म्याऊं - म्याऊं - म्याऊं ! (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> .... देवा ! माझीं पिलें भुकेनें कशीं व्याकूळ रे झालीं आहेत ! तीन वाजून गेले, पण अजून यांच्या पोटांत, घासभर कीं रे अन्न केलें नाहीं ! बाळांनो ! उगी, नका रडूं ! मी पुनः खालीं जातें - अगदी हलूं नका. या गलथ्यांतच अमळ एकमेकांशी खेळत बसा ! - स्वयंपाकघरांत जातें, आणि कांहीं उष्टें अन्न पडलें असेल, तें माझ्या बाळांकरितां घेऊन लवकर येतें ! जाऊं ? - आज घरांत येवढें काय आहे ? काय सांगूं तुम्हांला ! मुलांनो, आज किं नाहीं माझा वाढदिवस - माझ्या पूर्वजन्मीच्या मनुष्यदेहाचें वर्षश्राद्ध आहे ! खरें म्हटलें, तर हें माझेंच घर - हीं माझींच मुलें, - पण या घरांतल्या मुलांना काय ठाऊक कीं, मी त्यांचीच आई आहें म्हणून ! त्यांना वाटतें - त्यांनाच काय ? - सर्व जगाला वाटतें की, आपले सगळे पूर्वज स्वर्गाला जातात म्हणून ! पण किती तरी ठिकाणी, मनुष्यदेहाचें जीर्ण वस्त्र फेंकून देऊन पशुपक्ष्यांचें कातडें अंगावर घेऊन आम्ही ! - आम्ही आपल्या मुलांलेंकरांभोंवती प्रेमानें वावरतों, त्यांची सेवा करतों - आणि उलट त्यांच्या लाथाबुक्क्यांचे - चाबकांचे - तडाखे सोशीत धाय मोकलून रडत कीं रे असतों ! पण बाळांनो, जगाला निव्वळ देह - कातडें - माती ! - प्रिय आहे ! आत्म्यावर जगाचें खरें प्रेमच नाहीं ! जोंपर्यत मी मनुष्यदेहानें नटलें होते, तोंपर्यंत ही घरांतली माझींच मुलेंलेंकरे कशीं मजवर प्रेम करीत होतीं ! पण मी मांजर होऊन घरांत फिरुं लागल्यापासून, मला कोणी जवळसुद्धां उभें राहू देत नाहीं ! देवा ! आज माझाच वाढदिवस, आणि मलाच का रे अन्न - पानांतलें घासभर उष्टें अन्नसुद्धां मिळूं नये ! पण या घरांतल्या मुलांना तरी काय ठाऊक कीं, मी त्याचीच आई आहें ? तसें असतें तर मघाशीं मी नुसती स्वयंपाकघरांत डोकावलें मात्र, तोंच ' रांडे ! नीघ ! ' असें म्हणून माझ्या वेणूनें - प्रत्यक्ष माझ्या लेंकीनें ! - ताडकन् माझ्या डोक्यांत लाटणें फेंकून कशाला बरें मारलें असतें ! - बाळांनो ! नका रडूं ! मी आतां खाली जाऊन येतें !.....

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
Question Copyright 2.png
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.