असेचिना । आदरु सकळ लोकां । सख्यप्रीती परस्परें ॥१०॥ बोलणे सत्य न्यायाचें । अन्याय सहसा नसे। अनेक वर्तती काया। येक जीव परस्परें ॥११॥ दरिद्री धुंडितां नाहीं। मूर्ख हा तो असचिना। परोपकार तो मोठा। सर्वत्र लोकसंग्रहो ॥ १२॥ अद्भुत पीकती भूमी । वृक्ष देती सदा फळें । अखंड दुभती धेनु । आरोग्ये वाहती जळें ॥१३॥ जळजें स्वापदें पक्षी । नाना जीव भुमंडळीं। आनंदरूप बोभाती। नाना स्वर परस्परें ॥ १४ ॥ नद्या सरोवरें बावी । डोलती नूतनें बनें। फळती फुलती झाडें । सुगंध वनवाटिका ॥ १५ ॥ उदंड वसती ग्रामें । नगरें पुरेचि पट्टणें। तीर्थे क्षत्रे नाना स्लानें । शिवाल्ये गोपुरे बरीं ॥ १६ ॥ मठ मठ्या पर्णशाळा । रुसीआश्रम साजिरे। वेदशास्त्रधर्मचर्चा । स्नान संध्या तपोनिधि ॥१७॥ चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे। संतोष समस्त लोकां । रामराज्य भुमंडळीं ॥१८॥ १ जेथें युद्ध नाही ती जागा. २ हांक मारणे. ३ विहिरी. ४ ऋषी, ________________

९३] १६५ मानपंचक. हरिदास नाचती रंगीं । गायने कीर्तन बरीं। रागरग तानमानें। टाळबंधे विराजती ॥ १९॥ . अंबंद कविता छेदें। धाटी मुद्रा परोपरीं। आन्वय जाड दृष्टांतें । गयें पद्योंच औघडे ॥२०॥ नानायुक्ती नाना बुधी । नाना विद्या नाना कळा। नाना संगीत सामर्थ्ये । नाना वायें परोपरी ॥ २१॥ संमार्जनें रंगमाळा । पुष्पमाळा बहुविधा। केशरें धुशरें गधे । सुगंधे करताळिका ॥२२॥ सर्वही तोषले तोपें। नाम घोचि गर्जती। पुरेना दिन ना रात्री । यात्रा पर्व हरीकथा ॥ २३ ॥ दीपिका चंद्रजोती त्या। आ. नीरांजने जनें। रामराजा दयासिंधु । वोळला सेवकांवरी॥२४॥ रामदासी ब्रह्मज्ञान । सारासार विचारणा। धर्मस्छापनेसाठीं। कर्मकांड उपासना ॥ २५॥ मा. पं. १.७-२५. ९३. सर्व देव मिळून एकच. कास या रघुनाथाची। धरितां सुख पावलों। इतर कष्टती प्राणी। थोर संसारसांकडीं॥ सांकडी तोडिलीं माझीं। राघवें करुणाळयें। पूर्वीच तुटली माया। दुःख शोक विसंचला॥ सेवकु मानवीयांचे। कष्टती बहुतांपरी॥ सेविला देव देवांचा । तेणें मी भन्य जाहालों॥ १ गद्यपद्य. २ बक्का. ________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६९ नांच हे मानवी प्राणी। नीचाश्रय कामा नये। महत्कीर्ति श्रीरामाची। फावला महदाश्रयो॥....... विबुधां आश्रय ज्याच्या। पावले बदमोचनें। सेवकु मारुती ऐसा । त्याचा मी म्हणती जनीं। ... निवाला सीव ज्या नामें। ज्या नामें वाल्मीक रुसी। जें नाम सकळां तारी। तें नाम मज अंतरीं ॥ देव हा सर्व अंतरात्मा। वात हा त्याजपासुनी। वातसुत हनुमंतु । रामसेवक हा जनीं॥ सीव तो राघवा ध्यातो। राम ध्यातो सदासीवा। सख्यत्वें चालती दोघे । प्रसीध ठाउके जनीं॥ शक्ती ते शक्ती सीवाची। सीवशक्ती समागमें। औंश जे चंद्रमौळीचे। ते सर्व प्रभुचे सखे ॥ येकची अंश विष्णूचे। देवमात्र भुमंडळीं। येकांशें चालती सर्वै । यालागी सर्व एकची॥ ऐकती येकमेकांचें । येकमेकांसी पाहाती। जन्मले जीव ते सर्वै। एक देवची वर्तवी॥ रामउपासना ऐसी। ब्रह्मांडव्यापिनी पाहा। राम कर्ता राम भोक्ता। रामरूप वसुंधरा॥ विषयो जाहला देवो। नाना सुखें विळासवी। नाना दुःखें देव कर्ता। त्रासकें शरीरें धरीं॥ भुजंगें डंखितां देव । देव जाला धन्वंतरी। तारिता मारिता देव । बोलती ते येणें रिती॥ १ कारागृहातून सुटका. ________________

5 ९४] निर्गुणध्यान. शत्रु मित्रु देव जाला। सुखदुःखें परोपरीं। येकासी हांसवी देवो। येकासी रडवीतसे ॥ येकासी भाग्य दे देवो। येकासी करंटे करी। सर्व कर्तव्यता तेथें। येथे शब्दाच खुंटला॥ शब्दज्ञान सरों आलें । ज्ञान सर्वत्र संचलें । जाणती जाणते ज्ञानी । मौन्यगर्भ विचारणा ॥ ___मानपं व क ४. १-२५. १०, निर्गुणध्यान, ९४, परममार्गाचे वर्णन. चक्षूचे देखणे सरे । ज्ञानदृष्टि पाहोनि विरे। देखणेपणेंविण उरे। सर्वांगदेखणा ॥ ५२ ॥ अखंड चक्षु अर्धोन्मीलित । सकळ देखण्याचा प्रांत। जेथे अगोचरासहित । मुद्रा आटती ॥ ५३॥ श्रवण मनन निजध्यास । साक्षात्कारें जडे विश्वास। परमानंद सावकाश । होइजे स्वयें ॥ ५४॥ मुमुक्षु साधक सिद्ध झाले । तेही येणोंच मार्गे गेले। निखळ सुखें सुखावले । महानुभाव ॥१५॥ योगी वीतरागी उदास । चतुर्थाश्रम जो संन्यास। दिगंबर नाना तापस । येणेचि मार्गे ॥५६॥ जोगी जंगम आणि सोपी। फकीर कलंदर नानारूपी। .. येणेंचि मार्गे स्वरूपी । पावती सकळ ॥ ५७॥ - १ श्रेष्ठ. ________________

१६८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६९४ ऋषी मुनी आणि सुरवर । आदि करूनियां हरिहर । येणेंचि मार्गे पैलपार । पावती सकळ ॥ ५८॥ मागां जाहाले आतां होती। होऊनि नाही पुनरावृत्ति । ऐसी अभंग ऐक्यस्थिति । वर्तल्यासहित ॥७०॥ सकळ भक्त मिळाले । हरिहरब्रह्मादि आले। ऐक्यरूपें राम जाले । रामसाहित ॥ ७० ॥ जितुकें दृश्य साकार । आहे अनमेय अपार। तोच उसळले धूसर । रक्त श्वेत सुगंध ॥७२॥ पंचभूतीं कर्पूरगोळ । ज्ञानरूपें झाला प्रबळ । ओवाळूनियां सकळ । निवांत झाले ॥७३॥ गेला कर्पूर जळोनि । राहिला अनुहतध्वनि । ऐक्यरूपें समाधानी । सकळ राहिले ॥ ७४॥ नि. ध्या. ५४-७४. .११ जनस्वभावगोसावी. - ९५. भोंदू गुरूंचे वर्णन. अनीती अविवेकी अन्यायी। अभक्त अधर्म लंडाई। वेदशास्त्र करील काई । तया मूर्खासी॥१॥ कर्माच्या ठाई अनादर । नाहीं सगुण साक्षात्कार । ज्ञान पहातां अंधार । निश्चय नाहीं ॥२॥ उगाच गोष्टी ऐकिल्या। मना आल्या त्या धरिल्या। २ अमेय. ________________

१६९ ॥ ९५] जनस्वभावगोसावी. रत्ने सोडून एकवटिल्या। शुभा जैशा ॥३॥ फाल्गुन मासींचा खेळ । जैसा अवघा बाष्कळ।। तेथें पाहोनि निर्मळ । काय घ्यावें ॥४॥ प्रत्ययज्ञानेंविण । करी अनुमानाचा शिण। शत्रु आपणासि आपण । होऊन राहे ॥ ५॥ त्यासी कोणे उमजवावें । मानेल तिकडे न्यावें। आंधळे गुरू स्वभावें । धांवे चहूंकडे ॥६॥ जिकडे तिकडे ज्ञान झालें । उदंड गोसावी उत्तले। तयांचे संगती झाले । बाष्कळ प्राणी॥७॥ भ्रष्ट ओंगळ अनाचारी। कुकर्मी अनुपकारी । विचार नाहीं अविचारी । जेथें तेथें ॥ ८॥ गर्भाधा कैंची परीक्षा । दीक्षाहीनासी दीक्षा । प्रमाण मानी प्रत्यक्षा। विवेकहीन ॥९॥ कशापासून काय झालें । ब्रह्मांड कोणी निर्मिले। कांहीं न कळतां भुंकलें । गाढव जैसें ॥ १० जें वेदशास्त्रीं मिळेना । अध्यात्म कांहीं कळेना। माजला बोका आकळेना। रेडा जैसा ॥११॥ कोण दीक्षा आहे कैसी । अविवेक स्थिति ऐसी। ..... न पाहतां वसवसी । श्वान जैसें ॥ १२ ॥ ऐसे प्रकारांचे जन । चित्ती अवघा अनुमान। प्रतीतीवणि ज्ञान । उगेंच बोले ॥१३॥ १ गोवन्या. २ मातले. ३ मूर्ख, वटवट करणारा, ४ गुरगुरणे. ________________

९५ १७० . रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [ लक्षण नेणे अवलक्षण । भाग्य नेणे करंटपण । ज्ञान नेणे अज्ञान । परम अन्यायी ॥१४॥ एक उपदेश घेती। देवतार्चन टाकून देती। धर्मनीति बुडविती । महापाषांडी ॥१५॥ म्हणती आमुचा गुरु । तयाचा अगाध विचारु । तेथें अवघा एकंकारु । भेद नाहीं ॥१६॥ एक म्हणती गुरु आमुचा । करी अंगिकार विष्ठेचा ॥ तयासारिखा दुजा कैंचा। भूमंडळीं ॥१७॥ एक म्हणती एकचि तो। अखंड ओक वर्पितो। बरें वाईट पाही तो । गोसावी कैंचा ॥१८॥ अंगीकार करी सौख्याचा । तो गोसावी काशाचा। पहा गोसावी आमुचा । गुहाडींत लोळे ॥ १९॥ ओक नरक आणि मृत । निःशंक घटघटां घेत । लोकांमध्ये मोठा महंत । तया म्हणावें ॥ २० ॥ ओंगळपणाची स्थिती । स्वयें ओंगळ करिती। शुचिष्मंत महापंडितीं। मानिजेना ॥ २१ ॥ बरें जैसे जैसे मानले । तैसें तैसें घेतलें। येथे आमुचे काय गेलें । होईना कां ॥ २२॥ एक.म्हणती अर्गळा । भूताळा आणि देवताळा। . जनांमध्ये आग्या वेताळा । चेतऊं जाणे ॥ २३ ॥ म्हणती आमुचा गुरु । जाणे चेटकाचा विचारु। भूर्ते घालून संहारूं । समर्थ असें ॥२४॥ ५ ओरपणे, खादाड रीतीने खाणे. ________________

. $ ९५ ] जनस्वभावगोसावी. म्हणती आमुच्या घरीं। मोठी विद्या पंचाक्षरी। चे. चेटकीं नानापरी । लोकांमध्ये ॥२५॥ अखंड राहे स्मशानीं । सटवी मेसको मावराणी। नाना कुजत्रे येथुनी। शिकोनि जावीं ॥ २६॥ . एक म्हणती गोसावी । गारुड्यास वेड लावी। त्याचे सर्पचि पळवी । चहूकडे ॥ २७ ॥ कुसळी विद्या दृष्टिबंधन । तत्काळ सभामोहन। उच्चाटण आणि खिळण । मोहनी विद्या ॥२८॥ आमुचे गोसावी महायोगी । औषधे देती जगालागीं । नपुंसक वनिता भोगी। चमत्कारें ॥ २९ ॥ ... आमुचा गोसावी साक्षेपें । अखंड करिती सोने रुपें । अंजन साधन त्यापें । काय उणें ॥३०॥ मोठा बडिवार गुरूचा। विंचू उतरी ठाईचा। तैसाचि उतार सर्पाचा । ठाईंचा होय ॥ ३१॥ ... जंबुक मुसके खिळावीं । चोरटी करावी वोणचीं। अखंड भूतें राबवावी । नाना जिनसीं ॥ ३२ ॥ आमुचा गुरु गुप्त होतो। दुजे दिवशी उमटतो। अचेतन चालवितो । मोठा ज्ञानी ॥ ३३ ॥ .. व्याघ्रावरी निःशंक । हातीं सर्पाचा चाबुक। वांचले होते सहस्र एक । सामर्थ्यबळें ॥ ३४॥ दांत पाडोनी निघाले । पांढरे केश काळे झाले । किती आले आणि गेले । गोसाव्यादेखतां ॥ ३५ ॥ - ६ कपटविद्या. ७ उंदीर. ________________

२७२ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [९५ धारबंद नजरबंद । नाना घुटके काम बंद । पोर मोहरे नाना बंद । नाना प्रकारें ॥ ३६॥ अग्नीमध्ये परी जळेना । लोकांमध्ये परी कळेना। देखतां देखतां अस्माना। वेधून जाय ॥ ३७॥ जाणे दुसऱ्याचे जीवींचें। वांझपण फेडिलें वांझेचें। मन बिघडी दंपत्याचें । एकही करी ॥ ३८॥ त्याचे मोठे नवल की गा। मृत्तिकेच्या करी लवंगा। ब्राह्मण समंध अंगा। आणून दावी ॥ ३९॥ मातीची साखर केवळ । ढेकळाचा करी गूळ। . धोत्र्यांच्या बोंडांची केवळ । वाळकें करी ॥४०॥ श्वास कोंडी दिशा कोंडी। पाडी तिडकेने मुरकुंडी। धडा माणसाची मान वांकडी । करून मोडी ॥४१॥ ऐशापरीच्या करामती । भोंपळे पोटांत चढविती । मनुष्याचे पशु करिती । निमिषमात्र ॥ ४२ ॥ गुरु भविष्य सांगती। रेड्याकरवीं वेद म्हणविती। गधड्याकरवी पुराणे सांगविती। सामर्थ्यबळें ॥४३॥ कुतन्याकरवीं रागोद्धार ।। कोंबड्याकरवी तत्त्वविचार। खेचर आणि भूचर । सकळ बाधी ॥४४॥ घुटका घटकेने करावा । फुटका कवडा वेचों न द्याचा। उदंड बचनाग साधावा । येकायेकीं ॥४५॥ वाळलीं काष्ठं हिरवाळलीं। आंधळी डोळसें झाली। , पांगुळे धांवों लागलीं। चहूंकडे ॥४६॥ ३ आकाश. २ हिरवी झाली, पल्लवित झाली. ________________

... 3 ९५] जनस्वभावगोसावी. १७३ गर्भिणीस कन्या की पुत्र । हे ठाउके आहे यंत्र। गोसाव्यांनी विद्यामात्र । अभ्यासिली ॥४७॥ भांडविद्या अभ्यासिली । तस्करविद्या कळों आली । विचारे पाहिली । वसुंधरा ॥४८॥ आमुचे गुरु अधिक गुणें । डोईचें करी रांधणे। .. लोकांचे नवस पुरवणे । नानाप्रकारें ॥४९॥ मेले प्राणी उठविले । साकरे, मीठ केलें। गटगटां अग्नीस गिळिलें । काय सांगों ॥ ५० ॥ गोसावी समाधीस बैसला । दुसरे वेळे उघडून पाहिला। पूर्वेचा पश्चिमेस गेला । अकस्मात् ॥५१॥ लिंगाचे तुकडे तोडिती । कोटिलिंगें एकचि करिती। मोजवून दाळी चारिती । पाषाणनंदी ॥ ५२ ॥ आसन घातले जळावरी । पाहतां तो पैलतिरीं। आमुचा गुरु समुद्रावरी । चालत जातो ॥ ५३॥ पुरुषाची करी वनिता। वनितेचा पुरुष मागुता। अन्न खाऊन तत्वतां । दिशा नाहीं ॥५४॥ नानाजिन्नसी अन्न खाणें । परी उदक नाही घेणें। शापून भस्माच करणें । ऐसा गुरु ॥ ५५॥ अन्न उदंडचि खाणे । किंवा उपवास करणें । गोमुख तोंडे जेवणे । यथासांग ॥ ५६ ॥ गुरु वाघासी भेटला। वाघे चरचरा चाटिला। वस्त्रे बांधोनी आणिला। घरास वाघ ॥ ५७॥ . १ डाळ. २ शौच. ________________

रामदासवचनामृत- संकीर्ण ग्रंथ. गोसावी वाघ होतो । दुसन्या वाघाली मारितो। भुंक कोनि मरतो । उतार नाहीं ॥५८॥ साधी बाळंतिणीची खापरी । वोहरें साधी नानापरी । तूप घे घागरीच्या घागरी। गुरु आमुचा ॥ ५९॥ मेल्या माशा उठविती । तुळसी देवावरी पाडिती। ऐशा नाना करामती । भूमंडळीं ॥६०॥ अमुच्या गुरूची मोठी महंती । नाना अभक्ष भक्षिती। लोकांदेखता फुलें करिती । मद्यमांसाचीं ॥ ६१॥ एक गोसावी पृथ्वीवरी । त्याची कोणी न पवे सरी। जेथे बैसे तेथें वोहरीं। सावकाश करी ॥ ६२ ॥ .. एक गोसावी महा भला । पोरी वाळवंटी पुरिला। येक तो पडोनिच राहिला । कित्येक दिवस ॥ ६३ ॥ येक गोसावी भाग्य देती। एक गोसावी पुत्र देती। गोसाव्याने नवस चालती । नानाप्रकारें॥६४ ॥ जें जें मनामध्ये चिंतावें । तें तें गोसाव्यांनी जाणावें। चुकले ठेवणे काढून द्यावें । नाना प्रकारें ॥ ६५ ॥ सुडक्यामध्ये लाह्या भाजिती। थोड्या द्रव्यांचे उदंड करिती। पराची खबुत्रे नाचविती । नाना प्रकारे॥६६॥ हारपलें सांपडून द्यावें। चोरटें तात्काळ धरावें। थोडे अन्न पुरवावें । बहुत जनांसी ॥ ६७ ॥ ऐसें वर्ततें लोकीं। येणें सार्थक नव्हे की। अध्यात्मविद्या विवेकी। जाणतसे ॥ ६८॥ १ कवची, परटी. २ जादूटोणा. ३ जुनें फडके. ________________

F .१७५ ....६९६ ] ... राममंत्राचे श्लोक. पिंडज्ञान तत्त्वज्ञान । आत्मज्ञान ब्रह्मज्ञान । पिंडब्रह्मांड सकळ शोधून । राहिले जें ॥ ६९ ॥ पदार्थज्ञानाचा बडिवार । त्याहूनि थोर ईश्वर । ऐसे प्राणी लहान थोर । सकळ जाणती ॥ ७० ॥ ___ज. गो. १-७०. १२ राममंत्राचे श्लोक. ९६. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. नको शास्त्रअभ्यास वित्पत्ति मोठी। जडे गर्व ताठा अभीमान पोटी। कसा कोणता नेणवे आजपा रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ खुळे हस्तपादादि हे भग्न होती। दिठी मंद होऊनियां कर्ण जाती। तनू कंप सर्वागिं होती कळा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ कफें कंठ हा रुद्ध होईल जेव्हां । अकस्मात् तो प्राण जाईल तेव्हां । तुला कोण तेथे सखे सोयरे रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ १ लुले. .. ________________

१७६ ९६ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. दुराशा नको रे परस्त्रीधनाची। नको तूं करूं नीच सेवा जनाची। पराधीन कैसा मला दीससी रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ नको योग अष्टांग तो रोध प्राणा। नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा। अपभ्रंश हा मार्ग की वोखटा रे। हरे राम हा मंत्र सोपा रे॥ तपस्वी मनस्वी भले पार गेले। दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले। चिरंजीव कल्पायु गेले किती रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ नको सोंग छदें करूं ढोंग कांहीं। नको शिष्यशाखा मठी सुख नाहीं। महंतीमुळे नाश होतो तपारे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ कलीं साधनें याविणे सर्व निंदीं। हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदीं। हरे राम हे मालिका साधकां रे। हरे राम हा मंत्र सोपा जपा रे॥ रा. श्लो. (८). ________________

१७७ - --- - १९८] करुणाष्टके १३ करुणाष्टके. ९७. रघुनायेका मागणें हेंचि आतां. उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी। सदा प्रीति लागो तुझे गुण गातां । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥१॥ तुझें रूपडें लोचनी म्या पहावें । तुझें गूण गातां मनासी रहावें। उठोआवडी भक्तिपंथेचि जातां। रघुनायेकामागणे हेंचि आतां ॥२॥ मनी वासना भक्ति तुझी करावी। कृपाळूपणे राघवें पूरवावी । वसावें मज अंतरीं नाम घेतां। रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥३॥ सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा। नुपेक्षी मज गुणवंता अनंता। रधुनायेका मागणें हेंचि आतां॥४॥ नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा। सगुणीं मज लाविरे भक्तिपंथा। रघुनायेका मागणें हेंचि आतां॥५॥ भवें व्यापलों प्रीति छाया करावी । कृपासागरे सर्व चिंता हरावी। मज संकटीं सोडवावें समर्था । रघुनायेका मागणे हेंचि आतां ॥६॥ मनी कामना कल्पना ते नसावी। कुबुद्धी कुडी वासना नीरसावी। नको संशयो तोडिं संसारवेथा। रघुनायेका मागणे हेंचि आतां ॥७॥ समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना। . पुढे संशयो नीरसी सर्व चिंता । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥८॥ बिदाकारणे दीन हातीं धरावें। म्हणे दास भक्तांसि रे उधरावें। सुटो ब्रीद आम्हासि सांडूनि जातांरघुनायेका मागणे हेंचि आतां ॥९॥ ९८. उदासीन हा काळ कोठे न कंठे. समाधान साधुजनाचेनि योगें। परी मागुते दुःख होतें वियोगें। घडीने घडी.सीण अत्यंत वाटे। उदासीन हा काळ कोठें न कंठे॥१॥ ________________

१७८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [९८ घरें सुंदरें सौख्य नानापरीचें । परी कोण जाणेल तें अंतरींचें। मनी आठवितांचि तो कंठ दाटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे॥२॥ बळे लावितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहि केल्या घडेना। नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे। उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥ ३ ॥ आवस्था मर्ना लागली काय सांगों। गुणी गुंतला हेत कोण्हासि मागों। बहुसाल भेटावया प्राण फूटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे॥४॥ कृपाळूपणे भेट रे रामराया। वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया। जनामाजिलोकीक हा ही न सूटे। उदासीन हा काळ कोठेंन कंठे॥५॥ आहा रे विधी तां असे काय केलें । पराधेनता पाप माझें उदेलें। बहुतांमधे तूकती तूक तूटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥६॥ समर्था मनी सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी। घडेना तुझा योग हा प्राप्त खोटें। उदासीन हा काळ कोठे न कंठे॥७॥ अखंडित हे सांग सेवा घडावी। न होतां तुझी भेटि काया पडावी । दिसेंदीस आयुष्य हे व्यर्थ आटे। उदासीनहा काळ कोठें न कंठे॥८॥ भजा काय सर्वां परी हीण देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा। म्हणों काय मी कर्म रेखा न लोटे । उदासीन हा काळ कोठेन कंठे ॥९॥ म्हणे दास मी वास पाहें दयाळा। रघुनायेका भक्तपाळा भुपाळा। पहावें तुलाहे जिवीं आर्त मोठे। उदासीन हा काळ कोठें न कंठे॥१०॥ ९९. नसे भक्ति ना ज्ञान. नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काहीं। नसे प्रेम हे रामविश्राम नाहीं। असा दीन अज्ञान मी दास तुझा। समर्था जनीं घेतला भार माझा॥१॥ रघुनायेका जन्मजन्मांतरींचा। अहंभाव छेदूनि टाकी दिनाचा। जनीं बोलती दास या राघवाचा। परी अंतरीं लेश नाहीं तयांचा॥२॥ पर नयन, डोळा. २ वजन करणे. ३ वाट. ४ इच्छा... ________________

F१०.] .. करुणाष्टकें.. १७९ दिनाचें उणें दीसतांलाज कोण्हा।जनी दासदीसे तुझा दैन्यवाणा । सिरी स्वामितूरामपूर्णपतीपी। तुझा दास पाहें सदा सीघ्रकोपी ॥३॥ रघुनायेका दीन हातीं धरावें। अहंभाव छेदूनियां उधरावें । अगुणी तयालागीं गुणी करावें। समर्थ भवसागरी उतरावें ॥४॥ किती भार घालू रघुनायेकाला। मजकारणें सीण होईल त्याला। दिनानाथ हा संकटीं धांव घालीं। तयाचेन हे सर्व काया निवाली ॥५॥ मजकोंवसा राम कैवल्यदाता। तयाचेन हे फीटली सर्व चिंता। समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें। सदा सर्वदा नाम वाचे म्हणावें ॥६॥ १००, सर्वोत्तमा } मन भेट देसी. दुःखानळे मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं। आधार तुझा मज मी विदेसीं। सर्वोत्तमा मैं मज भेटि देसी ॥१॥ प्रालब्ध खोटें आभिमान आला । स्वामी समर्था वियोग जाला। तेणें बहु क्षीति वाटे मनासी । सर्वोत्तमा के मज भेटि देसी ॥२॥ तुझिया वियोगें बहु वेधना रे । विवेक नाहीं आम्हां दिनारे। पडिला समंधु या दुर्जनेसीं । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥ ३॥ संसारचिंता मज वाटते रे। रामा प्रपंची मन जातसे रे। संसर्ग आहे इतरां जनासीं । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥४॥ १०१. रघुविरभजनाची.. रघुविरभजनाची मानसीं प्रीति लागो। रघुविरस्मरणाची अंतरीं वृत्ति जागो। रघुविरचरणाची वासना वास मागो। रघुविरगुण गातां वाणि हे नित्य सांगों ॥१॥ १ रक्षण करणारा, आश्रय. ________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१०॥ चतुरपण जनी हे पाहतां आढळेना । निकट रघुविराचे रूप कैसे कळेना। . . चपळ मन वळेना गर्वताठा गळेना। तुजविण जगदीशा कर्मरेखा टळेना ॥२॥ तरुणपण देह्याचे लोपतां वेळ नाहीं। तन मन धन अंतीं वोसरे सर्व कांहीं। सकळ जन बुडाले वेर्थ मायाप्रवाहीं। झडकरि सुमना रे हीत शोधूनि पाहीं ॥३॥ पळपळ चळताहे बाळ तारुण्य देहीं। तळमळ विषयांची नेणवे हीत कांहीं। लळलळ गरळा तो काळ लाळीत आहे। जळजळ सितळा हे भक्ति सेऊनि राहे ॥४॥ दिनकरकुळवल्ली लोटली आंगभारें। रघुविरअवतारें दाटली थोरथोरें। सुखरूप सुखवासि राहिले योगरासी। - सफळ सितळ छाया फावली रामदासीं॥५॥ १०२. जनी जाणिने योग हा सुकृताचा. मनासारिखी सुंदरा ते अन्यया । मनासारिखे पुत्र ज्यामात कन्या। सदा सर्वदा बोलती रम्य वाचा। जनी जाणिजे योग हा सुकृताचा ॥१॥ भली मायबापें भले मित्र बंधु । भले सोयरे राखती स्नेहवादु । मुलें लेकुरे येक मेळा सुनांचा । जनीं जाणिजे योग हा सुकृताचा ॥२॥ भले धाकुटे थोरले सर्व काहीं । भले गोत्रजु भिन्न भावार्थ नाहीं। अखंडीत हा काळ जातो सुखाचा।जनी जाणिजे योग हासुकृताचा॥३॥ १ लाळ टाकणे. ________________

१०] __ करुणाष्टकें १८१ धनें धान्य पात्रे अळंकार चीरें । विसोर घरे सुंदर रम्य सारे ॥ देहे चौलतो. सर्व आरोग्य ज्याचा । जनी जाणिजे योग हा - सुकृताचा ॥ ४ ॥ मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी । मनासारिखे लोक शोकापहारी। मनासारिखा संग साधुजनाचा । जनी जाणिजे योग हा सुकृताचा ॥५॥ मनासारिखें चिंतितां देव पावे । मनासारिखे भक्त भावे मिळावे । सदा बोलती बोल सारांश वाचा । जनी जाणिजे योग हा - सुकृताचा ॥६॥ म्हणे दास सायास केल्यां घडेना। विकल्पं जनीं एक ठाई पडेना। घडे योग होतां विवेकी जनाचा । जनीं जाणिजे योग हा .. सुकृताचा ॥७॥ १०३. अनुदिनि अनुतापें. अनुदिनि अनुतापें तापलों रामराया। परम दिनदयाळा नीरसी मोहमाया। अचपळ मन माझें नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धाव रे धांव आतां ॥१॥ भजनरहित रामा सर्वही जन्म गेला। स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी। सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ विषयजनित सूखे सूख होणार नाहीं। तुजविण रघुनाथा ओखंटे सर्व काहीं॥ ___१ वस्त्रे. २ विश्रांतिस्थाने. ३ व्यर्थ. . - - - LE. ________________

१८२ १०३ . - - रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. रघुकुळटिळका रे हीत माझें करावें। दुरित दुरि रहावें म्यां स्वरूपी भरावें ॥३॥ तन मन धन माझे राघवा रूप तूझें। तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें ॥ प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी। अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥ चपळपण मनाचें मोडितां मोडवेना। सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥ घार्डधार्ड विघडे हा निश्चयो अंतरींचा। म्हणवुनि करुणा हे बोलतों दीन वाचा ॥५॥ जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी। मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी॥ तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । षडरिपुकुळ माझे तोडिं याचा समंधू ॥६॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी। . शिणत शिणत पोटी पाहिली वाट तूझी ॥ झडकरि झड घालीं धांव पंचानना रे। तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥७॥ सवळ जनक माझा राम लावण्यपेटी। म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी ॥ दिवस गणित बोटीं प्राण ठेवोनि कंठीं। अवचट मज भेटी होत धालीन मीठी ॥ ८॥ जननिजनकमाया लेंकरूं काय जाणें । पय न लगत मूखीं हाणितां वत्स नेणे॥ . ________________

। १..] - करुणाष्टके. . जलधरकणआशा लागली. चातकाली। हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९॥ तुजविण मज तैसें जाहलें रामराया। विलग विषम काळी सांडिती सर्व माया ॥ सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं। विषय वमन जैसें त्यागिले सर्व कांहीं ॥१०॥ स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे। रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥ जिवलग जिव घेती प्रेत सांडोनि देती। विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥ सकळजन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मज कैंचे चालतें हेंच साचें ॥ विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी। रघुवर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥ सुख सुख म्हणतां तें दुःख ठाकोन आलें। भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झालें॥ भ्रमुनि मन कळेना हीत तें आकळेना। परम कठिण देहीं देहबुद्धी गळेना ॥ १३ ॥ उपरति मज रामी जाहली पूर्णकामी। सकळभ्रमविरामी रामविश्रामधामीं ॥ घाडि घडि मन आतां रामरूपी भरावें। रघुकुळटिळका रे आपुलेसे करावे ॥१४॥ जळचर जळवासी नेणती त्या जळासी। निशिदिनि तुजपाशीं चूकलों गूणराशी॥ १ जेथें सकळभ्रम विराम पावतात असा. rrhitFH ________________

१८४ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [1.3 भुमिधरनिगमांसी वर्णवेना तयासी। सकळभुवनवासी भेटि दे रामदासी ॥ १५ ॥ १०४. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों. असंख्यात ते भक्त होऊनि गेले। तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ॥ नव्हे कार्यकर्ता भुमीभार झालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १ ॥ बहू दास ते तापसी तीर्थवासी। गिरीकंदरीं भेटि नाहीं जनासी॥ स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों। ... तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों॥२॥ सदा प्रेमळांसी तयां भेटलासी। तुझ्या दर्शनें स्पर्शनें पुण्यराशी। अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों॥ ३ ॥ तुझ्या प्रीतिचे दास जन्मासि आले। असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥ बहू धारणा थोर चंकीत झालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥४॥ बहूसाल देवालयें हाटकाचीं। रसाळा कळा लाघवे नाटकाची ॥ पुजा देखतां जाड जीवीं गळालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलों ॥५॥ १ आश्चर्यचकित. २ सोन्याची. ________________

१०५] . करुणाष्टकें कितेकी देह त्यागिले तूजलागीं। पुढे जाहले संगतीचे विभागी॥ देहदुःख होतांचि वेगें पळालों। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥६॥ सदासर्वदा राम सोडोनि कामी। समर्था तुझे दास आह्मीं निकामी ॥ . बहू स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलों। तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलो ॥७॥ किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांति ॥ परस्तावलों कावलों तप्त झालों। तुझा दास मी व्यर्थे जन्मास आलों ॥८॥ १०५. रघुनायका, काय कैसे करा ? उदासीन हा काळ जातो गमना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना॥ उठे मानसीं सर्व सोडोनि जावें। रघुनायका काय कैसें करावें ॥१॥ जनीं बोलता बोलतां वीट वाटे। नसे अंतरीं सूख कोठे न कंठे॥ घडीने घडी चित्त कीती धरावें। रघूनायका काय कैसे करावें ॥ २॥ बहू पाहतां अंतरीं कोड होतो। शरीरास तो हेत सांडोनि जातो॥ ________________

२८६ LI रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१०५ : उपाधीस देखोनि वाटे सरावें। रघुनायका काय कैसें करावें ॥ ३ ॥ अवस्था मनों होय नानापरीची। किती काय सांगू गती अंतरींची ॥ विवेकेंचि या मानसा आवरावें । रघुनायका काय कैसें करावें ॥ ४॥ म्हणे दास ऊदास झालों दयाळा । जनों व्यर्थ संसार हा वायचाळा ॥ तुझा मी तुला पूसतों प्रेमभावें । रघूनायका काय कैसें करावें ॥५॥ १०६. रामाचा धांवा. धांव रे रामराया किती अंत पाहासी ॥ ध्रु०॥ प्राणांत मांडिलासे नये करुणा कैशी। पाहीन धणिभरी चरण झाडीन केशी । नयन शिणले बा आतां केधवां येशी ॥१॥ मीपण अहंकारें अंगीं भरला ताठा । विषयकर्दमांत लाज नाहीं लोळतां। चिळस उपजेना ऐसें जाले बा आतां ॥ २॥ मारुतिस्कंधभागी शीघ्र बैसोनि यावें। राघवें वैद्यराजे कृपाऔषध द्यावें। दयेचे पद्महस्त माझे शिरी ठेवावे ॥३॥ या भवीं रामदास थोर पावतो व्यथा। २ वायफळ खळ. ________________

१८७ - १०४ ] करुणाष्टकें. कौतुक पाहतोसी काय जानकीकांता। दयाळा दीनबंधो भक्तवत्सला ताता ॥४॥ १०७. बुद्धि दे रघुनायका. युक्ति नाही बुद्धि नाहीं विद्या नाहीं विवंचितां ॥ नेणता भक्त मी तूझा बुद्धि दे रघुनायका ॥१॥ मन हे आवरेना की वासना वावडे सदा । कल्पना धांवते सैरा बुद्धि दे रघुनायका ॥२॥ अन्न नाहीं वस्त्र नाहीं सौख्य नाहीं जनांमधे । आश्रयो पाहतां नाहीं बुद्धि दे रघुनायका ॥३॥ बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना। बहु मी पीडिलों लोकी बुद्धि दे रघुनायका ॥ ४॥ तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतांपरी। सौख्य तो पाहतां नाहीं बुद्धि दे रघुनायका ॥ ५ ॥ नेटके लिहिता येना वाचितां बुकतों सदा। अर्थ तो सांगतां येना बुद्धि दे रघुनायका॥६॥ प्रसंग वेळ तर्कना सुचेना दीर्घसूचना। मैत्रिकी राखितां येना बुद्धि दे रघुनायका॥ ७॥ कळेना स्फूर्ति होईना आपदा लागली बहु । प्रत्यहीं पोट सोडीना बुद्धि दे रघुनायका॥८॥ संसार नेटका नाहीं उद्वेगू वाटतो जिवीं। परमार्दू कळेना की बुद्धि दे रघुनायका ॥९॥ देईना पुर्विना कोणी उगचि जन हांसती। विसरू पडतो पोटी बुद्धि दे रघुनायका ॥१०॥ ________________

रामदासवचनामृत--संकीर्ण ग्रंथ. [ १०७० पिशुनें वाटतो सर्वे कोणीही मजला नसे। समर्था ! तूं दयासिंधू बुद्धि दे रघुनायका ॥ ११॥ उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे। . तूं भक्तवत्सला रामा बुद्धि दे रघुनायका ॥ १२ ॥ कायावाचामनोभावें तुझा मी म्हणवीतसें। हे लाज तूजला माझी बुद्धि दे रघुनायका ॥ १३ ॥ सोडवील्या देवकोटी भूभार फेडिला बळें । भक्तांसि आश्रया मोठा बुद्धि दे रघुनायका ॥ १४ ॥ उदंड भक्त तुम्हांला आम्हांला कोण पूसतें। बीद है राखणे आधी बुद्धि दे रधुनायका ॥ १५ ॥ उदंड ऐकिली कीर्ति पतीतपावना प्रभो। मी एक रंक दुर्बुद्धि बुद्धि दे रघुनायका ॥१६॥ आशा हे लागली मोठी दयाळू बा दया करी। आणीक नलगे कांहीं बुद्धि दे रघुनायका ॥ १७॥ . रामदास म्हणे माझा संसार तुज लागला । संशय वाटतो पोटी बुद्धि दे रघुनायका ॥१८॥ १०८. रामदासांस कफव्यथा झाली असता त्यांनी केलेलें. मारुतीचे करुणाष्टक. फणिवर उठवीला वेग अद्भूत केला। त्रिभुवनजनलोकी कीर्तिचा घोष केला ॥ रघुपतिउपकारें दाटले थोर भारें। परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥१॥ सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें। कपिकटक निमाले पाहतां येश गेलें ॥ ________________

करुणाष्टके. परदळ शरघातें कोटिच्या कोटि प्रेतें। अभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ॥२॥ कपिरिसघनदाटी जाहली थोर दाटी। म्हणवुनी जगजेठी धावणे चार कोटी॥ मृत विर उठवीले मोकळे सिद्ध झाले। सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥ बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्रागदाता। .. उठवि मज अनाथा दूर सारूनि वेथा ॥ झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया। रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥. तुजविण मजलागीं पाहतां कोण आहे । म्हणवुनि मन माझें तूाझ रे वास पाहे ॥ मज तुज निरवीले पाहिजे आठवीलें । सकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ॥५॥ उचित हित करावे उद्धरावें धरावें । अनुचित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ॥ अघटित घडवावें सेवका सोडवावें। हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥६॥ प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया। परदळ निवटाया दैत्यकुळे कुडाया॥ गिरिवर तुडवाया रम्य वेशे नटाया। तुजचि अलगडाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥ । १ ठार मारण्यास ________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. .... बहुत सबळ सांठा मागतों अल्पवाटा।। न करित हित कांटा थोर होईल ताठा ॥ कृपणपण नसावें भव्य लोकी दिसावें। । अनुदिन करुणेचे चिन्ह पोटीं वसावें ॥८॥ जलधर करुणेचा अंतरामाजी राहो। तरि तुज करुणा हे कां न ये सांग पाहों॥ कठिण हृदय झाले काय कारुण्य केलें। न पवसि मज कां रे म्यां तुझे काय केलें ॥९॥ वडिलपण करावें सेवका सांवरावें। अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ॥ निपटाच हटवादें प्रार्थिला शब्दभेदें। कपि घन करुणेचा वोळला राम तेथें ॥ १० ॥ बहुतचि करुणा ही लोटली देवराया। सहजचि कफ गेलें जाहली दृढ काया॥ परम सुख विलासे सर्वदा दासनूसे । पवनज तनुतोषे वंदिला सावकाशें ॥ ११ ॥ १४, ऐतिहासिक, १०९. समर्थांचे स्वहस्तलिखित पत्र. - श्रीरामसमर्थ. उत्तमगुणाळंकृत रघुनाथभक्तिपरायेण परोपकार राज्यमान्य राजेश्री रघुनाथभट गोसावी यांसी स्नेहपूर्वक सूचना. तुमचा निरोप घेउनु हेलवाकीहून स्वार जालों तें सुखरूप चाफलास पावलो. संकल्पाची समारादनाही झाली. पुढे शरीराचा उपचार ही हळुहळु होतो. तुमचे मन मजवरि बहुत आहे ते तुमचे ________________

१९१ ६१.९] ऐतिहासिक. आवडीच्या गुणे कल्याण होईल ऐसें नेमस्त चिन्ह दिसते. आपण ते कर्कष सीतलाईमधे बहुताच श्रम पावलों, तो माझा सकळ श्रम घेउनु निरोप दिधला तो देव जाणे. येविसी चीत चमत्कारलें तें पत्रीं किती म्हणौनु लेहावें ? माझें अरिष्ट तुझी घेऊन मज उष्ण देशासी पाठविले हा उपकार श्रीरघुनाथजीस जाला. मज रघुनाथजीवेगलें कोण्ही जिवलग नाहीं; आपण जाल समाचार रघुनाथजीस विदित केला. या उपरी माझे ठाई तुम्ही आहा. रघुनाथकृपेचा प्रत्यये तुम्हास आलियावरी प्रचितीसी कलों येईल. बहुत काये लेहावें ? वेदमूर्ती दिवाकरभट गोसावी तेथें आलियावरी तुम्ही माझा समाचार घेयासी ये प्रांतास आले पाहिजे. स्नेह बहुत असों दीजे हा पत्रार्थ. हे इतकें म्यां आवडीच्या कलवळ्याने लिहिले आहे. मने मन साक्ष असेल. परंतु तुम्हांस उपचारसा वाटोन रंजीस होल तरी न होणे. जैसा दिवाकरभट तैसे तुम्ही हा इत्यर्थ आहे. बरे कलले पाहिजे. तुमचा आमचा येकांत प्रसंग जालियावरी मग ऐसे लिहितां न ये, म्हणौनि संधीमधे प्रसंग फावला पुढे फावेना म्हणौनि लाँबेकरून लिहिले. वरकड इतर भाव मनामध्ये असेल तरी रघुनाथ साक्ष असे. तुम्ही रजीस न होणे आणि जे आहे ते लिहिले यांमधे मिथ्या स्तुती नाही. तुम्ही सर्वज्ञ आहा. तुमचे जे काही आहे ते सकल माझें चि आहे. म्या मज माझ्या मनास येईल तैसे लिहिले येथे तुमचे काये गेलें ! कांहीं चिंता न कीजे. तुम्ही आमचेचि आहा, तुम्ही आम्ही सकल देवाचे आहों. शरीरभेदावरी न जाणे. अंतरस्थिति पाहिल्याउपरी कलों येईल. -सांप्रदायिक, कागदपत्रे. १ निश्चयपूर्वक. २ असंतोष. ३ विस्तारपूर्वक.... ________________

O रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१.. ११०. रामदासांचे महंतास पत्र. विवेक जालियां देवाचा योग । मग होणार नाहीं वियोग। देव सर्वांचे अंतरंग । अखंडित भेटी॥ या समाधाने असावें । निरूपणी विवरावें। मानसपूजनें आठवावें । सकळ कांहीं॥ ऋणानबंधे भेटी होईल । परस्परें समाचार कळेल। सहज वर्तमान निवळेल । ते प्रसंगी॥ कांहीं समुंदाव करणें । ये विषीं आलस्य न करणे। .. आलस्य करितां उदंड उणें । दिसेल परमार्थी ॥ पोहोणारे बुडते तारावे । सामर्थ्य बुडों नेदावे । मूर्ख ते शाहाणे करावे । विवेकी पुरुषे ॥ आपणाहुन जो धींग । त्यासी करूं नये प्रसंग। आपणाधीन जो प्रसंग । तोचि करावा ॥ सोईयाधाईयाची मुलें । तीक्षण बुधीची सखोलें। तयासी बोलणे मृद बोलें । करित जावें ॥ त्याचा संसार समाचार । पुसत जावा विस्तार । उदंड सांगतां तत्पर । होऊनि ऐकावें ॥ दुःख ऐकतां दुःख जाते। त्याचे दुःख हळु होतें। मग तें सर्वेचि धरिते। मित्रभावें ।।। निकट मित्रि बरी होतां । मग त्यासी न्यावें येकांता। म्हणावें रे भगवंता। कांहीं त-हीं भजावें ॥ पूर्वी देव पूजिला नव्हता । म्हणोनि आली दरिद्रता । या कारणे अनंता। कांहीं तन्ही भजावें ॥ १ शिष्यसमुवाय. २ वरचढ. क ________________

१९३ १११] । ऐतिहासिक. मान्य होतां जप सांगावा । मग तो इकडे पाठवावा। मग तयाचा सकळ गोवा । उगऊं आम्हीं॥ -विविधविषय १. १४ १-१४२. - १११. सुंदरमठ. परंतु येकवचनी देव एक । जेणे सोडिले देव अनेक । सेवाहीन मी सेवक । त्याचा म्हणवी॥ समर्थ अंगिकार केला । नाना संकटी रक्षिला। . त्याचिया अन्ने पिंड वाढविला । जन्मवरी॥ मारुतीसारिखे सेवक । तेथे मी मानवी रंक। नवल सामर्थ्याचे कौतुक । काये सांगों ॥ समर्थ आणि दीननाथ । वैभवें समर्थाहून समर्थ । जेणे माझे मनोरथ । पूर्ण केले ॥ जें जें मनें अभिळासिलें । तें तें समर्थे पुरविलें। मज दीनास वाढविलें । मर्यादेवेगळें ॥ समर्थाने समर्थ करावें । तरीच समर्थ म्हणवावें। त्रैलोक्यास पडिलें ठावें । सामर्थ्य ज्याचें ॥ देवमात्र जांजावला । म्हणोनि कैपक्षी पावला। भुवनकंटक निर्दाळिला । दशमुख शत्रु ॥ जिहीं त्रैलोक्य जिंकिलें । त्यास मर्कटाहातीं मार विलें। भुवनत्रय आनंदविलें। दाशरथीनें ॥ बिभीषणास दिधली लंका। सुरवरांची फिटली शंका। समर्थ रामदास रंका। नवाजिलें। H -- - -- १ संशय, संकट, विकल्प. २ त्रासला. ३ रक्षणकर्ता. ४ प्रसिद्ध केलें. ________________

१९४ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६१११ सुंदर मूर्ति सुंदर गुण । सुंदर कीर्ति सुंदर लक्षण । सुंदरमठी देव आपण । वास केला ॥ सुंदर पाहोन वास केला। दास संनिध ठेविला। अवघा प्रांतचि पावन केला । कृपालुपणें ॥ बावी पोखरणी झरे। टांकी विशाळ सुंदरें। ठाई ठाई विशाळ मनोहरें । स्थळे निर्मिलीं ॥ _ कडे कपाटें दरे दकुंटें। पाहों जातां भयचि वाटे। ऐसे स्थळी वैभव दाटे । देणे रघुनाथाचें ॥ अंतर्निष्ठ अखंडध्यानी। संनिध रामवरदायनी। विश्वमाता त्रैलोक्यजननी । मूळमाया ॥ -विविधविषय २. १३७-१३८. ११२. प्रतापगडच्या भवानीचे स्तोत्र प्रपंची आमचे कुळीं । तुळजा कुळदेवता। नेणतां ऐकिलें होतें । जाणतां स्मरलें मनीं ॥ श्रेष्ठांची कामना होती। पुर्विली मनकामना। नौसं जो नौसिला होता । तो त्यापासुनि चुकला ॥ पुत्रची घेतला त्यांचा । जोगी करुनि सोडिला। ख्यानति दाविली मोठी। न्याय नीति चुकेचिना ॥ वैराग्य घेतलें पोटीं । सर्व संसार सांडिला । तुझिया दर्शना आलों। कृपादृष्टी नवाजिलों॥ तुझा नवाजिला आहे । महंत म्हणती जनीं। तुझेंची सर्वही देणे । सर्वही तुजपासुनी ॥ १ प्रतापगडची भवानी. २ नवस. ३ ख्याती. ४ प्रसिद्ध झालो. ________________

. १९५ ११२] ऐतिहासिक. संसारीं मोकळं केलें । आनंदी ठाव दिधला। तोडिली सर्वही चिंता । तूं माया सत्य जाहालें ॥ पुर्विल काय मी सांगों। ईच्छा पूर्ण परोपरीं । मागील आठवेनासें । केलें आश्चीर्य वाटलें ॥ सदानंदी उदो' जाला । सुख संतोष फावला। पराधेनता गेली। सत्ता उदंड चालिली ॥ उदंड ऐकिलें होतें । रामासी वरु दीधला। मी दास रघुनाथाचा। मजही वरदायनी ॥ श्रेष्ठांचा नौस जो होता। तो भी फेडीनसें म्हणे । पुष्प देउनि उतराई । ऐसें हें कल्पिलें मनीं ॥ तुळजापुर ठाकेना । चालिली पश्चिमेकडे। पारघाटी जगन्माता। सद्य येउनी राहिली ॥ ऐसे हे ऐकिलें होतें । हेत तेथेंचि पावला। पुष्पाची कल्पना होती । तेथें पुष्पचि दिधलें। ऐसी तूं दयाळु माता। हेमपुष्पाचे घेतलें। संतुष्ट भक्तिभावाने । त्रैलोक्यजननी पाहा ॥ थोड्याने श्लाध्यता केली । थोर संतोष पावलों। उत्तीर्ण काये म्यां व्हावें । तुझे कृपेसी रोकडें ॥ तुझेंची तुजला दिल्हें । म्यां हे कोदुनि आणिलें। संकट वारिली नाना। रक्षिलें बहुतांपरी॥ जीवींचे जाणते माता । तूं माता मज रोकडी। लोकांच्या चुकती माता । आचुक जननी मला ॥ १ उदय. २ हल्ली. ________________

११ १९६ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [ येकची मागणे आतां । द्यावें तें मजकारण। तुझा तूं वाढवी राजा। सीन आम्हांची देखतां। दुष्ट संव्हारिले मागें । ऐसें उदंड ऐकतों। परंतु रोकडें कांहीं। मूळ सामर्थ्य दाखवी ॥ देवाची राहिली सत्त्वं । तूं सत्त्व पाहासी किती। भक्तांसी वाढवीं वेगीं । ईच्छा पूर्ण परोपरी ॥ रामदास म्हणे माझें । सर्व आतुर बोलणें । क्षमावें तुळजे माते । ईच्छा पूर्णची ते करी ॥

-रामदासांची कविता ३९३. १-२०..

११३. शिवाजीचे वर्णन. निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंडस्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥१॥ परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयासी। तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैंची ॥२॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति। पुरंदर आणि छत्रपति । शक्ति पृष्ठभागीं ॥ ३॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा॥४॥ आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठाई ॥५॥ धीर उदार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर । सावधपणे नृपवर । तुच्छ केले॥६॥ ________________

१९७ ऐतिहासिक. तीर्थक्षत्रे मोडिलीं। ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली। सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥७॥ देवधर्मगोब्राह्मण । यांचे करावया संरक्षण। हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥ ८॥ . उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायीं ॥९॥ या भूमंडाळाचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं। महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुम्हांकरितां ॥ १० ॥ आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होऊनी कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥ ११ ॥ कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांस धाक सूटले। ... कित्येकांस आश्रय जाले । शिव कल्याणराजा ॥ १२ ॥ तुमचे देशी वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाही घेतलें। ऋणानुबंधे विस्मरण जालें । काय नेणूं ॥ १३ ॥ सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हांप्रती। धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥१४॥ उदंड राजकारण तटले । तेणें चित्त विभागलें। प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥१५॥ ११४. क्षात्रधर्म. अल्पस्वल्प संसारधर्म । मागां बोलिलों राजधर्म । आतां ऐका क्षात्रधर्म । परम दुर्लभ जो॥१॥ जयास जिवाचे वाटे भय । त्याने क्षात्रधर्म करूं नये । कांही तरी करूनि उपाये । पोट भरावें ॥२॥ ________________

१९८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१r विन्मुख मरणीं नर्क होती। वांचून येतां मोठी फजिती। इहलोक परलोक जाती । पहाना कां ॥३॥ मारितां मारितां मरावें । तेणे गतीस पावावें। फिरोन येतां भोगावें । महद्भाग्य ॥४॥ नजर करारी राखणे । कार्य पाहुनि खतल करणे। तेणें रणशूराची अंतःकरणें । चकित होती ॥५॥ जैसा भांड्याचा गलोला। निर्भय भारामधे पडिला । तैसा क्षत्री रिचवला । परसैन्यांमध्ये ॥६॥ निशंकपणे भार फुटती । परवीरांचे तवके तुटती। जैसा बळिया घालुनि घेती। भैरी उठतां ॥७॥ ऐसे अवधेच उठतां । परदळाची कोण चिंता। हरणे लोळवी चित्ता। देखत जैसा ॥ ८॥ मर्दै तकवा सोडूं नये । म्हणजे प्राप्त होतो जय। कार्य प्रसंग समय । ओळखावा ॥९॥ कार्य समजेना अंतरें । तें काय झुंजेल बिचारें। युद्ध करावें खबरदारे । लोक राजी राखतां ॥१०॥ दोन्ही दळे एकवटें । मिसळताती लखलखाटें। युद्ध करावें खणखणाटें । सीमा सांडुनी ॥ ११॥ देव मात्र उच्छेदिला । जित्यापरीस मृत्यु भला। आपुला स्वधर्म बुडविला । ऐसें समजावें॥१२॥ मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा । ये विषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥ १३॥ The - - १ तोफ. २ गोळा. ३ सेंन्य. ________________

- - ६११५] ऐतिहासिक.. १९९ मरणहाक तो चुकेना । देह वांचवितां वाचेना। विवेकी होऊन समजाना । काय करावें ॥ १४ ॥ भले कुळवंत म्हणावें । तेही वेगीं हजीर व्हावें। हजीर न होतां कष्टावें । लागेल पुढें ॥१५॥ एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला । तुम्हां सकळांस कोप आला । तरी क्षमा केली पाहिजे ॥१६॥ देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते। देवदास पावती फत्ते । यदर्थी संशय नाहीं ॥१७॥ देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा। मुलुखबडवा का बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥ १८॥ विवेक विचार सावधपणें । दीर्घ प्रयत्न केलाचि करणें । तुळजावराचेनि गुणें। रामें रावण मारिला ॥ १९॥ . अहो हे तुळजा भवानी । प्रसिद्ध रामवरदायिनी। रामदास ध्यातो मनीं । यन्निमित्त ॥ २० ॥ ११५. शिवानीची सनद. श्री. श्रीरघुपती. श्रीमारुती. आश्विन शु॥ १० शके १६००. श्रीसद्गुरुवर्य श्रीसकळतीर्थरूप श्रीकैवल्यधाम, - श्रीमहाराज स्वामीचे सेवेसी. चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना जे मजवर कृपा करुनु सनाथ केले. आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना, देव-ब्राह्मणाची सेवा, प्रजेची पीडा दूर करुनु, पाळण, रक्षण करावें; हे व्रत संपादून ________________

२०० रामदासवचनामृत--संकीर्ण ग्रंथ. [११५ त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जे मनी धराल तें श्री सिद्धीस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक (पा. भे. दुराढे)लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्ये करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशी स्थळे दुर्घट करावीं ऐसें जें जें मनीं धरिलें तें तें स्वामींनी आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केले. .. याउपरि राज्य सर्व संपादिले तें चरणी अर्पण करूनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला तेव्हां आज्ञा जाहली की, “ तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावेस तीच सेवा होय." ऐसें आज्ञापिलं. . यावरून निकटवास घडुनु वारंवार दर्शन घडावें; श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी ऐसी प्रार्थना केली. तेही आसमंतात् गिरिगव्हरी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. त्यास चाफळी श्रीची पूजा मोहोछाव ब्राह्मणभोजन, अतिथि, इमारत सर्व यथासांग घडावे. जेथे जेथे श्रीची मूर्तिस्थापना जाहाली तेयें उछाव पूजा घडावी. यास राज्य संपादिले. यांतील ग्रामभूमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हां आज्ञा जाहली की “ विशेष उपाधीचे कारण काय ? तथापि तुमचे मनीं श्रीची सेवा घडावी हा निश्चय जाहला त्यास यथाअवकाश जेथे जें नेमावेसे वाटेल ते नेमावे, व पुढे जसा सांप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तैसें करीत जावें.” याप्रकारें आज्ञा जाहली. ________________

- RIP EURALaw २०१ - - -- - ६११६] ऐतिहासिक. यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्रीच्या स्थापना जाहल्या त्यास ग्रामभूमीची पत्रे करून पाठविली. श्रीसंनिध चाफळी एकशे एकवीस गांव सर्वमान्य व एकशे एकवीस गांवीं अकरा बिधे प्रमाणे भूमी व अकरा स्थळी श्रीची स्थापना झाली. तेथें नैवेद्यपूजेस भूमि अकरा बिधे प्रमाणे नेमिले आहेती ऐसा संकल्प केला आहे. तो सिद्धीस नेहण्याविषयी विनंति केली तेव्हां संकल्प केला तो परंपरेनें सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहली त्याजवरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले. तपशील१ मौजे चाफळ, मौजे नाणेगांव......वगैरे गांवें ३३. २ मौजे दहीफळ बुद्रुक, परगणे ढवळी,श्रीश्रेष्ठाचे समाधीकडे देहे २ ३ गांव गंना जमीन बिधे चारशें एकोणीस. धान्य गल्ला हरजिनसी खंडी १२१ एकशे एकवीस. येकूण दरोवस्त सर्वमान्य गांऊ तेहेतीस व जमीन बिघे गाऊगना चारशें येकोणीस व कुरण एक श्रीचे पूजा उछाहाबद्दल संकल्पांतील सांप्रत नेमिले व उछाहाचे दिवसास व इमारतीस नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. येणे करोन अक्षई उछा. हादि चालविण्याविषीं आज्ञा असावी. राज्याभिषेक ५ कालयुक्ताक्षि नाम संवत्सरे अश्विन शुद्ध १० दशमी बहुत काय लिहिणे हे विज्ञापना . ११६. आनंदवनभुवन. जन्मदुःखें जरादुःखें । नित्य दुःखें पुनः पुन्हा। संसार त्यागणे जाणे । आनंदवनभुवना ॥ कष्टलों कष्टलों देवा । पुरे संसार जाहला। .. - देहत्यागासि येणे हो। आनंदवनभुवना ॥ ________________

२०२ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. स्वधर्मा आड में विघ्नं । तें तें सर्वत्र उठिलीं। लाटिली कुटिली देवें। दापिली कापिली बहु ॥ खौळले लोक देवाचे । मुख्य देवचि उठिला। कळेना कायरे होतें। आनंदवनभुवनीं ॥ देवदेव बहु देव । नाना देव परोपरी। दाटणी जाहली मोठी। आनंदवनभुवनीं ॥ कल्पांत मांडला मोठा । म्लेंच्छ दैत्य बुडावया। कैपक्ष घेतला देवीं। आनंदवनभुवनीं ॥ बुडाले सर्वही पापी । हिंदुस्तान बळावलें। अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभुवनीं ॥ पूर्वी जे मारिले होते । तेचि आतां बळावले। कोपला देव देवांचा। आनंदवनभुवनीं ॥ येथून वाढिला धर्म। रमाधर्म समागमें। संतोष मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ॥ बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला । मोडिलीं मांडिली क्षेत्रे । आनंदवनभुवनीं ॥ उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया। जपतप अनुष्ठानें । आनंदवनभुवनीं ॥ लिहिला प्रत्ययो आला। मोठा आनंद जाहला। चढता वाढता प्रेमा। आनंदवनभुवनीं ॥ बंड पाखंड उडालें। शुद्ध अध्यात्म वाढलें। चढता वाढता प्रेमा। आनंदवनभुवनीं ॥ . १ खवळले. ________________

११.] सांप्रदायिक. रामवरदायिनी माता। गर्द घेऊनि उठली। मार्दले पूर्विचे पापी । आनंदवनभुवनीं ॥ प्रत्यक्ष चालली राया। मूळमाया समागमें । नष्ट चांडाळ ते खाया । आनंदवनभुवनीं ॥ भक्तांसि रक्षिले मागें। आतांही रक्षिते पहा। भक्तांसि दिधलें सर्वै। आनंदवनभुवनीं ॥ देवभक्त येक जाले । मिळाले जीव सर्वही । संतोष पावले तेथें। आनंदवनभुवनीं ॥ मनासी प्रचीत आली । शब्दी विश्वास वाटला। कामना पुरती सर्वै । आनंदवनभुवनीं ॥ -रामदासांची कविता ४२१. १-५३. . १५ सांप्रदायिक. .. ११७. रामदासांचे गुरु कोण ? आदिनारायण सद्गुरु आमुचा। शिष्य झाला त्याचा महाविष्णु ॥१॥ तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस । तेणें ब्रह्मयास उपदेशिलें ॥२॥ ब्रह्मदेवें केला उपदेश वसिष्ठा । तेथें धरा निष्ठा शुद्धभावो ॥३॥ वसिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी । रामें रामदासी उपदेशिलें ॥४॥ उपदेश देवोनि दिधला मारुती। स्वयें रघुपती निरवीता॥१॥ निरवितां तेणे झालों रामदास । संसारी उदास म्हणोनियां ॥२॥ म्हणोनि आमुचे कुळी कुळदैवत । राम हनुमंत आत्मरूपी ॥३॥ आत्मरूपी झाला रामीरामदास । केला उपदेश दीनोद्धारा ॥४॥ ________________

[११८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. ११८. रामदासांचे स्वचरित्रकथन. नमो अधिष्ठाता विष्णु मुख्य साधु । तेथूनियां बोधु विधीलागीं ॥१॥ विधीपासुनियां ज्ञान विधिसुता। तेंचि ज्ञान प्राप्त वसिष्ठासी ॥२॥ वसिष्ठे उपदेश केला रामचंद्रा। तोचि महारुद्रा हनुमंता ॥३॥ हनुमंत कलीमाजि चिरंजीव । झाले देव सर्व बौद्धरूप ॥४॥ बौद्ध नारायण होऊनी बैसला। उपाव बोलिला व्यासमुनि ॥ ५॥ व्यासमुनि बोले भविष्यपुराण। जग उद्धरणे कलीमाजी ॥ ६॥ कलीमाजी गोदातीरीं पुण्य क्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥७॥ अवतरे अभिधानी रामदास। कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥ ८॥ जगदुद्धारासाठी श्रीरामा सांकडें । केलें वाकोडें भक्तिपंथें ॥९॥ भक्तिपंथे मोठा केला श्रीरामाने। जंबू अभिधानें ग्राम तेथें ॥ १० ॥ तेथें ब्रह्मनिष्ठ अधिष्ठाता पूर्ण। सूर्य नामा जाण द्विजवर्य ॥११॥ ________________

१०] सांप्रदायिक. द्विजवर्य सूर्य जैसा तपोधन। अद्भुत विंदान झाले तेथें ॥ १२ ॥ झाली रामनवमी मध्य अष्टमीसी। अर्धरात्री त्यासी दूत आले ॥१३॥ दूत आले पुढे घालोनि चालिले। महाद्वारा आले भीम जेथें ॥ १४॥ भीमदेवालयी नेऊनी तयासी। तेथे उभयतांसी देखियेलें ॥ १५ ॥ देखियेलें राजपुत्र सूर्यवंशी। झापड नेत्रांसी पडे तेव्हां ॥ १६ ॥ पडे तेव्हां जसा दंडवत भूमी। मग अंतर्धामी बोलाविलें ॥ १७॥ बोलवूनि माथां ठेवी सव्य पाणी। मंत्र सांगे की रामनाम ॥ १८ ॥ नाम सांगुनियां तानमूर्ति रम्य । पहाभिश्रीराम दिधला तया ॥१९॥ तया दिला वर तुज पुत्र होतील। ध्वज उभारतील रामदास्यें ॥२०॥ रामदास्य झालें धन्य वंशोद्धार । बोलोनि सत्वर गैब झाले ॥ २१ ॥ झाला रामनवमी महोत्सव थोर । मध्यान्हीं सत्वर जन्म झाला ॥२२॥ १ लीला, करणी, २ मारुति. ________________

रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [ ११८ जन्म झाला झाला देव वंशा आले। उपासना चाले राघवाची ॥ २३ ॥ राघवाची भक्ति सुखाची विश्रांति।। पितयाची शांति झाली पुढें ॥ २४ ॥ पुढे ज्येष्ठबंधु न सांगेंचि कांहीं। सुखें देवालयीं निद्रा केली ॥ २५ ॥ निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी। तोचि मंत्र कानी सांगितला ॥ २६ ॥ सांगितला बोध रामीरामदासा। गुरूच्याहि वंशा निरोपिलें ॥२७॥ ११९. हनुमंत आमुची कुळवल्ली. हनुमंत आमची कुळवल्ली । राममंडपी वेला गेली। श्रीरामभक्तीने फळली । रामदास बोले ॥१॥ आमुचे कुळी हनुमंत । हनुमंत आमुचे दैवत । तयावीण आमुचा परमार्थ । सिद्धीतें न पवे की ॥२॥ साह्य आझांसी हनुमंत । आराध्य दैवत श्रीरघुनाथ ।। गुरु श्रीराम समर्थ। उणें काय दासासीं ॥ ३ ॥ दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देईल कोण। हे सोडोन आम्ही जन । कोणाप्रति मागावें ॥४॥ ह्मणोनि आम्ही रामदास । रामचरणीं आमुचा विश्वास । कोसळोनि पडो रे आकाश । आणिकाची वास न पाहूं ॥५॥ स्वरूपसांप्रदाय अयोध्यामठ । जानकी देवी रघुनाथ दैवत । मारुती उपासक नेमस्त । वाढविला परमार्थ रामदासीं ॥६॥ १ वाट. ________________

१२०] . सांप्रदायिक. . २०७ .१२०. "भीमरूपी स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती। वनारी अंजनीसूता । रामदूता प्रभंजना ॥१॥ महावळी प्राणदाता । सकळां उठवी बळें । सौख्यकारी शोकहारी। धूर्त वैष्णव गायका ॥२॥ दीननाथा हरीरूपा । सुंदरा जगदांतरा। पातालदेवताहंता। भव्य सिंदुरलेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा । प्राणनाथा पुरातना। पुण्यवंता पुण्यशीला । पावना परितोषका ॥ ४॥ ध्वजांगें उचली बाहो। आवेशे लोटला पुढे । कालाग्नी कालरुद्राग्नी । देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांड माईल नेणों । आवळे दंतपंगती। नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा । भ्रकुटी ताठिल्या बळे ॥६॥ पुच्छ तें मुर्डिलें माथां । किरीटी कुंडलें बरी। सुवर्ण कटि कांसोटी। घंटा किंकिणी नागरा ॥७॥ ठकारें पर्वता ऐसा । नेटका सडपातळू। चपळांग पाहतां मोठे। महाविद्युल्लतेपरी॥८॥ कोटिच्या कोटि उड्डाणें । झेंपाचे उत्तरेकडे। मंद्राद्रीसारिखा द्रोणू । क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥ आणिला मागुती नेला । आला गेला मनोगती। मनासी टाकिले मागें। गतीसी तुळणा नसे ॥ १०॥ १ सुंदर... ________________

. २०८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [६१२० अणूपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे । ब्रह्मांडाभोंवतें वेढे । वज्रपुच्छे करूं सके ॥ ११॥ . तयासी तूळणा कोठे। मेरु मंदार धाकुटे। तयासी तूळणा कैंची। ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥ . आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा। वाढता वाढता वाढे । भदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥ भूतप्रेतसमंधादि । रोगव्याधि समस्तही। नासती तुटती चिंता। आनंदें भीमदर्शने ॥१४॥ हे धरा पंधरा श्लोकी । लाभली शोभली भली। दृढ देहो निसंदेहो । संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥ रामदासी अग्रगण्यू । कपिकूळासि मंडणू। रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥ १६ ॥ १२१. छत्रसिंहासनी. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥ माझा मायबाप त्रिलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥ पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा॥३॥ स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडलें वर्म थोर भाग्ये ॥४॥ थोर भाग्य ज्याचें राम त्याचे कुळीं। संकटी सांभाळो भावबळे॥५॥ भावबळे जिहीं धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंभेना ॥६॥ विसंभेना कदा आपुल्या दासासी । रामीरामदासी कुळस्वामी ॥७॥ १२२. रामाचे दर्शन कव्हां होईल ?: । आज्ञेप्रमाणे परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥ आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥ १ आकाशं. २ सोळा. ________________

.. १२३ ] अभंग, पदें, वगैरे. .. २०९ आतां एकचि मागणे । कृपा करूनियां देणें ॥३॥ ज्याची दर्शनाची आशा । त्याची पुरवावी इच्छा ॥४॥ ऐक सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥ तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील जो साचा ॥६॥ गणना होतां तेरा कोटी । त्यासी भेटेन जगजेठी॥७॥ भय न धरावें मनीं। बहू बोलिलों म्हणुनी॥८॥ नलगे आसनी बैसावें । नलगे अन्नही त्यागावें ॥९॥ . येतां जातां धंदा करितां । जपसंख्या मात्र होतां ॥१०॥ तेरा कोटी गणना तेची। पापें निरसती जन्मांतरींची॥११॥ त्यासी देईन दर्शनें। तात्काळचि मुक्त होणे ॥ १२ ॥ ऐसा वर होतां जाण । दास झाला सुखसंपन्न ॥१३॥ १६. अभंग, पदें, वगैरे. । १२३. “ राघवाची कास न सोडी सत्य." जठरी लागो क्षुधा होत नाना आपदा। - भक्तिप्रेम कदा न संडी सत्य ॥१॥ शब्द न फुटे तरी चिंतीन अंतरीं। भक्तिपम परी न संडो सत्य ॥२॥. नानापरी आघात चिरकाल होत । . भक्तिप्रेमामृत न संडी सत्य ॥ ३ ॥ दाहूं वडवानळ अथवा दंशू काळ । भक्तिप्रेमबळ न संडो सत्य ॥४॥ आतांच हा देह राहो अथवा जावो। भक्तिप्रेमभावो न संडी सत्य ॥५॥ ________________

२१० [१२3. रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. म्हणे रामीरामदास वरीं पडो आकाश। राघवाची कास न सोडी सत्य ॥६॥ १२४. आतां तरी जाय जाय. आतां तरि जाय जाय जाय । धरि सद्गुरुचे पाय ॥ध्रु०॥ संकल्प विकल्प सोडुनि राहे । दृढ धरुनी पाय पाय पाय ॥१॥ .. नामस्मरण ज्या मुखिं नाहीं । त्याने वांचुनि काय काय काय ॥२॥ मानवतनु ही न ये मागुती। बरें विचारुनि पाहें पाहें पाहे ॥३॥ आत्मानात्मविचार न करितां । व्यर्थ प्रसवली माय माय माय ॥४॥ सहस्र अन्याय जरी त्वां केले। क्षमा करिल गुरु माय माय माय॥५॥ रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय खाय खाय ॥६॥ १२५. देव जवळ असून भेट नाही. देव जवळी अंतरीं । भेटी नाहीं जन्मवरी ॥१॥ मूर्ति त्रैलोक्यी संचली । दृष्टि विश्वाची चुकली ॥२॥ भाग्ये आले संतजन । झाले देवाचे दर्शन ॥३॥ रामदासी योग झाला । देहीं देव प्रगटला ॥४॥ १२६. एकही क्षण वायां न दवडितां देवाचें चिंतन, शिक जांभई खोकला । तितुका काळ व्यर्थ गेला ॥१॥ आतां ऐसें न करावें । नाम जीवीं तें धरावें ॥२॥ श्वास उश्वास निघतो। तितुका काळ व्यर्थ जातो॥ ३ ॥ पात्या पाते न लगत । तितुकें वय व्यर्थ जात ॥४॥ लागे अवचित उचकी । तितुकें वय काळ लेखी ॥५॥. म्हणे रामीरामदास । होतो आयुष्याचा नाश ॥ ६॥ ________________

२११ । की प्रसन्न होतो. . - १३० ] - अभंग, पदें, वगैरे. १२७. देवाचा वियोग नाहीं तो योग.. योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला येकायेकीं ॥१॥ येकायेकी येक त्रैलोक्यनायेक । देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥ चहूंकडे देव नित्य निरंतर । व्यापूनी अंतर समागमे ॥ ३ ॥ समागम मज रामाचा जोडला। वियोग हा केला देशधडी ॥४॥ देशधडी केला विवेके वियोग । रामदासी योग सर्व काळ ॥ ५ ॥ १२८. देव एकाएकी प्रसन्न होतो. आलभ्याचा लाभ आकस्मात जाला। देव हा वोळला येकायेकीं॥१॥ येकायेकी सुख जाहाले येकट । वर्थ खटपट साधनाची ॥२॥ साधनाची चिंता तुटली पाहातां । वस्तुरूप होता वेळ नाहीं॥ ३॥ वेळ नाहीं मज देवदरुशणा । सन्मुखचि जाणा चहूंकडे ॥ ४॥ चहूंकडे मज देवाचे स्वरूप । तेथें माझें रूप हारपलें ॥५॥ हारपले चित्त देवासी चिंतीतां । दास म्हणे आतां कोठे आहे ॥६॥ १२९. देवाचें सर्वत्र दर्शन. संताचेनि संगे देव पाठी लागे। सांडूं जातां मागें सांडवेना ॥१॥ सांडवेना देव सदा समागमीं । बाह्यअंतर्यामी सारिखाची ॥२॥ सारिखाची कडां कपाटीं सीखरीं । गृहीं वनांतरी सारिखाची ॥३॥ सारिखाची तीर्थी सारिखाची क्षत्रीं। दिवा आणि रात्री सारिखाची।४। सारिखाची अंत नाहीं तो अनंत । रामदासी कींत मावळला ॥५॥ १३०. राघवाच्या भेटीने अमृतत्व, बहु काळ गेले देवासी धुंडीतां । देव पाहों जातां जवळीच ॥१॥ जवळींच असे पाहातां न दिसे। संन्नीधची वसे रात्रदिस ॥२॥ रात्रदिस देव बाबअभ्यांतरीं । जीवा क्षणभरी विसंभेना ॥ ३॥ .. विसंभेना परी जीव हे नेणती ।जाती अधोगती म्हणोनियां ॥४॥ १ क्षेत्र. २ किंतु, शंका. ________________

_ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१३.. म्हणानीयां सदा सावध असावें। विमुख नसावें राघवेंसीं ॥ १ ॥ राम पूर्वपुण्ये जालीया सन्मुख । मग तो विमुख होऊ नेणें ॥६॥ होऊ नेणे राम सर्वांगें सुंदर । नित्य निरंतर मागे पुढे ॥ ७॥ मागे पुढे सन्मुखची चहुंकडे । भेटी हे निवाडें राधवाची॥८॥ राघवाची भेटी जाल्यां नाहीं तुटी । मग कल्पकोटी चिरंजीव ॥९॥ चिरंजीव होये राघवी मिळतां । तेथें पाहों जातां मृत्य नाहीं ॥१०॥ नाहीं जन्म मृत्य नाही येणे जाणे । स्वरूपी राहाणे सर्वकाळ ॥११॥ सर्वकाळ मन तदाकार होय । जरी राहे सोये श्रवणांची ॥ १२ ॥ श्रवणाची सोये संतांचेनि संगें। विचार विभागे अहंभाव ॥ १३ ॥। अहंभावें राम भेटला न जाये। जवळींच होये दुरी कैसा ॥१४॥ दुरी कैसा होये अहंभावें करी। जवळीच चोरी आपणासी ॥ १५ ॥ आपणासी चोरी सबाह्यअंतरीं । आणि सृष्टीभरी नांदतसे ॥१६॥ नांदतसे अंत नाही तो अनंत । जाणतील संत अनुभवी ॥१७॥ अनुभवी जाणे येथीचीये खुणे। ये वीटवाणे वाटईल ॥१८॥ वाटईल सुख संत सज्जनासी । रामीरामदासी भेटी जाली ॥१९॥ १३१. विठ्ठल व राम. एथे उभा कां श्रीराम । मनमोहन मेघश्याम ॥१॥ काय केले धनुष्यबाण । कर कटावरी ठेवून ॥२॥ काय केली सीताबाई । येथे राहीरखुमाई ॥ ३॥ काय केलें वानरदळ । एथे मेळविले गोपाळ ॥४॥ काय केली अयोध्यापुरी। एथे वसविली पंढरी ॥५॥ काय केली शरयूगंगा । एथे आणिली चंद्रभागा ॥६॥ रामदासी जैसा भाव । तैसा झाला पंढरिराव ।। ७ ॥ १ बाटेल. ________________

२१३ 1 .. F१३२] स्फुट प्रकरणे. १७ स्फुट प्रकरणं. --.:-- १३२. शक्ति व युक्ति. प्रतापगिरिचे ठाई । आदिशक्ती विराजते। कामना पुरती तेथें । प्रचीती रोकड्या जनीं॥ शक्तीने पावती सुखें । शक्ती नसतां विटंबणा। शक्तीने नेटका प्राणी । वैभवें भोगितां दिसे ॥ कोण पुसे अशक्ताला । रोगीसें बरॉडी दिसे। कळा नाहीं कांती नाहीं । युक्ती बुद्धी दुरावली ॥ साजिरी शक्ती तो काया। काया मायाची वाढवी। शक्ती तो सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥ शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने येत्न होतसे। शक्ती युक्ती जये ठाई । तेथें श्रीमंत धांवती॥ युक्तीने चालती सेना । युक्तीने युक्ती वाढवी। संकटी आपणां रक्षी । रक्षी सेना परोपरी॥ फित्व्याने बुडती राज्यें। खबर्दारी असेचिना। युक्ती ना शक्ती ना बेगी। लोक राजी असेचिना ॥ असो हे बोलणे जालें । युक्तीविण कामा नये। युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥ मुक्त केल्या देवकोडी । सर्वहि शक्तीच्या बळें। समर्थ भवानी माता । समर्था वरु दीधला ॥ १ दुकाळलेला. २ फितुरी. ३ त्वरित, वेगानें, ________________

रामदासवचनामृत- संकीर्ण ग्रंथ. [६११२ रामवरदायिनी माता। दासे धुंडुन काढिली। बोळखी पडिता ठाई । भिन्न भेड़ असचिना ॥ उदो उदो तुझा उदो । जाहला सचराचरौं । गोंधळ घातला देवीं । ब्रह्माविष्णुमहेश्वरी ॥ मातेसी काय चोरावें । सर्वही ठाउके तिला । उत्तीर्ण व्हावया नाहीं । तेची ते सचराचरीं ॥ बोलणे चालणे तीचें। देखणे चाखणे सदा।। आखंड खेळते आंगीं। प्राणीमात्रांचिये पाहा ॥ -रामदासांची कविता ४३६.२२-५७. १३३. देव व देउळे. . देहेदेवाळयामधे । पाहाणे देव तो बरा । देव सांडुनी देवाल्ये । वर्णिती सर्वही कवी ॥ दिसेना लोचनाला रे। घाला रे मन त्यामधे । येकला सर्व देवाली । गुप्त नाना परी वसे ॥ आनंत कोटि देवाल्यें । त्यामध्ये येकला प्रभु। दीपानें दिसेना नाहीं । त्याने त्यासचि पाहाणे ॥ उजेडे दिसेना नाहीं। आंधारें गुप्त होय ना। कदा हातासी लागेना । सर्वथा पूजीतां नये ॥ पूजीतां सर्व देवाल्यें । तेणें तो तृप्त होतसे। प्रतक्ष वर्ततें आतां । पाहा रे विवेकी तुम्हीं॥ देवाल्ये वर्णिती ज्ञाते । ते ज्ञाते नव्हती कदा । देव वर्णील तो ज्ञाता । ज्ञाने मोक्षची पावतो॥ ________________

१४] स्फुट प्रकरणे. मोडली जीर्ण देवाल्यें । तेंची लोकांसी मानती । भांडती देवळासाठीं। देव चुकोनि राहिला ॥ शरीरमात्र देवाल्यें । जीर्ण सांडुनी जातसे। नूतनें रम्य देवाल्थे । त्यामध्ये देव नाटकु॥ ठकु रे ठकु रे मोठा । ठकीतो जनमानवी। मानवी दानवी काया । काया माया पाहा बरी॥ थोर देवाल्य मुळींचें। ईश्वर जगदेश्वरु। देवदेव्या बहुरूपा । अर्धनारीनटेश्वर ॥ त्यापुढे तीन देवाल्ये । ब्रह्मा विष्णु महेश्वरु । तया अभ्यांतरी देवो । तो देव सत्य जाणिजे ॥ तोचि जो तो हा जाणा । नानां देवाळयांमधे। औतरे देवळामधे । त्यासी औतार बोलिजे ॥ आतां म्यां काये सांगावें । सांगावें त्या परमेश्वरा। अखंड अंतरी ध्यावें । जावें रे निश्चळाकडे ॥ .. __ -रामदासांची कविता ४३९. १-२२. १३४ गुरुशिष्यसंवादात्मक दासबोधाचा सॉलीव अर्थ. धैर्याचे आसन बळकट । आणि इंद्रिये वोढुनी सघट। धरे ऊर्ध्वपंथे वाट नीट । अढळपदी लक्ष लावी ॥१५॥ तैं मार्गाची करूं नव्हाळी। प्रथम घंटा नादाची नवाळ । दुसरी किंकिणीची मोवाळी। तिसरी अनुहत कोल्हाळ ॥१७॥ आतां अग्री लक्ष लावी । काय दिसेल ते न्याहाळीं। चंद्रज्योती प्रकाशली। विभु बांधिला बळकट ॥ १८ ॥ १ अवतार घेतो. ________________

२१६ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. [१37 तें सुख अंतरीं घेऊनी। पुढे चाल करी संगी। तेथे विजु ऐशा कामिनी । चमकताती सुवर्णरंग ॥ १९ ॥ तेहि जाणोनि मागें सारी । पुढें सूर्यबिंब अवधारी। ज्वाळा निघती परोपरी। दंडळू नको कल्पांतीं ॥२०॥ अनंतभानु तेज अद्भुत। खदिरांगार ज्वाळा उसळत। धारिष्ट तेथें न निभत । दुर्घट विभु तेथींचा ॥ २२ ॥ तेथें हुशारीचे काम । अनी लक्ष घालूनि नेम।। तीर लावून सुगम । मागें सारी सूर्यातें ॥ २३ ॥ पुढे दिसेल जें नवल । ते पाही हंसमेळ। चंद्रकिरण शीतळ । पाहसी तूं मम वत्सा ॥ २४ ॥ तेव्हां मागील दाह शमेल । शीतलाई सर्वांग होईल। चंद्राची प्रभा सुढाळ । फडफडीत चांदणे ॥ २५ ॥. तोचि डोळियाचा डोळा पाही। देहातीत वर्म विदेही। चिन्मय सुखाची नवाई । भोगी आपुलें की गा॥ २६॥ अनुभवाची शीग भरली। आग्रापरी उसळली। भूमंडळी प्रभा पडली । कर्पूरवर्ण नभ झालें ॥ २७ ॥ तया मध्यभागी सघन । अढळ पद दैदीप्यमान। उर्वरित ब्रह्म जाण । ध्रुव बैसला अढळते ॥२८॥ ते तुझें स्वरूप नेटबोटें । जेथें समस्त जाणणे आटे। ऐके जालासि धिटे । बळकटपणे बलाढ्य ॥२९॥ ऐसें सुख योगियां लाधलें । तेव्हां देहाचे मरण गेलें। सांगणे ऐकणे मुराले । एकत्वपणे एकचि ॥३०॥ - सॉलीव अर्थ १५-३०. ... ________________

- १३५] स्फुट प्रकरण... १३५. श्रीसमर्थकृत पांगळ. भरत गा खंडामाजी । शरयूतीर बा गांव । धर्माचें नगर तेथें। राज्य करी रामराव । पांगुळां पाय देतो। देव जानकीचा नाथ । जाईन मी तया ठायां । देवा उत्तम तो ठाव ॥१॥ राघवाचा धर्म जागो । (सर्व) अधर्म भागो। अज्ञान निरसोनियां । विज्ञानी लक्ष लागो ॥ध्रु०॥ मीपणाचे मोडले पाय । ह्मणउनि पांगूळ जालों। तूंपणाची कीर्ति देई । ऐकोनियां शरण आलों। मीतूंपण निरसी माझें । भजनभिंतीवरि बैसलों। प्रेमफडकें पसरोनियां । कृपादान मागों आलों ॥२॥ जनीं येक तूंचि दाता । म्हणुनि आलों मागावया । मागणे निरसें जेणें । ऐसें दे गा रामराया। नवविधा दुभतें देई । भावहलगा बैलावया ॥ . ज्ञानकाठी देई करीं। वैराग्यवोल पांघराया ॥३॥ दासीहाती देवविसी। तें मी नेधे सर्वथा। द्वैतदान ने जाण । दोन वेळे. आणीतां। अपूर्णता देऊं नको । पूर्ण करी निकामता। आपणा ऐसें दान तेई । तूं तरी इच्छेचा दाता ॥४॥ तुझे कृपेचा कांबळा देई । मज पांगुळाकारणें । माया मोहो हींव वातें । तें हें निवारें जेणें । निस्काम भाकर देई । कामक्षुधा हरे जेणें। बोधाचें ताक पाजीं। शब्द खुंटे धालेपणे ॥ ५॥ - । ________________

२१८ रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ. १६ १३५ रामदास पांगुळासी। राम दीधलीयां दान । घेणेचि निरसलें । कैंची मागण्याची खूण । देणे घेणे निरसोनीयां । पूर्ण केले परीपूर्ण । दाता ना याचक तेथें। सहजीं सहज संपूर्ण ॥६॥ -विविधविषय २.८९. .. . .. . . . . समाप्त. DelhiDOE M ________________

Central Archaeological Library, NEW DELHI 35830 Call No. 891.4611 Kaud Ran. Author Kanade, Rob. hamadasavacana mrit Book No: 4 Inata of Toma I Date of Return “A book that is shut is but a block" ; CHAEOLOGIC RAL ARCH CENTRA GOVT. OF INDIA Department of Archaeology NEW DELHI.

  • LIBRARY

Please help us to keep the book clean and moving. S. B., 148. N: DELHI.