माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो...
शरद जोशी यांच्या २९ भाषणांचा हा संग्रह. पिंपळगांव बसवंत येथील १९८१च्या भाषणापासून ते परभणी येथे जानेवारी २००९ मध्ये केलेल्या कार्यकारीणीतील भाषणापर्यंत २८ वर्षांतील वैचारीक मांडणी यात समाविष्ट आहे. शरद जोशींचे सर्व लिखाण ग्रंथरूपात उपलब्ध करून देण्याच्या योजनेत आत्तापर्यंत नऊ पुस्तके आम्ही प्रकाशित केली. हे दहावे पुस्तक शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात वाचकार्पण करताना समाधानाची भावना आहे.
टीकाकारांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे, की त्यांनी किमान हे लिखाण वाचून मग टीका करावी. शरद जोशींनी भूमिका बदलली, नव्वद नंतरचे शरद जोशी आम्हाला मंजूर नाहीत, अशी अतिशय अप्रस्तूत टीका त्यांच्या टीकाकारांनी केली आणि आजही करतात. त्यांच्यासमोर हे सर्व लिखाण आम्ही ठेवीत आहोत. निदान आतातरी लिखाण उपलब्ध नसल्याच्या तक्रारीला संधी नाही. शेतकरी संघटनेचा विचार हा स्वतंत्रतावादी विचार आहे इतकी साधी भूमिका समजून घेतली तरी नव्वदच्या आधीचे शरद जोशी व नंतरचे शरद जोशी अशी विसंगती टीकाकारांच्या लिखाणात व बोलण्यात येणार नाही.
शेतकरी संघटनेच्या विचारांवर आक्षेप नोंदवणाऱ्यांना या निमित्ताने आम्ही नम्र विनंती करू इच्छितो, की त्यांनी त्यांची मांडणी लेखी स्वरूपात आमच्याकडे द्यावी. हे सर्व लिखाण अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथरूपात प्रसिद्ध करण्यास आम्ही तयार आहोत. सामान्य शेतकऱ्यांनी विचारांचे खुले व्यासपीठ म्हणून शेतकरी संघटनेचा उपयोग केला. पुरोगामी महाराष्ट्रातील विद्वानांनीही या व्यासपीठावर आपले विचार मांडावेत. वैचारिक खुलेपणाची परंपरा हे शेतकरी संघटनेचे वैशिष्ट्य आहे.
शरद जोशींच्या सर्व पुस्तकांना सामान्य वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. शरद जोशींनी आमच्या प्रकाशनावर टाकलेल्या विश्वासाची ही पावतीच आहे. 'समग्र शरद जोशी' मालिकेतील उर्वरीत चारही पुस्तके शेगांव येथील मेळाव्यापर्यंत (१० नोव्हेंबर २०१०) आम्ही प्रकाशित करीत आहोत.
| १ | भक्ती, युक्ती, शक्ती आणि तीन वर्षांत मुक्ती | ०७ |
| २ | सौराज्य मिळवायचं औंदा | २५ |
| ३ | बळिराजाचा पुनरुत्थानाचा कार्यक्रम | ३१ |
| ४ | अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी | ३८ |
| ५ | आता हवी नवी हत्यारे आणि नवी व्यूहरचना | ४५ |
| ६ | नव्या लढाईची घोषणा | ६४ |
| ७ | दुसऱ्या गणराज्याचा अर्थात, बळिराज्याचा ओनामा | ६९ |
| ८ | शेतकरी संघटनेच्या विचाराची वाटचाल | |
| कांद्याच्या भावापासून बळिराज्यापर्यंत | ८५ | |
| ९ | बळिराज्यातील कृतिकार्यक्रम | ९१ |
| १० | आमचे आम्ही मालक | ९८ |
| ११ | युग आहे उद्योजकवादी संस्कृतीचे | १०६ |
| १२ | चला, दंडबेड्या तोडून टाकू | १२५ |
| १३ | नुसता नवा जोम नव्हे, नवी रणनीती हवी | १३३ |
| १४ | राज्य आले ठग पिंढाऱ्यांचे | १४२ |
| १५ | वाघाचा जन्म वाघासारखं जगा | १५० |
| १६ | सांगली-मिरज अधिवेशनाची विषयपत्रिका | १५७ |
| १७ | गुलामगिरीकडे आता पुन्हा जाणे नाही | १६५ |
| १८ | सरकारला वगळून शेती हाच पर्याय | १८१ |
| १९ | नांगर मोडून तलवार घ्या हाती | १९१ |
| २० | चला, हत्यारे परजून घेऊ या | २०२ |
| २१ | रुप्याचा दिवस म्या आनंदे पाहिला | २१० |
| २२ | शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा - | |
| नेहरू आणि त्यांच्या वंशावळीचे पाप | २२५ | |
| २३ | रणनीती एकारलेली नव्हे, चौफेर हवी | २३९ |
| २४ | स्वातंत्र्यासाठी 'पोशिंद्यां'चा संग्राम | २४८ |
| २५ | शेतकरी संघटना लोकांची गर्दी नव्हे, विचार आहे | २५८ |
| २६ | शेतकरी आंदोलनाची आगामी दिशा | २६७ |
| २७ | निमंत्रण औरंगाबाद अधिवेशनाचे | २८४ |
| २८ | औरंगाबाद ज्ञानयज्ञायी फलनिष्पत्ती | २९८ |
| २९ | रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना | ३१० |